श्रद्धावान लभते ज्ञान।आस्था (Believe) आणि #विश्वास (Trust),व श्रद्धा ( FAITH):$@π√∆¥ #

$@π√∆¥ #
श्रद्धावान लभते ज्ञान।
आस्था (Believe) आणि #विश्वास (Trust),व श्रद्धा ( FAITH):$@π√∆¥ #
dr sanjay honkalse 
drsanjayhonkalse@gmail.com
drsanjayhonkalse. blogspot.com
एक छान गोष्ट वाचनात आली,खूप छान गोष्ट आहे. नक्की वाचा!!
एकदा एके ठिकाणी एका २५ मजली इमारतींच्या मध्ये एक तार बांधली होती. त्या तारेवरून एक कलाकार हातात बांबू घेऊन चालत होता. विशेष म्हणजे चालताना त्याच्या खांद्यावर एक लहान मूल होते. हजारो प्रेक्षक श्वास रोखून तो प्रकार पाहत होते. तो माणूस अगदी विश्वासाने,  घट्ट पावले रोवून, वाहत्या वाऱ्याला तोंड देत आपले व आपल्या मुलाचे आयुष्य पणाला लावत त्या माणसाने ते अंतर पार केले. 

संपूर्ण गर्दी आनंदाने नाचू लागली. टाळ्या, शिट्या आणि त्या माणसाच्या स्तुतीने आसमंत भरून गेले. सगळी गर्दी त्या कलाकाराचे फोटो काढत होती. ज्यांना संधी मिळेल ते सेल्फी काढत होते. काही लोक त्याच्याशी हात मिळवत होते. 

गर्दीतून वाट काढत तो माणूस पुढे आला. त्याने माईक हातात घेतला आणि तो गर्दीला उद्देशून म्हणाला की *"तुम्हाला असे वाटते का की हे जे मी आत्ता केले ते परत करू शकेन का?"* गर्दी जोरात ओरडली *"हो नक्कीच तू हे परत करू शकशील"* त्याने परत विचारले *"तुम्हाला नक्की विश्वास आहे की मी हे करू शकेन?"* परत गर्दीतून आवाज आले *"हो नक्की आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे तू हे कितीही वेळा करू शकशील"*
कलाकाराने पुन्हा एकदा विचारले 
*"मी पुन्हा एकदा विचारतो तुमचा नक्की पूर्ण विश्वास आहे ना? "* गर्दी आता एकमुखाने ओरडू लागली *"नक्की…नक्की…नक्की… करू शकशील"*

कलाकार म्हणाला 
*"ठीक आहे, कुणीतरी आपल्या मुलाला घेऊन या पुढे, मी त्या मुलाला खांद्यावर घेऊन चालणार आहे."*

संपूर्ण गर्दी गप्प झाली, शांतता पसरली

कलाकार म्हणाला 
*"काय झाले घाबरलात…? आत्ता तर तुम्ही ओरडत होतात की तुमचा माझ्यावर विश्वास आहे मी हे करू शकेन. खरे सांगायचे तर तुमची आस्था होती की मी हे करू शकेन पण तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता. दोन्ही मध्ये खूप फरक आहे"*

*मित्रांनो मला हेच सांगायचे आहे "देव आहे… ही आपली आस्था आहे पण,श्रद्धा तर दूरच, आपला देवावर संपूर्ण विश्वास नाहीये* मी पण त्या लहानग्या मुलाने ज्या श्रद्धेने मला बळकट पकडलले  असते त्याच्या त्या विश्वासामुळेच मी दोरीवरून पार होण्याचे जाम करतो  .जसे रस्ता ओलांडताना बाप मुलास सांगतो हात  धर तेंव्हा मूल म्हणते की बाबा  मी नाही तुम्ही माझा हात धरा .
बाप म्हणतो काय फरक ? तर मूल म्हणते बाबा मी हात धरला तर मी भीतीने सोडेन पण तुम्ही धरला तर मला नक्कीच पार न्याल
याला श्रद्धा म्हणतात.

*You Believe in God but you don't Trust him.*

*आणि जर देवावर पूर्ण विश्वास असेल तर मग चिंता, राग, द्वेष आणि तणाव का आहे…? वाचा आणि नक्की विचार करा

आपले सर्व आचरण,व्यवहार आणि वैचारिक पातळी सुधारा. खास नीट नेटके शिक्षण घेतलेले शिक्षित वर्ग, जे विश्वासाने धर्म करतात पण श्रद्धा बळकट करीत नाहीत .
मी व माझे विद्यार्थी याना अत्यन्त तन्मयतेने व शरणागत होऊन साधना करायला शिकवले  व ते बऱयापैकी करतात हि.
 पण मडकी अजून कच्ची आहेत ,माती अजून ठिसूळ आहे चिकनी नाही ,काहींना दिखाव्याच्या चिकणेपणात रस आहे.कारण श्रद्धा नाही वा ती बळकट नाही .
आम्ही धर्म यद्न्य करतो ,गेली 7 आठ दिवसापासून माझे घरी "कर्म यद्न्य" सुरु आहे कारण तो अत्यावश्यक होता धर्म सहज सुलभ होण्यासाठी  कर्म योग्य व्हावे त्यामुळे घरी सतत 10 12एक लोकांचा ,मी व विद्यार्थी व काही कष्टकरी ,कामकरी धरून,राबता होता.
त्या मुळे पसारा ,कचारा ,इ होत होता (मी आधीच या बाबत उल्हासी इss त्यात हा फाल्गुन "माँ"स)
 असो आमचे वीर शेखर याबाबत नन्तर सतत भीती व्यक्त करत होते ,जी त्यांच्या वागणुकीत दिसत होती,कि "सर हे एवढे बाहेरचे लोक कुठून कुठून आले ,काही होणार नाहीं ना!"
मी त्यास शांत पणे सांगितलं कि "माउली आपण पूर्वीपासून व आता वर्षभर जमेल तेवढी काळजी ,उपचार ,तोडगे व साधना व यद्न्य केलेत  तर विचार करू नये. एवढे केले तरी काही झालेच तर ते आपले प्रारब्ध म्हणून स्वीकारायचं .जगणं असेल तर 6 व्या मजल्यावरून पडलेलेही जगतात नाहीतर ठेंच लागून वा मूत्रस्खलन होता होता ,जसे स्वातंत्र वीर सावरकर,प्राण जातो ."
पण ,शेखर सोहोनींची माफी मागून लिहतो ,कि या मकर राशीच्या लोकांना समजवण व समजणं कठीण  जाते, यांच्या मनात एखादा विचार वा impreession झालं तर ते  दगडासम असतं.  समजवून सांगूनहि फरक पडत नाही .
तर मकरराशी जातक श्रीमान चंद्रशेखर कॉन्फिडेंटली तावा तावा ने म्हणाले "काय सर काय पण म्हणता काळजी नको करू ? आपल्या समोर लोकं (त्याचे आसपास ,माझे आसपास व नातेवाईक) मेलेले आपण पाहतोय कि ......आणि बरेच काही ....
हे सारे माझे खंदे वीर 20 शी पंचविशी पर्यंत  श्रद्धेने ऐकायचे ( गेल्या वर्षी कशा वरून तरी  अनन्यभाव, अनुभाव व अनुभव यावर चर्चा याच समूहात (शिवोहं) समूहात झाली होती तेंव्हा प्रोफ सचिन यांनी लिहलं होत सर सांगतायत ना मग ते आम्ही follow करतो व आम्हाला अनुभवही आहे .
पण ते आता मोठे झाले ,माझ्यावर प्रेम व आस्था हि आहे पण आता त्यांना कळतं ते मला कळत नाही ,त्यात मी इंटर नॅशनल फालं फोक पुरस्कृत CSYZ ,म्हणून मी हल्ली काही मर्यादे नंतर प्रयत्न करून गप्प राहतो ,तेंच चंद्रधनीनि या बाबत केले व  मी गप्प बसलो .
वाईट वाटले ,विचार केला की तो बरोबर बोलतोय आसपासच्या अनुभवांबाबत ,.........
.........................पण हे विसरतो कि त्यांच्यात व आपल्यात फरक आहे ,तो आपण कष्ट पूर्वक व प्रयत्न पूर्वक केलेला आहे .त्याने 12 ज्योतिर्लिंग यात्रा ,सप्त पुऱ्या ,शक्तीपीठ ,चार धाम , अमरनाथ  इत्यादी अनेक यात्रा अनेकवार केल्यात त्याही वयाच्या पंधरा ते पंचविशीत व त्या सर्वाचे त्या बाबत अनूभवही आहेत .व याउपर सतत काही साधना ,याग ,तोडगे (जसे अर्क ,लसूण ,हळद सुंठ आवळा इत्यादी उपयोग)जे हे सारे करतात ते बाकीच्या आसपासच्या लोकांनी केलेत कां? उदा गेल्या महिन्यात इंटर्नशनल बॉडी builder जगदीश लाड,जे आमच्याच society मध्ये समोरच राहत होते, अचानक कालवश झाले ते नेहमी म्हणायचे मी फिट आहे मला काही होणार नाही .या उलट आमच्या चंद्रभानचा faithless confidence कि काय होणार नाही ना? 
त्यात दुसऱ्या दिवशी आमचे सर एक Sr विद्यार्थी Tangy ( तयाचं मीच या नावाचं बारसं घातले ले ,जसे दीपक हे मंडू बारसित झालेत.) ते आपल्या पुनम ला  घेऊन मला भेटायला आले तेंव्हा हाच विषय निघता ते अगदी पोट तिडकीने म्हणाले की आज जे काही आम्ही जगतोय व जिवंत आहोत ते या सर्व यात्रा केल्यानेच .हि पावती tangyनी ,जे आज डॉईश् बँकेत Manager आहेत ,दिली .
म्हणून मी वर म्हंटले कि हि मडकी अजून कच्ची आहेत वरच्या चिकणाईस अजूनही भुलते ,व विसरते कि बाह्य शुद्धीशिवाय आपण जगू पण अंतरशुद्धी ,दोन्ही  physio anatomical व metaphysical शिवाय जीवन, जगणे,उद्धार,अनुभूती व मुमुक्षत्व  कठीण आहे .म्हणून श्रद्धा बळकट हवी म्हणून मी या मुलाच्याच प्रश्नउत्तरमाध्यमातून  लिहलेले व मुद्दामहून अमेंरीकेत  प्रसिद्ध करवलेले पुस्तक "Management By Spiritual Quotient:The power of Faith "हे पुस्तक लिहले जे कित्येकांच्या बाबत उपयुक्त ठरले पण या धर्मवान मकरेश आदी  राशीपती जातकां बाबत मी अपयशी ठरलो ( tangy बा पृथ्वी पती व्यवहारी "कन्या"रास प्रसूत आहेत .
असो हे माझे अपयश आहे व मी ते मान्य करतो पण खात्री आहे की पुढे कधीतरी हि मडकी पक्की होतील व थंड गार जीवन ( जगणे व पाणी दोन्ही ) जगतील,व "एक"  जाणतील ,"एक"ला जगतील ,व "एक"ला  मार्ग चालवतील जो मी त्यांना वारसा म्हणू देऊ इच्छितो. फक्त श्रद्धा बळकट होणे बाकी आहे.कारण "श्रद्धावान लभते ज्ञानं
जी परशांती देणारी आहे .

"श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।

ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति।4:39 गीता 

जाता जातावर सांगितली तशी आणखी एक छोटी गोष्ट  श्रद्धे बाबत सांगतो जी माझ्या मनात अगदी सुरुवातीपासून  घर करून आहे .
एकदा एका दुष्काळी भागात पाऊस पडावा म्हणून पर्जन्य याग (जसा सोम याग ,जो Prof सचिन ,व टीचर पूनमयांनी मजसोबत अनुभवलाय) सुरु होता,एक आजोबा आपल्या नातवास घेऊन त्या यागास गेले ,त्यावेळी जाताना नातू म्हणाला आजोबा छत्री घ्या न! "
आजबो म्हणाले कारे बाळ तर नातू म्हणतो "अहो पावसासाठी यद्न्य आहे ना ,मग पाऊस पडेल तर लागेल ती " 
व यद्न्य सांगता होताना पाऊस पडला व आकाशवाणी झाली की त्या बालकाच्या श्रद्धेमुळे पाऊस पडला.
म्हणून मी म्हणतो, जे माझ्या पुस्तकात विवेवचन व सउदाहरण लिहले आहे ,
श्रद्धा हि लहान बाळा सारखी असावी 
"HV THE CHILDLIKE Faith" 
 देव हे आई सारख असतात ,मूल जसे गु घाणिने बरबटलेले असले तरी ते बिनधास्त  असते कारण आई वरच चाईल्ड like faith ज्यामुळे  ती आई त्या घाणी ने मढलेल्या बाळालाही उचलून घेते.  म्हणून श्रद्धावान व्हा नाहीतर जग हसाई करून घ्याल.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4580682305280744&id=100000170606055

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया