मराठी हरिहर स्वरूप प्रल्हाद निर्मित श्री लक्ष्मी नृसिहं मूर्ती :नीरा नरसिंग पूर
अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम् ।।
हरिहर स्वरूप प्रल्हाद निर्मित श्री लक्ष्मी नृसिहं मूर्ती :नीरा नरसिंग पूर
$#¡v@"π√∆¥ :dr $@π√∆¥ ©
drsanhayhonkalse@gmail.com
drsanjayhonkalse. blogspot.com
कृतयुगी प्रकट झालेले भगवान नृसिंह उपासना हि सर्व संप्रदाय ,तत्वज्ञान शाखा ,सर्व शास्त्र संमत आहे .
नृसिंह भगवान नारायण स्वरूप तर आहेतच पण दत्त व दत्त संप्रदायाशी त्यांचे अनोन्य /परस्पर संबंध आहेत .
तसेच द्वैत तत्वज्ञान व शैवाइत पण नरसिंह भगवंतोपासक आहेत .आदी शंकराचार्यांची तर त्यांच्यावर निस्सीम भक्ती होती ,कापालिक राक्षसाकडून बाली जात असलेल्या आदी शंकराचार्यांना नारसिंह देवाने कर्दळी वनात वाचवले होते ,तेंव्हा आचार्यांनी रचलेले निरावलम्बम स्तोत्र तर नारिंह भक्ती संप्रदायात अत्यंत भक्तीने उपसले जाते .
खरतर जसे आपल्याकडे तामीळ प्रांतात जसे हरीहर युतीदर्शक शंकर नारायण मंदिर आहे ,व हरेश्वर येथे हरिहरेश्वर लिंग आहे ,तसेच शिव नारायणाचे मिलन स्थान असलेले नृसिंह नंदिर आहे.व तेही नृसिंह प्राकट्या पूर्वी स्थापित झालेली मूर्ती आहे ,व तीही बाळ प्रल्हादानी स्वहस्ते बनवलेली वालुका मूर्ती आहे .
व हे स्थान म्हणजे नीरा नरसिंग पूर
हे स्थान आग्नेय दिशेस असून पुणे जिल्याचे ते शेवटचे टोक आहे.क्षेत्राच्या एका बाजूने निरा नदी तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी आणि तिसऱ्या बाजूस या उभयतांचा संगम. व मध्ये अंडाकृती गाव आहे .तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन असे हे रमणीय स्थान आहे. या क्षेत्राचा आकार सिंहाच्या नाखासारखा आहे.तसेच या क्षेत्राला शास्त्रीय महत्व देखील आहे. शास्त्रज्ञानाअसे दिसून आले कि निरा- नरसिंहपूर हे पृथ्वीचे मध्यस्थान/ नाभिस्थान आहे.हे एक भू वैज्ञानिक सत्य आहे.जे अनेक लोकांना निरा-नरसिंहपुरला भेट देण्यास आकर्षित करतात.
हे स्थान त्या फारच थोड्या स्थानांपैकी आहे जिठे मी ,"शिवंजय": संजय एकदाच गेलोय ,बाकी बऱ्याच स्थानी सद्गुरूंनी मला दोन व अधिक वेळा सेवादर्शन योग लाभ दिला ,जसे 12 ज्योतिर्लिंगे 39 वेळा ,सप्त कैलास ,2 वेळा (कैलास 3 वेळा) अष्ट नारायण 2 दोनदा,पंचप्रयग पंच बद्री,पांच केदार ,चारधाम ,सप्त पुऱ्या ,सप्त नद्या शक्तीपीठ ,नवं नंदी ,पंच राम इ इ
येथील श्री नरसिंह हा महाराष्ट्र ,कर्नाटक आणि मध्य-प्रदेश यातील अनेक नरसिंह भक्तांचा कुलस्वामी आहेच पण ज्यांचा कुलस्वामी नाही अशा हि अनेकांना क्षेत्राचे महात्म्य व रमणीयता जाणवली व ती त्यांनी मान्य केली.अनेक भक्त येथे दर्शनासाठी येतात व नरसिंहाचा आशीर्वाद घेतात.
या स्थानाची निर्मितीच शिव व नारायण यांच्या मिलनांनी झालीय .त्याचा इतिहास असा आहे की त्रिपुरासुर वधनन्तर शंकराची शरीराची लाही लाही व्हायला लागली ती शांत करण्यासाठी शिव रुपी भीमा नदीजवळ विष्णू नि जलरूप धारण केलं त्या जलरूपाने नीरा नदी स्वरूप घेतले व ती शिव रुपी भीमा नदिस जुडली व भीमा व निरे मध्ये एक सिंहाच्या नखाकृती भूमी तयार झाली ती हे नीरा नरसिंग पूर भिमारुपी शिव व जलरूप नारायणाचा इथे संगम आहे .संगम म्हणजे प्रयाग म्हणू याला दक्षिण प्रयाग या नावानेही ओळखतात .अशारीतीने त्रिपुरवधा नंतर या ठिकाणी शिव शंकराचा दाह लोप पावला .व नीरा हि पुण्य भूमी झाली .या पुण्य भूमीतच नारदांनी प्रल्हादास " ओं नमो नारायण " हा गुरु मंत्र दिला व प्रल्हादाचे इथे वाळूची नृसिंह लक्ष्मी मूर्ती बनवली व ती येथे स्थापित केली , तीच मूर्ती आजही इथे पुजली जाते व हे लक्ष्मी नृसिंह स्थान म्हणून उदयास आले .
नरसिंह पुरी देवालयात तीच वाळूची नरसिंह मूर्ती सिंहासनावर विराजमान आहे.हि मूर्ती पश्चिमाभिमुख आहे.हि वाळूची मूर्ती विरासनस्थ ,उजवा पाय गुडघ्यात मुडपून उभा,डाव्या पायाची मांडी घातलेली,उजवा हात उजव्या गुडघ्यावर,डावा हात कंबरेवर आहे.रुंद छाती ,बारीक कमर,मुख सिंहासारखे रुंद व उग्र ,भव्य डोळे अशी उग्र चर्या आहे.मुख ,छाती ,कामर सिंहासारखे तर हात पाय मानवी वाटतात.
नरसिंहाच्या मुख्य गाभाऱ्यात श्री नरसिंहाच्या दोन मूर्ती असून दुसरी मूर्ती काळ्या पाषाणाची असून ब्रह्मदेव कृत नरसिंह मूर्ती आहे.त्यात मूर्तीस शामराज असे म्हणतात.म्हणून जय घोषात नरहरे शामराज असा जय घोष होतो
प्रल्हादानें येथे सुरुवातीची साधना केली .या अर्थी हि प्रल्हादाची साधना स्थळी आहे . नंतर प्रल्हाद आपल्या राज्यात म्हणजे मूळस्थान ,(आताचे पाकिस्तान स्थित मुलतान).व नंतर मूलस्थानी नृसिंह भगवान प्रकट झाले व वैशाख शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी त्यांनी हिरानीजश्यपूचा वाढ केला .तर अशा रीतीने नीरा नरसिंग पूर हे नृसिंह प्रकट्या पूर्वी स्थापन झालेले स्थान आहे.तर असा हा पवित्र स्थानाचा खूप मोठा इतिहास आहे
पूर्वी प्रभू रामचंद्र यांनी आपली पवित्र यात्रा रावणाचा वाढ केल्यानंतर मुनी अगस्ती यांच्या सांगण्यावरून पूर्ण केली. त्यांनी हि यात्रा निरा-नरसिंहपूर येथूनच सुरु केली होती.हे स्थान खूप सुंदर आणि धार्मिक आहे. अनेक मुनी आणि भक्त येथे पूजेसाठी येतात. असे म्हटले जाते कि महर्षी व्यास सुद्धा येथे काही कालावधीसाठी राहिले होते.समर्थ रामदास यांनी दोन वेळा निरानरसिंहपूर येथे भेट दिली याची प्रचीती येते.शके १५५३ च्या एकादशीस समर्थ पंढरपुरास आले होते.चंपाषष्ठी साठी त्यांना पालीच्या खंडोबाला जायचे होते.ते येथे आले होते आणि त्यांनी संगमावर स्नान ,संध्या आटपून त्यांनी एक सुंदर कीर्तन सादर केले होते.
निरा आणि भीमा नदीच्या संगमावर असलेला अंडाकृती प्रचंड असा घाट शके १५२७ मध्ये बांधून पूर्ण झाला.हे बांधकाम कोणी त्रिमलापाळ दाधजी मुधोजी यांनी केले.सदरील बांधकाम सतत ३ वर्षे चालू होते. पुढे शके १७८७ साली रघुनाथ राव विन्चुरकर यांनी देवालयाचा एकदरीत जीर्णोद्धार केला त्यासंबंदीचा शिलालेख देवालयात उपलब्ध आहे.
इदं न मम।
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4606687046013603&id=100000170606055
Comments
Post a Comment