शिव शिव बाबा अल्प परिचय*....
*शिव शिव बाबा अल्प परिचय*....
शिव शिव बाबायांचे मी प्रथम कुरवपूर येथे दर्शन केले ,त्या नंतर आमचे स्नेही वरिष्ठ बंधू श्री जयंतजी देशपांडे यांनी त्यांना श्री गिरवीस गोपालकृष्ण मंदिरात आमंत्रित केले होते तेथे दर्शन लाभ झाला .आज ते 163 वर्षाचे होते.
नंतर मखमलाबाद येथे जाण्याचा प्रयत्न केला त्यांव्हे पुन्हा दर्शन व्हावे ही इच्छा तशीच राहिली.
मी अध्यात्माचा एक शिपाई आहे असे ते म्हणत.
शंकर महाराज,साई , इ प्रभृतींचे त्यांनी दर्शन सेवा केली होती.
शिव शिव बाबांचा जन्म २७ डिसेंबर १८५७ दत्त जयंती च्या दिवशी तामिळनाडूत झाला. वयाच्या ७ व्या व १४ व्या दिवशी आई व वडील हा संसार सोडून गेले. इतरांनी संगोपन केले.
बाबांनी संस्यास ग्रहण केला... पुढें स्वामी समर्थांच्या आदेश अनुसार स्वामींनी श्री साईबाबा, श्री माधवनाथ महाराज, श्री देव मामलेदार महाराज,श्री गजानन महाराज आदीं साठी ४ लखोटे घेवून नासिक ला आले ते कायमचेच नासिकला वास्तव करून राहिले.
१९१२ वर्षीच्या गुरुपौर्णिमेला बाबा उपस्थित होते. त्याच वर्षी दुष्काळ पडला व बाबांना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान दर्शन देवून पर्जन्य याग करण्याचा आदेश दिला.
याग समाप्ती दिवशी तर बाबांनी शीवगोरक्ष च्या साधकांना जिथे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी दर्शन दिले ती जागा दाखवली, स्वामींच्या पादुका दर्शन करवले , १९०१ ला शिव बाबा पशुपतीनाथ, काठमांडू ला गेले होते तेव्हाचे रुद्राक्ष साधकांना दिले. महिलांना स्वहस्ते साड्या दिल्या व भावावेशने अनावर झालेले पत्नीचे अश्रू हाताने पुसले....हा क्षण कायम तिच्या मनात राहील.
गेले काही वर्षे पुज्यानिय शिव शिव बाबा नासिक च्या बाहेर होते व काल त्यांचे कृष्णा किनारी असलेल्या पंचदेव पहाड येथील त्यांच्याच आश्रमात निर्वाण झाले. आज अमरधाम नासिक ला अनंतात विलीन झाले.
इंदोर चे श्री पानसे महाराज सांगतात की शिव शिव बाबा व साईबाबा त्यांच्या आजीच्या लग्नाला उपस्थित होते यावरून त्यांच्या वयाची कल्पना येते.
*अश्या ह्या दिव्य विभूतीस अंतकरणा पासून नमन व भावपूर्ण श्रद्धांजली* 🌷🌷🌹$@π√@¥ #🌷🌷🙏🏻
Comments
Post a Comment