दश महाविद्या ,व बगला मुखींमाता भाग2'शिवंजय'संजय
अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
दश महाविद्या ,व बगला मुखींमाता भाग2
'शिवंजय'संजय होनकळसे
बगलामुखी माताकी जय!
बगलामुखी जयंती आज बगला मुखी जयंती आहे.हि सत्ययुगात वैशाख शुद्ध अष्टमीस प्रकट झाली.बगळ्याच्या रूपांत येऊन तिने वेदांचं रक्षण केले म्हणून ती बांग्लामुखींदेवी.
बगलामुखी हि शत्रूनाश व कायद्याच्या संरक्षणासाठी बांधील देवी आहे .
हिला ब्रह्मास्त्र या नावाने पण ओळखले जाते कारण ती शत्रूसाठी ब्रह्मास्त्र आहे .
पृथ्वीवर भयानक महामारीचे संकट आले असता ,शिव आज्ञेने ,विष्णूच्या उपासनेस ती प्रसन्न झाली व प्रकट झाली ती सत्ययुगात .तिचं प्रकटीकरण जगले ते सौराष्ट्रातील हरिद्रा या ठिकाणी ,ती सोन्यासारखी पिवळी आहे म्हणून तिला पितांबरा या नावानेही ओळखले जाते . हरिद्रा येथे प्राकट्य झाल्याने व सोन्या सारखी पिवळी असल्याने तिला पिवळा रंग ,हळद ,पिवळी मिठाई,पिवळे फुल प्रिय आहे .
बागलामुखी देवीची तीन प्रमुख स्थाने आहेत ,एक दातीया मध्यप्रदेश,नलखेडा मध्य प्रदेश ,व हिमाचल येथील कांगडा येथे.माँते कृपेने मला तिन्ही ठिकाणी दर्शन सेवा करण्याचे भाग्य लाभले ,दातीया व नलखेडा येथे तर आमच्या ग्रुपच्या नावे यद्न्य सेवा व इतर उपासना ,देवीखडग् सुरु असते .
पण बिहार 36 गढ येथेही एक मंदिर आहे बागलामुखी आईचे.
बागलामुखी देवीस दश महाविद्यांपैकी महत्वाचे स्थान आहे ,ती आठवी म्हविद्या आहे .
हि स्तम्भन देवी आहे सारे ब्रह्माण्डची शक्ति एकत्रितपणे हि हिचा मुकाबला नाहीं
करु शकत. शत्रुनाश, वाकसिद्धि, वाद विवाद यांत विजय मिळवण्यासाठी हिची इ उपासना केली जाते.हिच्या उपासनेने शत्रुच स्तम्भन होत व जातकाच जीवन निष्कंटक होत.किमान १०००० तथा असाध्य कार्य यासाठी एक लाख मंत्र जप करना चाहिए। बगलामुखी मंत्र के जप करण्यापूर्वी बगलामुखी कवच पाठ अवश्य करावा. स्वरुप : नवयोवना आहे, पीवेळी साङी धारण करते सोन्याच सिंहासन यावंर विराजित आहे । तीन नेत्र, चार हाथ आहेत सोन्याचा मुकुट आहे.स्वर्ण आभूषण
अलंकृत आहे शरीर पातळ, सुंदर आहे , रंग गोरा व स्वर्ण कांति आहे ,सुमुखी आहे मुख मंडल अत्यंत सुंदर व हसमुख मन मोहि आहे.
बगलामुखी हि तंत्र देवता आहे पण सामान्य माणूसही हिची भावोक्त उपासना करू शकतो ,कित्येक पुढारी व नेते हिची पूजा पाठ करवतात.1962 च्या युद्धात हिची साधना केली गेली होती त्यामुळे हिची माहिती व प्रचार झाला.प्रत्येक महाविद्येच्या शिवदेवता आहेत कारण त्या पार्वतीचे रूपं, प्रतिबिंब आहेत.
दशावतार उत्पत्ती हि या महाविद्या पासूनच झालीय जसे काली-कृष्ण कूर्मवतार हा बग्लामुखीचा आहे ,तसेच दहा दिशांचं आधीपत्यही या दहा महाविद्यांकडेच आहे.अशा या दश महाविद्यांपैकी आज बग्लामुखीची जयंती आहे.
शिवंजय':संजय होनकळसे
इदं न मम।
Comments
Post a Comment