नीती अनीती व अध्यात्म :माझे विचार.. विस्तार ...विकेचन :एक मंथन'शिवंजय':डॉ.$@π√∆¥ .©

This article tries to seek connect between ethics n spirituality, because ऑफ canvass nd connotation D Full LENGTH article presuposes rreading with PATIENCE.

🕉 अगस्तै.नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्

नीती अनीती व अध्यात्म :माझे विचार.. विस्तार ...विकेचन :एक मंथन
'शिवंजय':डॉ.$@π√∆¥ .©

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4655250497823924&id=100000170606055


http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/06/blog-post_2.html


श्रीमती मेधा अरविंद माऊलींची नीती,अनीती व अध्यात्म यावरील पोस्ट वाचली( https://m.facebook.com/groups/551408761603735?view= permalink&id= 2118451871566075) त्यांची घालमेल व गोंधळ वाजवी आहे. अध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक माणूस  हा dual रोल, दुहेरी भूमिका, करीत असतो ,dual personality असतो .पण तिकडे जाण्या आधी मेधा माऊलींचा प्रश्न पाहू.

त्यांनी एक विचार मांडलाय कीआजकाल व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात नीती अनीती याबद्दल संवेदनशिलता राहिली नाही व आध्यात्मिक व्यक्तीच्या बाबतीतही ती अपवादाने दिसते म्हणून त्यांना  प्रश्न पडलाय की spirituality या अनीती पासून आपणांस वाचवू शकते कां?
त्यांच्या जवळील वा ह्रदयस्थ व्यक्तीच्या बाबत अचानक अनपेक्षित प्रकार  लक्षात आल्यामुळे  वा तशी समज केल्यामुळे त्यांच्या मनीं हा कल्लोळ होणे स्वाभाविकच आहे.अपेक्षित व्यक्तीबाबत अनपेक्षित घडणं वा illusion / perception मुळे) घडलं असा समज होणे वा करून देणे या मुळे हे झाले असावे.(  'बदला' या चित्रपटावर मी लिहलेले सिनेपरीक्षण पहा: https:// shivanjay-moviereview.blogspot.com/2019/03/blog-post.html   or
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2577831532232508&id=100000170606055  )
त्यांना पडलेला हा खूप फंडामेंटल प्रश्न मला  व माझे स्नेही श्री संजय केळकर यांना कॉलेज जीवनातं या वयाच्या 18 व्या वर्षी पडला होता.
विस्तार भयाचे भान असूनही ते बाजूला ठेऊन  लिहतोय. त्यावेळी  एक जवळचे तीशीतील परिचित एका मुंबई बाहेरील अमेरिकन कंपनीत  होते ते नेहमी मुंबईस येत व आम्हाला त्यांच्याबरोबर फिरवत असत ऑफिस चा खर्च करीत असत  व कधी कधी एक सुंदरस्त्री त्यांच्या बरोबर येत असे (ती डिवोर्सी होती व हे सुखस्त married) त्यावेळी आम्हाला दोन  नीती अनीतीचे प्रश्न त्या formative इयर्स मध्ये पडले 1)ते ऑफिसच्या पैशाची अनीती पूर्वक उथळ करितात (आम्हा एकुण चौघांवर)
2) लग्न होऊनही ते परस्त्री बरोबर अगदी आकंठ  फिरतात. त्यांचं म्हणणं होते ती त्यांची प्रपोज्ड गर्लफ्रेंड होती पण तिचं म्हणणं होते लगेच लग्न कर व तो म्हणे settle होऊन करू या नैतिक(परत नीती) वादावरून ते वेगळे झाले. याने लग्न केले सुंदर शालीन प्रेमळ बायको  व मुले पण होती)पण हिचे लग्न मोडले व ती सुखी नाही म्हणून मग ते गांधर्व झाले. ते त्यांच्या विश्वात होते. पण आमचे perception हे नीती अनिताच्या प्रश्नात दोन वर्षे काथ्याकूट ,शॉक यांत गुरफटून गेले . मेधा माऊलींची मनस्थिती आमच्या त्या किशोरावस्थेसारखी असावी याची मला जाणीव आहे व त्या सहमत होतील ही खात्री आहे .  दोन वर्षांनी आम्ही आमचे विचार व मत बनवले कि प्रेम आहे व ओरबाडून वा ठगवून ,false promises देऊन ते नाहीना एकत्र,दूतर्फी आहे ना मग काय करणार? ..

यानंतर मी अगदी आजही अशी उदाहरणं पाहतोय अगदी एक सुंदर ,शालीन ,संस्कारी व अगदी unparallel अशी माझी विद्यार्थिनी (जी आज प्रिन्सिपॉल आहे) आपल्या पेक्षा 8 वर्षांनी लहान मुलाबरोबर फिरत असे ,आजही माझ्या ओळखीच्या एक 'धार्मिक 'गृहिणीचे तिच्यापेक्षा 15 /16 वर्षांनी लहान व्यक्तीशी संवन्ध आहेत, स्वत:च्या दिराशी वा मेहुण्याशी संबंध ठेऊन त्यापासून संतती झालेले cases  पण माझ्याकडे आहेत.
असो नीती अनीती यांच्या कोंदणात या बाबी कश्या बसवायच्या हा प्रश्न आहे.
कारण अगदी स्वातंत्त्र्या नंतरही एका पेक्षा  जास्त विवाहबाह्य (गुंताता ह्रदय हे = देवदासी)संबंध वा विवाह होत असत व ते वैध असे .1954 ला आंबेडकरांनी द्विभार्या प्रतिबंधक कायदा आणल्यानन्तर हे कमी झाले बेकायदेशीर व अनितीमान झाले. याचाच अर्थ नीती व अनीती ही सामाजिक व्यवस्थेचा भाग आहे म्हणजेच मानवनिर्मित आहे. दुर्दैवाने कॉमन सिविल कोड नसल्याने हे मुस्लिमाना लागू नाही म्हणजेच ते officially 4 लग्न करू शकतात व संबंध ठेवणे जायज असते .याचाच अर्थ नीती हि सापेक्ष आहे .आपण ज्यास अनीती म्हणतो ते इतर समाजात नीती ठरते .सामान्य माणसाने जरासे जरी पैसे घेतले तर भ्रष्टाचार पण MNC कंपनीत वा परदेशी हे  कामकरण्याचे कौशल्य मानले जाते .आजही कित्येक MNC आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात -कसे ते तुम्ही पहा पण काम ,टेंडर  मिळने झालेच पाहिजे. व मग officeच्या पैशात सर्व काही मदिरा ,मदना,चालते .
थोडक्यात मेधामाऊलींचा गोंधळ हा conceptual clarity चाआहे .
नीती अनीती या लौकिक आहेत तर अध्यात्म पारलौकिक .नीती हा  Physical जीवनाच्या सामाजिक व्यवस्थेचाभाग आहे व आध्यात्म  पारलौकिक (धर्म व अध्यात्म यातही भेद आहे)-Meta physical (मेटा म्हणजे पलीकडील  physical जीवनापलीकडील) 
मग याची सांगड कशी घालावी तीही आध्यात्मिक दृष्ट्या ?
इथे आध्यत्मिक भूमिका Spiritual or Real Role व कार्यात्मक भूमिका (Functional Role)हे दोन रोल ,वर सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे ,येतात ते समजावणे व समजून घेणे आत्यंतिक महत्वाचे आहे ,व मी शिक्षक व सामाजिक बांधिलकी म्हणून  माझ्या परीने सतत हे माझ्या विद्यार्थ्यास व परीजनास अगदी जीव तोडून सांगत आलोय.त्यासाठी व त्यापासून( विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रश्नोत्तरातून एक पुस्तकाही लिहलीय :ref 
Managenent by Spiritual Quotient:The power of Faith (https://www.amazon.in/Management-Spiritual-Quotient-Power-Faith/dp/1448970148/ref=mp_s_a_1_fkmr0_1?ie=UTF8&qid=1553073845&sr=8-1-fkmr0&pi=AC_SX118_SY170_QL70&keywords=dr+sanjay+honkalse#)
मानवी जन्म हा dual रोलचा जन्म आहे. येथे प्रत्येक मानव double रोल साकारीत असतो. तो पुरुष वा स्त्री ,आई व वडील ,मुलगा वा मुलगी ,नोकर वा धनी शिक्षक वा विद्यार्थी ,भाऊ बहीण अशा अनेक विविध भूमिका पार पाडत असतो, याला आपण कार्यात्मक भूमिका, Functional रोल म्हणू .या पार पाडण्याचे नियम ,अटी हे  प्रत्येक समाज व राष्ट्र यात वेगळी असते . ती परंपरा होते  .या नियम ,अटी  यांत बसणारे सारे नीती व न बसणारे अनीती ठरते  व ही नीती अनीती व परंपरा  पर्यायाने त्या समाजाची  संस्कृती  ,culture म्हणून ओळखली जाते. तर आधी नीती व अनितीची उपज होते. ह्या साऱ्या भूमिका भौतिक जगाशी संबंधित असतात. यालाच आपण भोग पण म्हणतो. या अर्थाने मानव ही इतर प्राण्यांसारखी  भोग योनी आहे.
पण पराभौक्तिक व आध्यात्मिक जग विचारते आपण मानव काय फक्त या भूमिकाच पार पाडायला जन्मास येतो कां?फक्त ,लग्न संसार ,शृंगार ,व शिक्षक ,उद्योगपती इ इ होणे हेंच मानवी जीवनाचे सार आहे कां? .तर उत्तर नाही असेच आहे, कारण मानव हा नुसता भोग भोगायला जन्म घेत नाही तर तो कर्म योनी पण आहे त्याला कर्माचा विकल्प म्हणजेच चॉईस आहे, जो मानवेतर प्राण्यांना नाही कारण मानव हा Rational animal असून त्याला भोग भोगता भोगता आपला उद्धार ,अभ्युदय श्रेयस नि:श्रेयास साध्य करण्याची बुद्धी व तारतम्य आहे. पाश्चिमात्य जग भौतिक प्रगती (मटेरियल progress )च तत्व ज्ञान मांडते तर हिंदुत्व आध्यात्मिक प्रगती spiritual Progress व सद्गती व मुक्तीचा विचार मांडते व तो कर्म विपाक सिद्धांतावर आधारित आहे. तर यासाठी प्रयत्नशील असणं व तशी  हि मानवी जीवनाचे Real Role व Spiritual  रोल आहे निभावणं  हीच वास्तविक भूमिका आहे.
असो मानवच अशी दुहेरी भूमिका पार पाडू शकतो .
तर मुद्दा असा की नीती अनीती हि समाजनिर्मित व पर्यायाने मानव निर्मित आहे त्यामुळे ती सापेक्ष आहे Relative आहे .त्यामुळे adminप्रज्ञा माउलीना जी वा  ज्या पोस्ट posts अ 'निय'मित वाटतात त्या मला नाही वाटत अनुभूतित 37 प्रकारच्या पोस्ट आहेत ,आपण सामाजिक घटक आहोत त्यामुळे सामाजिक प्रगती व आर्थिक प्रगती हि अध्यात्म बाह्य ठरत नाही नाहीतर , स्वामी रामदास ,टिळक आगरकर ,तुकाराम ,या प्रभूती यांनी समाज व राजकारण यांत महत्वाच्या भूमिका पार नाडत्या पाडल्या ना आज हिंदुत्व टिकले तर आपण टिकू तर 'अनुभूती'ला अस्तित्व आहे. मग जर आज एखादी व्यक्ती राजकीय शक्तीचा वापर समाज उन्नतीसाठी वापरतोय तर ते स्पृहणीय व उल्लेखनीय आहे ,मग ते 'अनुभूती'स पोषक व पुरकच आहे हे माझे प्रांजळ मत आहे. पण प्रज्ञा माऊलीस ते नियम बाह्य वाटते व ते मग तशी पोस्ट टाकणाऱ्यास निलंबित करतात. साने माउली 'प्रज्ञा'वान व 'मेधा'वान आहेत .
पण माझ्या दृष्टिकोनात 'अनुभूती 'बसते पण 'अनुभूति 'त मी नाही.असे pegion hole करणे माझ्या भूमिकेत व dynamism मध्ये बसत नाही 
आसो,.तर नीती अनीती हि सापेक्ष आहे ,मानव निर्मित आहे ,तर अध्यात्म शाश्वत व सनातन ,अपौरुषेय  आहे 
पाहना ज्या आपण पंचकन्या म्हणून पूजतो त्या तारा (बृहस्पती पत्नी व चंद्राची प्रेयसी ,अहिल्या इंद्राच्या नजरेत आलेली ,द्रौपदी-पांचाली पंच पुरुषांची पत्नी ,मंदोदरी  वा ली ,रावण व बिभीषण पत्नी या त्यार्थने अनिती पूर्ण तरीपण पंच पतिव्रता ,अरुंधती ,सती अनुसूया या तेवढ्याच ताकदीच्या असूनही या पांचात येत नाहीत ..
मग नीती अनीती व अध्यात्म याची सांगड वा संबंध कसा लावायचा? वा मेधा माऊलींचा प्रश्न :खरोखर अध्यात्माची spirituality च्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती ह्यापासून नक्की स्वतःला वाचवू शकते?उपस्थित होतो.
इथे Real role v Functional role ची जाणीव महत्वाची, त्याचे भान महत्वाचे .समजा एखाद्या साधूला एखादा अनोळखी कलाकार जसा अमिताभ वेगवेगळ्या भूमिका -हिरो ,देवदास,villain, डाकू ,CID,Don, शहेनशहा,शराबी, नवाबी,-करताना दाखवले व खरा अमिताभ दाखवला तर त्याला रिअल अमिताभ व भूमिकेतील अमिताभ यातला फरक कळनार नाही  ते कळले तरच खऱ्या अमिताभच्या अभिनय कसब व कौशल्य कळेल . निदान त्या भूमिका करताना त्या भूमिका आहेत व रिअल 'मी' वेगळा आहे हे भान स्वतः त्या कलाकाराने ठेवणे  महत्वाचे नाहीतर त्याच्या वर विपरीत परिणाम होऊन तो त्या त्या भूमिकांतू बाहेर येणार नाही व त्याचे त्याच्यावरच फार वाईट परिणाम होतील हे आपल्या लक्षात येईल .
मग हेंच आयष्यातील अनेक विध भूमिका
पार पाडताना  रिअल रोल लक्षांत ठेवला तर नीती अनीती ची जोड देता येईल.इथे ,खरी गोम आहे ,माणूस चुकतो कारण  षड्रिपूंच्या रूपांत माया नावाचे आवरणा खाली माणूस असतो. माया एवढी  glamorous असते की ती अध्यात्मिक व्यक्तीलाही भूल पाडते. अहंकार ,वासना यांचा गुलाम करते .मग काय करावे माया तर टाळू शकत नाही मग तिचा गुलाम होण्या ऐवजी आपण तिला गुलाम करायचे ,आपणावर स्वार होऊ न देता तिच्यावर स्वार  व्हायचे.हे  होत नाही म्हणून हे लक्षांत घेणे महत्वाचे कि आपण अध्यात्मिकते पासून कोसो दूर असतो ,आहोत.अनेक जण अर्ध्या हळकुंडाने  पिवळे होतात.
एकदा रिअल functional कळले व वळले तर पहा तेच कार्य मग उच्च व नीतिमान ठरते .पहा रावणाने सीतेवर  वाईट नजर ठेवली ती अनीती ठरली व त्याचे फळ त्यास मिळाले,उलट कृष्ण अष्ट राण्यासकट 16000 स्त्रियांनी व गोपीनी स्मरला वरला तो तारणहार म्हणून.इंद्रा ने अहिलेवर वासना ठेवली म्हणून शापित, सहस्त्राक्ष झाला ..तर वासना ,नजर हेतू ठरवतो एखादी बाब नीती व अनितीमान होते कि नाही ते.अन्यथा नीती व अनीती या लौकिक व अध्यात्म पारलौकिक.नाहीतर आपली अवस्था एका साधूच्या त्या शिष्य ओरमाणे होईल जो वासना ,ऋण ,ऋणानुबंध यातच अडकतो. 
एक्स साधुचे दोन शिष्य होते ,कोण आदर्श ठ आहे हे ठारावण्या म्हणून त्यांबा यात्रेस पाठवले : खोटे नाही बोलायचे ,परस्त्री स्पर्श हि नाही करायचा ,नामस्मरण करीत राहायचे इ निती नियम लागू होते.
एकदा यात्रेत एक स्त्री नदीत बुडताना  त्यांना दिसते  प्रथम शिष्य ,say मनस्वी  स्त्री दपर्ष वर्ज्य म्हणून दुर्लक्ष करतो ।तर दुसरा तपस्वी काहीही विचार न करता नदीत उडी मारून तिला वाचवतो व दोघेही पुन्हा वाटचाल सुरु करतात .तपस्वी आपलं नाम स्मरण  करीत पुढे जातो तर मनस्वी विचारकारात राहतो कि हा चुकला नीती बाह्य वागला व त्याच विचारात गुरु पर्यंत पोहचतात  मनस्वी  रेपीर्ट करतो कि तपस्वी चुकला त्यांनी अनितीपूर्ण वर्तवणूक केली  ।पण गुरु म्हणतो  तापस्वीच आदर्श  व उत्तम शिष्य कारण तो त्या स्त्रीस वाचवून विसरूनही गेला व आपल्या नाम स्मरणां त रामला पण तू त्यातच गुरफटून राहिलास व नाम्समरण ,साधन्स व पर्यायाने अध्यात्मिक गतीस मुक्लास.
.हे लक्षांत घेतले तर Growth म्हणजे survival न होता Growth(= उन्नती) साठी survival हे समीकरण ठरेल. 
What say मेधा माउली nd all वाचक नारायण?आपलें मत नोंदवा.
'शिवंजय':डॉ $@π√∆¥ होनकळसे©
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
drsanjayhonkalse.tripod.com
drsanhayhonkalse@gmail.com
#####################$#######$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
रेफरन्स साठी मेधा अरविंद यांची पोस्ट ( https://m.facebook.com/groups/551408761603735?view= permalink&id= 2118451871566075
खूप फंडामेंटल प्रश्न आहे हा मला माहिती आहे पण विचारल्याशिवाय आता अगदी रहावत नाहीये.. अलिकडेच असं नाही गेल्या कित्येक वर्षात ज्या व्यक्ती काही ना काही कारणामुळे संपर्कात आल्या त्यातील खूप कमी व्यक्ती नीती अनीतीबाबतीत खरोखर संवेदनशील असलेल्या पाहिल्या... मान्य आहे नोकरी- व्यावसायिक क्षेत्रात बऱ्याच तडजोडी करत टिकून राहावं लागतं.. आजकाल growth म्हणजेच survival हेच  समीकरण आहे व्यावसायिक जगतात, सिस्टिमच्या किंवा सिस्टिम मध्ये भरलेल्या लाचखोर लोकांच्या विरोधात जाऊन नैतिकता सांभाळणं आजकाल next to impossible झालं आहे.. पण वैयक्तिक आयुष्यातही नीती अनीती, न्याय अन्यायाच्या संकल्पना धूसर होताना दिसतात. न संपणाऱ्या ऐहिक, शारीरिक भौतिक गरजांवर, मोहांवर, आकांक्षांवर मनाचे नियंत्रण ठेवण्यासाठी अध्यात्म किती मदत करू शकतं? नामस्मरण, ध्यानधारणा योगाभ्यास किंवा तीर्थयात्रा, नर्मदा परिक्रमेसारखे उपक्रम यासाठी खरंच मदत करू शकतात का? दुसऱ्या शब्दात विचारायचं झालं तर अशा गोष्टींमध्ये रस असणाऱ्या, गती असणाऱ्या व्यक्तीही वैयक्तिक आयुष्यात अनैतिक मार्गावर जाण्यापासून स्वतःला का रोखू शकत नाहीत? की मग अशी लोकं या गोष्टींविषयीच्या गप्पा इतरांची स्वतःविषयीची दिशाभूल करण्यासाठीच करतात? खरोखर अध्यात्माची spirituality च्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती ह्यापासून नक्की स्वतःला वाचवू शकते?।


https://m.facebook.com/story.php?story_fbid=4655270467821927&id=100000170606055

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|