शरणागत व्हा ,इदं न मम म्हणा : भाग1
[17/05, 11:59 PM] Shivanjaydrsanjay: अगस्तै नमः। कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
शरणागत व्हा ,इदं न मम म्हणा : भाग1
गुरु कर्ण धारं।:$@π√a¥ #
drsanjayhonkalse.blogspot.com
drsanjayhonkalse@gmail.com
।।शिव संकल्पम अस्तू।।
न गुरोर अधिकम न गुरोर अधिकम असं गुरु गीता (श्लोक 125 सांगतो). गुरु हेंच खरे मार्ग दर्शक असतात .गुरु हे तत्व आहे कुणी व्यक्ती नव्हे ,गुरूला जात पात ,लिंग ,योनी हि महत्वाची नसते .गुरु कुठच्याही जातीचा हलका वाटणारा असू शकतो .तो आपला बडेजाव करीत नाही . म्हणून एक लव्याने मातीचा गुरु केला ,एक नाथ ब्राह्मण होते त्यांचे गुरु योद्धा तर ज्ञानेशानी आपले बंधुचं गुर मानले ,गुरु हि टिटवी ,बांगडी हि होऊ शकते. म्हणून गुरु हे तत्व आहे ,तुमची श्रद्धा हवी.पहा श्रद्धावान लभते ज्ञान हा लेख पहा: (https://m.facebook.com/story.php?story_fbid=4580682305280744&id=100000170606055
Or
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/05/believe-trust-faith.html)
तुमचे खरे मार्गदर्शक/गुरू तुम्हाला फक्त मार्ग सांगतात. त्या मार्गावर चालल्याने काय भेटेल हे नाही सांगत... त्यासाठी शरणागत साधना भाव हवा .
त्या मार्गावर चालल्याने आपण जेवढा विचार करू शकतो त्या ही पलीकडच्या वस्तू/अनुभव आपल्याला भेटतात. "the karate kid" या चित्रपटात तो मुलगा कुंगफु शिकण्यासाठी उत्सुक असतो. त्याला वाटते त्याचा गुरू त्याला attack आणि defence शिकवेल. पण त्याचा गुरू त्याला जॅकेट खिळ्यावर लटकावयला शिकवतो आणि काढायला. त्या मुलाला वाटते हे काय पाणचट पणा लावलाय... पण त्याला माहिती नसते की त्याचा गुरू त्याचा base मजबूत करतोय आधी. मी 0न माझ्या विद्यार्थ्यांना काही काम सांगतो ,शिकवतो आधी त्यांना वाटते की मी हे त्यांना का सांगतो ,( आता मोठी झालीत म्हणून काही जण वाद घालतात ,त्यांचा उपयोग करतात असे त्यांना वाटते ते वेगळे ) पण कधी कधी मी लक्षांत आणून देतो व त्यांच्या लक्षांत येते की मला करायचे नाही म्हणून मी त्यांना सांगत नाही तर त्यांना यावे म्हणून तसे करतो,अगदी या वयातही ते बाही म्हणले वा विसरले तर मी ते करतो वा करवून घेतो ,( तरीही काहीं मकरेश कर्केश ,मेषेस असे आहेत कि त्याबा कमी पण वाटतो वा त्यांना असे वाटते की माझ्या कडे अनेक जण आहेत,असो show must go on हा न्याय त्यांच्या लक्षांत यायला वेळ लागेल)
अध्यात्म/तंत्र या क्षेत्रात प्रत्येकास वाटते कि चुटकी सरशी कामे व्हावीत (चंचलदास), मला कि ही सिद्धी हवीय, अमकी शक्ती हवीय, तमकी विद्या शिकायची आहे...पण तुमच्या प्राणमय शरीरा मध्ये जे ऊर्जा साठवण्याचे पात्र आहे तेच फुटके असेल तर काय? म्हणून गुरू आपल्या मंत्राने त्या पात्राला मजबूत करण्यासाठी गुरू मंत्र देतात.
एक उदाहरण घेऊया, तुमच्या कडे मातीचे मडके आहे. थोडे से टीचलेले...त्यात तुम्ही कधी पाणी ही भरलेले नाही...आणि अचानक तुम्ही त्यात कधी दूध भरत आहात, कधी दही, कधी तूप...पण ते गळून जाईल तुमच्या नकळत...अन आधीच तुम्ही त्याला भट्टी वर तापवले मजबूत केले तर त्यात तुम्ही काही ही टाका. गळून जाणार नाही आणि फुटणार पण नाही....
म्हणून कोणतीही विद्या, सिद्धी, किंवा साधना काही ही करण्या आधी हा विचार नक्की करा की आपली चादर केवढी...गुरू मंत्र जाप आम्ही करतोय १०८ फक्त रोजचा...आणि आमच्या अपेक्षा सिध्दी मिळण्याच्या...खिशात आठ आणे आणि मॉल मध्ये फिरतात काही लोक अशीच अवस्था आहे.... अशी अर्ध्या हलकुंडाने पिवळी झालेली professional व्यक्ती आमच्या या विद्यसर्थ्यांनी पाहिल्यास ज्या माझे पुस्तक वाचून मुख्य समीरचा यांना सांगतात की त्यांना अस दृष्टांत मिळाला ,सुगन्ध आला ,मला बाबाजी दिसतात वगरे
जोवर गुरू मंत्राचा/इष्ट मंत्राचा जप कमीत कमी १२५०००० होत नाही तोवर दुसऱ्या कशाचा विचार ही करू नये. आणि जप किती लक्ष झाला या बरोबरच जपात किती लक्ष होत हेही महत्वाचे .नाहीतर पाट्या टाकणारे शिक्षक / गुरुहि त्यांनी पाहिलेत.
ज्याला खरंच या मार्गात काही मिळवण्या ची इच्छा आहे. atleast १ वर्ष फक्त एका मंत्रावर टिकून रहावे... त्याची खरी ताकत बघण्या साठी...आणि रोज किमान ५१ माळ जाप...मंत्र मोठा असेल तर ११ माला जप.
मोठी मोठी स्वप्ने दाखवणारी लोक भरपूर आहेत...म्हणतात मी सांगतो तो मंत्र कर तू...काही गरज नाही गुरू मंत्राची...मी आहे न... गोत्र माहित नाही तर मखे नाव गोत्र म्हणून लिही ,व मीच काशी विश्वनाथ आहे असे म्हणणारे "बापू" हि आहेत. मी केलाय ना...अन जेव्हा तो व्यक्ती करतो आणि अपयशी होऊन हतबल होऊन त्याला विचारतो..मग तो सांगतो अरे तुझे कर्म पाप आहेत करत जा...मिळेल यश. मग आपण निराश होऊन या मार्गात काही होत नाही असा ग्राह्य धरून पूर्ण जीवन अध्यात्म आणि तंत्राला शिव्या घालत फिरतो. आडे म्हणणारे माझ्या महाविद्या लाय पासून मनमित मित्राचे पुतणे असे कसलाच मला म्हणाले .
तुम्ही प्रयत्न केले पण ते योग्य मार्गावर केले नाहीत...आधी गुरुमंत्र करून स्वतःच्या माडक्या ला आकार द्या, भट्टी मध्ये तापवा...
मग पुढे जाऊन जे करायचं ते करा...थोड्या श्रमातच खूप काही मिळावे.असे वाटणारे हि थोडे नाहीत
. पण त्या आधी इष्ट मंत्रावर स्वतः ला सिद्ध करावे लागेल की मी मेहनत करेल...जीव जरी गेला तरी मी रोज एवढं जप केल्या शिवाय अन्नाचा दाणा सुद्धा पोटात जाऊ देणार नाही...स्वतःच्याच तपाच्या भट्टी मध्ये तापून निघा...मग जी चमक येईल तुमच्यात सिद्दी तुमच्या पायावर लोटांगण घेतील...पण तुम्हाला त्या सिद्धी मध्ये रस राहणार नाही...कारण तुम्ही एका अशा लेव्हल वर पोहचाल जिथे ह्या सिद्धी खूप छोट्या वाटायला लागतील... यासाठी श्रद्धवाना व्हावं लागेल ,शरणागत वागावं लागेल
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/05/1.html
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4587877164561258&id=100000170606055
.................. भाग 2
..
🙏🏻🙏🏻
[18/05, 12:12 AM] Shivanjaydrsanjay: भाग दोन नक्की वाचा उद्याला $@π√∆¥ #
Comments
Post a Comment