6)पितृशास्त्र :अंती मती ,सा गती.
6)पितृशास्त्र :अंती मती ,सा गती.
$#¡\/@π√@¥ dr $@π√@¥ #©πk@£$€ ©
https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/09/6.html
मनुष्य मृत झाला की सर्व संपले असा अनेकांचा समज असतो . परंतू मेल्यावरही वासना न संपल्याने ती व्यक्ती अतीसूक्ष्म देहाने ती वासना पूर्ण होईल यासाठी झटत असते . देह जो प्रत्यक्ष दिसतो तो यानंतर कारण देह , महाकारण देह व सूक्ष्मदेह या रूपात ती व्यक्ती असते यातील सूक्ष्म देह तो पुढील मार्गक्रमणेस निघतो परंतु जोवर और्ध्वदैहीक होत नाही तोवर कारण व महाकारण देह तिष्ठत रहातात . आपण म्हणतो की कणखर मनाने केलेला संकल्प वातावरणात मिसळून तो पूर्णत्वासच जातो अगदी याच प्रमाणे जाणाऱ्या जिवाच्या जर इच्छा खूपच बाकी असतील व संसारात जिव गुंतला असेल तर मृत्यूच्या समयी ईश्वर मनात न येता पाळीव प्राणी , आवडत्या व्यक्ती , जेवण बाकी असेल तर जेवण असे दिसत रहाते तेच चिंतन करत ती व्यक्ती मृत होते ! व त्यानुसार त्या मृतास गती व जन्म मिळतो.म्हणूनच आपल्या कुंडलीत पूर्वकर्मानुसारें जन्म मिळतो असे लिहलेले असते.म्हणून मरण समयी देवाचे नाव घावे व तसे घेता यावे म्हणून आपण मुलांची नावे देवीदेवतांची ठेवतो.व त्यांना गती ,सद्गती मिळो म्हणून पितृकर्म करतो.
नाही केल्यास त्रासदायक ठरते.
मनूष्य गेला तरी त्याचे डोळे चार तास , किडन्या चार तास , त्वचा वगैरे जिवंत असतात इतकेच काय तर चक्क रक्त प्रवाहही दोन तास सुरू असतो यातच वासना काय ते लक्षात घ्या ! तर अश्या या वासनांची पूर्ती करण्यासाठी लागलेली तगमग त्या जीवास मुक्ती मिळू देत नाही व ती सतत घरातील व्यक्तींस येनकेन प्रकारे अडचणी उत्पन्न करत असते अगदी तशीच जसे एखाद्या संकटातून एखादे पूण्य आपली सुटका करते तसेच !
ख्रीस्ती बांधव , पारशी लोक , इस्लामीक लोक इत्यादी लोकही पितृ कार्य करतात फक्त त्यांची पद्धत वेगळी असते . ख्रीस्ती बांधव हे मृताच्या कबरीवर फुले , वाईन , केक ठेवतात व त्याच्या स्मृतीसाठी वाटतातही ! (आपण परदेशातील पितृशास्त्र ,जे आपल्यासारखे स्वयंपूर्ण नाही ,यावर वेगळे लिखाण करत आहोत.)
अगदी प्राणीही आपल्या पूर्वजांस वंदन करतात . यात हत्ती हा प्राणी अत्यंत पुढे आहे . हा हत्तीचा कळप एका मादीच्या नेतृत्वाखाली अन्न व पाणी यांच्या शोधात स्थलांतर करीत असतो . वाटेत अनेक बांधव ( हत्तींचे ) मृत होतात . अशावेळी तेथे थांबून घोळक्याने श्रद्धांजली वाहून पुढे निघतात यावेळी गेलेला हत्ती ज्याच्या जवळचा असतो तो जरा रेंगाळतो परंतू त्याला काहीजण आधार देऊन बाहेर आणतात . हा प्रकार इथेच थांबत नाही तर ज्या तारखेस तो हत्ती/हत्तीण गेला होता त्याच दिवशी आठवणीने त्याच जागी सर्व कळप त्या मृतास मानवंदना देण्यास उपस्थित रहातो . यावेळी मृताच्या अस्थी तेथे असतात . कळपातील प्रत्येक सदस्य त्या उचलून आपल्या कपाळी लावतात . तेथे जरावेळ थांबतात व पुन्हा आपल्या मार्गाने जातात .
(#हेसर्वमीनाहीसंशोधकांनीसिद्धकेले_आहे ज्यावर #डीस्कव्हरी या #चॅनेलवर कार्यक्रम प्रदर्शीत केला गेला होता ) यावेळी कळपातील सदस्य काही खाण्याच्या वस्तूही नेतात ज्या त्या अस्थींजवळ अर्पीत करतात.
या सर्वात मानव अत्यंत प्रगत म्हणून त्याने आपल्या पूर्वजांस श्रद्धांजली देणे किती गरजेचे असते ते पहा
आता आपण वळूयात मूळ विषयाकडे पितृदोष ! सर्व पितृकर्मे करताना यत्किंचीतही तृटी चालत नाही जसे पुजेत एखादी वस्तू नसेल तर एेवजी अक्षता वाहतात तसे इथे चालत नाही . त्यामुळे वा गुरूजींनी दिलेली माहिती नीट न समजणे , कधी कधी गुरूजी जे सांगतात ते व घरातील काही मंडळी हे आमच्यात नसते म्हणतात त्यामुळे तो विधी केलाच जात नाही याने पत्रिकेत पितृदोष येत असतो . हे अनेक पिढ्या मागे चालत आलेले असते . जसा एखादा आजार एकदम उद्भवत नाही त्याची लक्षणे आधी दिसतात व नंतर तो आजार जोर करतो अगदी तसेच हे असते !
१ ) घरातील कर्ता पुरूष अचानक मृत्यू पावणे .
२ ) घरातील तरूण मुलाचा अचानक काहीही न घडता साध्या कोणत्याही कारणाने अचानक मृत्यू होणे .
३ ) ऐन जेवणाचे वेळी घरात भांडणे होणे व त्यामुळे अन्न वाया जाणे .
४ ) घरात चांगली केलेली पुण्यकृत्ये लागू न पडणे व आणखी वाईट होणे त्यामूळे श्रद्धा डळमळीत होणे .
५ ) दोन सख्ये असलेले भाऊ (लग्नांनंतरही सख्य कायम ) अचानक वितूष्ट येऊन वेगळे होणे व अगदी हा मरावा इतका द्वेष वाढणे .
६ ) दोन भाऊ असता एकाचे खूप चांगले होणे व दुसरा अगदी दरीद्री बनणे व योग्य असूनही नोकरी , विवाहात नाकारले जाणे .
७ ) घरात अनेक जण किंवा काही जण अविवाहित असणे व घराण्यात संतती नसणे .
८ ) पैसा योग्य कारणासाठी खर्च न होता तो अचानक उद्भवलेल्या आजारपण अॅक्सीडेंन्ट यावर खर्च होणे व कर्ज काढावे लागणे .
९ ) विविध प्रकारची भितीदायक स्वप्ने पडणे ज्यात घरातील वडिलमंडळी खायला मागत आहेत असे दिसणे .
१० ) तिर्थयात्रा , तेथे केलेली श्राद्धे लागू न पडणे .
१) घरात पुरेसे अन्नधान्य भरूनही ते न पुरणे वा बनवलेले वाया जाणे . ( हे अन्न बाहेर टाकल्यावर कोणताही प्राणी खात नाही ).
२ ) घरात काही देवाचे कार्य वा शुभकार्य ठरले की नेमक्या अडचणी उभ्या रहाणे वा ऐनवेळी भांडणे होणे व केलेल्या कार्याचे समाधान साध्य न होणे .
३ ) घराण्यात कुटूंब विभक्त होणे व होणारी कार्ये बंद पडणे .
४ ) घरात वडिलधारी मंडळी काहीही मार्गदर्शन करण्यासाठी शिल्लक न रहाणे .
५ ) हाती घेतलेले काम यशस्वीरीत्या सुरू होणे पण मध्येच खीळ बसणे.
६ ) घरातील मुलगा / मुलगी सर्व काही योग्य असूनही विवाह न होणे .
७ ) जोडप्यात कोणताही दोष नसताना व डाॅ. इलाज सुरू असूनही संतती न होणे / संतती न वाचणे / वारंवार गर्भपात होणे / संततीत व्यंग असणे / मतीमंद संतती जन्माला येणे.
आपल्याला होणारी संतती ही फक्त देवांच्याच नव्हे तर पितरांच्या पण आशिर्वादाने होते ! जर संतती होत नसेल तर जेव्हा श्राद्ध करतो तेव्हा तीन पिंड असतात त्यातील दोन नंबरचा ( मधला) पिंड संतती न होणाऱ्या स्त्रीस खाण्यास देतात
.....श्री गुरुदेव दत्त.....
$#¡\/@π√@¥ dr $@π√∆¥ #©πk@£$€
shivanjaydrsanjayhonkalse. blogspot.com
drsanjayhonkalse@gmail.com
Comments
Post a Comment