पितृशास्त्र भाग 14 :पिंड पूर्वजांना कसे पोहचते भाग 13 पुढे चालू $@π√@¥ #©πk@£$€ ©

पितृशास्त्र भाग 14 :पिंड पूर्वजांना कसे पोहचते भाग 13 पुढे चालू
$@π√@¥ #©πk@£$€ ©

https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/09/14-13-k.html

दशरथ महाराजांचे निधन झाले तेव्हां राम, सिता, लक्ष्मण वनवासंत होते.त्यामुळे रामाला आपल्या वडीलाचे कोणतेच कार्य करावयास मिळाले नाही.रावणवध करुन राम राज्यवर बसला तरी सुध्दा रामाने वडीलांचे श्राद्ध  केले नव्हते.
एकदा राम व सिता जंगलांतुन जात असताना एका तळ्यामधे आकाशातुन फार मोठी वस्तु त्या तळ्यात पडते. राम जवळजाउन बघतो तर तो स्वर्गातुन पडलेला य़क्ष असतो.तो रामाला सांगतोकी दशरथ महाराजांना मुक्ती मिळालेली नाही कारण त्याचे क्रियाकर्म व्यवस्थीत झालेले नाही.
रामघरी येतो व  वडीलाचे श्राध्द घालावयाचे आहे त्याची तयारी करणाची आज्ञा देतो. ही गोष्ट जेव्हां राजपुरोहीताच्या कानावर जाते तेव्हां ते पुरोहीत सांगतात की स्वकमाईच्या पैशाने  क्रियाकर्म केले तरच महाराजांना मुक्ती मिळेेल.राम व सिता  महाराजंचे क्रियाकर्म करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी येतात.सकाळी राम सितेला जमुना किनारी बसवुन गावांत काही मिळते का बघण्यास जातो. दुपारची बाराची वेळ होते तरी राम परत येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसतात.मघ्यान्ह टळायला  लागते या चिंतेत, सिता व ब्राम्हण बसलेले असतात त्याच वेळेला नदीतुन दशरथ महारांजांचे दोन्ही हाताची ओजंळ बाहेर येते आपला शिधा घेण्यासाठी.
सिता म्हणते मजजवळ देण्याारखे काहीही नाही. महाराज तिला सांगतात तु ज्याठिकाणी बसली आहेस तेथील वाळु माझ्या हातावर दिली तरी चालेल सिता त्याप्रमाणे करते व तातकाळ हात अदृष होतात.त्याच वेळेस राम तिथे येतो व सितेला म्हणतो तु हे काय केलेस, माझ्या वडीलाच्या हातावर वाळु ठेवलीस ती म्हणते असे करण्यास महाराजांनीच सागीतले. ह्याला हा झाडावरचा कावळा, ही गोमाता साक्ष आहे, हे भिक्षुक साक्षआहेत.यमुना माता साक्ष आहे.  राम प्रथम कावळ्याला विचारतो हे खरे आहे का ?
कावळा भगवान रामा पुढे काहीही न बोलता गुपचुप बसतो. भिक्षुक,गोमाता,यमुना नदीसुध्दा शांत बसते.सर्व काही यांच्चा समोर झालेले असताना सुध्दा रामाच्या भिती पोटी गुपचुप बसतात.सिता संतापते व म्हणते सत्य  माहीत असुन सांगायला तुम्ही कचरतात,मला खोटी पाडतात, मी तुम्हा सर्वाना शाप देते.कावळ्या तु बाहेरुन तसा आतुन सुध्दा काळा आहेस आज पासुन लोक तुला अवलक्षणी समजतील तुझे दर्शन अपशकुन समजतील.
गोमाते तु एवढी पवित्र तु पण तशीच,तुला शाप देते तुझ्या पवित्र तोडांने  घाण खाशील  तुला लोक अपवित्र समजतील.
भिक्षुक तु ब्राम्हण असुन सुध्दा असा वागला तु आयुष्य भर भिकारी रहाशील. जमुने माते तुझ्या उदरातुन माझ्या ससुरांचे हात आले होते तरी तु गप्प बसली मी तुला शाप देते डाव्या बाजु पर्यंत  व उजव्या बाजु पर्यत माझी नजर पोचेल तीतपर्यत तुझे पात्र कोरडे पडेल.
एवढे सर्व होइ पर्यंत राम शांत बसलेला असतो. सितेने  संतापुन एवढे जळजळीत शाप दिल्याचे  पाहुन रामाला वाटते सितेचे म्हणने खरे आहे.मग तो कावळा,गाय,भिक्षुक व नदी ला विचारतात तुम्ही सर्वजण असे का वागलात.चौघे म्हणतात भगवंता तुमच्या समोर आम्ही काय बोलणार म्हणुन आम्ही गप्प बसलो.राम म्हणतो केवळ माझ्यामुळे तुम्हाला शाप मिळाले आहेत ते मी सितेला परत घेण्याची विनंती करतो पण सिता शाप परत घेण्यास साफ नकार देते.शेवटी राम म्हणतो यावर उशाप दे.

सिता कावळ्याला म्हणते जरी लोक तुला अवलक्षणी समजत असतील  तुझे दर्शन अपशकुन समजतील मी तुला उशाप देते तरी सुध्दा लोक १० ,१३ व व वर्ष श्राध्दाला पितृपंधरवड्यात पितरांच्या नावानी नेवेद्याचे ताट ठेवतील  तुुला आग्रहाचे आमंत्रण देतील,या दिवशी तु जेवल्या शिवाय ते जेवणार नाहीत म्हणुन आपण १० ,१३,  वर्ष श्राध्दाला  व पितृपंधरवड्यात  कावळा शिवण्याची वाट पहातो.

सिता गाइला  म्हणते जरी तु तोडांनी घाण खाशील   मी तुला उशाप देतेकी तरी सुध्दा लोक तुझी पुजा करतील पण पाठी मागुन. म्हणुन  गाइची पुजा किंवा नमस्कार पाठी मागुन करतो.

सिता भिक्षुकाला म्हणते   तु आयुष्य भर भिकरी रहाशील पण मी तुला उशाप देते ज्या वेळेस तुजकडे घरांत लग्न वगैरे कार्य निघले त्या वेळेस तुला धर्मकार्याचे काम मिळेल व तुझ्या घरांतले कार्य पुर्ण होइल.

सिता यमुनेला म्हणते उजव्या व डव्या बाजु पर्यंत माझी नजर पोचते तितपर्यंत तुझे पात्र कोरड्च राहील पण मी तुला उशाप देते की जी लोक तुझ्या तटावर य़ेउन क्रिया कर्म करतील त्यांना परत क्रिया कर्म करण्याची गरज भासणार नाही.आज  आपण पहातो की यमुना नदीचे पात्र मध्य भागी कोरडे आहे.
हाइ कथा जर आपण गयेस श्राद्धकर्म करण्यास गेलो तर आवर्जून सांगीतली  जाते. मी गुरुकृपे दोनदा, एकदा मातोश्रीना घेऊन व एकदा सर्व विद्यार्थी मित्रांना घेऊन, गया श्राद्ध करवून घेतलंय जमल्यास गयाश्राद्ध महत्वावर पण लिहिण्याची इच्छा आहे.पाहूया!
पण सध्या कावळा पुराण पूर्ण करूयात........
To be cintinued ....
भाग 15
इदं न मम्।
शिवार्पणाम्।
शिवंजय डॉ sanjay होन कळसे
drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
Xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxcxxxxxxxxxxxxxx

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|