एकमेकाद्वितीय सरकटा /मुंडकटीया गणेश:
🕉अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम।
Unique Ganesh:
Mund katiya ganesh or sar kata vinayak.
एकमेकाद्वितीय सरकटा /मुंडकटीया गणेश: 'शिवंजय':संजय होनकळसे©
'शिवंजय':संजय होनकळसे©
Beheaded Ganesha:
(कुठे शीरछेदन झालंय गणपतीचे ? कुठे आहे गणेशाचे मूळ शीर?)
गणेश हा कृष्णा इतका वा थोडा जास्तच लोकप्रिय देव आहे.जसे कृष्णबाळकृष्णा च्या कथा व छटा बालगोपा ळांना व वरिष्ठांना आवडतात त्याच आवडीने,उत्साहात बालगणेश कथा,animatio n ऐकल्या,पहिल्या जातात.
ऋग्वेद ते पुराण वाग्ड्मय या दोन्हीत गणेशाच्या अनेक कथा उल्लेख आहे.गणेश पुराण व मुद्गलपुराण तर सर्वस्वी गणेशावरच आहे. पण ब्रह्मवैवर्त व शिवपुराण, भाविष्यपूराण यातही उल्लेख आहेच.ब्रह्मवैवर्तात कृष्ण राधा संवाद माध्यमातून गणपतीची माहिती मिळते तर भविष्यपुरणात वरद विनायक पूजनाने कसे कृष्णाला शक्ती व यश प्राप्त झाले,ते व्रत तो दर शुक्रवारी करतोअसे सुदामास सांगतो.सत्य युग, त्रेता युग इ युगातील गणेश अवताराच्या कथा आहेत व यदा यदाही ग्लानीर्भवती भारत अशी अवस्था झाल्यावर गणेशाचे प्राकट्य झाल्याचे दिसते.या गणेशाचे गज आनन झाले ते शंकरामुळे व कश्यपांच्या शापामुळे .
गणपतीचे शिरच्छेदाबाबत दोन कथा आहेत एक कथा जी जास्त प्रचलित आहे ती शिवपूरणांतर्गत आहे .
पार्वतीने स्नानाला जाताना रक्षणासाठी बाहेर आपल्या मळातून गणेश निर्माण केला व त्याची पार्वतीने द्वारपाल म्हणून रक्षणासाठी अंघोळी ला जाताना नियुक्ती केली होती.कुणालाही आत सोडू नको म्हणून आज्ञा होती,तिचे पालन करताना शिवपार्वतीस भेटण्यास आले असता गणे शाने त्यांना अडवले व आंत जाण्यास मज्जाव केला अस ता रागावून त्याचा शिरच्छेद केला.
,तर दुसरी कथा ब्रह्मवैवर्त पुराणात आहे त्या प्रमाणे शनीची दृष्टी पडून गणेशाचा शिरच्छेद झाला.नंतर चूक लक्षांत आल्यावर जो उत्तरेस मुख करून झोपलेला पहिला प्राणी मिळेल त्याचे मुख लावण्याचा आदेश दिला. (म्हणून आपल्याकडे दक्षिणे स पाय करून वा उत्तरेस डोके करून झोपणे अशुभ व प्राण नाशक मानतात.तर उत्तरेकडे मुख करून झोपले ला हत्ती दिसला व त्याचे शीर घेऊन तो गजमुख झाला व त्याला गणपती गणांचा पती हे नाव शिवशंकर यांनी दिले.
अशा या गणेशाचे गज आन न झाले.गणांचा ईश गणेश, गज( हत्ती) आनन (मुख) गजमुख =गजानन झाले.
असो तर अशा शिरहिन गणेशाच मंदिर केदारनाथला तळतटी गौरिकुंड येथे आहे. सरकटा विनायक वा मुंड कटिया गणेश म्हणून प्रसिद्ध आहे.
हे मंदिर केदारनाथच्या तळहटी असलेल्या गौरीकुंड पासून सोनप्रययाग मार्गावर आहे .
केदारनाथ कृपे 36 वेळा 12 ज्योतिर्लिंग यात्रा दरम्यान 3, 4 वेळाच येथे जाण्याचा योग आला.केदारनाथ यात्रा,आज अनेक सोयी होऊनही,तशी खडतरच रस्ते,थंडी,हवामान अनाकलनीय व मनमौजी तपमान,चढाई,आपली पात्र ता,ताकत इच्छाशक्ती व प्रारब्ध इत्यादी अनेक बाबी अडचणी निर्माण करतात. अशा परिस्थितीत केदार नाथलाच जाणे कठीण होते तर येथे जाणे मुष्कीलच.
मी पाहिल्यांदा 1997- 98 ला केदार नाथ ला गेलो तेंव्हा व नंतर आणखीन 36 वेळा गेल्यावर तीन चारदांचं जाणे झाले.इच्छा असूनही नोकरी, इतर कर्तव्ये यांत कसाबसा केदारनाथ पुरते 9 दिवस मुश्किलीने काढणे व्हायचे. असो सोनप्रयोग ते गौरीकुंड मार्गावर 3 साडेतीन किमी उंचीवर हे मंदिर स्थित आहे.हे एकमेव मंदिर आहे जिथे शीररहीत गणपतीचे पूजन होते.शिवपुराणानुसार अशी मान्यता आहे की या ठिकाणी शंकरांनी गणेशाचे शीर छेदन केले.येथून जवळ च गौरीकुंड आहे व गौरीचे पुरातन मंदिरआहे.केदारनाथ येथे वर चढण्याआधी गौरीकुं ड येथे दर्शन करण्याचा प्रघा त आहे.येथील गौरीकुंडात रामेश्वरयेथून वाळू आणून वाहतात व येथील पाणी व गंगाजल नेऊन रामेश्वरामला अभिषेक करवतात.याला सेतू बंध क्रिया सेवा म्हणता त,व याचा उल्लेख पद्मपुराणां तर्गत येतो.सद्गुरुकृपे हि सेवाही भगवंताने तीन चार वेळा करण्याचे भाग्य दिले आम्हाला.कधी केदारनाथला जायचा योग आलाच तर सरकटा विनायक दर्शनलाभ साऱ्यांना नक्की लाभो हि केदारनाथा जवळ प्रार्थना.
गणईशाचा गजानन झाला हे तर सर्वश्रुत आहेंच,पण मग जे शीर धडापासून वेगळे झाले त्याचे काय झाले?
तर ते शिरच्छेद एवढा स्ट्रॉंग होता की ते शीर एवढ्या वेगात लांब जाऊन पिथोरा गढ येथे पडले.येथे पाताल भुवनेश्वर नावाची एक अद्भुत गुफा आहे.खरेतर या अद्भुत व अचंभीत करणाऱ्या गुफेव र एक पूर्ण वेगळे लेखन होऊ शकेल.हि गुफा अनेक आश्चर्यपूर्ण बाबींनी परिपूर्ण आहे.गुफामार्ग 90 फूट जमिनी खाली आहे,साखळ दंड पकडूनच आंत जाण्या चा मार्ग आहे,एका वेळी एकच व्यक्ती आंत जाऊ शकते.तर अशा या गुफेत गणपतिचे छेदन केलेले मूळ नरमुख आहे व साक्षात शिव शंकर त्याचे रक्षण करतात अशी मान्यता आहे.तेथे त्यांचे शीर असून त्यावर एक शिवाष्ट्क सोनेरी ब्रह्म कमल आहे ज्यातून सतत दिव्य जलधारा अभिषेक गणेश शिरावर होत असतो. हे ब्रहकमल हि शिवशंकरानी स्थापित केले आहे.पाताल भुवनेश्वर गुफा अति प्राचीन असून,त्रेता युगांत तिचा शोध सूर्यवंशी राजा ऋतुपर्णा याने घेतला,तेथे त्याने साक्षात शिव दर्शन केले व 33 कोटी देव त्यांच्या दर्शनास आलेले पाहिले.स्कंदपुराणात असे म्हंटले आहे की शिव येथे विराजमान आहेत.द्वापार युगांत पांडव यांनी ही या गुफेत आल्याचा उल्लेख आहे.कली युगांत या गुफेचे शोध शंकराचार्यानी लावला.
प्रभकृपे त्याचे दर्शन मी अनेकवार घेतले आहे.
©'शिवंजय':डॉ संजय होनकळसे
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
https://www.facebook.com/100000170606055/posts/2901956169820041/
Comments
Post a Comment