हिमालयाच्या कुशीतछोटी मूर्ती ,महानविभूती :पुष्प3रे:भाग 2यक्ष दर्शन व मार्गदर्शन लाभलेले

अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
हिमालयाच्या कुशीत
छोटी मूर्ती ,महान
विभूती :पुष्प3रे:भाग 2

यक्ष दर्शन व मार्गदर्शन लाभलेले केदारनाथचे पुजारी: $@π√∆¥ #.
drsanjayhonkalse@gmail.com
चंद्रमा ललाट पे, भस्म है भुजाओं में
वस्त्र बाघ-छाल का, है खड़ाऊँ पाँव में
प्यास क्या हो तुझे,गंगा है तेरी जटाओं में,
दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया।
माँगा कुछ कभी नहीं,तूने सिर्फ़ है दिया
समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा

द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा
अमृत सभी में बाँट के, प्याला विष का तूने खुद पिया
जय हो जय हो शंकरा भोलेनाथ शंकरा आदि देव शंकरा हे शिवाय शंकरा

पुजारींच प्रेम  व जिव्हाळा मिळण्याइतकी अजून नीटशी ओळख झाली नव्हती .
पण पुजारी नेहमी हसत मुखे आमचे स्वागत करीत ,भोजन प्रसादी देत व चहा नाश्ता देत.खरेतर हा आश्रम फक्त साधू व संतां साठीच आहे तरी ते आत्यंतिक आर्ततेने आमचे स्वागत करीत असत.माझ्या बरोबर इतर लोक जे ट्रेकिंगमध्ये आगेमागे असत ते सर्व इथे वर्दी देत व मी आलोय हा निरोप देउन पुढे जात असत .
तर हे पुजारीजी ,त्यांनी विचारुनही कधी नाव सांगितले नाही,पुजारीजी म्हणूनच त्यांची ओळख होती.
खाली ऋषीकेशला हि  संत आश्रम आहे वर निघायच्या आधी आम्ही तेथे जात असू कधी बडे महाराज तिथेच भेटत व त्यांचा पुजारीजींसाठी निरोप व सामान घेऊन आम्ही नेहमी जात असू.
पुजारी प्रेमळ पण अत्यंत मितभाषी होते. हळू हळू ओळख व प्रेम,करूणा वाढली .ते रहायचा आग्रह धरीत ,संतविभूतींसाठी आहे म्हणून आम्ही सहसा टाळत असु व जमेल ,झेपेल तेवढी सेवाच देत असू. गरुड चट्टी हि एक प्रचंड मोठी गुफा आहे,दारातच गुफेचे द्वार आहे ,पण आतून ती साधारण 200 ते 300 मीटर आहे जीत आत  भंडार व भोजनगृह हि आहे ,बाहेर संतांसाठी पक्क्या कुटिया बांधल्यात. इथेच श्री मोदीजी यांनी उपासना केलीय,७० -८० च्या दशकांत व समयास घ्यायचा निर्णय घेतला.पण त्यांनाही येथेच तसे नक सूचना ,उपदेश मिळाला व मग त्यांनी RSS जॉईन केले .
  कधी कधी पुजारीजी केदार मंदिरात दर्शनास जात तिथे व वाटेत जात येता भेटत ,मग इथेच नमस्कार करून आम्ही उभे निघत असू ..
हलु हळू कळले की हे पुजारी केदारबाथ द्वार बंद झाल्यावरही तिथेच गरुडचट्टीस राहतात ,एकदम सुखदआश्चर्य वाटले .त्यांनी गुफा पूर्ण दाखवली,गुफेचे मुख्य द्वार आंत ,हे शितकाली बंद करतात, रोजच्या पूजेचे मंदिर आहे व बैठक आहे यात्रिंसाठी ,आरती साठी व ध्यानासाठी ,वर
नॉर्थवेस्टला छोटा जीना व वाट आहे जी आतून किचन  व भंडारा यांना जोडते . कपात बंद होताना भांडार  सात महिन्याच्या धन धान्याने भरलेले असते ,सर्व जण निघून गेल्यावर पुजारी एकटे राहत.
हळू हळू ते बोलते होऊ लागले,आमचा जात येत संवाद होऊ लागला.मला म्हणाले तुम्ही या आश्रमात रहा,मी म्हणे मला एकदा शित काली राहायचेय,तर ते म्हणे या नक्की .मी म्हणालो अहो पण आम्हाला झेपले  पाहिजे  ते म्हणत महाराजांनी म्हणजे केदार बाबांनी ठेंवले पाहिजे ,पण या ठेवायचं नसल तर बाबा परत पाठवतील, एकदा एकाला असेच हाकलून दिले गेले.
त्यांनी कधीही पै,पैशाला हात लावला नाहि, दक्षिणा पण घेत नसत ,त्यांच्या पूजाघरी मी कृष्णसखाउद्धवांचा live फोटो दिला तर ते खुश झाले व नेहमी सर्व पूजा विग्रहांबरोबर च त्याची पूजा करीत,मला एक मोठा सुंदर शाळीग्राम मुक्तीनाथ जिथे शाळीग्राम,गंडकी नदीत  होतात ,तो मी त्यांना दिला पूजेत. आजही या दोन्ही वस्तू गुफेत पूजाघरांत आहेत.
पुजारीजीयेथे 1973 ,74 पासून होते.
एकदा असेंच गप्पा मारताना त्यांनी सांगित ले की गुफेचे दरवाजा 6 महिने बंद असतो मी आतच राहतो,बाहेर भरपूर बर्फ जमा झाल्याने दरवाजा घट्ट होतो.आपले काही अनुभव सांगा म्हंटल्यावर म्हणाले ,' रात्री बारा वाजता मला दरवाज्याच्या झरोख्यातून कवडश्यातून लख्ख प्रकाश दिसतो,कधी कधी चाहूल जाणवते."
"मंदिरातून दिवसा रात्री घंटा नाद,आवाज, संवाद ऐकू येतो,भाषा कळत नाही पण संवाद असतो. पूजेचा आवाज येतो .इच्छा होते पण तो प्रकाश सहन होणार नाही या भीती पोटी  दरवाजा उघडत नाही". नोव्हेम्बर  ते एप्रिल या काळात ते पूजा विधीचा आवाज ऐकत असत आणि रात्री त्यांच्या गुहेतू प्रकाश दिसत असे जसे बाहेर लख्ख सूर्य उगवलाय. म्हणूनच भगवंताची पूजा नारदजी करतात हे पटते.या पूजेमुळेच केदार मंदिराच्या गर्भागृहातील दीप अखंड जळत असावा.म्हणजे विधिविधान आहे त्या प्रमाणे शितकालातही केदारबाबांची पूजा होते,गरुड चट्टी हे गरुडाचे स्थान आहे व गरुड भगवान नारद व इतर देवतांना मंदिरात नेतात व विश्रांती इथे घेतात हणून या गुफा स्थानास गरुड चट्टी असे नाव आहे.
   "कधी कधीseason बंद झाल्यावर  नोव्हेंवरमध्ये व मार्च अप्रिल दरम्यान बर्फ कमी झाल्यावर मी बाहेर पडतो व देवाळातही जातो (जे 3.5 की मी  वर आहे) व दारातूनच दर्शन घेतो व येतो."यासे ते म्हणत.
आता त्यांनी आम्हला व आम्ही त्यांना मनाने आपलेस केले होते .
हा भेटीचा सीलसीला  दरवर्षी 2011 पर्यंत चालू होता,कधी मी सीजनला दोनदा, एकदा तर चारवेळा पोहोचलो होतो,जात असे.
एकदा(२००७ किंवा २००९) मी केदारनाथहून निघाल्यावर गरुडचट्टी जवळ पडलो घोड्याने मला ढकलले होते.( केदार नाथला चढता उतरताना प्रवासी व मालवाहू घोडेही जात असंतात त्यामुळे तो एक भीती दायक प्रकार हाताळावा लागतो).माझा पाय तुटला होता तेंव्हा त्यांनीच दवा दारू करवून डॉक्टरची चिठ्ठी देऊन,श्रीनगरला ऍडमिट होण्यासाठी,पाठवले होते.म्ग मी दोन प्रवास दिवसांनी श्रीनगरला पोहोचलो,bandage केले.या वेळी श्री चंद्रशेखर व मी असे दोघेच होतो.
आणि एक दिवस ,मी पूनम व प्रोफ सचिन माझ्या बराबर असताना त्यांनी आम्हास सांगितले की ते 1973 व 74 ( आता इयर मला नीट आठवत नाही )साली तेथे आले त्या वर्षी भटकत असंताना(नोव्हेंबर 73वा 74 मार्च) त्यांना एक यक्ष भेटला .तो 30 एक फूट,त्याही पेक्षा उंच असावा.तो पुजारी जवळ झोपून बोलू लागला तरी त्याचे आडवे मुख सहा फुटापेक्षा उंच वाटत होते असे ते म्हणाले.त्या यक्षाने त्यांना त्यांच्या बद्दल, कदाचीत पूर्वजन्माबद्दल,माहिती दिली. व त्या यक्षानेच त्यांना इथेच गरुड चट्टीस कायमचा रहा म्हणून सांगितले व इतरही मार्गदर्शन केले .म्हणून ते तिथंच राहू लागले. मी तुला परत नक्की भेटेन असेही त्या यक्षाने त्यांना सांगितले.
आम्ही हे ऐकुन सुन्न झालो होतो,मानवातीत असा हा अनुभव होता.यक्ष हे उपदेव देवता आहेत ते एकूण 64 यक्ष व यक्षिणीआहेत.व ऋषी कश्यपाची संतान ,प्रजापती कन्या अरिष्टा पासून यक्षयक्षिणी,गंधर्व ( एकूण 6333 गंधर्व व अप्सरा1100)आहेत ,हे सारे देव व मानव यातील दुवा आहेत.हे रक्षण करतात ते  निधी पती व हारक तर दानव दैत्य (दनु व दितीपासूनचे कस्यप पुत्र  व यक्ष गंधर्व यांचे सावत्र भाऊ संहारक आहेत)देवता व देव प्रसन्नतेसाठी यांची उपासना केली जाते.कुबेर हा सर्वात प्रसिद्ध यक्ष आहे व  महाभारतातही यक्ष प्रश्न हा यक्ष व युधिष्ठीर कथावृत्तांत आहे ,यक्षिणीमध्ये दश महाविद्याही येतात जसे काली ,तारा धुमावतो इ .यांची उपासना अध्यात्म मार्गात अत्यन्त महत्वाची मानतात ,तसेंच काही यक्षिणी या भौतिक इच्छापूर्तीच्या देवता आहेत व त्वरित फळ देतात .यक्षिणी यांचं 64 योगिनी होत.कधी कधी यक्ष गंधर्व अप्सरा शापित होऊन वा इतर कारणासाठी मनुष्य रूप वा मनुष्य जन्म घेतात,त्यांचं मानवी जीवनही अत्यंत उच्च, विस्मयकारी असते.आपण मग अशांना ते कदाचीत शापित गंधर्व वा यक्ष असावेत असे म्हणतो . पहा हे सर्व आता खरे वाटू लागते.त्यांच्या उत्पत्ती बद्दल तर्कयुक्त व संयुक्तिक माहिती आपल्याकडे आहे.थोडी आणखीन  माहिती मी "हिमालयाच्या कुशीत "हिमालयाच्या अद्भुत रहस्य यासदरात  देत आहेच .
पुजारी  या नंतर भेटले की नाराज दिसत , केदारनाथला लूट चालू आहे म्हणत ,मास अंडी विकली जाऊ लागल्याने ते व्यथित होते (हरिद्वार पासून सारी केदारभूमी हि शाकाहारी आहे ,इथे मास मच्छी निषिद्ध आहे .तरी गेली काही वर्षे ,विशेषतः बंगाली यात्रीमुळे हे सुरु झाले ज्यांचे माशा शिवाय (seafood) चालत नाही व गंगेतले मासे फार छान ,चवदार ,व चविष्ट सतात.त्यामुळे 2006 ,7 नंतर वेज हॉटेल शोधून सापडत नाही या मार्गावर.लुटा लूट मास मच्छी ,अंडी व हेलिकॉप्टर या मुळे ते व्यथित होत व म्हणत" देखो एक दिन सब तबाह हो जायेगा ".
आणि खरंच 2013 ची भयानक आपदा, आली ,मी स्वतः dec 2013 स गुप्त काशी ,उखी मठ पर्यंत पोहोचलो होतो. व आज हे कॊरोना संकट.दोन्हीही धडा देतायत की मानव स्वतःला अभिद्न्य सृष्टीचा मालक (फार शहाणा)समजू नको.तू एक तींकभर आहेस. एक अदृश्य लाट वा जिवाणू तुझं आयुष्य  व अस्तित्व दावणीस लावू शकतो.
,पण हे पाहायला आज ते नाहीत .
आधी सांगितल्या प्रमाणे यक्ष त्यांना पुन्हा भेटणार या ओढीने ते नेहमी काहीही माहिती मिळाली की त्याच्या शोधार्थ बाहेर पडत.2011च्या शिवरात्री नंतर बहुधा 5 मार्च नंतर ते असेच बाहेर पडू लागले,रोज बाहेर जात ,असेच मग 11 तारखेस ते एका बर्फा च्या विळख्यात अडकले व बर्फ समाधिस्थ झाले असे मला लगेचच15 तारखेस कळले .सुन्न झालो,सर्व मित्र मंडळीस  कळवले.
.शेवटि वर सांगितल्या प्रमाणे  बर्फात 41 वर्षे राहिलेले ते बर्फाच्या माध्यमातूनच  पंचतत्वात विलीन झाले ,त्यांचा देह शोधूनही सापडला नाही ,मिलिटरी व हेलिकॉप्टरने शोधही फोल ठरवला .
पण मग म्हंटले  कदाचीत त्यांना तो यक्ष पुन्हा भेटला असावा,तो म्हणालाच होता तसे त्यांना, व त्यानेच त्यांना आपल्या सूक्ष्म लोकी ,वरूथ्वी व स्वर्गाच्या मध्ये नेले असावे .ककदाचित तेही पूर्व जन्मी असाच एखादा यक्ष असावेत .आज विचार करता आपण काय अनुभवले अनुभावले हे  जाणून उर भरून येतो.
जून मध्ये अभिरामदासजी,बडे महाराजांना भेटलो,ते शांत होते,त्याचेही म्हणणे माझ्या विचारांशी जुळले हे जाणवले . तर अशी ही आणखी एक यक्ष कथा ,सत्यकथा ,आपला इतिहास ,धर्म  अध्यात्म ,व शास्त्र किती परिपूर्ण आहे हे धाय मोकलून सांगणारी , सत्यकथा.पण आपण इंग्रजाळलेले अंधांग्ल ,फसवे sickular . रशियन ,अमेरिकन ,व युरोपिय याचा अभ्यास करतायत व आपण दंतकथा व अंध श्रद्धा वा  नुसताच belief ,श्रद्धा( श्रद्धा हि विश्वासा पलीकडे असते  सत्यनिष्ठ , अखंड ,अबाधित ,इमानी ,अमर्याद असते. पहा :Management by Spiritual Quotient ,Power of Faith :डॉ संजय होनकळसे https://www.amazon.in/Management-Spiritual-Quotient-Power-Faith/dp/1448970148
)नाही .
तर अशा रीतीने त्यांना यक्ष दर्शन व मार्गदर्शन झाल्याचे त्यांनी सांगितल

भगवान केदारजी या करोना शोकांतिके पासून विजय मिळवण्यास सहाय्यभुत ठरुन  सर्वाचा उद्धार करतील हि प्रार्थना करून हे पुष्प वाचक नारायणांना अर्पण करतो.
'शिवंजय"डॉ संजय होनकळसे©
शिवार्पणम्।


Please always leave your VALUABLE COMMENTS


https://www.facebook.com/113582620366640/posts/114531543605081/


https://m.facebook.com/story.php?story_fbid=3519235804758738&id=100000170606055

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|