अज्ञात चेहरा ,महान मोहरा:पुष्प 2भाग 2)MatheMagician 'गणितानंद' काप्रेकर सर

अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।

अज्ञात चेहरा ,महान मोहरा:पुष्प 2
भाग 2)MatheMagician 'गणितानंद' काप्रेकर सर.:$@π√∆¥ #.
(भाग 1 ची लिंक :
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2020/04/mathemagician.htmlshivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com)
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com©
(आमचे सहपाठी श्री संजय केळकर याना अर्पित)
गणिताला सन्माननीय मनो रंजनाचा दर्जा मिळवून देणारे गणित जगणारे,गणितात रमणारे गणित हेंच 'एका'न्त मानणारे देवळाली नाशिक स्थित गणितानंद काप्रेकर सर यांचा जन्म 17जानेवारी 1905ला डहाणू येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ठाणे येथे झाले व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील सुप्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.पारिस्थिती मुळे उच्च शिक्षण,पदवित्तर शिक्षण झाले नाही.आईच छ्त्र लहान पणीच हरपलं.त्यांचे वडील हे क्लार्क होते,ज्योतिषशास्त्रा त पारंगत होते,तो वारसा न घेता दत्ताने ज्योतिषातील आकड्यांचा वारसा मात्र घेतला,त्यातच रमले इतकेकी महाविद्यालयीन काळातच त्यांनी Mathematicsसाठी चे मूलभूत लिखाणासाठी रँग्लर परांजपे prize मिळव ले. परांजपे त्यांचे महाविद्या लयीन गुरु व नंतर त्यांनी आपल्या गुरुच्या शहाऐंशी व्या जन्मदिना निमित्त (16- 2-62)गुरु दक्षिणा दिली. कापरेकर यांनी त्यांच्या गुरुं साठी तब्बल पाच संख्यांचा मॅजिक चौकोन बनवला. योगायोग म्हणजे त्या घटने नंतर त्यांना विद्यापीठ अनुदा न मंडळाची शिष्यवृत्ती मिळाली.
असाच मॅजिक चौकोनत्यांनी त्यांचे आवडते खगोलशास्त्र ज्ञ कोपर्निकस यांची ५००वी जयंती १९ फेब्रुवारी १९७३ रोजी झाली त्यांच्यासाठी केला.त्यांनी त्यांच्या या आवडत्या खगोलशास्त्रज्ञाला गणिताच्या माध्यमातून वेग ळ्याच पद्धतीने आदरांजली वाहिली.त्याच्या जन्मतारखे वरून जादूचा असा एक चौरस बनवला,की त्यातील उभी,आडवी,तिरपी किंवा कोणत्याही सिमेट्रीने बेरीज एकसारखीच म्हणजे ५९४ येईल...

 19    2   73  500

501   72    5   16

   3  18  499   74

  71 502   17    4

या जादुच्या चौरसात 594 ही बेरीज तब्बल 22 वेगवेगळ्या पद्धतींनी मिळवता येते. त्या चौरसातील पहिली ओळ 19 2 73 500 हि कोपरनिकस ची जन्मतारीख आणि त्यांनी साजरी केलेली 500 व्या जयंतीचे आहे.

त्यांनी  Recurring Decimals,magic squares integers अशा गणितातील विविध विषयांवर लिखाण प्रसिद्ध केले.1929 ला त्यांनी मुंबई विद्यापीठाची पदवी  प्राप्त केली,देवळाली नाशिक येथील कॅन्टोमेंटच्या शाळेत  विज्ञान व गणित शिकवण्या चा शिक्षकी पेक्षा स्वीकारला व त्याच्याशी एक निष्ठ राहिले ते 1962ला निवृत्त होई पर्यंत. शालेय स्तरावर असूनही (सहसाअसे लिखाण महाविद्यालयीन व विद्यापीठी य स्तरावर होते)ते सतत गणितावर लिखाण करत राहिले.दुर्दैवाने त्यांची दाखल तर घेतली गेली नाहीच पण खिल्ली उडवली जाई.
त्यांची राहणी अगदी साधी होती माझ्या मते शिक्षक तीन प्रकारात मोडतात चांगले, असाधारण आदर्श शिक्षक , साधारण शिक्षक व साधा वा गबाळं शिक्षक.मी एक शिक्षक म्हणून माझ्या विद्यार्थी व सहकार्याने नेहमी सांगतो की असाधारण व  साधा शिक्षक या दोन प्रकार च्या शिक्षकांस विद्यार्थी आयुष्यभर विसरत नाही , साधा  शिक्षकास किती त्रास दिला वा मज्जा केली  म्हणत आठवला जातो व आदर्श शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्या वरील प्रेम व प्रभाव यामुळे  आयुष्यभर अगदी आपल्या म्हातारपणीही  आठवतो . काप्रेकर सर पहिल्या व तिसऱ्या दोन्ही कारणामुळे  त्यांच्या पाल्यांच्या लक्षात राहिलेत.ते अगदी साधे, गबाळे वाटण्याइतपत ,होते. एकतर बुटके त्यात धोतर कोट टोपी घालीत,झिजले ल्या चप्पल,तुटकी ब्रेक रहित घन्टि रहित पण एकनिष्ठ सायकल,लेहंगा वा कॉटन पॅन्ट पण तिला पट्ट्याऐवजी नाडीने घट्ट बांधलेलेअसायचे व गणित मनोरंजीक करीत शिकवत.साधेपणा गबाळे पण यामुळे तर ते लक्षात राहिलेच पण नंतर नंतर त्यांची विद्वत्ता लक्षात आल्याने व प्रेमळ पणा मुळे चांगलेच स्मरणात राहिलेले असे काप्रेकर सर आजही कित्येकांना आठवतात प्रसिद्ध दिलीप कुलकर्णी व कै मंगेश कुलकर्णी नट , आर्टिलरीतून उच्च पदावरून गेल्या दशकात निवृत्त झालेले सुनील जोगळेकर हे त्यांचे विद्यार्थी,पुसाळकर इ. नाशिकच्या गंगापुरचे श्री दिलीप के गोटखिंडीकर सर  हे त्यांचे सहकारी शिक्षक . त्यांनी काप्रेकर सरांवर पुस्तके लिहलीत व त्यांचे सरा वरील एक पुस्तक गुजरातीतही भाषांतरीत आहे.
माझे सहपाठी ,Retired Adl Commissioner of Cust oms व  Excise श्री संजय केळकर हेही त्यांच्या कडे धडे गिरवल्याने  गणितात आवड निर्माण करते झाले, इतके कि त्यांनी व सुनील श्रीकांत जोगळेकरांनी आम च्या रुपारेल महाविद्याल यातील अत्यंत हुशार व चांगल्या अशा गणितांच्या नागर्र्गट्टी नामक प्राध्यापका शी 1divided by zero (1 upon zero ) Infinity वर संवाद साधून त्यांना आपले से केले इतके की नागरगट्टी सरांनी  Ph D.साठी Infinity हा विषय निवडला 1972 ला.
असो कॊप्रेकर सरांना त्यांच्या हयातीतच Germany हुन बोलावणे आले .
1962 ला शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यावरही  त्यांचा आकड्यांचा खेळ सुरूच राहिला.
त्यांनी दोन्ही बाजूंनी वाचले तरी तोच मजकूर येतो अशा इंग्रजी,मराठी,हिंदी इत्यादी शब्दांचे प्रदर्शन भरवले होते. उदा. डालडा,काजू भाजु का?
या वरूनच त्यांना ,कदाचित, पलिण्ड्रोमिक संख्यांची कल्पना सुचली असावी. त्याचा एक नमुना:
4 2 0 4 2 3 4 1 2 5 व  5 2 1 4 3 2 4 0 2 4 या पालीण्ड्रोम संख्या आहेत; म्हणजे त्या उलटसुलट कशा ही लिहिल्या तरी एकच संख्या मिळते.त्या पुढील प्रमाणे पुनरमांडणी करून मांडल्या.....

4, 20, 42, 3, 41, 25 आणि 5, 21, 43,2, 40, 24आता,
4 + 20 + 42 + 3 + 41+ 25 = 5 + 21+ 43 + 40 + 24
आणखी गंमत पाहा. या सर्व संख्यांचे वर्ग केले आणि मिळवले तरीही........
4²+ 20²+ 42² + 3² + 41²+ 25²= 5² + 21² + 43² + 40²+ 24²
आणखी गंमत पुढेच आहे
यांचा घन केला असताही दोन्ही बाजू सारख्या राहतात हे कापरेकरांनी गणित करून  calculator नसलेल्या जमा न्यात काढले होते..०
4³+ 20³+ 42³+ 3³ + 41³+ 25³ = 5³ + 21³ + 43³+ 40³ + 24³
त्यांना आगगाडी स्टेशनवर किती वेळ थांबते हे एकदा कोणी विचारले असता त्यांनी अगदी गमतीदार उत्तर दिले होते....
“टू टु टू टु - टू – टू”
समोरचा माणूस गोंधळून गेला होता. तेव्हा त्यांनी त्याला समजावले... “Two to Two to Two two” म्हणजेच दोनला दोन मिनिटांपासून दोन वाजून दोन मिनिटांपर्यंत अशी चार मिनिटे गाडी थांबते.
  त्यांनी काप्रेकर नंबर,देवळा ली नंबर,डेमलो नंबरहर्षद नंबर जगास दिले. 
काप्रेकर सर सरळ,भाबडे होते आयुष्या त छक्या पंज्याचे मोहताज नव्हते ."
कौटुंबिक पातळीवर त्यांचं चौकोनी कुटुंब नव्हते ,ते आणि त्यांच्या सौभाग्य वती अशी दोनच कोन होते. त्यांच्या श्रीमती शांत ,निरपेक्ष  होत्या .त्या बाल मंदिर चालवत असत.त्यामुळे दोघेही आपयाआपल्या कामात व्यस्त असत. काप्रेकर मॅडम आधी निर्वरतल्या ,व अपत्यहीन असल्याने नंतर मेहुणीकडे भोजन करीत वा चित्पावन समाजात जात,पण आकडेमोड चालूच होती .
4 जुलै 1986 ला 81 व्या वर्षी या जगनमूर्तीने  जगाला निरोप घेतला.

असे हे रामनुजाचार्यानंतर त्यांच्या इतकेच जागतिक कीर्तीचे तरीही आजही काहीशे उपेक्षित व अपरिचित असे काप्रेकरसर.
अशा व्यक्तींचे महत्व व मोठे पण ते असताना कळत नाही.मग कळतं अशी व्यक्ती होणे नाही.
कुठल्याही समाजाच्या जडन घडण्यात व विकासात शिक्षकांचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण असतं. कित्येक बाबींमध्ये तर आई वडील करु शकत नाही ते शिक्षक करतात,म्हणून अगदी आर्य चाणक्य ,सॉक्रेटिस पासून ते राधा कृष्ण मेनन, ऐ पी जे अब्दुल कलाम पर्यंत सारे शिक्षकांचं महती वर्णन करतात.हे कदाचीत जर्मनी या देशाने पुरेपूर ओळखले म्हणून तिथे शिक्षकांस मान सन्मान तर देतातच पण ते highest paidअसतात तिथे कारण त्याचा dictum आहे : 'TEACHER TEACHES PEOPLE OF ALL OTHER PROFESSIONS'.
तर विद्यार्थांच्या जडन घडणात,योग्य व्यक्ती बनवण्यात, शिक्षकांचा वाटा सिंहाची असतो
भारतात तर गुरु शिष्य परंपराच  आहे. भारतात असे  कित्येक अज्ञात प्रसिद्ध पराङ्मुखं शिक्षक होते व आहेत जे अज्ञात आहेत. यांची माहिती ,विचार ,जीवन समाजापूढे येणं ,आणणं भविष्यातील सुदृढ समाज व भावी पिढी घडवण्यासाठी अत्यावश्यक  आहे ,नव्हे ती आजच्या पिढीचे कर्तव्यच आहे.कारण आज आपण खाऊ शकत असलेल्या आंब्याचं झाड पूर्वी कुणीतरी लावलय  म्हणून उद्याच्या पिढीस चांगलं फळ मिळण्यासाठी आज पेरणी महत्वाची. 
काप्रेकरसर यांचे काही विद्यार्थी त्यांच्या साठी काही तरी जरू इच्छितात असे ऐकले. ते  scholorship ,prizes इत्यादी पारंपरिक  गोष्टीं करतीलच पण मला वाटते की त्यांसाग जीवनवृत्तांत इतका विचित्र ,भरीव ,वैशिष्ट्यपूर्ण आहे कीत्यांच्या जीवनीवर एखादा सुंदर ,मनोरंजक,रंगतदार  3 इडियट सारखा चित्रपट काढता येईल . असे का नाही होऊ शकणार ? जर सुपर 30 ,Padman, केसरी ,मिशन मंगल , हवाई ज्यादा असे चित्रपट येऊ शकतात तर काप्रेकर सरांवर कां नाही? अक्षय ,ह्रित्तिक ,राजू हिरानी ,आयुष्यमान ,संजय लीला ,महेश मांजरेकर सारखे चित्रउद्योजक त्यांना नक्क्की न्याय देतील.मी तर चांगलं,योग्य सुचक शिर्षकही दिलंय World Famous MatheMagician.त्यांच्या चाहत्यांनी व विद्यार्थ्यांनी नक्की विचार करावा,व गुरुऋण फेडण्याची संधी घ्यावी. सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर  या विचारास  कृतीत आणण्यास नक्की सहाय्य भूत होईल.
$@π√∆¥ #©

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया