दश महाविद्या ,व बगला मुखींमाता भाग2'शिवंजय'संजय
अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।। दश महाविद्या ,व बगला मुखींमाता भाग2 'शिवंजय'संजय होनकळसे बगलामुखी माताकी जय! बगलामुखी जयंती आज बगला मुखी जयंती आहे.हि सत्ययुगात वैशाख शुद्ध अष्टमीस प्रकट झाली.बगळ्याच्या रूपांत येऊन तिने वेदांचं रक्षण केले म्हणून ती बांग्लामुखींदेवी. बगलामुखी हि शत्रूनाश व कायद्याच्या संरक्षणासाठी बांधील देवी आहे . हिला ब्रह्मास्त्र या नावाने पण ओळखले जाते कारण ती शत्रूसाठी ब्रह्मास्त्र आहे . पृथ्वीवर भयानक महामारीचे संकट आले असता ,शिव आज्ञेने ,विष्णूच्या उपासनेस ती प्रसन्न झाली व प्रकट झाली ती सत्ययुगात .तिचं प्रकटीकरण जगले ते सौराष्ट्रातील हरिद्रा या ठिकाणी ,ती सोन्यासारखी पिवळी आहे म्हणून तिला पितांबरा या नावानेही ओळखले जाते . हरिद्रा येथे प्राकट्य झाल्याने व सोन्या सारखी पिवळी असल्याने तिला पिवळा रंग ,हळद ,पिवळी मिठाई,पिवळे फुल प्रिय आहे . बागलामुखी देवीची तीन प्रमुख स्थाने आहेत ,एक दातीया मध्यप्रदेश,नलखेडा मध्य प्रदेश ,व हिमाचल येथील कांगडा येथे.माँते कृपेने मला तिन्ही ठिकाणी दर्शन सेवा करण्याचे भाग्य लाभले ,दातीया व नलखेडा येथे तर आमच्या ग्रुप...