वैशाख पौर्णिमा :सगुणातून निर्गुणाप्रत नेणारा वास्तविक ज्ञान प्राप्तीचा दिवस:

अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।        
वैशाख पौर्णिमा :सगुणातून निर्गुणाप्रत नेणारा वास्तविक ज्ञान प्राप्तीचा दिवस:
'शिवंजय':संजय होनकळसे.

(आमचे महाविद्यालयीन मास्तरकीच्या जीवनातील प्रथम मित्र ज्यां बरोबर मी अध्यात्मिक गमभन सुरु केले,व आजही तेथेच रेंगाळतोय त्या अभय जोगळेकर यांना समर्पित.)           
वैशाख पौर्णिमा हि अध्यात्मिक जगतात अति पावन मानली जाते.आपले उपनिषद, उत्सव,सण पूजा,जसे सत्य नारायण (Ref  वाचा:सत्य हांच नारायणhttpp://story _fbid=2886322858050039 &id =100000170606055
--------------------------------or--------------
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2018/08/blog-post_26.html)     
व इतर 'सत्य' पूजा या अनेककानेक अध्यात्मिक रहस्यांनी ओतप्रोत आहेत. सण,व्रत,वैकले,पाकशास्त्र,कथांच्या आवरणाखाली बरीच ध्यात्मिक रहस्य दडली आहेत.ती सर्व विज्ञानाधारीतच आहेत उदा म्हणून पहा  :   https://m.facebook.com/story.php?story_fbid=3464818033533849&id=100000170606055
---------------------Or-------- - --------
https://drive.google.com/file/d/1_asoC2sqmwHdAfPq21brcW4ieTK_T/view?usp=drivesdk
   पण त्याला श्रद्धा,भीती,दैव देव यांची आवरणे लावली आहेत ती मानवास योग्य ठिकाणी नेण्यासाठीच.त्याचे अनेक दाखले व द्योतक आहेत.
इथे आपण वैशाख पोर्णिमाचा विचार करू. या दिवशी सूर्य हा त्याच्या उच्च राशीत  म्हणजे मेषेत असतो वा त्याच्या आसपास असतो सूर्य हा आत्मकारक आहे व चंद्र हा गुरुच्या विशाखा नक्षत्रात असतो तुळ राशीत सूर्य म्हणजे आत्मा व चंद्र म्हणजे मन .. गुरु म्हणजे ज्ञान
म्हणजे पहा कसे  उच्च रहस्य आहे यात .हे भटकणारे चंचल विकारी मन उच्च राशीतील आत्म्याच्या समोर व तूळ सारख्या संतुलित राशीत गुरुच्या नक्षत्रात म्हणजे आता मन सांसारिक माये पासून दूर होते अशावेळी गुरु कृपा जर असेल व व्यक्ती वास्तविक आध्यात्मिक साधक असेल तर बुद्धत्व प्राप्त करु शकतो जर त्याने मनोभावे व योग्य पद्धतीने साधना व अभ्यास केला तर. नुसती साधना नव्हे तर त्याचा अभ्यास हवा म्हणजे सातत्य हवे म्हणून तर भगवान कृष्ण गीतेत म्हणतात "अभ्यासेन तू कौंतेय "अर्थात 'Practice makes d man PERFECT'  माधवत्व प्राप्त करण्यास हा दिवस व या दिवशीची साधना महत्वाची  म्हणून  वैशाख  महिन्यास माधवमास असेही संबोधतात.
याच दिनी पृथ्वी तरली ती माधवाच्या  दशा वतारातील दुसरा अवतार कूर्मअवतार जन्म ला  त्यामुळे व समुद्र मंथन होऊन अनेक रत्ने पृथ्वीस बहाल झाली.
तसेच याच्या आदल्या दिवशी नरसिह अवतार झाला व हिरण्यकश्यपचा अंत झाला तो सद्य पाकिस्तान येथेअसलेल्या मूलस्थान ,आता मुलतान ,येथे.
या दिवशी योग्यसाधनेने मानवास वास्तविक व योग्य साधकास ज्ञान,वास्तविक ज्ञान, आत्मज्ञान,प्राप्ती होते.स्थूलाकडून सूक्ष्मत्वा कडे वाटचाल सुलभ होते.याचे आणखिन एक,कदाचित सर्वात महत्वाचे कारण- याच दिवशी भगवतीदेवी दशमहा विद्यांपैकी दुसरी देवी तारादेवी हीचा प्रभाव, प्रादुर्भाव असतो.आजच्या भाषेत तारातत्व ऍक्टिव्ह असत,तारा देवीचे सीक्रेट चॅनेल्स ओपन होतात ते आजच्या वैशाख पौर्णिमेसच. त्यामुळे साधक साकारातून निराकार साधनेस प्रवृत्त होतो,सगुणातून निर्गुणाकडे वाटचाल करू शकतो.सविकल्प समाधी पासून निर्विकल्प साधना,समाधीकडे वळ तो.त्याला बुद्धत्व प्राप्त होते,नव्हे त्यासाठी हाच योग्य व शुभ दिन आहे.तारा ही वास्त विक अध्यात्मिक,आत्मज्ञान (real know ledge) देणारी महाविद्या आहे.तारादेवीच्या कृपेने साधक बुद्धत्व प्राप्त करतो.हीची साधना ही तत्वरुपात (element form )  केली जाते.तत्वरुपात असल्याने ताराची मुर्ती पूजा होत नसते.
याचा अर्थ मूर्ती पूजा निषिद्ध आहे वा अयो ग्य आहे असे मुळीच नव्हे.या विषयावर इस्लाम व हिंदुत्व यांत होणारे वाद हे वायफ ळ आहेत.कारण इस्लाम idolatry म्हणजे मूर्ती पूजा अमान्य आहे व ते योग्यहि आहे. पण संपूर्णत: खरं नाही.कारण साकारा तूनच निरकाराकडे जाणे सुलभ,सहज व योग्य असते.पहा!आपल्याला जर एखाद्या बागेत गप्पा मारायचा असतील तर आपण बागेत गेल्यावर चौफेर नजर फेरतो व मगच एखादी जागा निवडून तेथे ठाण मांडतो. भाषा शिकायची तर 'श्री'  व' ग ' गणेशाचा इत्यादी अक्षर म्हणत सुरु करतो व मग शब्द, वाक्य करत अनेक कष्ट करून भाषा प्रभुत्व मिळवतो,तसेच निराकार,निर्गुण समजायचे तर कुठून तरी,कुठल्या तरी बिंदू (म्हणजे आकार,सगुण)पासूनच सुरुवात करणे हेंच योग्य आहे,नाहितर नुसतं निराकार निर्गुण करत बसले तर ते कधीच साध्य होणार नाही.म्हणून हिंदूधर्म सर्वसमावेशक,com prehensive व composite आहे. म्हणूनतर कृष्णभगवान म्हणतात मी सगुण निर्गुण दोन्हीही आहे ,I M BOTH FORM ND FORMLESS.तर निर्गुणाची उपासना व ज्ञान सगुणापासूनच सुरु करावे.इस्लाम निर्गुण निर्गुण करत भरकटत जाते हि त्यांची tragedy पण हिंदुत्वाचीही अशीच शोकांति का होऊ शकते.कारण आपण सगुण रूपाचे पुजन करत राहतो,त्यातच अडकुन राहतो. कित्येकजण अनेकानेक वर्षे पूजा अर्चना करतात वा कित्येक जण म्हणतात माझ्या अमक्यातमक्याने अनेक वर्षे पूजा पाठ केले काय मिळवले?म्हणून मला नाही करायची पूजा वा मी नाही मानत देव वगैरे.हेअसे होते कारण आपण मूर्ती पुजाच,सगुण उपासना, करत राहतो,त्याच्यापुढे काय? हा विचारच कित्येकजण करत नाहीत.मग एकाच वर्गात राहिलो तर प्रगती कशी होणार?.असो दोन्ही धार्मिक साधक चुकतात.पण तरीही विवेक व भाव सातत्य राहिले तर सगुणोपासना निर्गुंण उपसानेकडे आपोआप नेते हे तितक च खरे,म्हणून हिंदुत्व इस्लामवर हावी होते व श्रेष्ठत्व टिकवते.
असो मुद्दा हा आहे की तारादेवीची निर्गुणा तच उपासना करतात.
  खरे पाहता वर पहिले तसे कुणी किती ही मुर्ती पूजक असलातरी पण सदभाव,सातत्य भाव साकारापासुन निराकाराकडे नेणाराच आहे.सगुणपासुन निर्गुणकडे जाणारच आहे. त्यामुळे जस जशी आध्यात्मिक उन्नती होत जाइल तस तसे तुम्ही निर्गुण उपासनेकडे वळताल.हेच तारा रहस्य आहे. भवसागरातून तारते म्हणुन ती तारा.तिच्या साधनेने मायेचे आवरण हटते व वास्तविक, आध्यात्मिक ज्ञान  प्राप्त होते,व्यक्ती जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो. 
गौतम बुद्ध हे दश महाविद्यापैकी या दुसरी महाविद्या तारा चे उपासक होते.तारा ही आत्मज्ञान देणारी म्हणून तारा कृपेने साधक बुद्धत्व प्राप्त करतो.म्हणुन गौतमास बुद्ध म्हणुन ओळख मिळाली.गौतम बुद्ध हे दश महाविद्या पैकी दुसरी महाविद्या ताराचे उपासक होते जीची सगुण उपासून होत नाही आणि लोकानी असा गैरसमज करुन घेतला की गौतम बुद्ध हे मुर्ती पूजेच्या विरुद्ध होते पण हे खरे नाह, मग त्या धर्मकारणाचे राजकारण झाले व होतेय.
गौतम बुद्ध हे भगवतीताराच्या साधनेने बुद्ध त्वास प्राप्त झाले.त्यांच्या जन्मही वैशाख पौर्णिमेंचाच आणि त्याना बुद्धत्व प्राप्त झाले ते पण ह्याच दिवशी.त्यांनी निर्वाण दिवस पण वैशाख पौर्णिमेचाच.अशी ही एकमेव घटना आहे.
वास्तविक आध्यात्मिक साधक असेल तर बुद्धत्व प्राप्त करु शकतो जर त्याने ताराची उपासना केली तर. हेच गौतम बुद्ध यानी दाखवुन दिले.दुर्दैवाने त्यांची खरी शिकवण फक्त तिबेटी लोकानी अंगिकारली व ते तारा ची साधना करत राहिले व आध्यात्मिक उंचीवर जावुन पोहोचले व बाकी जनता जनार्दन या वास्तविक ज्ञान  मिळवण्याच्या लाभापासून वंचित राहिले व फक्त कर्मकांड करत राहिले,वा मूर्तिपूजा बहिष्काराचे राजकारण करत राहिले.
बुद्धव्यतिरिक्त  वसिष्ठ मुनी तारा उपासक होते.रामाच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त काढ ण्यास चूक झाली हे लक्षांत आल्यावर त्यांनी तारा उपसना केली व ब्रह्मत्व  प्राप्त केलं.
भगवान शंकरानी समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले विष प्राशन करुन सृष्टीला वाचवले तेव्हा त्या विषाचा परिणाम त्यांच्यावर होवु नये म्हणून भगवती ताराने त्यांना स्तनपान करुन त्या विषाच्या जहरी परिणामापासून मुक्त केले होते .. 
द्वितीय महाविद्या भगवती तारा ही गुरु ग्रहाची अधिष्ठात्री म्हणून आध्यात्मिक  गुरु आणि तारा हे दोन्ही तत्व मनुष्य शरीरात आज्ञाचक्रावर प्रभाव टाकतात.येथे या चक्रावर वास्तविक ज्ञान आहे,सिद्धी आहेत, कालज्ञान व वाचा सिद्धी आहे .
अशा या तारा देवीचे पीठ बंगाल मध्ये आहे ,गोहाटीस उपस्थान व हिमाचलला नयनतारा पीठ आहे व सिमला येथेही मंदिर आहे .हि सतीची बहीण व तारपीठ हे शक्ती पीठ आहे कारण येथे देवीचे नेत्र पडले. सद्गुरू कृपेने हि माझ्याकडून सर्व स्थान या आध्यत्मिक देवीने करवून घेतलीत तीही काही माहिती व अक्कल नसताना .
तर अशी ही  बुद्धत्व दात्री एकमेकाद्वितीय वैशाख पौर्णिमा,ज्या दिवशी कूर्म अवतारही झाला व बुद्ध जन्म ,निर्वाण व साक्षात्कार झाला.
तारा उपासना आयुष्यात एकदा तरी करावी नाहीतर आहेच :
पुनरपि मरणम् पुनरपि जननं.
आणि हो अशा या पवित्र दिनीच  वैशाख पोर्णिमेसच सातशे वर्षांपूर्वी एके ठिकाणी हरिहररूप गोपाळकृष्णाची एक पवित्र मूर्ती महाराष्ट्रात फलटण जवळ स्थपिली गेली व ती आज नाव रुपास येतेय व त्या मूर्तीचे स्थापकांचे वंशज आज आपल्यात आहेत माझ्यावर जेष्ठ बंधुवात स्नेह करतात, ज्यांचे मंदिर दक्षिणेचे वृंदावन आहे .
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3466869633328689&id=100000170606055

तर उद्या पाहू त्याची माहिती
$@π√π¥ #.
'शिवंजय:' डॉ संजय होनकळसे
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
इदं न मम।

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया