श्रीदत्त संप्रदाय व श्रीनृसिंह अन्योन्य-संबंध:

अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।

श्रीदत्त संप्रदाय व श्रीनृसिंह अन्योन्य-संबंध:'
'$#¡v@π√∆¥' dr $@π√∆¥ 
          ।।शिव संकल्पमस्तु।।
भगवान नरसिंह यांचा अवतार कृत युगातील आहे .नरसिंह भगवान सध्या पाकिस्तानात असलेल्या मुलतान जे नरसिंह प्राकट्य स्थान म्हणून मूळस्थान म्हणून ओळखले जाते.
नारसिंह अवताराच्या आधी दत्त अवतार झाला व नंतरच्या रामावतारात विष्णू भगवंताने लवणासुराचा वध केला  नारसिंह रूपांत त्याला दर्शन दिले .राम जन्मी भगवंतांनी दंडकारण्यात वास केला होता व नंतर भारत यात्रा नीरा नर्सिंगपूर या नरसिंह स्थानापासून सुरुवात केली.
दत्त अवतार हा त्रिदेव अवतार असला तरी ब्रह्मा व शिव यांनी आपले अस्तित्व विष्णू रूपात विलीन करून नारायणास दत्तरूपाचे प्रतिनिधित्व दिले .
याअर्थी नरसिंह व दत्त देवात साम्य जाण वतं.एवढंच नाही तर इतर काही बाबीत नरसिंह व दत्त यांत विलक्षण साम्य दिसते. जगद्गुरु भगवान श्रीनृसिंह व जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभू यांचा फार जवळचा ऋणानुबंध आहे हे लक्षांत येते,म्हणचे दत्त संप्रदाय व नारसिंह संप्रदाय यात विलक्षण, विस्मयांकीत,अलौकिक साम्य आढळते.
बरोबरच आहे कारण  यांचे  (दोघांचेच नव्हे तर तिन्ही देवतांचे रूप ,अवतार व कार्य) कार्यही एकच आहे ना,जे आपण इथे शेवटपर्यंत व शेवटी  जरूर सिद्ध करू.

भगवान श्रीनृसिंह व दत्त दोन्ही देवता पुराण कालापासूनच खूप प्रसिद्ध आहे. श्रीनृसिंहांची अनेक स्थानेही जुन्या काळापासून भरभराटीला आलेली आहेत.तसेच दत्त स्थाने भारतभर आहेत  नृसिंह उपासना  व दत्तोपासना दोन्ही समाजाच्या सर्व थरांमध्ये पोचलेली पाहायला मिळते. 

 श्रीनृसिंहदेव हा अवतार श्रीदत्त संप्रदाया मध्येही खूप मानला व उपासला गेलेला दिसून येतो.
याच प्रमाणे दत्त संप्रदाय  नारसिंह उपासना मान्य करतो.
श्रीदत्त संप्रदाय व श्रीनृसिंह भगवंतांचा अन्योन्य-व विविधांगी संबंध आहे.

भगवान श्रीनृसिंहांचा अवतार शनिवारी झाला,म्हणून श्रीनृसिंह उपासनेत शनिवार हा मुख्य वार मानतात.कलियुगातील द्वितीय दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मवार शनिवारच आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाडीची वारी ही शनिवारचीच मानतात.  श्रीगुरुभक्त यांनी "सावळा सद्गुरु तारू मोठा रे..।" या वाडी नित्यक्रमातील सुप्रसिद्ध पदात असा उल्लेख आहे की "द्वादशी शनिवार करिता वारी पाडवा ।" पूर्वी दत्त संप्रदायातही गुरुवारपेक्षा शनिवारलाच अधिक महत्त्व होते, हे यावरून कळते. नंतरच्या काळात हे महत्व वळते झाले असावे. 

भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंची व भगवान श्रीनृसिंहांची जन्मवेळ ही देखील एकच, सूर्यास्ताचीच आहे. 
तसेच दोघांचाही जन्म शुक्लपक्षाच्या शेवटीच चतुर्दशी( वैशाख) व पौर्णिमेला (मार्गशीर्ष) झालेला आहे.
आणखीन एक म्हणजे दोन्ही अवतार प्रकट झाले अवतार आहेत .म्हणचे राम ,कृष्ण ,परशुराम यांच्यासारखे योनिज अवतार नव्हेत तर अयोनिज अवतार आहेत.
 कुमसी येथे  नरसिंह सिंहसरस्वतींनी  त्रिविक्रमयास वैशाख शु दशमीस विराट रूप दर्शन दिले.त्याच प्रमाणे भागवत पुराणातील सातव्या स्कंधात भक्तश्रेष्ठ प्रल्हादजींना भगवान श्रीदत्प्रभूंनी अवधूतवेषात आत्मस्वरूपाचा उपदेश केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे भगवान श्रीदत्तप्रभू हे श्री प्रल्हादांचेही श्रीगुरूच होत. 
आणि आपल्यास अचंभा वाटेल श्री दत्तदेवानी हा आत्मबोध कुठे केला माहित आहे? हा उपदेश औदुंबर वृक्षाखाली केला. आणि या औदुंबर वृक्षाचा सरळ संबंध नरसिंह रुपाशी आहे .म्हणचे नरसिंह भगवंत वैशाख शु चतुर्दशीस ज्या खांबात प्रकट झाले तो खांब औदुंबर वृक्षाचा होता.
त्याच खांबास हिरण्यकश्यपू वधानंतर पालवी फुटली.व त्या वृक्षाचीच  प्रल्हाद नियमित पणे पूजा करीत.त्यांना औदुंबर वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या श्रीदत्तप्रभूंनी आत्मबोध केला होता.  त्याच वेळी त्या औदुंबरवृक्षानेही मनुष्यरूपाने प्रकट होऊन भगवान श्रीदत्तप्रभूंना आशीर्वाद मागितल्यावर त्यांनी, "तुझ्याठायी मी सूक्ष्मरूपाने अखंड वास करीन व कलियुगातील अवतारात तुझ्यातून प्रकटलेल्या भगवान नृसिंहांचेच नाव मी धारण करीन !" असा आशीर्वाद दिला. 
हिरण्यकश्यपूच्या विषयुक्त रक्तामुळे नखांचा होणारा दाह, (इथे हे हि लक्षांत घ्यावे कि नृसिंह चा क्रोद्धग्नि दाह शिवाने शरभ अवतार घेऊन शांत केला) भगवती लक्ष्मीमातेने आणलेल्या औदुंबराच्या फळांमध्ये नखे रोवल्याने शांत झाला. म्हणून औदुंबर वृक्षाला भगवान श्रीनृसिंहांनी भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. औदुंबराला भगवान श्रीनृसिंहांनीच "सदा फळित तू होसी ।" असा कल्पवृक्ष होण्याचा आशीर्वादही दिलेला आहे. तसेच, "आम्ही लक्ष्मीसह निरंतर तुझ्याखाली वास करू", असाही वर दिलेला आहे. तोच वर त्यांनी श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या रूपाने पूर्ण केलेला दिसून येतो असे एका ओवीत(१९.२८) श्रीगुरुचरित्रकार म्हणतात,.
श्रीनृसिंह दैवताचे प्रेम म्हणूनच कलियुगातील या द्वितीय अवतारामध्ये भगवान श्रीदत्तप्रभूंनी स्वत:ला "नरहरि" किंवा "नृसिंह सरस्वती" असेच नाम धारण केलेले दिसून येते.

श्रीदत्त संप्रदायातील वेदतुल्य मानलेल्या श्रीगुरुचरित्रातील चार हकिकतींमध्ये श्रीनृसिंहांचा उल्लेख येतो. 
अ)भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी गोदावरीची तटाकयात्रा करीत असताना, मंजरिका क्षेत्री राहणा-या श्री माधवारण्य नामक संन्यासी भक्तावर कृपा केल्याचा उल्लेख तेराव्या अध्यायात येतो. हे माधवारण्य श्रीनृसिंहभक्त होते व त्यांना स्वामींनी नृसिंहरूपातच दर्शन दिले होते. तसेच, 'मानसपूजेतील नृसिंहमूर्ती प्रत्यक्ष होईल', असा आशीर्वादही दिला होता. 

ब)पंधराव्या अध्यायात भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या शिष्यांना पवित्र तीर्थक्षेत्रांची माहिती सांगितलेली आहे. त्यात गाणगापूरच्या भीमा-अमरजा संगमावरील कल्पवृक्ष अश्वत्थासमोर "नृसिंहतीर्थ" असल्याचा उल्लेख आलाय. त्यानंतर कृष्णाकाठावरील कोळे नृसिंहपूरच्या श्रीज्वालानृसिंह भगवंतांचाही श्रीस्वामी महाराज आवर्जून उल्लेख करतात. पुढे पश्चिम महाराष्ट्रातील भ्रमणात ते स्वत: देखील या स्थानी येऊन मग पुढे औदुंबरकडे गेले होते. 
क)एकोणिसाव्या अध्यायात औदुंबर वृक्षाचे माहात्म्य व श्रीदत्तप्रभूंचे त्यावरील विशेष प्रेम कथन करताना पुन्हा भगवान श्रीनृसिंहांचा उल्लेख येतो. 

येथे श्रीगुरुचरित्रकार सरस्वती गंगाधर, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींना स्पष्टपणे नृसिंह-अवतार म्हणतात. या आधीच्या ओवीत गुरुचरित्रकार फार महत्त्वाचा संदर्भ सांगतात की,सरस्वती गंगाधर या ओवीत स्पष्ट सांगतात की, भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज "नृसिंह मंत्र उपासना" करत होते. तसेच नृसिंह अवताराप्रमाणेच उग्रत्वाची शांती करण्यासाठी ते नित्य औदुंबरवृक्षाखाली वास करीत असत.

ड)चोविसाव्या अध्यायात श्रीत्रिविक्रम भारतींचा प्रसंग आहे. हे थोर संन्यासी देखील श्रीनृसिंह भक्तच होते. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी स्वत:हून कुमसी गावी गेले होते. त्यावेळी त्यांनी श्री त्रिविक्रम भारतींना मानसपूजेत नृसिंहरूपातच दर्शन दिल्याचा उल्लेख येतो.

श्रीक्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण मठात आज श्रींच्या निर्गुण पादुका आहेत. तेथेच चोवीस वर्षे स्वामींचे वास्तव्यही होते. त्या पादुकांच्या खाली एक तळघर असून त्या गुंफेत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नित्य ध्यानाला बसत असत. त्या गुंफेत त्यांनी स्वहस्ते श्रीनृसिंहयंत्र स्थापन केले होते, असा उल्लेख पुजारी मंडळींकडील जुन्या नोंदींमध्ये आहे. श्री स्वामींच्या शैल्यगमनानंतरही काही काळ श्री सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र त्या तळघरातील गुंफेत जाऊन नित्यपूजा करीत असत. पुढे देवांच्याच आज्ञेने ती गुंफा कायमची बंद करून टाकण्यात आली.

तृतीय श्रीदत्तावतार, राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामींचेही जन्मनाम ' नृसिंहभान ' असेच होते. प्रसंगी तेही नृसिंहरूपासारखेच अत्यंत उग्र रूप धारण करीत असत. त्यावेळी त्यांच्यासमोर जाण्याची कोणाचीही छाती होत नसे. त्याचबरोबर त्यांचे अलौकिक भक्तवात्सल्यही त्यांच्या सर्व गोष्टींमधून स्पष्ट जाणवते. त्यांच्या अशा अपरंपार भक्तप्रेमाचे वर्णन करणा-या अनेक कथा त्यांच्या बखरीत सापडतात. अत्यंत असह्य उग्रत्व व त्याचवेळी अपरंपार करुणा; या नृसिंहरूपाचेच नेमके वैशिष्ट्य असणा-या दोन्ही गोष्टी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ठायी विलसणा-या श्रीनृसिंहतत्त्वाचेच स्पष्ट प्रत्यंतर देतात.
श्रीनृसिंहांनी दुष्टांचा नाश केला; तर भगवान श्री माउली म्हणतात तसा, श्रीदत्तप्रभूंच्या या अवतारांनी केवळ दुष्टबुद्धीचा नाश करून समाजात अास्तिकता वाढविली. प्रसंगी भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराज व भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भगवान श्रीनृसिंहांसारखे रौद्ररूप धारण करून दुष्टांचा संहारही केलेला आहे. वल्लभेश द्विजाचा शिरच्छेद करणा-या चोरांना श्री श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या त्रिशूलाने मारलेले आहे व श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी म्लेंच्छांसमोर वेद म्हणणा-या उन्मत्त ब्राह्मणांना शाप देऊन पिशाचयोनीला पाठवलेले आहे. 

थोडक्यात,श्रीनृसिंह अवतार व दत्त अवतार वा इतर कुठलाही अवतार धारण करून भगवंतांनी, "देव आहे व तो सर्वत्र व्यापून राहिलेला आहे !" हेच दाखवून दिलेले आहे. शिवाय देवत्वाचा, धर्माचा विरोध करणा-यांचा समूळ नायनाट केलेला आहे. हेच कार्य  सर्व अवतारांनी केलेले आहे. त्यांनी जगात अप्रकट असलेले देवत्वच लोकांना दाखवून दिले. शिवाय नास्तिकांची ती नास्तिकबुद्धी आपल्या कृपेने नष्ट करून लोकांची धार्मिक श्रद्धा बळकट केलेली आहे
जात जाता ,हे लक्षांत येउद्या कि सनातन धर्म परतत्व एकच आहे असे दाखवतो पण रूप ( अवतार ,देवी ,देव ,) अनेक आहेत ( ज्या वरून इतर धर्मीय आपलं हसं  करतात).हे म्हणजे आपण जसे आपले वेग वेगळ्या रूपातील ,प्रसंगातील,वा वयातील फोटो काढतो  तसेच आहे  आपण तेंच असतोपण रुपं अनेक अथवा मेळ्यात असलेल्या आरश्याच प्रदर्शनात वेगवेगळ्या आरश्यात आपण वेगळे व विचित्र दिसतो
काशांत उंच ,तर बेढब,तर बुटके अशी आरशाच्या CONSTITUTION प्रमाणे आपलं रुपडं दिसतो .तसेच परतत्व ,परब्रह्म ,पराशक्ती एकच आहे पण त्याची रूपे आपल्या वेग वेगळ्या constituion , मूळ (Roots),व स्वभावानुरूप वेगळी वेगळी आहेत ,म्हणून आपण त्या प्रमाणे वेगळे रूप ( संप्रदाय)पूजतो हे जन  नारायण व साधक नारायणास लक्षांत यावे म्हणून हा लेखन प्रपंच परतत्त्वास समर्पित.
इदं न मम।
$@π√∆¥ #

शिवंजयसंजय
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4613794285302879&id=100000170606055

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|