काशी विश्वनाथाची इतिहास गंगा : भाग 1
काशी विश्वनाथाची इतिहास गंगा: भाग 1 मराठी व हिंदीमें $#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥ drsanjayhonkalse@gmail.com drsanjayhonkalse.blogspot.com https://m.facebook.com/story.php?story_fbid=4905693879446250&id=100000170606055 ।शिव संकल्पमस्तु।। काशी हे शिवाचे मूळ स्थान ,याला आनंदवन या नावाने ओळखले जाते.हि मोक्षपुरी आहे .इथे मृत्यू पावणाऱ्यास शिव स्वतः तारक मंत्र देतात .याच काशीत अन्नपूर्णा माता आहेत अगदी विश्वनाथाच्या वामभागी ,ती कुणाशी येथे उपाशी ठेवीत नाही. या काशीस मी पहिल्यांदा ऑक्ट 1991च्या अश्विन महिन्यात शुक्ल एकादशीस म्हणचे नवरात्रीतील दसऱ्यास सिम्मोंलंघन करीत आई ,बहीण व भाचीस घेऊन आलो होतो.अलाहाबादचा दसरा उत्सव पाहून येथे पोहोचलो होतो.या आधी महाराष्ट्र बाहेर फक्त दिल्ली, दार्जिलिंग ,व नेपाळ येथे गेलो होतो तेही स्वबळावर नव्हे .स्वबळावर केलेली ,म्हणचे मीच करता धर्ता,आणता नेता असलेली,अशी ही पहिलीच महाराष्ट्रा बाहेरील यात्रा आहे ,अर्थात याआधी महाराष्ट्रात अशी यात्रा भटकंती बरीच केली होती. अनेक जणांना घेऊन अनेक वेळा,जवळ जवळ 41 वेळा येथ...