शरणा गत व्हा ,इदं न मम म्हणा:भाग 2
अगस्तै नमः ।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
(माझे बंधुवत प्रेमकरणारे जेष्ठ मित्र श्री दिलीप गडकरी व चंद्रशेखरसरस्वती साळुंके व त्यांच्या सर्व सख्ख्या मित्र मैत्रेणिस अर्पण)
$@π√∆¥ #
शरणा गत व्हा ,इदं न मम म्हणा:भाग 2
"$#¡v@π√∆¥ ":$@π√∆¥ #
।।शिव संकल्पमस्तु।।
drsanjayhonkalse@gmail.com ®©
drsanjayhonkalse.blogspot.com
शरणागत व्हा भाग एक मध्ये आपण पाहिले ,गुरु ,मार्गदर्शन व प्रचिती यावर भाष्य.
पण कितीही पूजा आराधना, साधना करून अनुभव येत नाही अशी अनेक उदाहरणे दिसतात,व त्यामुळे भाव भक्ती साधना कमी होते अशीहि उदाहरणे दिसतात.
माझ्या एक महाविद्यालयीन मनमित मित्राचा पुतण्या आहे( नाव देत नाही permission नसल्याने) की तो ,त्याचे पालक धार्मिक आहेत पण त्यांना पाहिजे तसे फळ मिळत नाही .पुतणेसाहेबांनाही थोडेफार तसेच वाटते .पण हे ,जे माझ्या मित्राचे पुतणे आहेत ,हे धार्मिक वृत्तीचे आहेत व आपल्या काकांच ,जे माझे मित्र आहेत,ऐकतात.म्हणून ते काहि थोडी फार साधना करतात .पण त्यांनाही हा प्रश्न पडतोच.
कितीही पूजा आराधना, साधना करून अनुभव का येत नाही?
अर्थात कित्येक लोक असे विचारतात की आम्ही इतका जपतप करतो, ध्यान धारणा करतो, पोथ्या पुराणे वाचतो तरीही आम्हाला त्याचे फळ का मिळत नाही.
याची म्या अल्पमतीस जाणवलेली उत्तरे येथे देण्याचा प्रयत्न करूयात
1)सद्गुरूंनी ह्यावर सुंदर असे स्पष्टीकरण दिले आहे. असे होण्याचे कारण म्हणजे कधी कधी लोक धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने ते सहसा कधीही कोणाला दुखावत नाही, त्यांच्याकडून कोणासाठीही कुठला श्राप इत्यादी निघत नाही, पण आशिर्वाद मात्र निघत असतो.
म्हणून आपल्या कडे मोठे ,शिक्षक ,आई वडील ,गुरुजन यांना पाया पडून ( दोन्ही हाताने ,आजच्या फॅशन सारखे एका हाताने वा फक्त गुडघ्यास एक हात लावून नव्हे त्याचा दोष लागतो। आमचेद्रशेखर सांगतील त्यांना कुणीतरी सेवा केल्यावर दिलेल्या अशीर्वादाच फळं त्यांना आज दहा वर्षांनी जाणवते ते तसें आपल्या अर्धांगिनीस व मला बोलूनही दाखवतात .)
तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण असे कित्येकदा तुमच्या बाबतीतही होत असेल की तुम्ही कोणाला असे सहजपणे सांगता की तुझं भल होईल, तुझं कल्याण होईल, तेव्हा नेमकं काय होतं? तर ते बोललेलं कधीही फुकट जात नाही, म्हणजे त्यावेळी तुम्ही जी रोज साधना करत असता, त्या साधनेचे पुण्य जे तुमच्या खात्यात unsafe म्हणजे hoarrded but not saved, असत ,ते hoarded पुण्य त्या माणसाला जाऊन त्याचे खरोखरच भले होत असते, ( म्हणून सत आत्म्याची हाय व श्राप घेऊ नयेत- हे मी इंदिरा ,संजय ,राजीव इ च्या मृत्यूचं कारण सांगताना सांगत आलोय :यातच आपल्या प्रश्नाचं दुसरे कारणही मिळतं ,ते पाहुच)आणि तुमच्या वाट्याला मात्र काहीच शिल्लक राहत नाही आणि म्हणून तुम्हाला त्याच फळ मिळत नाही. मग आता प्रश्न हा आहे की, अस असेल तर मग कोणाविषयी चांगलं काही बोलूच नये का? तर तस नाही चांगलं बोलण हे नेहमीच चांगलं पण तुम्ही केलेल्या साधनेची शक्ती खर्च न करता.
या साठी आपलं होंर्डिंग आहे ते unproductive आहे व ते कधी कधी चुकिच्या माणसास वा चुकीच्या कामास देऊन वाया वा वाईट कर्मात जाते . आणि आज भारतात हेंच होतेय म्हणून विषय विस्ताराचे भय लक्षात घेऊनहि
मी इथे एक उदाहरण मुद्दाम देऊ इच्छितो .माझे एक आदरणीय मित्र यांनी मला एक post पाठवली ज्यात मूक मोहन सिंग पप्पूला सांगतात ( हल्लीच त्यांनी तसे पत्रही मोदीजींना लिहलय ) कि भारतात 60 टक्के इकॉनॉमी unaccounted आहे वगैरे सांगत माझे मित्र म्हणतात की कोण बोलताय ( म्हणजे पप्पू) त्या पेक्षा काय बोलतोय हे लक्षांत घे.इ.माझे मित्रही अर्थशास्त्राचे विद्यार्थी,मला Sr, बँकेत मॅनेजरच्या पदापर्यंत पोहोचलेले व advisor ,मी नेहमी माझ्या मोठ्या मित्रांसमोर underplay करतो मान म्हणून म्हणून गप्प बसतो.
पण आपण इथे हे लक्षात घेऊ कि हा unorganised उत्पादनाचा पैसा unaccounted ( hoarded ) राहतो त्याचरूपांतर काळ्या पैशात होऊ शकत नव्हे होतं ( हेंच मोदींनी जन बँक ,आधार पँन शी संलग्न करून अशा लोकांची पंचाईत केली ,त्याचा राग मोदींवर निघतो यात अगदी महाराष्ट्राचे WH O fame आदर्श मालक हि येतात बरका ,पण अस्पन काही बोलायचे नाही हे हीं आणि खोटं असतं ?किती लाख मुलांची नावे जी बेनामी हिशोबात मदरसे वापरात होती व सरकारी मदत लुटत हाती ती बंद झाली ,हे 40 वर्षे विविधउच्च सेवा अधिकार देणाऱ्या मूक मोहननी केले नाही व आज त्याचा दोष मोदींना ,हे म्हणजे आमच्या पूनम ने तिच्या मोदक कलेलाच नाव ठेवण्यासारखे आहे. असो हे च आपल्या साधनेचे होते ( या abstract गोष्टी कळाव्यात म्हणून मुद्दमहून विस्तार भय न मानता हि आसपास ची उदाहरण मी इथे देतोय ,म्हणजे आजची सामाजिक परिस्थितीही सुजाण पण अद्न्य वाचक नारायणास कळतील
तर ते कस करायचं, तर जे मोदींनी करतात तेंच करायचं आपलं hoarding savings मध्ये रूपांतरित करायचं व मग ते गरजे प्रमाणे ,channelised mobilise होऊन इन्व्हेस्ट होऊन accelarartion multiplier effect ने प्रोग्रीसिव्ह होते हा साधा अर्थशास्त्रीय वित्तीय क्षेत्राचा ( Banking) व Keynesian सिद्धांत आहे पण मी काय लिहणार माझ्या जेष्ठ मित्रामते माझी ज्ञानगंगा आटलीय.पण हेच आपल्या सनातन ,शाश्वत व शास्त्रोक्त धर्मात सांगितलंय आपणास माहित आहे पण कळत नाही आपल्या ऋषींनी ( ऋषी म्हणजे सायंटिस्ट:सत्यशोधक) सत्पुरुषांनी एक पद्धत शोधून काढली ती म्हणजे आपण केलेली साधना त्या त्या देवतेला अर्पण करायची. तुमच्यापैकी किती लोक हे करत असतील हे माहीत नाही. आपण अगदी घरी एखादी सत्यनारायणाची पूजा घालतो,वा ज्यावेळी नवनाथ भक्तीसार किंवा श्रीगुरुचरित्र ,सप्तशती ,गीता ,या सारखे कित्येक ग्रंथ वाचता तेंव्हा या प्रासादिकग्रंथा शेवटी श्रीकृष्णार्पणमस्तू किंवा श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तू म्हणतो.
माझ्या कैक लिखाणात मी सुरुवातीस अगस्तै नमः वा शिव संकल्पमस्तु व शेवटी इदं न मम लिहतो हे कित्येकांनी नोट केले असेल पण कुणी कधी विचारले नाही.
त र हे असे का लिहिलेले असते, तर ह्याचे कारण म्हणजे तुम्ही जे काही वाचले किंवा ईश्वर आराधना केली वा कर्म लिखाण वा इतर करता ती सर्व तुम्ही देवाला अर्पण केली, त्याने काय होते? त्याने असे होते की ते बोलल्यामुळे तुमची ती उपासना त्या त्या दैवताकडे डिपॉसिट, hoard नाही saved केली जाते, आता जेव्हा केव्हा तुमच्यावर वाईट वेळ ओढवेल तेव्हा तुम्ही त्या देवाचा धावा कराल तेव्हा तो ते तुमचे त्याच्याकडे असलेले डिपॉसिट खर्च करून तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. पण ज्यावेळी आपण कित्येक जण दैनिक साधना करतो त्यावेळी ह्याबद्दल काहीही माहिती नसल्याने ती साधना आपल्या इष्ट देवाला अर्पण न करत नाही, म्हणजे ती आपल्या जवळच ठेऊन घेतो . आपण पहा सहसा possessive व secretive असतो, आणि मग जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या बद्दल चांगले बोलता, त्याला आशिर्वाद देता तेव्हा ती खर्च होते आणि तुमच्या स्वतःच्या कामाला येत नाही. त्यासाठी रोज दैनिक उपासना झाल्यावर ती तुमच्या उपास्य देवतेला, इष्ट देवतेला किंवा तुमच्या कुलदेवतेला अर्पण करायची, ती सुरक्षित करायची. त्यासाठी साधे शब्द वापरले तरी चालतात. माळ जपल्यानंतर जसे आपण म्हणतो की शिवार्पणमस्तू, कृष्णार्पणमस्तू, ब्रह्मर्पणमस्तू हे जरी नाही जमले तरी आपल्या साध्या शब्दात ती उपासना देवाला अर्पण करून सुरक्षित ठेवायला सांगायची आणि कुठले मोठे संकट आले तरच देवाला त्याची मागणी करायची, करायला पण लागत नाही ती फळते च अन्यथा ती तुमच्याकडून कधी खर्च होईल तुम्हालाही नाही कळणार.
आता हेच पहा की सद्गुरु करावे ,गुरूंक ऐकावे कारण की ज्यावेळी आपण सद्गुरूंकडून अनुग्रहित होतो तेव्हा ते आपला सर्व भार त्यांच्या डोक्यावर घेत असतात, ते ईश्वरीय अंश असल्याने, महान तपस्वी असल्याने तसेच नेहमी साधनारत असल्याने त्या भाराने त्यांना तसा काहीच फरक पडत नसतो, त्यांनी आपल्याला कितीही भरभरून आशिर्वाद दिले तरी त्यांची शक्ती संपत नसते(जसे चंदूस सत आत्मा ज्याने आयुष्य भर मधुरा भक्ती केली व सारे साधना ,पुण्य इतकेच काय भौक्तिक कमाई सद्गुरू अर्पण केली ( भले ते कदाचित राऊळ महाराज व अण्णा महाराजांसारखे शिव्या देत बोलत असतील )कारण सतत ईश्वरचिंतनात राहून ते त्याची भरपाई करत असतात, परंतु आपले तसे नसते, आपण काय करतो की थोडीफार साधना करतो आणि मिळालेले फळ दुसर्यांना कळत न कळत आशिर्वाद देऊन घालवून टाकतो. कधीकधी आपण आपल्या समस्यांसाठी एखाद्या तांत्रिक, महाराज ह्यांच्याकडे जाऊन वाट्टेल ते पैसे मोजून आपल्या समस्या सोडवून घेणे असे प्रकार ही करतो, त्याने काय होत? तंत्राच्या नियमानुसार आपल्याला समोरच्याला काहीतरी द्यावे लागते तेव्हा त्याचे फळ आपल्याला मिळते, आपण त्याला पैसे देतो, ते पैसे तो वस्तू आणण्यावर खर्च करतो, पण मग त्या देवाला काय मिळते, देव काय नुसता कोंबडे आणि बकऱ्यांवर संतुष्ट होतो असे तुम्हाला वाटते का, तर नाही, तो देव तिकडे तुमचा आत्मा गहाण ठेऊन त्याची साधना, आत्मशक्ती हे देखील घेत असतो, परंतु ते आपल्यास कळत नाही, त्याचा परिणाम म्हणजे खरतर तुमच्या त्या शक्तीनेच ती कामे होतात पण तुम्हाला वाटते की त्या तंत्रिकाने ते काम केले. त्यानंतर त्याचे वाईट परिणाम तुमच्या पुढच्या पिढीला भोगावे लागतात, कारण तंत्र फक्त पैशाची अपेक्षा ठेवत नाही तर तंत्रातील क्षुद्र स्तरावरील देवता तुमची साधना, तुमची जीवनशक्ती घेत असतात, आणि त्याबदल्यात तुम्हाला हवे ते देत असतात. पण तुम्हाला ते कळत नाही, कारण ह्याची वाच्यता तुम्हाला कोणीही करत नाही. तुम्हाला वाटते की सामानाला पैसे खर्च झाले, ते तर होतातच म्हणून मी सांगतो जसे परवा मातंगी वर(
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4572871842728457&id=100000170606055 अथवा
https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/05/blog-post.html
लिहताना शेवटी लिहले कि भावोक्त साधना करा ,तंत्राच्या मागे आपण नको जाऊयात)पण, त्याबरोबर त्यांचा तुमच्या आत्म्याशी संबंध बांधला जातो, तुम्हाला त्या शक्तीचे गुलाम केले जाते, ते सर्व तुमच्या नकळत केले जाते, त्यामुळे त्याचा तात्पुरता फायदा दिसतो पण नंतर येणाऱ्या कित्येक पिढ्यांचे तुम्ही नुकसान करत असता. (माझे एका समूहातील पूनम टीचरचे चाहते यांच्या बाबत मी हे पाहिले आहे ,मुलगा व ते स्वतः सफर करतायत) ह्या कारणानेही तुमच्या साधनेचे फळ तुम्हाला मिळत नाही. म्हणूंन कोणाही तांत्रिक साधना करणाऱ्या महाराजाकडे जाताना सावध राहा, आताच नाही तर पुढचा विचार करा. तुमच्या पुढच्या पिढीला हे सर्व काहीच माहिती असेलच असे नाही, किंवा तुम्ही तेव्हा सांगायला नसाल. त्यामुळे त्यांच्या बरबादीला तुम्हीच कारणीभूत ठराल म्हणूंन उपाय फक्त तेचं करा जे देवाच्या सानिध्यात घेऊन जातील.
काही जण तर अघोरी उपाय करतात ते आणखीन वाईट.
2 ) दुसरे कारण म्हणजे प्रारब्ध
आपण तीन प्रकारची कर्म करतो/ भोगतो.प्रारब्ध ,क्रिय माण व संचित ( या वर इथे लिहीत नाही) पण पेरिलेची उगवते या न्यायाने "करावे तसे भरावे" होते त्या मुळेच .
ज्या अर्णव गोस्वामीला विनाकारण अलिबाग कोठडीत अन्याय केला गेला त्याच कोठडीत आज वाजेची पुंगी वाजतेय ,ज्या सचिनला ला भारताची बाजू घेतल्याने धमकी दिली ते देशमुख सचिनच्या वाढदिशी बेल नाकारले गेले ,इंदिरच्या आपला शब्द न पाळता उलट साधूंवर गोळ्या झाडल्या गोमातेच्या अपमान करत) त्याच गोपष्टमीस त्यांचा व पुत्रांचा मृत्यू (खून)झाला.देवाची उपासना करायला लावतील, कारण मनुष्य जन्म हा भोग भोगण्यासाठी आहे,त्यांना बगल देण्यासाठी नाहीतर कित्येक मोठ्या साधू संतांना मोठे आजार होते, कॅन्सर सारखे आजार होते, त्यांना सहज ते त्यांच्या तपाने घालवता आले असते पण त्यांनी तसे केले नाही, म्हणून आपल्या सद्गुरूंना शरण जा जे सात्विक क्रिया करवून घेतात.
3) वरील कारणाशी जुळत आणखीन एक कारण म्हणचे आपला सूक्ष्म कर्म सिद्धांत ( थोडासा हे इंग्रजीत Butterfly इफेक्ट म्हणून ओळखलं जातं ,यावरही ली लिखाण केलय )आपला जन्म,कर्म , विचार,स्वभाव हा हजारो जन्माची देणं असतो ,फलित असतो. कधी कधी पुण्यवान व्यक्तीसही काही भोग वाट्यास येतात जसे भीष्मांचं शर पंजरी पडणं ,द्रौपदीस पांच पती लाभणे, इ ,बालीचा कृष्ण जन्मात भिल्ल म्हणून कृष्णास बाण मारणे, कर्म कि गती न्यारी म्हणतात ना तसं
4) कधी कधी उत्कृष्ट साधना करूनही फळत नाही काही कुठे तरी काही तरी राहलेले असते.जसे रामदासांना गायत्री पुरश्चरण केल्यावरच हसनुमान साधना सिद्ध करता आली ,तसे होते मी माझ्या एका student ला कुंभ विवाह कर वा कुणाशीतरी अफैर कर असे चक्क सांगीतले कारण कदाचित त्याच ते कर्म फेड बाकी होत व खर खोटं देव जाणे त्याने माझं ऐकलं व महाराष्ट बाहेर त्याला तसा योग आला व त्या student च आज लग्न झालंय व सुखात आहे ,अर्थात जीवन समस्या या आहेतच.
स्वामी समर्थांच्या पोथीत एक कथा आहे की एक सज्जन 24 वर्षे देवी उपासना करत होता पण त्याच्या परिस्तितीत काही फरक पडला नाही ,म्हणून मग त्याने उपासना सोडली व तो देवीस नावे ठेऊ लागला ,शिव्या देऊ लागला ,मग देवी त्यास प्रसन्न झाली व दर्शन दिले तर तो तिला रागावून म्हणाला आता का आलीस ,जा परत मला तुझी गरज नाही . तेंव्हा देवी म्हणाली मागे बघ .त्याने पहिले तर त्यास सात डोंगर जळताना दिसले ,देवी म्हणाली हे तुझे पूर्व कर्म जे तुझ्या 24 वर्षाच्या साधनेमुळे जळत आहेत ,त्या मुळे तुला positive काही मिळत नव्हते तू due नव्हतास.आता due झालास .तर मित्रहो म्हणून कधी कधी उपासना फळत नाहीये असे वाटते ,पण तसे नसते .असा अनुभव मी स्वतःपक्का केला 1986 साली मी जेव्हा अक्कलकोटला पहिल्यांदा गेलो तेंव्हा आम्ही साधारण 200 लोक होतो ,त्या वेळी राहायची सोया नव्हती आम्ही मंदिराच्या गल्लीच्या तोंडावरील एक मेव मुरलीधर ( कदाचित नाव चुकत असेल) धर्म शाळेत उतरलो होतो व सकाळी आंघोळलीस लाईन लागली होती ( आम्ही 200) 40 एक लोक लायनीत होते .
तर पहिला साधक तीन बादल्या वाथरूम मध्ये घेऊ न गेला ( पाणी नळ बाहेर होता) व चवथी बादली नन्तर बाहेर आला तर पाठ कोरडीच .तेंव्हा एक जण ओरडला 4 बादल्या घेऊन गेला तरी पाठ कोरडीच? यावर त्याच उत्तर "अरे 3 बादल्या मोरी साफ करायलाच गेल्या ,शेवटची कशी बशी चवथी मला आंघोळीस मिळाली " मी विचार केला की आयुष्याच असच असत ,कितीक कर्म आपणास पूर्व कर्म धुवायलाच करावी लागतात.म्हणून गीतेत भगवन्त कर्म ,अकर्म व विकर्म सांगतात जे मी माझ्या MANAGEMENT By Spiritual QUOTIENT :THE POWER OF FAITH मध्ये लिहलय .ONE HAS TO DO UNDO न NOT TO DO CERTAIN THINGS TO UPLIFT (स्वउद्धार करायचा तर ) ONESELF
म्हणून अशी साधना करा जी आपल्यास "त्या"च्याशी संलग्न करेल म्हणून "त्या"ला आपका servant नका करू ( सकाम साधना) त्यालाच आपला MASTER करा निर्गुण साधना करा
इथे पारात एक उदाहरण देऊन विषय नारायनास व नारायण रुपी वाचकास अर्पण करतो
माझ्या दोन SOUTH इंडियन विद्यार्थिनी आहेत सौम्या (ICWA) व राधिका [ MA जर्मन व आता जर्मनी येथे वास्तव्य】 दोघीही गायिका आहेत त्या नेहमी मारुतीची उपासना करत व मला म्हणत मारुती अंजनेय आमचं ऐकतो ,पास कर म्हणाला तर करतो वगैरे .
एकदा मी त्यांना म्हंटले कि हे जारून तुम्ही मारुतीस SERVANT करता व त्यास वेठीस धरता ,मी त्यालाच आपला करू इच्छितो ,तो माझा झाला की त्याच सर्व माझंच होईल . म्हणून म्हणतो शरणागत व्हा ,इदं न मम म्हणा.
आशा आहे हे लिखाण तुमच्यातील वाचक नारायणा पर्यंत पोहचेल
इदं न मम।
$@π√∆¥ #
drsanjayhonkalse.blogspot.comdrsannayhonkalse@gmail.com
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/05/2.html
Comments
Post a Comment