पितृ शास्त्र 1: विषय प्रवेश ,Cutain Raiser:
ऋण मुक्ती व शुभाशीर्वाद प्राप्तीचा उत्सव पित्रोत्सव:विषय प्रवेश ,Cutain Raiser:
:'शिवंजय' डॉ संजय होनकळसे.©
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/09/1-cutain-raiser.html
🕉️ अगस्तै नमः।
कृन्वंतो विश्वम आर्यम्।।
भारतीय संस्कृती हि सनातन,सर्वसमावेशक, स्वयंपूर्ण,संपूर्ण(व्यापक)अशी आहे.तिला परंपरा आहे.ती सर्व समावेशक व व्यापक आहे कारण ती हवामान तापमाना पासून मान सन्माना पर्यंत,अर्थशास्त्र पासुन जिवशास्त्रापर्यंत,जनन शास्त्रापासून मरण शास्त्र(Eschatology),मरणोत्तरशास्र,पुनर्जन्म शास्त्रपर्यंत विचार,विहार,व्यवहार व परिणाम याचा उहापोह उपयोग करते जन्मापासून मरणापर्यंत,नव्हे मरणोत्तर विचार करते.त्यामुळे व्यापार,व्यवहार, उपचार,सणवार,उत्सव,स्वयंपाक यांची सांगड, अगदी तर्कनिष्ठ सांगड घातली गेलीय. हे सर्व इतकं चांगल्यारीतीने गुंफलेय कारण याला शास्त्रोक्त ,व अध्यात्म शास्त्रोक्त आधार आहे ,आणि अशी इतकी छान गुंफण कुठेच नाही .हि जगाला सनातन धर्माची देणगी आहे.
मात्र दुर्दैवान,अंधांग्ळलेल्या ©(Blinded Westernization) प्रवृत्तीमुळे आपल्याला त्याच महत्व कळत नाही वा त्याची आपणास जाणीव नाही.चरा चरात ईश्वर आहे असे आपण मानतो म्हणूनच अक्षय त्रितीयेपासून (ऍन व जलदान) नागपंचमी, बैलपोळा,अगदी होलिका(अग्निपूजन) शाकं(भाज्या)भरी, गणेश,दीपावली उत्सव,असे अनेक उत्सव साजरे केले जातात .यात एक उत्सव असा आहे ज्या बद्दल भीती,अज्ञान,गैरसमज आहेत आणि तो उत्सव म्हणजे पित्रोत्सव /पितरोत्स्व खरतर हा उत्सवचं आहे ज्यात आपण पुर्वजांच स्मरणपूजन श्राद्ध ,तर्पण ,पिंडदान इ माध्यमातून केले जातेव त्यांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. आपण देव देवता इतकचं पितरांना महत्व देतो कारण त्यांच्या मुळे व त्यांच्या माध्यमातूनच आपल्यास हे जीवन प्राप्त झालेले असते ,जीवनच नाही तर आपले भाग्य ,प्रारब्ध ,आनंद ,समस्या या त्यांच्यामुळे असतात .म्हणून त्यांचा आनंद ,त्यांचे समाधान ,त्यांची तृप्ती ,त्यांची कृपा ,त्यांची मुक्ती,त्यां चा आशीर्वाद सुकर जीवनासाठी अत्यावशक असतो.म्हणून आपण इतर उत्सवांसारखे त्यांचाही उत्सव साजरा करतो ,हो हो हो उत्सवच आणि आनंदोत्सव कारण या उत्सवात ते मुक्त,अमुक्त जीव आपणांस भेटायला ,जरूर येतात.त्यामुळे त्यांचा आगमन आदरातिथ्य करण्याचा सोहळा म्हणजे हा उत्सव पितरो त्सव /पित्रोत्सव,जो भाद्रपद कृष्ण पक्षात प्रतिपदा तिथी पासून अगदी अश्विन प्रतिपदे म्हणजे घटस्थापने पर्यंत साजरा केला जातो.आणि हो हे सारे शास्त्रोक्त आहे याला शास्त्राधार आहे.
चला,गणेशाला निरोप देता देता ,आपल्या आणखीन एका उत्सवाच्या तयारीस लागूया .हा उत्सव कदाचित सर्वात महत्वाचा ,सर्वात मोठा असा ,परिणाम कारक ,फलदायी ,प्रारब्ध दर्शवणारा ,घडवणारा उत्सव .अशा लोकांचा ,अशा लोकांसाठीचा उत्सव ज्यामुळे आपण आज आपण आहोत.म्हणून काही ठराविक कार्ये सोडून हा पुण्य कमाईचा ,आशीर्वाद प्राप्त करण्याचा काळ असून दान ,धर्म पूजा पाठ ,अगदी रत्नधारण इ कामासाठी वापरण्यायोग्य असा उत्सव काळआहे त्याबद्दल आपल्या अनेक शंका ,भीती कुतुहल असते व कुणी काय सांगत नाही नीट सांगत नाही .
मी पण त्यातला जाणकार वा विशेषद्न्य ,Expert,नाही ,पण जे हे आपणासी ठावे,ते ते सर्वांशी सांगावे या न्यायाने ,या नात्याने मी याचे तर्कशुद्ध शास्त्रोक्त विचार मांडणार आहे आज पासून .
मी येतोय....पितृशास्त्र घेऊन.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3822823257733323&id=100000170606055
$#¡\/@π√@¥ dr $@π√@¥
#♀πk@£$€
Comments
Post a Comment