जगातील सर्वात मोठी स्वयंभू शाळीग्राम नरसिंह मूर्ती,भारताचे मुलतान: कोळे नर्सिंगपूर:

अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।
जगातील सर्वात मोठी स्वयंभू शाळीग्राम नरसिंह मूर्ती,भारताचे मुलतान: कोळे नर्सिंगपूर:$#¡v@π√∆¥ dr$@π√∆¥ 
drsanjayhonkalse.blogspot.com


drsanjayhonkalse@gmail.com
    ।।शिव संकल्पमस्तु।।
यदा पुनस्तदा भक्त्या तपः कर्तुं पराशरः |
नारसिंहं तदा ध्यायन् कृष्णा तीरे मुनीश्वरः |
भारतात अनेक नृसिंह स्थाने आहेत.त्यात भारताचे मुलतान म्हणून प्रचलित असलेले ज्वलंत म्हणजेच ज्वाला नृसिंहमूर्ती असलेले कोळे नर्सिंगपूर हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील स्थान.
यास मुलतान,जे सध्या पाकिस्तानातं आहे जिथे नरसिंहदेव प्रकट झाले,म्हणण्याचे कारण म्हणजे हि मूर्तीहि नरसिंहासारखीच स्वयं प्रकटीत आहे .
कोळे नारसिंहपूर हि व्यासपीता पराशर यांची तपस्थळी आहे .हि इ.स. पूर्व ५५६१ ची घटना आहे - महाभारत पुर्वकाळ वेद व्यास पिता पराशर ऋषीं कृष्णा नदीकाठी तप करीत असताना हि मूर्ती प्रकट झाली तीच हि ऋषींना दर्शन दिलेली स्वयंभू मूर्ती प्रत्यक्ष भुयारात आहे.
  या मूर्तीतील परमेश्वराचे स्वरूप फारच प्रभावी,आनंद दायी आहे.मूर्तीमध्ये हिरण्य कशपू राक्षसाला घट्ट धरुन 16 शस्त्रे असलेले नरसिंहस्वामी दिसतात.
एका पायावर उभे असलेले परमेश्वराचे हे ज्वलन्तरूप प्रभावी सोळाहजार वर्षांपासून भक्तांचे रक्षक व हितकारक आहेत.या देव तांशी संबंधित स्थानिक परंपरेचे संकलन कृष्णमहात्म्य या पुस्तकात केले गेले आहे.  परमेश्वराच्या डाव्या तळाशी भक्त प्रल्हादा चे रूप दिसू शकतं,बाजूस देवी महालक्ष्मी आहेत,तर त्यांच्या उजवीकडे देवी विष्णूचे वाहन गरुड  व देवी आहे.त्याच्या हातावर "बाजुबंध"सारखे विविध दागिने व त्याला अधिक सुंदर बनविणारे रिंग्ज दिसतात. मूर्तीच सौंदर्य वर्णनातीत आहे.त्यासाठी आपल्याला दर्शन घेऊनच नरसिंहाच्या या स्वरूपाचा सुगंध अनुभव घेऊन धन्य झालं पाहिजे.भगवान नरसिंहाच्या रूपाभोवतीच भगवान श्रीकृष्णाचे दहा अवतार प्रसिद्ध दशावतारांची अप्रतिम कोरीव कामं होती.
 स्थानिक परंपरेनुसार भगवान नरसिंहदेव पराशर मुनींच्याभक्तीने प्रसन्न झाले व सोळा हातांनी अद्भुत स्वरुपात प्रकट झाले.  हिरण्यकशश्यापुची हत्या करताना देवाने हेंच धगधगणार रूप धारण केला होतं.
 हे भयंकर प्रज्वलित स्वरूप कोणालाही पृथ्वीवर स्थापित करणे शक्य नाही हे पाहून,भगवानांनी पराशरमुनि यांना कृष्णा नदीत विसर्जित करण्याचा आदेश दिला.  जड मनाने,पराशर ऋषींनी पाण्यात मूर्तीचे विसर्जन केले.
 शतकानुशतके नंतर, इ.स. १७५ च्या सुमारास,अंजना नावाच्या खेडुत राहणाऱ्या ब्राह्मण दांपत्याला ऋषींनी अंध व मुका होण्याचा शाप दिला होता.माफी मागित ल्यावर,ऋषींनी त्यांना उशाप देऊन मुक्त होण्यासाठी भगवान नरसिंहांची तपस्या करण्याचा सल्ला दिला.बारा वर्षांच्या कठोर तपानंतर,देव त्यांच्या स्वप्नांमध्ये प्रकट झाले, त्याने त्यांना आता पृथ्वीवर स्वत: ला देवता म्हणून स्थापित करावे अशी इच्छा व्यक्त केली व त्याला नदीतून बाहेर काढण्यासाठी भीमदेव नावाच्या स्थानिक राजाकडे जाण्यास सांगितले. तो पाण्याखाली आहे हे अचूक स्थान कसे मिळेल हे विचारले असता,प्रभुने त्यांना कोरडं कुश गवत नाल्यात ठेऊन गवत जळत असलेल्या जागेखाली त्यांना मूर्ती सापडेल असे सांगितले.स्वप्नात परमेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर त्या जोडप्याने त्वरित पुन्हा दृष्टी व बोलणी मिळविली व राजाला सांगितले.
या दाम्पत्याची विनंती ऐकून राजाने देव मूर्ती शोधण्यासाठी आपल्या नोकरांना पाठविले.भगवानांनी निर्दिष्ट केलेल्या प्रक्रियेनुसार नदीत शोध घेता घासांच्या एका ब्लेडला आग लागली व परमेश्वराचे आश्चर्यकारक सोळा हाताचे रूप नदीच्या खोल भागातुन सापडले.राजा भीम देव यांनी या मूर्तीची स्थापना इ स पूर्व 175 ला केली.
 मूर्तीची तपासणी केल्यावर दिसले की, हिरण्यकश्यपु राक्षस मारण्यासाठी  देव डावा पाय उंच ठेवून मांडी घातलेला आहे. राक्षसाचा डावा बाहू धरुन त्याला पळण्या पासून रोखू शकत होता.त्याचा दुसरा पाय हिरण्यकशिपूच्या दारात ठामपणे ठेवलाय.
 
मंदिराला दोन मुख्य दरवाजे आहेत - एक उत्तर बाजूला आणि दुसरे पूर्वेकडील.  पूर्वेकडील प्रवेशद्वारातून सामान्यतः प्रवेश केला जातो.देवता जमिनीच्या खाली १ फूट अंतरावर आहे.तेथे जाण्यासाठी पायर्‍या उतरून अरुंद बोगद्यातून जावे लागते. त्यातील बरेचसा भाग  जवळच्या कृष्णा नदीच्या अनेक इंच पाण्याच्या खाली आहेत.
थोडक्यात मंदिराचा गर्भगृह बाहेर असले ल्या दक्षीण वाहिनी कृष्णाच्या स्तराखाली ल डोहात आहे हे सहजासहजी लक्षांत येणे कठीण जाते.या पावन,पवित्र,व शक्तीस्रोत असलेल्या मंदिरात मी "शिवंजय"संजय १९८६ साली प्रथम दर्शन घेऊ शकलो. आम्ही साधारण 150 जण होतो,त्याचवेळी हे रूप मला भूल घालून गेले.त्या नंतर बऱ्याHचदा जाणं झाले.या वर्षी फेब्रुवारीत इथे गेलो असता श्री नृसिंह सेवा प्रित्यर्थ, पवमान युक्त लघु विष्णूयाग,वा उग्र नरसिंह  याग सेवा रुजू व्हावी अशी तीव्र इच्छा झाली.मंदिर विश्वस्त श्रीमती आशाआत्या कुलकर्णी,दिलीप कुलकर्णी यांची मदत घ्यायचा योग आला.आशाआत्या माउलींनी ती उचलून धरली.तेथीलच अनंत दीक्षित गुरुजींना अनेकवार फोन केले पण ते एक तर बिझी असल्याने फोन उचलत नसत,वा तेथील नेटवर्क weak असते .मग सातारा येथील गोविंदशास्त्री गुरुजी व आमचे वाडी तील जेष्ठ मार्गदर्शक वेदशास्त्री अवधूत शास्त्री बोरगावकर यांनाही विचारले .4 एप्रिल वा 1 मेंस  करण्याचे योजिले देखील पण कोरोना महामारीने आडकाठी केली . नरसिंह भगवंत लवकर सेवा करवून घेवोत हिच त्यांच्या चरणी प्रार्थना .
हे स्थान स्वयंभू व ज्वलन्त तर आहेच पण याउपर येथे अनेक संत माहत्मे येऊन गेल्याच उल्लेख आहे.जसे:
  मंदिर संकुलामध्ये श्री सिद्धेश्वर महाराजा नावाच्या सिद्ध महात्माची चित्रकला आणि समाधी आहे.
इ.स. ११२४ - संत शिरोमणी नामदेव महाराजांचे ६वे पूर्वज यदुशेठ, रिळे गावातून देवाच्या सेवेसाठी आले होते. ३,४ पिढ्या इथे राहिले. नामदेवांच्या जन्म आधी ते परत गेले.
तसेंच इ.स.१२७३ - रामदेवराव यादव, देवगिरी यांनी हेमाद्री पंताकडून मंदिराचे भुयारीमार्ग बांधकाम केले.
 इ.स. १४२६ - विजापूरचा बादशाह महम्मद आदिलशाह यांनी मागे चालत आलेप्रमाणे श्री नृसिंहास जमीन इनाम दिली त्यावेळेपासून पुजाऱ्यांच्या १७ पिढ्यायेथे सेवा करीत आहेत.
इ.स. १४४९ - श्री गुरुचरित्र, अध्याय १५ , ओवी ७५ मध्ये या क्षेत्राचा उल्लेख आहे.
इ.स. १६६२ - श्री समर्थ रामदास स्वामी यांनी २,३ वेळा इथे श्रींचे दर्शनासाठी येऊन आरती रचना केली. 
इ.स. १७१८ - सातारचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांनी अग्रहार जमीन इनाम दिली. 
इ.स. १७७८ - श्री सिद्धेश्वर बुवा महाराज, कोल्हापूर संस्थानचे राजगुरू यांनी पुजारी मंडळीवर होण्यारा अन्यायाबाबत दावा नाना फडणीस, पुणे यांचेकडून विजयी केला.
 तसेंच तात्या टोपे यांचे बंधु इथे रात्री 2 वाजता पूजेस येतात,ते चांगले उंच पुरे,धष्ट पुष्ट आहेत.त्यांना सेवा करताना आमचे स्नेही व मंदिराचे विश्वस्त श्री दिलीप  कुलकर्णी यांनी 2020 साली मला सांगितले .
असे हे,जगात सर्वात मोठी शाळीग्राम मूर्ती जी स्वयंभू आहे ,स्थान प्रत्येकाने भेट द्यावे असे आहे .
भगवंताची केवढी करुणा कि माझ्या सारख्या पामरास इथे अनेकवार दर्शन सेवेचा योग्य आला,श्रींनी याग सेवाहि लवकर करवून घ्यावी .
इदं न मम।
$@π√∆¥ #
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4610054052343569&id=100000170606055

Comments

  1. Tumchi sata janmachi punnyai phalas ali,adhyatmik kshetratil tumchi garud bharari pahun kadhi elda tumchi bhet ghetoy ase zale ahe

    ReplyDelete
  2. तुम्ही खूप भाग्यवान आहात़

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया