महाराष्ट्राचे वृंदावन ,गिरवी येथील अद्भुत व विलक्षण गोपाळकृष्ण मंदिर
अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
महाराष्ट्राचे वृंदावन ,गिरवी
येथील अद्भुत व विलक्षण
गोपाळकृष्ण मंदिर
'शिवंजय'-डॉ. संजय होनकळसे
भारत हा धर्म परंपरा,अध्यात्म,संत परंपरा, हिंदू,जैन, बुद्धीझम, शीख इत्यादी धर्माचा मूळ स्रोत असलेला प्राचीन देश आहे. अध्यात्मिक ज्ञान,उन्नती मोक्षप्राप्तीसाठी धर्म,धार्मिक उत्सव,व्रत -वैकल्य,सण,पूजन, अर्चन मनन,ध्यान,भक्तियोग,कर्मयोग ज्ञानयोग,समाधी इत्यादी अनेक मार्ग सांगितले आहेत.निर्गुणाचे ज्ञान व जाणिव सगुण उपासने पासूनच योग्य रीतीने होते,हा भारतीय तत्वज्ञान व अध्यात्माचा गर्भित भाव आहे. म्हणूनच मूर्तीपूजन हे प्राथमिक पण अती महत्त्वाचे साधन आहे. अध्यात्माचा श्रीगणेशा आहे. त्यामुळेच प्रत्येक पारंपारिक हिंदू कुटुंबात देवघर व गावात मंदिर असते.
देव पूजन प्रथा हि वेदिक काळात नव्हती. हिंदूधर्माच्या पुनरुजीवनासाठी आदी शंकरा चार्यांनी ती सुरु केली.
आदि शंकराचार्यांनी सुरु केलेले देव पूजन परंपरा त्यानंतरच्या सर्व शंकराचार्यांनी व शृंगेरी पिठातील शंकराचार्यांच्या हस्ते आज ही सुरू आहे व ती जनमानसात रुजवली आहे.तसेच एकनाथ महाराजांच्या देवांची आजही त्यांच्या आजच्या पिढीतील वंशजां कडून पूजा केली जात आहे.वरील दोन्ही ठिकाणच्या देवघराचे व पूजेचे वेळी कृपा दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले आहे.
अशाच प्रकारे एका मूर्तीचे पूजन -अर्चन परंपरेने एकाच कुटुंबीयांच्या मार्फत गेली पाचशे वर्षे गिरवी या फलटणमधील गावी होत आहे. ते देशपांडे कुटुंबीयांकडून तेथे 700 वर्षापूर्वी त्यांचे पूर्वज श्री. बाबुराव गोपाळ देशपांडे प्रतिष्ठापित केलेल्या श्री. गोपाळकृष्ण मूर्तीचे पूजन आज त्यांच्या तेराव्या पिढीपर्यंत अव्याहतपणे सुरू आहे.
या गोपाळकृष्णमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मूर्तीची प्रतिष्ठापना सातशेवर्षांपूर्वी वैशाख पौर्णिमेस झाली.जी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडीचे द्योतक आहे.
हा प्रतिष्ठापनेचा इतिहास विलक्षण व विस्मयकारक आहे.
कृष्णास भारतीयांच्या ह्रदयात अढळ स्थान प्राप्त आहे.भारतात कृष्ण मंदिरे सर्वत्र आहेत.डाकोर येथे रणछोडदास स्वरूपात, द्वारकेचा द्वारकाधीश,केरळचा गुरुवायूर, पुरीचा जगन्नाथ,मिरच्या मेवाडचे कृष्ण मंदिर,गोव्यातील एकमेव देवकी कृष्ण मंदिर. त्याचप्रमाणे जगातील पहिल्या संगीतकाराचे बासरी वादन तल्लीन होऊन श्रवण भक्तीत रंगलेल्या धेनूद्वयांसह असलेले श्री.गोपाळ कृष्ण मंदिर जे फलटण येथे आहे. हे हरिहर एकरूपतेचे,अद्वैताच स्थान आहे.
या मूर्तीची प्रतिष्ठापना करणारे बाबुराव महाराज (श्री.बाबुराव गोपाळ देशपांडे) हे आदिलशहाच्या सुभेदाराकडे वसुलीच्या कामात गावोगाव कार्यरत असत.ते असीम कृष्णभक्त होते.त्यांच्या जवळ एक कृष्णमूर्ती नेहमी असे.प्रत्येक मुक्कामी ते आपल्या जवळील कृष्णमूर्तीच अनन्यभावे पूजन अर्चन करीत. या दरम्यान त्यांच्या मनात काळ्या पाषाणाची गोपाळकृष्णाची मूर्ती आपल्या गावी स्थापित करण्याचा विचार घर करू लागला. अशाच चिंतनात मग्न असताना सोलापूरच्या माढा येथील उपळवे गावी त्यांना शाळीग्रामाचा पाषाण मिळण्याचे संकेत मिळाले. त्यासाठी त्यांनी तेथे शोध घेण्याची परवानगी विजापूरला जाऊन आदिलशहाकडून मिळवली. सात पुरुष खोल खणल्यावर त्यांना शाळीग्रामाचा 4-6 फूट पाषाण मिळाला. त्यावर विष्णू चक्रांकीत रेषा होत्या.
तो शाळीग्राम त्यांनी त्या काळात तेथून माढा व नंतर आपल्या गावी सोलापुरातून नेला. त्यानंतर त्यांनी त्या पाषाणापासून आपल्या मनाने ध्यास घेतलेली सुंदर सुबक मूर्ती बन वण्यासाठी योग्य शिल्पकार न मिळाल्याने सेवानिवृत्तीनंतर देवाला साकडे घालून शिल्पकार मिळण्यासाठी प्राणांतिक उपोषण आरंभले.त्याचा परिणामत: काही दिवसां नंतर त्यांना दोन शिल्पकार भेटले व त्यांच्या माध्यमातून चांगली,आकर्षक,सुबक,उत्कृष्ट मूर्ती घडवली गेली.ते मूर्तिकार स्वतःस्वयंपा क करीत त्यांना शिधा देऊन वेगळ्या खोलीत मूर्ती बनविण्याचे काम सुरू केले. त्यांनी बनवलेल्या मूर्तीचे मुखकमल प्रसन्नचित्त असून नेत्र विशाल व आकर्षक आहेत. मूर्ती अत्यंत रेखीव आहे. कृष्ण भगवंताच्या हातावरील रेषा ही सुस्पष्ट आहेत.अलंकार,वस्त्रे पाषाणात कोरलेली आहेत. दोन बाजूला दोन धेनू श्रवण भावात मुरलीचे सूर ऐकण्यात तल्लीन दिसतात. त्यांचे कान श्रवणातूरतेने वर ताठ झालेले आहेत.
मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात हरिहर संयोग आहे. मूर्ती शिवलिंगाच्या साळुंकीवर आहे. लिंगाऐवजी बन्सीबजैया कृष्ण साळुंकीवर-जलाहारीवर उभा आहे. त्यामुळे गरुड हनुमंताबरोबरच नंदी ही मंदिरासमोर आहे आणि सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे हे सर्व घडवणारे दोन मूर्तीकारांपैकी एक आंधळा तर दुसरा थोटा- दोन्ही हात नसलेला असे होते. ते दोघेही मूर्तीच्या पसंतीची पावती मिळताच काहीही मानधन न घेताच मंदिरामागील विहिरीत अदृश्य झाले.
या मागील अध्यात्मिक रहस्य लक्षांत घेणे अत्यावश्यक आहे.सांख्य तत्वज्ञानानुसार प्रकृती लूळी असते ,पुरुष अंध असतो. प्रकृती (चैतन्य) व पुरुष( form) यांच्या मिलाप होण्यानेच निराकार साकार होतं. तसेंच प्रकृती स्वरूप थिट्या व पुरुष स्वरूप आंधळ्याच्या एकोप्यानेच हि गोपाळ कृष्ण ची विग्रह मूर्ती बनलिय 700 वर्षांपूर्वी.
मूर्तीची प्रतिष्ठापना सातशे वर्षांपूर्वी वैशाख पौर्णिमेस झाली. जी कृष्णाच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडीचे द्योतक आहे. याबाबतीतर अचंभीत करणारे अध्यात्मिक रहस्य आहे जे देशपांडे कुटुंबीयांनी मनन व जतन करावे ,व करवावे.
तसेंच पहा कदाचित देशपांडे कुटुंबीय लक्षांत घ्या या मूर्ती स्थापनेचा दिवस हा वैशाख पौर्णिमेचा आहे ,जो दिवस विष्णूअवतार बुद्धाचा जन्म दिन ,साक्षात्कार दिवस व निर्वाण दिनही आहे कारण या दिवशी तारा देवी जी आत्मज्ञान देणारी आहे ,सगुणातून निर्गुणात नेणारी आहे ,साकारा कडून (निराकार कडे नेणारी आहे.(Ref https://m.facebook.com/story.php?story_fbid=3466869633328689&id=100000170606055
----/-//////or-----------
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2020/05/blog-post.html) हा साक्षात्कार बाबुराव महाराजाना मूर्तीस्थापने दिनी ,वैशाख पौर्णिमेस नक्की झाला असणार व म्हणून ते गेचंच सगुणातून निराकार पंचतत्वात विलीन झाले.
व बाबुराव महाराजांनी मूर्ती स्थापनेनंतर लगेच वैशाख वद्य प्रतिपदेस आपले जीवित कार्य संपन्न झाल्याचे समाधानाने संजीवन समाधी घेतली.ती समाधी गोपाल कृष्णाच्या मूर्तीच्या गाभार्या खालील भुयारात आहे. मंदिरात त्यांच्या चिरंजीवाची व नातवाची समाधी पण आहे. तसेच गरुड व हनुमान मंदिराखाली त्यांच्या पणतुची समाधी आहे. अशी चार पिढ्यांच्या सेवेची प्रतिकाची पार्श्वभूमी मंदिरास आहे.
या गोपाळ कृष्णाच्या पूजन सेवेचे कार्य आजपर्यंत अव्याहतपणे चालू असून आज तेराव्या पिढीचे प्रतिनिधित्व श्री.जयंतराव देशपांडे आत्यंतिक तळमळीने करीत आहे त.माझी त्यांची भेट 2010 साली मी लिहलेल्या महावतार बाबाजींवरील ,कुठल्याही भाषेत असलेल्या चरित्रात्मक मराठी पुस्तकाच्या निमित्ताने झाली.व ते आजतागायत जेष्ठ बंधू प्रमाणे माझ्यावर जीव लावून आहेत हे माझं भाग्यच आहे व कृष्णभगवंतांची प्रेम पावतीची पोहचच आहे आहे असे मला वाटतं. त्त्यांचा 24 तास गोपाळकृष्णाचाच विचार सुरू असतो. ते धीर,गंभीर,विचारी,शांत अभ्यासू, जिज्ञासू, मधुर व रसाळ आहेत. त्यांचा मित्र-परिवार मोठा आहे. त्यांनी मंदिराचे कार्य व प्रगती होण्यासाठी अनुष्ठान, हवन, सप्ताह केले व करीत आहेत. शंकरमहारजांचे पदस्पर्शानेही हे मंदिर पुनीत झालेय. यासाठी त्यांनी नाना महाराज तराणेकर, दत्त महाराज कविश्वर यांचे कृपाशिर्वाद प्राप्त केले. त्याचबरोबर त्यांना त्यांचे आजोबा कै. विनायक महादेव यांचे आशिर्वाद होते.
जयंतरावांनी गुढी पाडवा,अक्षय तृतीया, आषाढी,गीता जयंती,गणेश जयंती उपस्थित राहून पूजन अर्चन सेवा सुरू केली.वैशाख पौर्णिमा उत्सवाचे वेळी पवमान,यजुर्वेद पठण,याग, कीर्तन,पालखी दहीकाला होतो. वैशाख वद्य प्रतिपदेला बाबुराव महाराजांची पुण्यतिथी असा तीन दिवस भरगच्च कार्यक्रम असतो. यानिमित्ताने हरीओ स्वामी, डॉ. रा. ल. जोशी, श्री. आनंदस्वामी, श्री नारायण शास्त्री गोडबोले,अवधूतानंद (नर्मदे हर कार) ज्येष्ठ भागवताचार्य धनंजयराव देशपांडे,मनोहर दिक्षित महाराज,कृष्णदास,ज्येष्ठ साधक व किर्तन केशरी रामकृष्ण कानडे, प्रा. शिवाजीराव भोसले यांचे पाय या मंदिरास लागले आहेत व ते या मंदिराच्या जागृतत्वाचे साक्षीदार आहेत. या कामी जयंतरावांना त्यांच्या अर्धांगिनी सौ.सुनिता जयंत व आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे निखिल व सौ. चारुता देशपांडे यांची मोलाची साथ आहे.व आतातर त्यांचे नातू 4 वर्षाचे यातील आनंद लुटतात. नियमानुसार ट्रस्टच्या माध्यमातून सर्व कार्य व कारभार चालतो. गावकरी व समस्त देशपांडे परिवाराचा जोमदार उस्ताह व सहभाग असतो. हल्ली दार वर्षी फलटण ते गिरवी पायी वारी आयोजित केली जाते व कित्येक भाविक यांत हिरहिरीने भाग घेतात.
अशा या महाराष्ट्राच्या वृंदावनास मी सातत्याने भेट देत आलोय पण प्रथम दर्शन सेवा भेट देण्याचा लाभयोग मला वैशाख पौर्णिमेला दि. 27 मे 2010 आला. या दिवशी दोन मूर्तिकारांच्या प्रतिकात्मक पादुका ते अंतर्धान पावले, त्या ठिकाणी स्थापित केल्या गेल्या. या कामी 151 वयाचे श्री शिवबाबा,गजानन महाराज व साईबाबां चे सान्निध्य लाभलेले जे 71 वर्षांपूर्वी शंकर महाराजांसमवेत मंदिरासभेट देऊन गेले होते.प्रमुख अतिथी श्री.मुकुंदमहाराज,आंध्र चे गोपाळ महाराज,शिवाजीराव भोसले हे उपस्थित होते.जवळ जवळ दोनशे तीनशे पाहुणे हजार होते.प्रत्येक कार्यक्रमास बारी क सारिक तपशीलात अत्यंत नम्रपणे,रसा ळपणे जयंतराव लक्ष घालित होते.सर्व स्त्रिया स्वयंपाक नाष्टा करून ते वाढण्याची सेवा देण्याचे काम शांतपणे करीत होत्या. खरेच सातशे वर्षांची पारंपारिक सेवा कर ण्याचे भाग्य लाभलेले हे सर्व जण आहेत. जयंतरावांनी गोशाळा,अध्यात्मिक ग्रंथालय, तुळशीवन,वृक्षारोपण इ कार्यक्रम पार पाड ण्याचा विडा उचलला आहे.हे सर्व ते अयाचित वृत्तीने करतात हे मला फार भावते.
मंदिरात पूजेसाठी पुजारी आहे.तेथे पूर्वसूचना देऊन अनेक भाविक, शाळांतील सहली येतात. सर्वांनी आवर्जून तेथे दर्शन लाभ घ्यावा.मे जून मध्ये सातत्याने हिमाला यात असल्याने मी दोन तीन वेळच पोर्णिमा सोहळ्यास हजर राहू शकलो पण इतर कार्यक्रमास मी नेहमी हजर राहण्याचा प्रयत्न करतो कारण तेथील ऊर्जा .
खरेच देशपांडे कुटुंबियांचे हे इष्टदैवत भगवद्गगीतेतील 9-22 या श्लोकांच प्रत्यंतर देते.
अनन्याश्चिनंतयंत्यो मां ये जन: पर्युपासते
ते षा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्
गीता - 9/22
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3468003929881926&id=100000170606055
$@π√∆¥ #."©
'शिवंजय':डॉ संजय होनकळसे ©
Comments
Post a Comment