नरसिंह भगवान :प्रथम पूर्णावतार:विदारूनि महास्तंभ देव प्रकटला स्वयंभ

अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
नरसिंह भगवान :प्रथम पूर्णावतार:विदारूनि महास्तंभ देव प्रकटला स्वयंभ 
"$#¡v@π√∆¥" :$@π√∆¥ #
drsanjayhonkalse@gmail.com
     ।।शिव संकल्पमस्तु।।
उग्रं वीरां विष्णुं ज्वलतं सर्वतो मुखं।
नृसिंहं भिषणम भद्रम मृत्यूरमृत्यम नमामि अहम।। 
भारतात हिंदू धर्म प्रेरित अनेक संप्रदाय आहेत ,जसे दत्त संप्रदाय,शाक्त, गाणपत्य, शैव , इत्यादी .याबरोबरच भारत भर सर्वत्र  नारसिंह सांप्रदाय आहे ,ज्याची लौकिक अर्थने स्थापना कृत युगात हिरण्य कश्यपू पुत्र भक्त प्रल्हाद यांनी केली .कारण भगवान श्रीनृसिंहांनी पहिला अनुग्रह भक्तराज प्रल्हादांवरच केला व त्यांच्या पासून पुढे परंपरा निर्माण झाली. 
 नारायणाच्या दशवंतारांपैकी नरसिंह अवतार हा चवथा अवतार .भगवंतांनी गीतेत सांगितल्या प्रमाणे धर्म स्थापना ,दुष्ट दमन व सज्जनसाधु व समाज रक्षण या त्रयी साठी जन्म घेतलेत:
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥४.८॥

भगवान श्रीनृसिंहांनी आपल्या अनन्यभक्ताचे रक्षण करण्यासाठी व दुष्ट हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी हा अवतार धारण केला. त्याचबरोबर प्रल्हादांवर कृपा करून भक्तीची परंपरा निर्माण करून धर्माची संस्थापनाही केली. आजही तो भक्तिसंप्रदाय अव्याहत चालू आहे. म्हणूनच भगवान श्रीनृसिंह हे पूर्णावतार म्हटले जातात,कारण याआधी चे मत्स्य ,कूर्म व वराह अवतार हे ठराविक कार्य समाप्ती नंतर पुढे राहिले नाहीत पुजले गेले नाहीत. म्हणून त्यांचे नावाचे भक्ती संप्रदाय झाले नाहीत .नारसिंह ,राम ,कृष्ण व  दत्त हे पुर्णावतार  आहेत.गर्ग संहितेत नारसिंह हा पुर्णांवतार  आहे असा स्पष्ट उल्लेख आहे.

भगवान श्रीनृसिंहांची अनंत स्थाने पुराणकालापासून प्रसिद्ध असून आजही अतिशय जागृत म्हणून ख्याती पावलेली आहेत. श्रीनृसिंह कुलदैवत असलेल्या कुलांची संख्याही प्रचंड आहे. किंबहुना दशावतारातील इतर अवतारांच्या मानाने श्रीनृसिंह हेच सगळ्यात जास्त कुलांचे कुलस्वामी आहेत. हेच त्यांच्या लोकप्रियतेचे स्पष्ट द्योतक आहे. उपासनाक्षेत्रातील श्रीनृसिंह भगवंतांचा वाटा देखील प्रचंड मोठा आहे. मंत्रशास्त्र, तंत्रशास्त्र, नाथ, दत्त व भागवत संप्रदाय तसेच विविध वैष्णव संप्रदायांच्या सर्व शाखांमध्ये श्रीनृसिंह उपासना आजही खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. श्रीनृसिंह ही सर्वपूज्य देवच आहेत, यात तिळमात्र शंका नाही.
श्रीनृसिंह कुलदैवत  हे अनेकांचे कुलदैवत आहे.अशा कुलांची संख्याही प्रचंड आहे. किंबहुना दशावतारातील इतर अवतारांच्या मानाने श्रीनृसिंह हेच सगळ्यात जास्त कुलांचे कुलस्वामी आहेत. हेच त्यांच्या लोकप्रियतेचे स्पष्ट द्योतक आहे. उपासनाक्षेत्रातील श्रीनृसिंह भगवंतांचा वाटा देखील प्रचंड मोठा आहे. मंत्रशास्त्र, तंत्रशास्त्र, नाथ, दत्त व भागवत संप्रदाय तसेच विविध वैष्णव संप्रदायांच्या सर्व शाखांमध्ये श्रीनृसिंह उपासना आजही खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. 
द्वैत ,अद्वैत व विशिष्ट अद्वैत या तिन्ही प्रमुख तत्वज्ञान वादी संप्रदायात भगवान नारसिंह पूज्य आहेत .आदी शंकराचार्य विरचित करावंलंब नरसिंह स्तोत्र तर  प्रचलित व प्रसिद्ध आहे .अनेक जणांना त्याचा लाभ झालाय .
नारसिंह संप्रदाय सर्वत्र पसरलाय ,भारतभर 
श्रीनृसिंह ही सर्वपूज्य देवच आहेत व त्यांची स्थाने ,(जवळ जवळ 52 प्रमुख स्थाने) आहेत . 
याचे एक कसारण म्हणजे सर्व संप्रदायात ,शास्त्रात ,व तत्वज्ञान सिद्धांतात  
नारसिंह उपासना मान्य आहे .
पण या व्यतिरिक्त आणखी एक प्रमुख कारण विचार करता लक्षांत येते ते म्हणजे राजा प्रल्हादाने  याची ओड्फह्तशिर बांधणी व विस्तार भारतभर होईल अशी आखणी केली .चला कसे ते पाहुयात:
नरसिंह भगवान जिथें प्रगट झाले त्या स्थानास मूळ स्थान म्हणतात ,तिथ प्रल्हादाचे राज्य होते.मुल्तान येथे  प्रल्हादाने नृसिंह मंदिर बांधले
आजही हे स्थान प्रचलित आहे पण भारतीय राजनीतीच्या दुर्दैव फेऱ्या मुले आज हे स्थान विभाजनात पाकिस्तानात गेले व मुलतान म्हणून ओळखले जाते .तर पाकिस्तानातही नारसिंह संप्रदाय आहे .
भक्त प्रल्हादास 10 पुत्र होते. त्या पैकि मोठ्या विरोचन या मुलास  मुल्स्थांन चे राज्य देउन नउ मुलांना नऊ अरणयाअरण्याची  राज्ये दिली
देवरोचन यास दंडकारण्य  देऊन बाकी आठ मुलांना दिलेली आठ अरण्यप्रदेश असे १. पुष्करण्य २.अर्बुदारण्य (अवधूत पर्वत), ३.  महेंद्रान्या ४. शैलारण्य.५.  हिमारण्य (काश्मीर).६. पंचारीकाराणय(कर्नाटक) ७. धर्मारण्य (गुजरात) ८. नैमिशरण्या (म.प्र/उप्र).

या  कृतयुगातील घटनां नन्तर  त्यानंतर  त्रेतायुघ अंतिम टप्प्यावर आले होते तेव्हा प्राग्ज्योतीषंपूर  (गुहाटी) चा बाणासुर हा प्रलहादाचाच वंशज होता. हा परमशिवभक्त होत पण विष्णुद्वेषी होता. परम विष्णुद्वेषी हिरण्याकशपुच्या पोटी जसा परम विष्णु भक्त प्रल्हाद जन्माला आला तसा बाणासुरपुत्र क्रांतासुर हा नारसिंह भक्त होता. नृसिन्ह भक्ती मान्य नव्हती म्हणुन त्याने क्रांतासुराला आपल्या राज्यातून सपत्नीक काढून दिले.

क्रांतासुराची पत्नी कांचनप्रभा हि महनकावती नरेश हिर्ण्यामायाची एकुलती एक मुलगी होती. हिरण्याला हि बहिश्कृतीची माहिती होताच त्याने जावयाला व मुलीला बोलावून घेतले व महनकावती  चे राज्य देऊन आपण सन्यास घेतला व त्याच राज्यांतर्गत असलेला दंडकारण्यातील गोदावरी काठच्या पोखरणी(पुष्करणी) येथे  नृसिंह सांन्नीध्यात ताप करण्यास निघून गेला.

पुढे क्रांतासुराला दोन मुले झाली , पैकी मोठा मेघनकर व लहान लवणासूर, क्रांतासुराने सन्यास घेणयाअगोदर दोन्ही मुलांत राज्य विभागून देले. दकशीणेकढील विराज नावाचे राज्य लवणासूराला दिले.त्यांची राजधानी विरज म्हणजे सध्याची लोणार येथे होती.त्याने दक्षिणेकडे विस्तृत राज्य विस्तार केला.मेघनकराचे राज्य बाकी तिन्ही देशांनी ८०० योजन म्हणजे १६०० कोस विस्तृत होते.
तर अशा रीतीने नारसिंह संप्रदाय भारतभर प्रचुर झाला आजही खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. श्रीनृसिंह ही सर्वपूज्य देवच आहेत, यात तिळमात्र शंका नाही.

श्रीनृसिंहांच्या पूर्णब्रह्मस्वरूपाचे यथार्थ वर्णन करणारा एक सुंदर ध्यानश्लोक संप्रदायात प्रचलित आहे की, 

उपास्महे नृसिंहाख्यं ब्रह्मवेदान्तगोचरम् ।

भूयोलालितसंसारच्छेदहेतुं जगद्गुरूम् ॥

"वेदान्ताद्वारे, अपरोक्षानुभूतीने जाणले जाणारे निर्गुणनिराकार परब्रह्मच प्रत्यक्ष श्रीनृसिंहरूपात सगुणसाकार झालेले असून, आपल्या अमोघ कृपेने बंधनकारक व दुर्लंघ्य अशा संसाराचा समूळ नाश करून भक्ताला ब्रह्मस्वरूप करणारे ते साक्षात् जगद्गुरूच आहेत, म्हणून आम्ही मनोभावे त्यांचीच उपासना करतो !"
इदं न मम।
$#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥ 
drsanjayhonkalse@gmail.com
drsanjayhonkalse.blogspot.com
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4602787879736853&id=100000170606055

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|