पितृशास्त्र भाग 13 : पिंड पूर्वजांना कसे पोहचते?
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2326540180694979&id=100000170606055
पितृशास्त्र भाग 13 :
पिंड पूर्वजांना कसे पोहचते?
शिवंजय डॉ संजय होनकळसे©
https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/09/13.html
पिशाचा गुह्यका: सिद्धा: कूष्माण्
आपल्या आतापर्यंतच्या आलेखावरून हे स्पष्ट होते की पितृउत्सव हा आपल्या कडे सर्वात मोठा उत्सव आहे .
हा उत्सव 15 दिवस कमीतकमी वा16 दिवस चालतो .इतर सारे उत्सव या पेक्षा कमी दिवसांचे असतात. जसे नवरात्र व दशहरा 10 दिन.गणपती 11 दिवस ,दिवाळी 5 दिवस ,वा सहा ,षड रात्र सहा दिवस, होली व रक्षा बंधन गोकुळ अष्टमी 2 दिवस इत्यादीड कुंभ मेळा हा जर उत्सव धरला तर तो मात्र 2 ते 3 महिने चालतो .
पित्रोत्सव हा सर्व भारतभर पाळला जातो जसा गणेश उत्सव महाराष्ट्रात , पोंगल दक्षिणेत, दुर्गा पूजा बंगाल ,गरबा गुजरात असं यांचं क्षेत्र मर्यादित नाही ते भारतभर आहे.
हा आपले पूर्वज ज्यांच्या वंशात आपण जन्मलो ,जयचे जिनस्,कुल व गोत्र परंपरा आपण धारण करतो त्यांच्या बद्दल कृतज्ञता दर्शवण्याचा उत्सव आहे.
हा उत्सव वेग वेगळ्या नावाने व पद्धतीनं जग भर मनवतातात.
उदाहरणार्थ आमचे सुहृद शेखर सोहोनी जे सिंगापुरला वारंवार जातात ते माझया इतर देशां तील याउत्सवांच्या लेखास पहा पितृशास्त्र भाग 5.:shivanjay dr sanjayhonkalse. blogspot.com वा https://m.facebook.com/story.php?story_fbid=2319052071443790&id=100000170606055 उद्देशून लिहतात"खूप छान आणि खरी माहिती।
मी सिंगापूरमध्ये पण हे बघतो। तेथे व्यक्ती ज्या दिवशी जाते त्यादिवशी प्रत्येक वर्षी स्मरण करतात।
जवळ जवळ प्रत्येक सोसायटी च्या कोपऱ्यात एक मोठा ड्रम ठेवलेला असतो आणि तेथे छापील चित्र ,डौलर, मोटारी केक असे कागद त्या व्यक्तीचे स्मरण करून जाळतात करण त्याला त्या वस्तू स्वर्गात मिळतील आणि तो खुश राहील म्हणून.
हिंदू धर्म बद्दल टिका करणाऱ्यांची हल्ली फार फॅशन आली आहे"
खरतर आपल्याकडे हा उत्सव फार शास्त्रोक्त व योग्य पद्धतीने साजरा होतो.अगदी पितरलोक ,पिशाच लोक ,व त्यांचा अस्ट्रोलाजीकल विचार करून याचे दिवस ठरले आहेत
दशक्रिया व श्राद्ध तर्पण करताना पिंड दान करतात अशी आपली प्रथा आहे .
ते पिंड कावळ्याने स्पर्शल्यासच पितर तृप्त झाले असे मानले जाते,यालाच आपण काकस्पर्श असे म्हणतो .
कावळा शिवणे व कावळाच का इतर पशु का नाही?
पितृपंधरवड्यात कावळा शिवण्याची आपण वाट का पहातो?
माणसाच्या १० वा १३ व पितृपंधरवड्यात कावळेच का यावे लागतात?
गाईला मागुन नमस्कार का करतात?
वा गंगा व यमुनेच्या व नदितीरीच श्राध्द का करतात.का करावे?
असे अनेक प्रश्न बुद्धिवादी बुद्धिमान प्राण्यास पडणे साहजिकच आहे.पण बुद्धी prograamed व direct नीट केली की यांची उत्तरे मिळतात फक्त काविळीची नजर न लावता बुद्धीला श्रद्धेची झालर लावणे हे आत्यंतिक महत्वाचे .मी माझ्या व्यवस्थापनशास्त्र ,वाहतूक व्यवस्थापन व अर्थशास्त्रातील अनेक theories समजून सांगताना मी हे मावर्जून माझ्या पाल्यांना समजावून सांगतो.
अध्यात्म शास्त्रांत तर हे आणखीन व आणखीन जास्त अत्यावश्यक व महत्वाचे असते कारण हे तर्कां पलिकडचे ( पण अतार्किक वा अगम्य rather बुद्धिगम्य नसते तर बुद्धीस तर्क व श्रद्धा यांचे रोपण करून व्यवसाईका बुद्धीने सहजसाध्यच नव्हे तर सहज सिद्ध होऊ शकते.
असो आपल्याकडे ते शास्त्रोक्त (श्रुती स्मृती युक्त वेदोक्त) कथा रूप प्रश्नउत्तर वा गुरुशिष्य सवांद रूपात (पुराणोक्त) वा परंपरा युक्त असते,।
थोडक्यात अनेक मार्गे ,जस ज्याचा पिंड तसे वा जसे ज्याला समजेल तसे सांगून ठेवले आहे ,प्रॉब्लेम आपण त्याकडे चुकूनही पाहायला तयार नसतो हा आहे .पण एखाद्याने तर्काने सांगितले मग ते चुकीचे का असेना आपण स्वीकारतो व याला खरेतर आंधळे पणा न म्हणता ,बुद्धी वाद म्हणत वाद घालत बसतो .याचाच पुरेपूर फायदा इतरधर्मीय घेतात .तेंच जे आपल्या लाडक्या चाच्या बापूंनि,पूर्वनेत्यांनी स्वार्थपायी ,निधर्मवाद नावाच्या शोभिवंत भूलपाडणाऱ्या नावाखाली हेंच केले व आपल्यास आपल्या परंपरा ,श्रद्धा ,एवढेच काय राज्यव्यवस्था यापासून कोसो कोसो कोसो ,व्यवस्थित व्युव्ह रचून ,दूर ठेवले.असे केले हे कळायला फार उशीर लागतोय.
असो ,याबाबत प्रथम पुराणोक्त कथेचा उल्लेख करूया............................
To continue पितृशास्त्र भाग 14 .....
इदं न मम्।
शिवार्पणम्।
'शिवंजय': डॉ संजय होनकळसे©
drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
Comments
Post a Comment