७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया:
$#¡\/@π√@¥ dr $@π√@¥ #©πk@£$€ ©

https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/09/blog-post_20.html

क्रमाने पितरांचा त्रास नेमका कसा ओळखावा  हे आपण पाहिले.
आजकाल बहूतांशी लोकांच्या पत्रिकेत पितृदोष असतो. याला कारण घरात होणाऱ्या श्राद्ध कर्माचा लोप हे आहे . गरूड पुराणा नुसार , अंत्यकर्मा नंतर करावयाचा विधी हा सर्वांना एकसारखाच असतो. तो म्हणजे दहनापासून दहावे दिनी दशक्रिया विधी , नंतर ११ वा व १२ वा करतात आजकल वेगवेगळा न करता एकाच दिवशी करतात , या बाराव्यात सपींडी म्हणून विधी असतो जो हल्ली केलाच जात नाही. यावर उत्तर मिळते आमच्यात करत नाही ! परंतू या वेळी कोणताही भेद न करता सर्व वर्णांना एकाच प्रकारचे विधी शास्त्रात दिले आहेत . या नंतर करतात तेरावा व चौदावा नंतर उदकशांती करून वर्षभराने प्रथमाब्दिक करतात. या वेळीही अब्दपूर्ती व प्रथमाब्दिक अशी दोन श्राद्धे करावयाची असतात जी कोणी हल्ली करतात कोणी करीत नाहीत....

तसेच घरात कोणी पुर्वी बाहेर गेला तिर्थ यात्रेस गेला तर तो परत येईलच याची शाश्वती नसायची व तो तिकडे जिवंत आहे वा मृत याचाही पत्ता नसायचा ! अशावेळी बारा वर्षे वाट पाहून तो मृत आहे असे समजून पळसाच्या काड्यांचा पुतळा बनवून त्याचे दहन करून मग पुढील विधी करावे असे शास्त्र सांगते ( पलाश किंवा पर्णशर विधी) . परंतु हे कोणी पूर्वी केले होते वा नाही हे समजण्यास मार्गच नसतो कारण , पिढ्या विभक्त झाल्या व वृद्ध लोक जे मार्गदर्शक असतात त्यांना हवा तसा सन्मान दिला जात नाही! 

तर वरील सर्व गोष्टी पितृदोषास कारणी भूत ठरतात. आता आपण अंत्य संस्कार विधी जाणून घेऊन व त्यावरील उपाय काय ते जाणून घेऊ.

आपण पिंडदानच का व दहावा बारावा म्हणजे नेमके काय ते पाहूत .

प्रथम दिनी गेलेल्या व्यक्तीचा दाह संस्कार होतो यावेळी मृतस्थानी , द्वारस्थानी , विश्रांती स्थानी काष्ठ रचनेवेळी आणि चौकात पिंड देतात यामुळे भुमीवरील , गृहवास्तु , प्रेतास वाईट शक्तींनी अपवित्र करूनये यासाठी केले जाते . पुढे नवद्वारांवर पिंड ढेवून क्रव्याद नावाच्या मांस भक्षक अग्निस आवाहन करून बोलावले जाते . स्मशानात पिंडदान करताना प्रेतसखा म्हणजे त्या मृतात्य्माचे मृत स्नेही त्यासाठीही पिंडदान केले जाते .

नंतर प्रत्येक दिवशी स्मशानात जाऊन दहा दिवसांपर्यं पिंड द्यावेत . नंतर दहाव्या दिवशी दशक्रिया विधी होते . जर दररोज पिंडदान केले असेल तर दहाव्या दिनी केवळ एक पिंड देऊन काक बली द्यावा लागतो अन्यथा एकाचवेळी दशपिंड द्यावे लागतात . ही दशक्रिया विधीची संकल्पना मानवी जन्मावर अधारीत आहे . जसे प्रथम मातेच्या गर्भात छोटासा पिंडच असतो तशीच कल्पना करून पहिला पिंड देतात . यात सम व विषम श्राद्ध अशी संकल्पना असते . विषमदिनी अवयव पिंडही देतात . पहिला पिंड मस्तक , दुसरा पिंड कान , नेत्र , आणि नाक , तीसरा पिंड गळा , खांदे , भुजा व वक्ष:स्थल , चौथा पिंड नाभी , लिंग /योनि व गुदा , पाचवा पिंड जानु , जंघा , पाय , सहावा पिंड सगळी मर्म स्थाने , सातवा पिंड सगळ्या नाड्या , आठवा पिंड दात केस वगैरे , नववा पिंड विर्य व रज , दहावा पिंड संपूर्ण शरीर . अगदी हेच आईच्या पोटातही घडत असते व दहाव्या महिन्यात बाळाचा जन्म होतो . याच संकल्पनेवर देह जळाला मग पुढे गर्भात जाताना त्या जिवास सगळे शरीर अवयव मिळावे हि संकल्पना असते . त्यामुळे दहावा हा दहाव्या दिवशीच करावा . तीसऱ्या , पाचव्या दिवशी नाही कारण यात वेळ किंवा कोणी नातेवाईक यावेत म्हणून दिला जाणारा ही वेळ नाही . 

पाच बोळकी घेऊन त्यावर पाच पिंड सोबत पाच काड्यांवर पिवळ वस्त्र जे ध्वजे सारखे दिसते ते असते छत्री म्हणून . पाच पोळी पादूका जोड वगैरे असतात . पाच पिंड पहिला गेलेल्या व्यक्तीचा , दुसरा प्रेतसखा , तीसरा वैवस्वत यम , चौथा वायस म्हणजे कावळा व पाचवा प्रेताधिपती रूद्राच्या नावे द्यावा . यानंतर वायसबली म्हणजे कावळा शिवणे होते . व कावळा शिवला नाही तर दर्भाचा कावळा करतात . यात दर्भ , काळे तीळ , जव व पांढरी फुले , माका , तुलसीपत्र अत्यंत महत्वाचे असते .

अकरावे दिनी सर्व घरातील कपडे वगैरे स्वच्छता केली जाते . यानंतर पंचगव्य वगैरे प्राशन करून विष्णु पुजन, विष्णु तर्पण , विष्णु बलि विधि केला जातो वृषोत्सर्ग पुर्वी करीत असत . याच दिवशी महिकोद्दिष्ट ( म्हणजे फक्त एकास उद्देशून केलेले ) श्राद्ध केले जाते . यापाठोपाठ रूद्रगण श्राद्ध , वसुगण श्राद्ध व यानंतर मासिक श्राद्ध केले जाते . यावेळी दशदाने करून समाप्ती केली जाते .

बारावे दिवशी सपिंडी श्राद्ध केले जाते . यात चार पिंड बनवून त्यातील गेलेल्या व्यक्तीच्या नावाच्या पिंडाचे तीन भाग करून बाकीच्या तीन पिंडात मिसळले जातात . चार पिंडात पहिला पिंड मृत व्यक्तीचा , दुसरा पिंड प्रेताचे वडिल , तीसरा आजोबा , व चौथा पणजोबांचा असतो . यातील पहिल्या पिंडाचे तीन भाग उरलेल्या तीन पिंडात मिसळल्यावर गत व्यक्ती पितृलोकी जाते व पणजोबांस मुक्ती मिळते . हा विधी केल्या शिवाय सुतकातून सुटकाच होत नाही व पुढे कोणतेही शुभ कर्म करू शकत नाहीत हा नियम सर्व वर्णांस लागू आहे . नंतर पाथेय श्राद्ध करून विधी संपतो .

तेरावे दिनी प्रथम निधनशांती करतात . यात गणेशपुजन पुण्याहवाचन रूद्र पुजन करतात व विप्रांकडून विविध सुक्ताचे पठण करतात . नंतर सुतकात गंध , कुंकू वगैरे लावलेले नसते ते लावून घरातील देवपूजा केली जाते . या विधीसाठी चार गुरूजी लागतात . यात उंबऱ्यावर सुपारी फोडली जाते .

यानंतर तेराव्याचे श्राद्ध केले जाते . यासोबतच शुद्ध सोळा मासिक श्राद्धे केली जातात . यात तेरा ब्राह्मण भोजनास सांगतात . परंतू अभावी किमान पाच म्हणजे दोन देवा कडील व तीन पितरांचे असे भाेजन करतात . यास मासिक निवृत्ती असेही म्हणतात . आलेल्या गुरूजींस व चालवणाऱ्या गुरूजींस दशदाने पददानादी सह उदककुंभ व दक्षिणा दिली जाते . दुपारी आहेर करून यजमानांचे मामा यजमानास मारूतीच्या मंदिरात नेतात . तेथे नवीन निरांजनात दिवा लावून नमन करून बाहेर पडताना देवळाची घंटी वाजवतात . यादिवसापासून रोजची कर्मे करण्यास सुरूवात केली जाते . जर कोणाचा विवाह ठरला असेल तरच तो विनायक शांती करून करावा अन्यथा पुढे तीन वर्षे विवाह करता येत नाही हा समज अत्यंत चुकीचा आहे त्यामुळे असे करू नये .

तेरावे आटोपल्यावर चौदावे दिवशी वातावरण शुद्धी साठी उदकशांती नावाचा विधी करतात . उदकशांती अर्थात जलाची शुद्धी असा सरळ अर्थ होतो परंतु प्रत्यक्षात जर पाहीले तर जल हे अत्यंत पवित्र मानून त्याद्वारे समंत्रक केलेली पंचतत्वांची शुद्धी म्हणजे उदकशांती होय . जर आपण मृत झालेल्या व्यक्तीच्या घरात गेलात तर सहज लक्षात येते की तिथे संपूर्ण भागात उदासी पसरली आहे . मग अशावेळी हे शोकमग्न वातावरण सारून पुढे चालणे व दैनंदिन कामे करणे ही निकड असते . यासाठी ही उदकशांती करतात .

काही लोकांचा गैरसमज असतो की उदकशांती हा विधी फक्त यावेळीच केला जातो परंतु , तसे नसून हा विधी घरातील कलह , आजारपण , काही विशीष्ट होणारे त्रास , सतत मानसिक तणाव व त्यामुळे सर्व घर डीस्ट्रब होऊन सतत भांडणे , नुकसान व याने झालेली पंचतत्वांची हानी भरून काढण्यासाठीही हा विधी दर सहा महिन्याने आपल्या घरी करावा असे शास्त्र सांगते . तसेच नारायणबली , व नागबली करून आल्यावरही काही लोक ही उदकशांती करतात . स्थानिक गुरूजी ज्यांनी नारायण बली केलेला असतो ते याबद्दल कल्पना देतात किंवा ज्या गुरूजींनी हा विधी करण्यास पाठवले ते याबद्दल सांगून हा विधी करवून घेतात . 

या विधीत चार गुरूजी असतात . प्रथम गणेशपुजन व पंचवाक्यीय पुण्याहवाचन करून मग एका नवीन कलशास धुपवून त्यात पाणी घातले जाते . येथे हवन करीत आहोत अशी संकल्पना करून हवनाचे वेळी हवनपात्रासाठी करण्याचे स्थंडील कर्म करतात . नंतर चारही दिशेस दर्भ मांडून ब्रह्मदेवांचे पूजन केलेल्या कलशावर शंभर ते हजार अश्या प्रकारे दर्भाचे अच्छादन करतात . हे अच्छादन एखाद्या झोपडी सारखे दिसते . 

चारही दिशांस बसून चारही गुरूजी चतुर्वेदातील ऋचांचे स्वर व सुरात पठण करतात . नंतर यजमानासह सर्व कुटूंबीयावर आंब्याच्या डहाळीने ब्रह्मकलशातील पाण्याने गुरूजी अभिषेक करतात ! यानंतर दहीभाताचा नैवेद्य दाखवून विसर्जन होते . मग यजमानास आशिर्वाद मंत्राने नारळ देऊन तो नारळ यजमानांनी पत्नीच्या ओटीत द्यायचा असतो व या नारळाचे गोड पदार्थच बनवतात .

मागे दिलेले चौदावे पर्यंतचे विधी यथासांग पार पडले की मग येते ऊनाब्दीक श्राद्ध .व आब्दिक म्हणजे त्यादिवशी वर्षपूर्ती झाली त्याचे श्राद्ध ! जसे रेल्वेच्या पासवर सत्तावीस तारखेचा पास सव्वीसला संपते त्यानुसार ज्या तिथिस मृत्यू झाला त्याची आदली तिथि ही उनाब्दिकसाठी घेतात . उदा. मृत्यू माघ कृष्ण दशमी असेल तर पुढील वर्षी माघ कृष्ण नवमीस अब्दपूर्ति व दशमीस प्रथमाब्दिक म्हणजे पहिले वर्ष श्राद्ध होय . हे खरे तर कायम करावे असे शास्त्र सांगते परंतू किमान पहिले तीन वर्ष तरी पिंडदाना सह गुरूजी बोलावून करावे .
आपण जी दीपावली करतो ती देखील पितरांसाठीच असते . नुकतेच महालय व पितृपंधरवडा आटोपलेला असतो . यानंतर कोजागीरीस आकाश दीपदान करतात अर्थात आकाश कंदील लावतात .मग सुरू होते दीपावलीची धामधूम . यात पितरांस आम्ही खूप सुखी आहोत हे दाखवणे हा हेतू असतो . याचवेळी दक्षिणेकडे दीपदान करतात . यमतर्पण करतात
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com ©

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|