5)पितृशास्त्र:पित्रोत्सव ०पितृपक्ष
5)पितृशास्त्र:पित्रोत्सव ०पितृपक्ष
🕉 अगस्तै नमः ।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।
'शिवंजय':डॉ संजय होनकळसे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2318366018179062&id=100000170606055
https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/09/5.html
पितृशास्त्र हे मृत्यूनंतरच्या जीवनाचं,व त्याच्या उत्सवाचं शास्त्र आहे.मृत्यूशास्त्र हे पितृशास्त्राशी सुसंगत,संबंधित पण विशेष शास्त्र आहे व वेगळ्या लेखाचा विषय आहे.मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय व कसा होतो याचा शास्त्रीय विवेचन करणारे शास्त्र मृत्यूशास्त्र होय व त्याचा सारासार विचार भारतीय 'संस्कृतीशास्त्र' करते व तो विचार 5000 वर्षापूर्वीच केला गेलाय,आपण तो एक संस्कृतीचा भाग म्हणून शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासतो,पण पाश्चिमात्य संशोधनात, जिथे फक्त शास्त्र वा विज्ञान, संस्कृतीशी नाही, या पुरताच हा विषय मर्यादित आहे हा विचार 1970 पासून करू लागले,त्यांचा विचार पाळण्यात तर सोडाच पण अजून गर्भ धारणावस्थेत पण पुरेसा नाही.मृत्यू शास्त्र हा पितृशास्त्राचाच एक महत्वाचा घटक आहे कारण मृत्यू नंतर पितृलोकांची यात्रा सुरु होते.तो पर्यंत जीव मरण झाले ल्या जागेतील आवारातच एखाद्या दगडा वर,ज्याला अष्म म्हणतात,ओळखीच्या भेटायला आलेल्या मर्त्यमानवांचे स्वरूप पहात बसून असतो.
असो पितृशास्त्र हे" मृत्यूपाश्चात विचार ,विवेचन व विधी उत्सवाचे शास्त्र आहे".
मृत्यूपाश्चात जीव अ)प्रेत व पिशाच्य होतो पिशाच्य पण अनेक प्रकारची व स्तरांवरची ,जसे भूत ,प्रेत पिशाच्य,हडळ ,डाकीनी,संबंध,ब्रह्मसंबन्ध,असतात.
वा तो जीव कर्मवीपकानुसार श्रेयकर व प्रेयकर कर्मानुसार ब)पुनर्जन्म घेतो वा
क) पिर्तृ योनित व परमतत्व परमत्म्यात विलीन होतात।
या भूलोकांत सप्तसमुद्र व सप्त द्वीप आहेत, खंड आहेत.,जंबु द्वीप यातच आहे .या जंबुद्वीपात 9 खंड आहेत त्याती भरत खंडातील भारत वर्षात आपण असतो,आपण तसे कोणत्याही पूजनाच्या संकल्पात म्हणत असतो पहा"'जंबुद्वीपे भरत वर्षे भरत खंडे
असो अशा या जंवुद्विपातील नऊ खंडांपैकी देव खंडात देव वास करतात,गभसत्य खंडात भुते,पुरुष खंडात किन्नर, भरत खंडात मानव,शरभ खंडात सिद्ध,गंधर्व खंडात गंधर्व,ताम्रखंडात राक्षस,शेरु खंडात यक्ष व इंदुखण्डात पन्नग राहतात.
तसेंच सप्त पातलातील लोक आहेत.
आता पातालांतील अतल येथे पिशाच्य, वितलात गुह्यक(येथेच मायासुराची माया नागरी आहे.) ,सुतलात राक्षस राहतात (,येथेच वैवस्वपूर व वैतरीणी नदी आहे,)रसाताळात भुते, तलातलांत यक्ष,व महातलात पितृ देवता वास करतात ,येथील अर्यमा नावाची देवता हि राज्यकर्ती आहे .( म्हणून मी कित्येकांना औम अर्यमाय्ये नमः हा जप करण्यास सांगतो.
तर असे आपले पूर्वज ,आर्यमा देवीची अनुज्ञा घेऊन भाद्रपद कृ प्रथम ते भाद्रपद अमावास्ये ओर्यंत पृथ्वी वर येतात त्यावेळी त्याचे सेवार्थ आपण "श्रद्धे"ने त्यांची पूजन करतो त्यास श्राद्ध तर्पण म्हणतात श्रद्धायाम क्रियतें इति 'श्राद्ध'
असते.आपल्या पितरांना चांगली गति मिळावी म्हणून पुत्राने 'श्राध्दकर्म' करावयाचे असते.*पुत्र* या शब्दाचा अर्थच "पुं" नावाच्या नरकापासून तारतो तो पुत्र.देह सोडल्यानंतरचा जिवाचा प्रवास सुखकर व्हावा,त्याला नरकात जावे लागू नये म्हणून सर्वपितरी अमावस्येला अपराण्ह काळी तज्ञ ब्राह्मण जो श्राध्दविधी करतात तो अत्यंत शास्त्रोक्त असतो व आनंदने करायचा
तर या आपल्या पूर्वजांच्या आठवण ,ऋण सेवा साधने चा साजरोत्सव हा पित्रोत्सव असतो व तो एक नाही दोन नाही चक्क 15 दिवसांचा असतो.व गणपती विसर्जनानंतर कृष्ण पक्षात असतो.कदाचित हा आपला सर्वात मोठा उत्सव आहे . अनेक उत्सव 1 दिसांचे आहेत,दिवाळी पांच दिवस साजरी होते ,नवरात्र नउ दिवस साजरी केली जाते .पण पित्रोत्सव हो चक्क 15 दिवस असतो व तो हि साजराच करायचा असतो.
हा एक मानवी जीवनाचे महत्वपूर्ण 'ऋण'फेडण्याचा उत्सव आहे,
उद्धाराची एकपायरी आहे.भाद्रपद अमाव स्ये पर्यंत पितर हे पितृलोकातून *अर्यमा* देवतेच्या आज्ञेने पृथ्वीतलावर येत असतात व त्यांच्या पुत्राने त्यांच्या मृत्यू तिथीला त्या ना आवाहन करून पिंड दान करायचे अस ते.जर नाही केले तर 'पितृदोष' लागतो, व त्यांची नाराजी घरा मध्ये अडचणी आणते . म्हणून आपली कुलदेवता व आपले पितर यांना कधीही विसरू नये.जातक समस्या घेऊन येतो तेंव्हा ज्योतिषाने ह्या दोन गोष्टी नीट होत आहेत ना याकडे आवर्जून लक्ष द्यावे.सर्वपित्रि अमावास्या तर सर्व पितरांचे श्राध्दविधी करण्यासाठी उत्तमच.एकवेळ मृत्यूतिथीला नुसता शिधा किंवा चटावरचे श्राध्द चालेल पण सर्वपितरीला यथासांग विधी करावे.
जसा दिवाळी सण व इतर सण,यात्रा आगमन (देवी गणेश)तसेंच हे आगमन असते व ते आनंदाने,गंभीरतापूर्वक-भीती पोटी नव्हे-करावे.
पितरांच्या कृपाशिर्वादासाठी रोज पितृस्तोत्र म्हणावे,ते येथे देत आहे:
पितृस्तोत्र ।।रूचिरूवाच।।
अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम्। नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम्।।
इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा। सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान्।।
मन्वादीनां च नेतार: सूर्याचन्दमसोस्तथा। तान् नमस्यामहं सर्वान् पितृनप्युदधावपि।।
नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा। द्यावापृथिवोव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि:।।
देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान्। अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येहं कृताञ्जलि:।।
प्रजापते: कश्पाय सोमाय वरुणाय च। योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि:।।
नमो गणेभ्य: सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु। स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे।।
सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा। नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम्।।
अग्रिरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम्। अग्रीषोममयं विश्वं यत एतदशेषत:।।
ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्रिमूर्तय:। जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिण:।।
तेभ्योखिलेभ्यो योगिभ्य: पितृभ्यो यतामनस:। नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदन्तु स्वधाभुज।।
इदं न मम्।
शिवार्पणम।
'शिवंजय':डॉ संजय होनकळसे
drsanjayhonkalse.tripod.com.
shivanjay dr sanjay honkalse.blogspot.com
Comments
Post a Comment