कट्टरगाम्मा,बाबाजीं क्रियायोग दीक्षा स्थान.
अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
कट्टरगाम्मा,बाबाजीं क्रियायोग दीक्षा स्थान.
$#¡v@π√∆¥':dr $@π√∆¥ #.
drsanjayhonkalse@gmail.com
drsanjayhonkalse.blogspot.com
http://shivanjay-moviereview.blogspot.com/2021/06/blog-post.html
।शिवसंकल्पमस्तु।
मी सद्गुरू कृपेने भारतातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्री अगदी अमरनाथ ( 3वेळा) ते अनंतपुरं( पद्मनाभबाभ स्वामी - कन्या कुमारी रामेश्वरम 39 वेळा.)आ
साम अरुणाचल प्रदेश ते सोमनाथ,द्वारका पुरी या सर्व दरम्यान असलेली ज्योतिर्लिंग 39 वेळा,सप्त नद्या ,सप्त पुऱ्या ,सप्त कैलास, पंच केदार ,पंच बद्री ,पंच प्रयाग ,पंच राम ,नव नंदी,एकादश रुद्रस्थाने ,सहा क्षन्मुख स्थान,एक ओम पार्वती ,अष्ट नारायण ,अष्ट विनायक,कोकण अष्ट गणेश, 33 पितृ स्थाने ,40 शक्ती पीठ व अनेक सिद्ध पीठ दर्शन सेवा गौमुख ते गंगा सागर करवून घेतली गेलीत.
पात्रता नसताना कृपा व वर बाबाजीने त्यांचे चरित्रात्मक पुस्तक जे कदाचीत सर्व जगात त्यांचे एकमेव चरित्रा त्मक पुस्तक आहे ,लिहवून घेतले,तेही तीन मराठी ,हिंदी ,व इंग्रजी भाषेत.त्यामुळे बाबाजी चारधाम ,जन्म ,शिक्षण, गुरु स्थान व साक्षात्कार स्थान व प्रमुख कार्यालय दर्शन हि करवले गेले.
आज त्यांचे जरी या योग शिक्षण झाले ते स्थान व तेथील माहिती पाहुयात:
मी 2014 बुद्ध पौर्णिमा साधारण 26 मे या दिवशी कोलंबो ,श्रीलंका येथे उतरलो ते फक्त बाबाजीनी प्रथम क्रिया योग दीक्षा घेतली ते स्थान ,कट्टीर ग्राम येथे जाण्यासाठीच.पण आमच्या यात्रेत हे स्थान नव्हते .
हे ठिकाण दक्षिण प्रांताच्या दक्षिण प्रांताच्या हंबनटोटा मधील तीसमाहाराम पासून 3चार तास अंतरावर आहे. येथे एक याला नावाचे राष्ट्रीय उद्यान आहे.
पण मी या तिसमहारामा टप्प्यावर आलो व माझ्या 8 लोकांच्या गटापासून,ज्यांच्या साठी लंकेची ट्रिपची व्यवस्था केली गेली होती,अक्षरशः पळून गेलो .
हा माझा भारताबाहेरचा 2014 साली केलेला पहिला दौरा होता (नेपाळ वगळता जिथे मी 5 वेळा गेलो होतो व कैलास)
मला कतीर व्हिलेज (लंकेत कट्टरगम) जाण्यात खूप रस होता कारण इथेच बाबाजीना त्याचे प्रथम गुरु ,भोग नाथ भेटले
सर्वात मोठी अडचण,मुख्यत्वे भाषा, वाहतूक होती मी कटीर खेड्यात पोहोचलो.
यासाठी मी काय काय पराक्रम केले याची कल्पनाच करू नये.
कटीर ग्राम म्हणजे कार्तिक स्वामींचे गाव.
येथे कार्तिक स्वामी राहिले होते आणि दुसर्या पत्नी वल्लीबरोबर अनेक लीला केल्या
आपल्याकडे असा समज आहे की कार्तिकेय अविवाहित होते (काही श्रद्धा / आख्याईकां यांमुळे) पण देवसेना व वल्ली या त्यांच्या दोन बायका आहेत.एक देवसेना ,देवयानी इंद्र व शची यांची मूलगी आहे. जेव्हा कार्तिकेय देवदेवतांचा सेनापती झाला तेव्हा इंद्राने तिचे कार्तिकेयशी लग्न लावले .ज्या ठिकाणी हे लग्न लागले ते स्थळ कार्तिकेयाच्या सहा स्थान पैकी एक तिरुकुरृपुंड्रम हे आहे. दक्षिण-भारतीय मधे देवसेना सहसा हिची सवत कार्तिकेयाचा ।सहकारी पत्नी वल्ली म्हणून दर्शविली जातात; ते दोघे मिळून कार्तिक देव पूर्ण होतात. देवसेना व वल सहसा कार्तिकेयाचे वल्लीबरोबर दाखवके जातात.
देवसेना हिची स्वतंत्र उपासना होत नाही , परंतु बहुतेक मंदिरात कार्तिकेय यांची पत्नी म्हणून त्याची उपासना केली जाते. तिरुप्रंकरुनम मुरुगन मंदिरात तिची प्रमुख भूमिका आहे, असे मानले जाते की हे तिच्या लग्नाचे ठिकाण आहे.
परंतु तारकासुरला ठार मारल्यानंतर कार्तिकेय श्रीलंकेच्या तिसमाहारामा प्रदेशातील कटीरग्राम येथे गेले आणि तेथील राजा आदिवासी जमातीच्या राजाची मुलगी वल्ली व कार्तिकेय यांची भेट झाली. येथेच कार्तिकेयांनी तिच्या बरोबर राधा कृष्णासारख्या लीला व तप केले.
म्हणून वल्लीची तुलना कृष्णाच्या राधाशी केली जाते.
हे इथल्या 84 सिद्धांपैकी एक भोगनाथ बाबाजींचे पहिले योग क्रियागुरू राहिले होते ते कार्तिकेयाचे ,त्यांचे इष्ट ,भक्त आणि त्यांनी इथेच स्वतःचे गुरुकुल सुरू केले आणि श्री कार्तिकेय सुवर्ण यंत्र स्थापित केले.
येथे आषाढ महिन्यात कार्तिकेयनचा एक मोठा सण साजरा केला जातो. दर वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये येथे ,अस्प्ल्या वारी सारखे भाजत गन 48 दिवस चालत येतात .
महावतार बाबाजी आपले गुरु बोगरनाथ उर्फ़ भोगनाथ यांना भेटण्यासाठी भारतातून पायी येथे आले होते.
त्यांनी आपले सर्व औपचारिक क्रियायोग
शिक्षण इथेच केले होते.
हे स्थान आध्यात्मिक उर्जा, मोहकपणाने परिपूर्ण आहे. येथील परीसारत अनेक छोटी मिठी देवळे आहेत व एक बाबाजींचा मंदिर ,जे मार्शल गोविंदन यांनी बांधले ते आहे.मी सहा साडे सहा वाजता पोहोचलो तेथील नदीत स्नान केले ,साश्रु नयनांनी दर्शन घेतले ,दैवयोगे मला सायं आरती हि मिळाली.
मी इथुन रात्री नऊ वाजता ,4 ओ निघालो, तो आनंदातरांगत न्हाहूनच.कट्टीरग्राम येथील भेटीचा वृत्तांत यावर एक वेगळा लेख होईल.
या ठिकाणी दोनदा भेट दिल्याचा मला खरोखरच आनंद होत आहे.पण गुरु कृपा अशी की या भेटीनंतर माझ्या सारख्या middleclass महाविद्यालयीन शिक्षकाकडून, ज्याने त्याचा शिकवण्याचा hot साजे असूनही कधी एक tution नाही घेतली व स्वामींनी 2014 नंतर 40 देश यात्रेची अशक्यप्राय गोष्ट घडवली.
इदं न मम।
$@π√∆¥ #
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4640203445995296&id=100000170606055
Comments
Post a Comment