भारतीय एकतेचं प्रतिबिंब:एकता स्मारक:Statue of UNITY
भारतीय एकतेचं प्रतिबिंब:एकता स्मारक:Statue of UNITY
$#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥ #
drsanjayhonkalse@gmail.com
drsanjayhonkalse.blogspot.com
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/08/statue-of-unity.html
।शिव संकल्पमस्तु।
जगात अनेक स्मारकं आहेत जस अमेरिकेतील स्वतंत्रता स्मारक ,Statue of liberty जे जगप्रसिद्ध स्मारक आहे. अमेरिका व फ्रान्स यांच्या मैत्रीचं प्रतिक जे गुस्ताव आयफेल यांच्या मदतीने 1864 ते 1884 दरम्यान फ्रान्स मध्ये बांधल गेलं व 1885 ला MANHATTEN ,NEW YORK येथील लिबर्टी नावाच्या बेटावर आणून स्थापित केला गेल .
याच धर्तीवर व जास्त संयुक्तिक व साजेसं स्मारक भारताच्या सर्वात यशस्वी व लोकप्रिय पंत प्रधान श्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकार झालेय जे भारतीय वैविध्यपूर्ण व विविधरंगी संस्कृतीच्या एकतेचे सुयोग्य स्मारक झाले आहे व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध पावत आहे.हे स्मारक नव्याने स्थापन झालेल्या गुजरात च्या,केवडिया-बडोदरा विभागातील, गरुडेश्वर तालुक्यात स्थापित आहे जे बडोद्यापासून जवळच व येथील केवडिया या नव्याने सुशोभित रेल्वे station पासून 5 km वर आहे.
हे स्मारक नर्मदाधरणाच्या खालच्या प्रवाहापासून 3.2 किमी (2.0 मैल) दूर आणि साधू बेट नावाच्या नदीच्या बेटावर बांधले गेले आहे.पुतळा आणि त्याच्या सभोवतालचा 2 हेक्टर (4.9 एकर) पेक्षा जास्त जागा व्यापलेली आहे,आणि नर्मदा नदीच्या खाली गरुडेश्वर विराने तयार केलेल्या 12 किमी (7.5 मैल) लांब कृत्रिम तलावाने वेढलेले आहे.नर्मदा परिक्रमेच्या मार्गावरील नवीन स्थूलपाणेश्वर मंदिर हे येथून जवळच आहे .
ज्या वेळी मी पहिली परिक्रमा केली त्या वेळी या स्मारकाची संकल्पना साकारली गेली आणि 2018 साली हे स्मारक तयार झाले व लोकार्पण झाले (31 ऑक्ट 2018)त्या वेळी मी येथे डिसें महिन्यात 3री परिक्रमा करण्यास आलो असता ,यास भेट द्यावयाचा प्रयत्न केला होता व अगदी तिकीटबारी पर्यन्त पोहोचलो होतो पण लक्षांत आले की हे स्मारक नर्मदा नदीच्या बेटावर आहे त्यामुळे नर्मदा ओलांडण्याचा दोष लागतो तो परीकम्मावासींना बंधक आहे म्हणून परत फिरलो.
आज 21 ऑग 2021येथे भेट देण्याचा योग आला ,सकाळी 5 वाजता केवडिया स्थानक येथे पोहोचलो,चहा नाश्ता करुन,वसंत विहार नावच्या होम स्टे मध्ये आंघोळ व जेवण करून येथे पोहोचलो.
हे स्मारक नितांत सुंदर असे आहे ,सरदार वाल्लभभाईंची 182 मीटरची उंचीची लोह व ब्राँझ वापरून चिरकाळ अबाधित राहील अशी जगातील सर्वांत उंच अशी प्रतिमा सरदार पटेलांचं उत्तुंग व्यक्तिमत्व दर्शवणारे उत्तुंग स्मारक नरेंद्र मोदींनी देशास अर्पण केले आहे .
आणि हो हे स्मारक अगदी सुयोग्य असून योग्य माणसास श्रद्धांजली स्वरूप असे नक्कीच आहे.
सरदार पटेल हे लोह पुरुष म्हणून ओळखले जातात. ते खरे तर भारताचे पहिले पंत प्रधान व्हावयाचे पण........नेहारुवियन राजकारणामूळे अनेक बळी पडले जसे सुभाष बाबू ,आझाद ,राजेंद्रजी , त्यातील हे प्रमुख.
ते विभाजनाच्या अगदी विरुद्ध होते ,ते नसते तर आज काश्मीर जेथे 1947 पर्यंत हिंदू राजवट होती आज बगरताचे अविभाज्य अंग नसते ,आज 370 कलम जे नेहरूंनी जाणीव पूर्वक लावले त्यास हे कलम अस्थायी राहील अशी पुष्टी व पुस्ती पटेलांनी लावली त्याचा फायदा मोदी शहाणी घेऊन 370 रद्द केले हे आताच जिवंत इतिहास आहे ,त्या आधी राजा हरिसिंगला सैनिकी बळ व हातभार देण्याचा निर्णयही त्यांचाच .तरीही काही भाग हा procrastinated लोकांनी गिळंकृत केलाच तोही आता आपण लवकरच परत मिळवू.
असो याही पेक्षा मोठी कामगिरी वल्लभ भाईंनी केली ती म्हणजे भारताची अखंडता अविभाजीत राखण्याचे मोठे कार्य.भारत हा अनेक संस्थानिक व संस्थानाचा असा बनलेला होता .सर्व संस्थान खालसा करून राष्ट्रीय झेंड्या खाली आणण्याचे अनमोल कार्य त्यांचेच .अनेक संस्थाने प्रामुख्याने जुनागड व हैद्राबाद यांना विलीन करून घेण्याचे अत्यंत क्लिष्ट व कठीण काम त्यांनी करवून घेतले .हैद्राबाद वेगळे राष्ट्र म्हणून घोशीत होऊ पाहत होते ,तसे झाले असते तर ते भारताचा पोटाचा कॅन्सर ठरले असते .ब्रिटिशांनी त्यांना तसे स्वातंत्र्य दिले होते .पटेलांची diplomacy यावेळी कामास आली ,तशीच ती काश्मीर बाबत आली .
थोडक्यात सरदार पटेल यांनी चिकाटीने व अत्यंत मेहनतीने कौशल्य पूर्वक हे काम केले ,या आधी आर्य चाणक्य ने हे हिंद जागृतीचे व एकोप्याचे काम केले होते ,त्या अर्थाने पटेल हे आधुनिक बगरताचे आर्य चाणक्यच होय. त्यांचे भारतीय अखंडतेचे कार्य पाहून भारतीय एकतेचे रूपक ,त्यांचीच प्रतिमा प्रतीक होणे हे अगदी सुयोग्य आहे. त्यांनी एकूण 562 संस्थाने खालसा करवून भारत अखंड ठेवला . 70 वर्षाने का होईना पण आज त्यांच्या कार्याची दखल घेणारे असे हे स्मारक नरेंद्र मोदींनी तयार जेल्याने भारत ,अखंड भारत त्यांचा सदैव ऋणी राहील.बभारताच्या आजच्या युनिटीचे खरे शिल्पकार पटेल व त्यांचे मुत्सद्दी व धोरणी राजकारणच आहे .
आज त्यांच्या मुळेच भारत अनेकते मध्ये एकता ,विविधतेत एकोपा राखू शकली. असे हे स्मारक गेल्या 3 वर्षात कमीत कमी 3 लाख पर्यटकाची भेटीने पाइन झालेय .2700 कोटी रुपये खर्च करून तयार जगाकेले हे स्मारक लार्सन व टुब्रो या कंपनीने मिळवले व जागतिक दर्जाचे भारतीय मूर्तिकार ,महाराष्ट्रातील गोंदिया येथील 93 वर्षाचे श्री राम व्ही सुतार यांचे योग्य हातून हे पुतळ्याचे काम झाले आहे .महाराष्ट्रातील मुंबईच्या होऊ घातलेल्या शिवाजी स्मारकाचे कामही त्यांच्याकडेच आहे .
युनिटी पुतळा 182 मीटर (597 फूट) जगातील सर्वात उंच पुतळा आहे. हे चीनच्या हेनान प्रांतातील स्प्रिंग टेम्पल बुद्ध या मागील रेकॉर्ड धारकापेक्षा 54 मीटर (177 फूट) उंच आहे .मागील सर्वात उंच पुतळा भारत परमेश्वराच्या 41 मीटर (135 फूट) उंच पुतळा होता हनुमान येथे Paritala Anjaneya मंदिर जवळ विजयवाडा राज्यातील आंध्र प्रदेश . पुतळा 7 किमी (4.3 मैल) च्या परिघात दिसू शकतो. आज हे जगातील सर्वात उंच स्मारक ठरले असून जागतिक पार्यटनाचे असकृष्ण ठरत आहे.Statue of liberty हे नंबर वर आले आहे.
एकात्मता स्नारक पाच झोनमध्ये विभागली गेले आहे त्यापैकी फक्त तीन लोकांसाठी उपलब्ध आहेत. त्याच्या पायथ्यापासून shoes च्यापातळीपर्यंत पहिला झोन आहे ज्यामध्ये तीन स्तर आहेत आणि त्यात प्रदर्शन क्षेत्र, मेझेनाइन आणि छप्पर यांचा समावेश आहे . पहिल्या झोनमध्ये स्मारक बाग आणि संग्रहालय देखील आहे . दुसरा झोन पटेलच्या मांड्यांपर्यंत पोहोचतो, तर तिसरा 153 मीटर उंचीच्या व्ह्यूइंग गॅलरीपर्यंत वाढतो. चौथा झोन देखभाल क्षेत्र आहे तर अंतिम झोनमध्ये पुतळ्याचे डोके आणि खांदे आहेत.
पहिल्या झोनमधील संग्रहालय सरदार पटेल यांचे जीवन आणि त्यांच्या योगदानाची यादी करते. शेजारील दृक-श्राव्य गॅलरी पटेलवर 15 मिनिटांचे लांब सादरीकरण प्रदान करते आणि राज्यातील आदिवासी संस्कृतीचे वर्णन करते. पुतळ्याचे पाय तयार करणारे काँक्रीट टॉवरमध्ये प्रत्येकी दोन लिफ्ट असतात. प्रत्येक लिफ्ट एका वेळी 26 लोकांना फक्त 30 सेकंदात व्ह्यूइंग गॅलरीत घेऊन जाऊ शकते. गॅलरी 153 मीटर (502 फूट) उंचीवर स्थित आहे आणि 200 लोकांना ठेवू शकते.दइय स्थान
सर्व ठिकाणं वातानुकूलित आहेत. जण सुविधा युक्त आहेत .आत फूड स्टाल वा खाण्याचे स्टॉल नाहीत .बसायची सोयफक्त गॅलरीत आहे ताल माळ्यावर ,जेष्ठ नागरिक ,व आजाररे व्यक्तींसाठी आराम खोल्या नाहीत व इतरत्र कुठे बसून देत नाहीत बाहेर कॉरिडॉर मध्ये बसण्याची सोय आहे .जेष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींसाठी योग्य सुविधा पुरवल्या जाव्यात हे आजच्या जेष्ठ नागरिक दिनी सुचवावे वाटते.
केवदिया स्थानकापासून फ्री बस सर्व्हिस आहे . व आजूबाजूच्या परिसरात एकटा माल ,एकतागार्डन ,food court आहेत .
एकंदरीत भारताची शान वाढवणारे असे हे जागतिक दर्जाचे स्मारक प्रत्येकाने एकदातरी भेट द्यावे असे आहे .
इदं न मम।
$@π√∆¥ #.
Comments
Post a Comment