पितृशास्त्र:पुष्प ३:जिथे ब्रह्मपुत्रा पृथ्वीराज उतरते ते परशुराम कुंड:पितृस्थान.: 


पितृशास्त्र:पुष्प ३:जिथे ब्रह्मपुत्रा पृथ्वीराज उतरते ते परशुराम कुंड:पितृस्थान.: "शिवंजय":डॉ.संजय होनकळसे.



.https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/09/blog-post_37.html



पितृ पंढरवड्यात तर पितृशांती व संतुष्टि करतातच पण पितरांच्या शांति,संतुष्टि व प्रसन्नते साठी तीर्थ तर्पण व तीर्थ श्राध्द पण महत्वाचे मानले गेलेत.किंबहूना काही महत्वाची तीर्थस्थळे ही पितृस्थाने म्हणून मान्यता प्राप्त आहेत. भारतात अशी एकूण ४२ पितृ स्थाने प्रसिध्द आहेत.


माझ्या गेल्या २० वर्षाच्या अध्यात्मिक व धार्मिक वाटचालीत सद्गुरू कृपेने माझी १२ ज्योतिर्लिंग यात्रा प्रत्येकि ३५ वेळा संपन्न करवली गेली .12 ज्योतिर्लिंगाच एक वर्तूळ पूर्ण करण्यास २५००० के २७००० कि.मि.प्रवासाचा टप्पा पार करावा लागतो.असा यात्रावास प्रभु कृपे मजकडून ३५ वेळा नौकरी ,व्यवसाय व घरील कर्तव्य सांभाळून पार करवला गेलाच पण त्याचबरोबर मातोश्री व इतर २०० जणांना  पण या यात्रा मजमार्फत करवल्या  गेल्या.


सात कैलाश,सात बद्री,पंचराम पंचप्रयाग,पंचकेदार,पंच महाभूत शिवलिंग,सप्त पवित्र नद्या,अष्ट नारायण,त्रिस्थळी,चार धाम,चार शंकराचार्य व चार बुध्द धाम,महावतार बाबाजींची सर्व प्रमुख स्थाने, ३५ शक्तिपिठें,सारी प्रमुख दत्त स्थाने तर करवली गेलीच पण ४२ पितृस्थानांपैकि   ३२ पितृस्थानं साग्रसंगीत झाली. हे​ ​


इथे​ ​


नमूद​ अशासाठी केलय​ की ज्यामुळे  आजची तरुण पिढी जी हे वाचतेय त्यांना प्रेरणा  .व स्फूर्ति मिळावी की या यात्रा आपण करू शकतो . मला करतांना काहीच मदत वा माहिती न्हवती वर भीती आपण कसं करायाच हे .. त्यांना मार्गदर्शन करायला खूप जण आहेत .


आपली ३२ पितृस्थानी सेवा झाली हे आता लक्षांत येतय ते पुढील महीन्यात मकर संक्रांतीस (२०१८  )प्रसिध्द परशुराम कुंड करण्याचा योग आल्यावर .


हे सारे कळत नकळत मज 


सारख्या लायकि नसलेल्या पामराकडून परमपित्याने करवले ,केवढी अमर्याद करूणा व कृपा त्याची.


 असो ४२ पितृस्थानं अत्यंत पवित्र शक्तिस्थळं व मान्यताप्राप्त आहेत व प्रत्येका मागे तशी कारणं  व महात्म्य आहेत.


बदरी,गया,काशी,अयोध्या,मथुरा, देवप्रयाग,मदमहेश्वर,त्रियुगी नारायण,हरिद्वार,नाशिक,उज्जैन, जाजपूर,सिध्दपूर,अमर कंटक, रामेश्वर,दर्भशयनम,परशुराम कुंड इ महत्वपूर्ण पितृ स्थाने होत.


परशुराम कुंड येथे जाण्याची माझी गेली २० वर्षाची सुप्त इच्छा.१९९७-९८ ला शृंगेरी मठातील  वास्तव्यात  वृंदावन स्वामींच अद् भूत व विलक्षण चरीत्र वाचतांना मी परशुराम कुंडाच प्रथमच उल्लेख वाचला .( वृंदावन स्वामी १८५ वर्ष जगले ते १७६६ रे १९५१ व ते पतियाळा संस्थानाचे युवराज होते.त्याकाळी ते स्वर्गारोहीणीमार्गे स्वर्गा पर्यंत गेले होते.साक्षात भगवान कृष्ण त्यांना दर्शन व मार्गदर्शन करत. खरंच त्यांचा जीवनपट विलक्षण, अचंभित करणारा  व विविधांगी आहे .मला तेव्हांपासून त्यांचा चरीत्रपट मराठीत लिहावयाची इच्छा आहे.)वृंदावन स्वामि १८ /१९ व्या शतकात परशुराम कुंड येथे गेले होते.


परशुराम कुंड स्थान फार लांब अरुणाचल प्रदेशात ईशान्येस अरूणाचल ब्रह्मदेश मार्गावर लोहीत जिल्ह्यात आहे.ब्रह्मदेश तेथून २५ ते  ३० कि.मी वर आहे.


मी २० वर्ष सतत तेथे  जाण्यास प्रयत्नशील राहीलो.


जानेवारीत मकर संक्रांति तेथे मेळा असतो .ईशान्य भारतातील कुंभ मेळा अशी त्याची ख्याती आहे.


हा मेळा मकर संक्रांतिस भरतो त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे.या दिवशी सूर्यबळ व चेतना भरपूर असते.


सूर्य आत्म्याचा कारक ग्रह आहे.


सिरदर्द,ज्वर,नेत्र विकार,मधुमेह, मोतीझारा,पित्त रोग, हैजा, हिचकी हे सूर्य प्रदत्त विकार होत


जन्म कुंडलीत  निर्बल सूर्य व्यक्तिस आत्महीनता,सिरदर्द, केशविकार व केसां सम्बंधित विकार(अवेळी पांढरे होणे)केस, खान्धा,मान,पायासंबधी समस्या, शरीरांत कैल्शियम कमी व रक्त सम्बन्धी विकार आहेत.


जर औषिधि सेवनानेपण रोग व समस्या समाधान नाही झाले तर समझावे कि सूर्यदशा वा अंतर्दशा  सुरू आहे व  वा सूर्य निर्बली आहे


व मग निर्विवाद पणेे मंत्र जप, रत्न या जडी बूटीचा प्रयोग करावा व सूर्यो पासना  करावी


व्यक्तिंद्वारा कधी कधी चूकिच कार्य होते सूक्ष्म कर्म होतात व आत्म विश्लेषण करूनही,मार्गदर्शक मिळूनही निन्दनीय कार्य व कर्म केले जाते . 


अशांनी मकर संक्रांतिस सूर्यो पासना,सूर्यसाधना करावी.


मकर संक्रांति दिनी सूर्योदय ते सूर्यास्तपर्यंत वातावरणांत अधिक मात्रेत चैतन्य असतं.त्याचा साधकांनी पूर्ण लाभ घेणं उचित आहेे.


या चैतन्यामुळे  जीवांस  विद्यमान तेज तत्व वाढवण्यात सहायता हाेते


या दिनी रज-तमच्या अपेक्षेपेक्षा सात्विकता वाढवून  लाभान्वित  होण्यास वाव मिळतो, मकर संक्रांति साधनसे फारच  अनुकूल आहे.


मकर संक्रांतिस सूर्य पूजेचं  विशेष महत्त्व आहे.सूर्य  तेज, बल, ऊर्जा व निरोगी शरीर देते .  


म्हणून सूर्य उपासना करणा-या व्यक्तिस आत्मविश्वास,आत्मबळ, ऊर्जा,एकाग्रता व अारोग्य प्राप्त तर होतच पण यश,प्रतिष्ठा व आकर्षक व्यक्तिमत्व ,परतत्व आशीर्वाद प्राप्त होतो. अशा मकर संक्रातिस परशुराम कुंड येथे मेळा भरतो.सारे भावुक व श्रध्दाळू मकर स्नान करतात.असाच मकर मेळा दरवर्षी गंगासागर येथे भरतो.


मकरसंक्रांतिस सूर्य दक्षिणेहून उत्तरेस वाटचाल सूरू करतो ज्यास 'उत्तरायण' म्हणतात ते अत्यंत पवित्र व शुभ मानले जाते मरणासन्न भिष्म १८ दिवस शर पंजरी राहीले ते मृत्यू उत्तरायणा तच यावा म्हणून.उत्तरायण भाग्यशाली व सौभाग्यदायी म्हणूनच याच दिवसांत स्रीया हळदि कुंकू समारंभ् करतात.


सूर्यास अर्ध्य द्यावे.


ॐघृणी सूर्याय नम:| जप​ ​


करीत अर्ध्य​ ​


द्यावे.


सूर्यापाससून परावरतीत होणारे सप्त वैश्वीककिरणं अर्ध्याचा माध्यमातून शरीरात प्रसारित होतात.व अारोग्य, सौभाग्य प्रदान करतात


परशुराम कुंड आणखीन एक कारणाने महत्वाच आहे.ते मातृगया स्थान आहे.


पितृस्थानांत सिध्दपूर व  परशुराम कुंड आईच्या श्राध्दासाठी मान पटकावून आहेत. कारण या दोन ठिकाणी परशुराम यांनी आईसाठी श्राध्द  केले.


वडिलांच्या आदेशानुसार त्यांनी   रेणुका मातेची हत्या केली व तीस वरदानाने पूर्न् जिवंत केले तरीपण त्यांना मातृहतेच पातक लागलं. त्यासाठि  सिध्दपूरला मातृ श्राध्द बिंदू सरोवराजवळ केले व सरस्वती स्नान केले तेव्हांपासून ते मातृ गया म्हणून ओळखले जाउ लागले.भिमानेपण येथे श्राध्द केलेय.आजही दर दिवशी हजारो श्रध्दाळू येथे मातृ श्राध्द करतात. मी स्वत: महाशिवरात्रीच्या अमावासेस २०१२ साली सिध्दपूरला मातृ श्राध्द केलेय.


तसेच परशुरामकुंड येथे त्यांनी


जमदग्नीॠषीस मातृहत्या मोक्षणासाठी उपाय विचारल्यावर सूचवले गेले कि तू त्यासाठी ब्रह्म कुंडात जाउन स्नान कर.


त्यानुसार  ब्रह्मकुंडात परशुराम स्नाना करते झाले व त्यांनी मातृहत्यामोक्षण प्राप्त केले.


परंतु त्याच बरोबर विश्व कल्याणा साठी पर्वतीय ब्रह्मकुंडआपल्या परशुने कापून ब्रह्मकुंडातील जल (कैलासपर्वतस्थ )लोहित सरोवरात बाहेर आणलं ती  धारा ब्रह्मकुंडातून आल्यामुळे तीस ब्रह्मपुत्र नदा म्हणतात.( बाकि सा-या नद्या ,ब्रह्मपूत्र ही एकमेव नर नदि म्हणून नदा) ब्रह्मपुत्रा लोहित सरोवरात(परशुराम कुंड लाेहित जिल्ह्यात लोहित नदिकाठी आहे) पडली.परशुराम हतोत्साहीत झाले पण मग परत परशुने पर्वत कापून त्यांनी ब्रह्मपूत्रेस पृथ्वीवर पाचारण केले.ब्रह्मपुत्रा ज्याठिकाणी पृथ्वीवर अवतरली त्यासच परशुराम कुंड म्हणतात.(गंमत म्हणजे गंगा व ब्रह्मपुत्रा दोनही स्वर्गातून खाली आणल्या गेल्या गंगा भागिरथाने अथकप्रयत्ने आपल्या ६०,०००पितरांच्या मुक्तिसाठी तर ब्रह्मपुत्रा परशुधारी रामाने मातृ श्राध्दासाठी. दोन्ही ठिकाणी  गंगासागर व परशुराम कुंड येथे मकरसंक्रातिसच मेळा होतो.


गंगासागर २००० व २०१२ साली केले .तेपण फार लांब आहे ट्रेन ,बस,बोट,परत बस ,मग बोट व मग ३ ते ६ कि.मी.चालत जावयास लागते .लाखो भाविक येतात .गंगासागरला तर आम्हाला वाळूतच नाराळाच्या डहाळ्या लाउन रात्र काढावी लागली म्हणून तशी पाळी येउ नये या साठी आम्ही परशुराम कुंडात रूम्स आताच बुक केल्यात.


२० वर्षांनी अथक प्रयत्नांती योग आलाय.तब्बेत तोलामासा असुन ही "शरणागत भावाने" परशुराम स्थानी ३३ व्या पितृ स्थानी जात आहे.सत्यसंकल्पाचा दाता व वाली सखा परमेश्वर यथायोग्य सेवा करवून घेईलच.


 ईदं न मम|


शिवार्पणमस्तु.


"शिवंजय":डॉ .संजय होनकळसे.






 be/SNJHg7rBJ2



[12/19, 10:58 AM] Sanjay Honkalse: https://youtu.be/y6rJOjddpRU


[12/19, 10:58 AM] Sanjay Honkalse: https://youtu.be/vfrqu9xEZMU


[12/19, 10:58 AM] Sanjay Honkalse: https://youtu.be/SNJHg7rBJ2A


[12/19, 10:58 AM] Sanjay Honkalse: https://youtu.be/ipe1y-qmLFM


Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|