MatheMAGICIAN 'गणितानंद' काप्रेकर सर.भाग1
🕉अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
अज्ञात चेहरा ,महान मोहरा:पुष्प 2
भाग 1)
MatheMAGICIAN 'गणितानंद' काप्रेकर सर.:$@π√∆¥ #.
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com©
[आमचे सहपाठी सागरी संजय केळकर याना समर्पित ]
अर्थशास्त्र हे जीवन जगण्यासाठी करण्यात येणाऱ्या भूमिकांचे /उपक्रमांचे शास्त्र आहे असे J. R. Hicks म्हणतो.अनेक विभूती अश्या असतात की ज्या विद्वान असतात असामान्य बुद्धिमत्तेच्या ,Prodigy, असतात. पण या अर्थशास्त्रीय जगण्याच्या कार्यक्रमा साठी ,थोडक्यात उपजीविकेसाठी त्यांच्या लायकीपेक्षा कमी दर्जाची काम, नोकरी धंदा करतात व उपजीविका चालव तात ज्यास underemployment(अपूर्ण वा अर्ध रोजगारी) म्हणतात ,असे असामान्य लोक मग अज्ञात होऊन जातात.पण हिरा कोळश्यातही चमकतो ,कमळ चिखलातच फुलते तसे हे लोक आपली छाप या ना त्या प्रकारे सोडतातच व हे अज्ञात चेहरे महान मोहरे होऊन जातात .
गेल्या शतकांतात झालेले असेच एक अज्ञात व्यक्तिमत्व - छोटी मूर्ती महान कीर्ती-भारताची जगास दिलेली देणगी ,जगप्रसिद्ध गणितद्न्य काप्रेकर सर .
काप्रेकर सर,गणितद्न्य, सदा गणितातच रम्य असलेले,गणितातच आनंद मानणा रे,गणितातच आनंद शोधणारे,गणिताचा आनंद देणारे जगप्रसिद्ध "गणितानंद" दत्तात्रेय रामचंद्र काप्रेकर.माझ्या मते ते तर MatheMagician होते ,कारण त्यांनी गणितासारख्या क्लिष्ट विषयास मनोरंजनाचे ,हर्ष ,आनंदाचे साधन बनवले .
गणित हाच त्यांचा जीव प्राण ,गणित हांच त्यांचा विरंगुळा ,गणित हांच त्यांचा 'एकांत' होता.त्यांनी गणित सारख्या क्लिष्ट विषयाला जादुई करून सोडले व जागतिक कीर्ती मिळवली .
असे म्हणतात की शिक्षक हा एखाद्या रस्त्या सारखा असतो ,तो एकाच ठिकाणी स्थिर असतो ,CONSTANT असतो ,पण आपल्या पाल्यास त्याच्या ध्येया पर्यंत किर्तीमान करतो .काप्रेकर सर हे असेंच होते त्यांनी आपल्या लाडक्या पण क्लिष्ट गणितास जागतिक कीर्तीचे साधन ,जादुई मनोरंजक करवून त्याला मानाचा तुरा मिळवून दिला व स्वतः शांत ,एकांत ,स्थिर राहून गणितास "काप्रेकर स्थिर"अंक काप्रेकर Constant दिला.हो 6174 हा नंबर काप्रेकरांनी जादुई नंबर ,स्थिर नंबर म्हणून जगभर किर्तीमान केलापण या बरोबर महाराष्ट्राला गणितात जागतिक किर्तीमान मिळवून दिला.
कोणतेही चारांकी आकडे जे सम वा
एक चार अंकी संख्या घ्यावी जीचे दोन अंक भिन्न आहेत जशी 3141 हि संख्या हिस आरोही (उन्नत,ascending =1134) व अवरोही (अवनत,descending=4311)क्रमात लिहून उन्नत संखेतुन म्हणजे 4311 मधून अवनत संख्या 1134 वजा करावी
जी संख्या येईल (4311 वजा 1134 = 3177) ती संख्या आल्यावर पुन्हा तीच प्रक्रिया, जीस काप्रेकर व्यवहार व प्रक्रिया म्हणतात,(=Kaprekar’s routine) उन्नत वजा अवनत संख्या करत राहिल्यास शेवटी
काही निश्चित (जास्तीत जास्त सात)पायऱ्यां नंतर आपल्याला 6174 संख्या मिळते हिलाच काप्रेकर स्थिरांक म्हणतात .पहा हा कसा येतो ते
4311-1134=3177.
7731-1377=6354.
6543-3456=3087.
8730-0378=8352.
8532-2358=6174.
नंतर वरात यातून यांचं काप्रेक प्रक्रियेतून म्हणजे
7641-1467=6174…हाच काप्रेकर स्थिरांक मिळतो.हा स्थिरांक हि रस्त्या सामान स्थिर अशा काप्रेकर सरांची म्हणजेच पर्यायाने महाराष्ट्राची जगाला देण आहे.या काप्रेकर स्थिरांक आज जगभर गणित शिकवण्यात व गणितात आवड निर्माण करण्यात वापरला जातो. याच अँड्रॉइड अँप पण आहे जे आज जगभर वापरलं जातं.
पण सुरुवातीस काप्रेकरांना आपल्याच गणितज्ञांनी मूर्खात काढले ,त्यांची खिल्ली उडवली जायची. पण सर आपल्या रस्त्यावर मग्न व स्थिर राहिले सुदैवाने त्यांना उशिरा का होईना पण त्यांच्या हयातीतच जागतिक सन्मान व कीर्ती प्राप्त झाली व ते मार्क्स सारख्यांच्या यादीत , ज्यांना मरणोत्तर कीर्ती मिळाली,न जाता याच देही आपल्या लाडक्या गणिताचा सन्मान पाहू शकले. व काप्रेकर सर व काप्रेकर स्थिरांक ,जो 1949 ला जन्मला 1975 साली उजेडात व प्रसिद्धीस आला .1975 साली अमेरिकेतील प्रा .मार्टिन गार्डनर यांनी घेतलेल्या दखलीनंतर ते जगभर प्रसिद्धीस आले.गार्डनर यांनी काप्रेकर सरांच्या संशोधनावर आधारित एक लेख SCINTIFIC AMERICAN या जगप्रसिद्ध मासिकात, Mathematical GAMES या सदरात लिहला व सरांची दखल भारत भर व जगभर घेतली गेली.
स्वीडनच्या WORLD DICTIONARY OF MATHEMATICS यात काप्रेकर सरांचं नाव अंतर्भूत झालंय. STEFANU ELIAS ALOYSIUS या लेखकाने D R KAPREKAR या नावाने त्यांचे चरित्र लिहलेय. काप्रेकर स्थिरांक बरोबरच त्यांनी काप्रेकर नंबर ,डेमलो नंबर हर्षद नंबरही जगास दिले.
गणिताचा त्यांच्या धतास एवढा अजब हिता की त्यांनी स्वतःच्या दत्तात्रेय या नावाचहि गणित मांडले, स्वतःच्या ‘दत्तात्रय’ नावाच्या संख्येचा शोधही लावला. दत्तात्रयात ब्रम्हा, विष्णू, महेश अशा तीन देवता आहेत; तसेच, तीन वर्गदर्शन देणार्या संख्याही गणितात आहेत हे कापरेकर यांनी शोधून काढले. 13, 57, 1602, 40204 या संख्यांना दत्तात्रय संख्या म्हणतात. कारण, त्या संख्यांच्या वर्गाचे दोन किंवा अधिक हिस्से केले तर त्यांतील प्रत्येक हिस्सा हा पूर्ण वर्ग असतो.
उदाहरणार्थ, 13²=169.(16 आणि 9 हे पूर्ण वर्ग आहेत.)
57²=324।9;
1602²=256।64।04;
40204²=16।16।36।16।16
असे हे जगप्रसिद्ध Mathematician , सॉरी ,MATHE MAGICIAN काप्रेकर सर महाराष्ट्राचे भूमिपुत्र व भारताचे सुपुत्र होत.चला तर थोडक्यात पाहूया त्यांची जीवनी भाग 2 मध्ये .........
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3381681508514169&id=100000170606055 shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2020/04/mathemagicia
Comments
Post a Comment