विष्णूच्या स्वयंभू स्थानांपैकी एक: भुवराह अवतार रूप :श्री मुष्णुम
विष्णूच्या स्वयंभू स्थानांपैकी एक: भुवराह अवतार रूप :श्री मुष्णुम
'शिवंजय': डॉक संजय होनकळसे©
भारत हा आध्यात्म प्रधान देश आहे. अध्यात्म हि भारताची जगास दिलेली अनमोल देणं आहे.अध्यात्म ,धर्म ,व संस्कृती हि अत्यंत पुरातन सनातन आहे म्हणून आपण हिला सनातन धर्म संस्कृती म्हणतो.
अध्यात्म हे शास्त्रांचं शास्त्र आहे शास्त्रपली कडचे शास्त्र आहे,जगाचा,जगण्याचा हेतू ,कला सांगणारे आहे .
तसेच आपल्या कडे वेगळे भक्ती मार्ग आहेत शैव ,वैष्णव (वारकरी व धारकरी),शाक्त,
गाणपत्य, नाथ ,इ.
शैव भक्त यासाठी 1008 शिवस्थाने पवित्र मानली जातात त्यात कैलास (एकूण सात कैलास आहेत व उप कैलास पण आहे)सर्वोच्य,व त्या नंतर स्वयंभू 12 ज्योतिर्लिंगे व मग इतर स्थाने जसे पंचमहाभूत लिंग,पंचराम शिवस्थाने ,नव नंदिकेश्वर शिव स्थाने ,एकादश रुद्रस्थाने इ..
यांचं प्रमाणे विष्णूची 1008 प्रमुख स्थाने आहेत. त्यात आठ स्वयंभू स्थान आहेत ,108 दिव्य स्थाने आहेत तर काही मानव निर्मित पवित्र स्थाने ,जसे जगन्नाथ,द्वारका इ
जशी कैलास व 12 ज्योतिर्लिंगे दर्शनहि शैव भक्त यांची आस असते तसे नारायणाची अष्ट स्वयंभू सिहाने हि प्रत्येक वैष्णवांने पहिलीच पाहिजेत,पण या बाबत सारे वैष्णव अभिज्ञ असताना दिसत नाहीत.
हि अष्ट नारायण स्थाने 4 उत्तरेस व चार दक्षिणेस स्थापूत आहेत.येथील सर्व स्थाने स्वयंभू ,स्वउत्पन्न अशी आहेत.
सद्गुरू कृपे मला 12 ज्योतिर्लिंगे 36 वेळा प्रत्येकी दर्शसन केलेला म्हणून ओळखतात पण माझी 35 शक्ती पीठे व अष्ट नारायण स्थाने प्रत्येकी कमीत कमी 2ते तीन वेळा करवून झाली आहेत
या पैकी श्री मुष्णूम हे स्थान आज 4थ्यादा झाले. आजचा योग्य अचानक अजाणता आले व मग लक्षांत आले की आजचा दिवस दुर्मिळ आहे .आज पौर्णिमा, श्रावण महिना,राखी पौर्णिमा, आजचा दिवस श्रीपाद श्रीवल्लभांनी पण अत्यंत शुभ असा सांगितला आहे.
त्यात आज विष्णूच्या दशअवतारापैकी ह्यग्रीव अवतार,ह्यग्रीव या राक्षसांचा वध करून त्याने लंपास केलेले वेद व वेदिक ज्ञान परत मिळवले त्याची जयंती म्हणून विष्णू पूजन महत्वाचे .अर्धा या दिवशी म्8 श्री मुष्णूम या स्वयंभू नारायण स्थानी दर्शनास गेलो हे परम भाग्य. श्री मुष्णूम हे तम्8लनाडूच्या कॅडलोर जिल्ह्यात चिदंबरम पडून 37 कि मी वर आहे .
येथील मूर्ती वराह रुपात आहे हिरण्याक्ष राक्षसाचा भूमी संहारापासून बचाव करण्यासाठी वराह रूप धारण केले गेले वराह अवतार हा भाद्रपद शुक्ल त्रितीयेचा म्हणजे गणपतीच्या आधी एक दिवसाचा.येथील वाराहमूर्त्या स्वयंभू आहे चोळा व नतंजवर्चत नायक यांनी या देवाची रचना ,द्रविडीयन पद्धतीने केली आहे.
कांचीलापान कामाक्षी मंदिरात वराह विष्णूची मुर्ती आहे .
तसेच मध्यप्रदेश भोपालयेथील उडायगिरी पर्वताच्या पाचव्या गुफेत वराहदर्शन आहे.वराह म्हणजे डुक्कर नव्हे पण त्यासमान दिसणारा प्राणी आहे हे लक्षांत घेणे महत्वाचे आहे.
वायू पुराण ,वराह पुराण व ऋग्वेद या नुसार नारायणाचे तीन वराह अवतार झाले निल वराह ,पद्मकल्पात,आदी वराह हीं कल्पात ज्यावेळी हिरण्याक्ष वध झाला संगमनेर येथे ,हिंगोली ,येथे या जमातीचे लोक आजही वास्तव्यास आहेत .
तिसरा अवतार श्वेत वराह अवतार झाला.
अशी मान्यता आहे की वधा नंतर वराह लक्ष्मी सह कोशी नदी किनारी ,नेपाळ,येथे राहिले.
ॐ वराहाय नमः
ॐ सूकराय नमः
ॐ धृतसूकररूपकेशवाय नमः
वराह जयंतीस उपवास करून षोडशो पचार पूजन करावे,भाग्य जागे होते.
अशा या वराह रुपी वियष्णूभगवंतांच्या श्री मुष्णूम या स्थानी आम्ही सहस्ररचं पूजा केली ती हैग्रीव जयंतीस.
© $@π√@¥ #●πk@£$€
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
Comments
Post a Comment