ऋषिकेश गंगा: : माझे आजोळ
ऋषिकेश गंगा: : माझे आजोळ
शिवंजय डॉ संजय।©
मानो तो गंगा माँ है।
गंगा हि आई आहे child like faith ने तिच्या कुशीत गेले तर ती वात्सल्य सिंधू आहे. मी ज्या ज्या वेळी ऋषीकेशच्या दयानंद घाटावर स्नान केले तेंव्हा तेंव्हा मला ही अनुभूती झाली,अनुभव तर सतात्याने येतातच.
अनेकानेक वेळा स्नान करूनही मला स्पष्ट आठवते मी प्रथम ऋषीकेशला महविद्यालयीन जीवनात जानेवारी 16 ता.स आलो होतो. त्यानंतर महाविद्यालयाची सहल घेऊन येथे स्नान केले.
त्यानंतर 1992 च्या 17 ऑक्टो. ला गंगोत्रीस जाण्यासाठी म्हणून आई,बहीण,भाचीस घेऊन आलो त्या रात्री 2 वा 35 मिनिटांनी गाढ निद्रिस्त असता आश्रमात गाडी चालल्या सारख्या भिंती हलु लागल्या,आधी थकल्यामुळे व गाडी प्रवासामुळे गाडीतच आहे असे वाटले पण मग गोंधळ व आवाजाने त्या कंपताच जागा झालो व लक्षांत आले की तीव्र भूकंप झालाय.थोड्याच वेळांत बातमी थडकली कि गंगीत्री मार्गा वरील मुख्य पाडाव असलेल्या उत्तरकाशी येथे भारी भक्कम 6 रिक्टर स्केलचा भूकंप होऊन प्रचंड जान मालाची हानी झाली होती.
सकाळी गंगेत स्नान केले.आमचा गंगोत्री गौमुखचा प्लॅन भूकंपामुळे बारगळला कारण रस्ता खचला व भूस्खलनामुळे सारंच फ्लॉप.
तरीपण show must go on या तत्वानुसार आम्ही बद्रीनाथला प्रयाण केले होते.बद्रीनाथ बद्दल नंतर लेखन ,येथे फक्त ऋषीकेश व गंगा. या नंतर गंगाईने एवढी कृपा केली की हे ऋषीकेशच गंगा स्थान माझं आजोळच झालं. लहानपणी एकाकी वाढलो मावशी,मामा,काका,आजी आजोबा असा गोतावळा वा त्यांचा सहवास माहितच नव्हता व कथा कादंबऱ्या सिनेमाच्या प्रभावामुळे नेहमी वाटायचे कि आपले आजोळ वा मामाचा गाव असावा सुटीत मज्जा करायला. "झुक झुक झुक झुक आगीनगाडी,
धुरांच्या रेषा हवेत काढी,
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया "
या प्रभावातील ते भारलेले दिवस, पण हा अनुभव आमच्या गावीही नसलेले आम्ही .त्यामुळे मनांत एक सुप्त अशी इच्च्छा घर करूनच होती कि आपलंपण एखाद आजोळ असावा एखादा मामा काका अफ्रीकेतून यावा. आणि पहा गंगा माझी माय माउली झाली ती आज तागायत.तीने अक्षरश: मला माय माउली सारखें सांभाळले व मी पण अगदी बाळासारखा नेहमी व आजही परतीच्या वाटेवरील मी तिच्या प्रेम कुशीपात्रात शिरतो. आजवर माझ्या बरोबर अनेक जण आलेत जवळ जवळ सर्वांना पोहता येत नसे ,मजसकट, अन मी नेहमी म्हणतो कि गंगा आई आहे बाळासारखं उतरा ,आई कधीच वाईट करणार नाही . आणि खरोखर माझ्या बरोबर येणारे सारे साक्षी आहेत,एकदा गंगेत उतरल्यावर त्यांना विनवण्या करून,पुढच्या प्रवासात बद्री केदार रस्त्यावर परत आपण स्नान करू या लालचेने बाहेर काढले आहे,अर्थात हृषीकेश सोडल्यावर आपण सतत गंगा साक्षीनेच तिच्या सह प्रवास करतो व मिळेल त्या प्रत्येक ठिकाणी आईच्या कवेत मायेने ओथंबून गेलोय व इतरांनाही नेलय.माझ्या सुज्ञ साधक वाचकां ना आश्चर्य वाटेल पण हा अनुभव आधुनिक मराठीत मांडायचा म्हणजे हा age neutral व gender neutral अनुभव असतो कारण लहान मोठे स्त्री पुरुष म्हातारे कोतारे यांचा हा अनुभव असे. मग माझी 80 + आई असो ,वा 55 प्लस बहिण असो वा 16 -23 चे विद्यार्थी,वा त्यांचे भाऊ बहीण आई वडील असोत.
मला मात्र हे सर्व करतांना कार्या लयीन पीडा सातत्याने सहन करा वी लागत असे.कारण माझ्या बरोबर विद्यार्थी,मुलीपण .आमची सर्वांची चांगली निरागस निरामय गट्टी बट्टी व भट्टी जमलीअसली तरी जग तसे नव्हते व नाहिये त्यामुळे पालकांना पण सुरवातीस शंका,भीती असे.आपला पाल्य चांगला आहे पण बरोबरीच्या मुलांचा व संजय सरांचा काय भरोसा?त्यात मी तरुण,सिंगल. त्यात माझ्यावर सर्वांचं प्रचंड विश्वास व जीव या उपर माझी माणसं हाताळण्याची पद्धत जगा वेगळी पण मजेशीर व अनूभव देणारी, शिकवणारी ,व व्यक्तिमत्व घडवणारी. त्यामुळे मला व बरोबरीच्यांना एकमेकां बाबत अतूट जिव्हाळा.पण पालकांच्या पचनी हे पडणं मुश्किल व्हायचं कि आपले पाल्य आई वडीलां इतकेच बाहेरच्या माणसास इतके कसे मानतात वा मानू शकतात?मला हे कळत असे पण मी मुलांना कसं सांगणार ?त्यामुळे कधी भाऊ,कधी आई,कधी मित्र*(ज्याच्या कडे आपण मन मोकळं करू शकतो तो मित्र)कधी सखा (जो न सांगता आपलं मनीचं ओळखतो तो सखा)तर कधी दुर्वासाची भूमिका बजावूनही मी आई सारखा वडीलांसारखा व काका मामा हि बिरुंद कधी लावून घेतली नाही मी संजयसरंच म्हणून राहिला गेलो.
उदाहारण म्हणून नमूद करतो माझी एक विद्यार्थिनी ऋचा देशपांडे मुबंई उपनगरातील एका उच्चभृघरातील मुलगी व तिची बहीण जी माझी विद्यार्थिनी नव्हती.त्या दोघी आईच्या मागे लागल्या आमच्या पहिल्या वहिल्या ऋषीकेश चारधाम सहलीस जाण्यास . मुलांना नाही कसं म्हणणार?म्हणून मग त्यांच्या मातोश्री स्वतः सहलीस आल्या. त्यांना 5 स्टार राजधानी च्या प्रवासाची सवय आम्ही 2 क्लास 3 टायर मधून प्रवास करणारे पण त्यांनी मुंबई दिल्ली हा मे च्या वैशाख वणव्यातील चक्क मध्य प्रदेश व राजस्थाना तील कोटा भरतपूर असा प्रवासच इतका एन्जॉय केला की त्या अत्यंत लाडा काळजीच्या छत्र छायेत वावरणाऱ्या मुली आईस म्हणाल्या की या नंतर आम्हास राजधानिक्सप्रेसचा प्रवासचं नको कारण त्यात बाहेरच जग,मज्जा अनुभवतांच येत नाही.अर्थात त्यांच्या मातोश्रीनीही व त्यांच्या जेष्ठ भगीनी यांनीही प्रवास एन्जॉय केला ऋषीकेशची गंगाईची प्रेमकरुणा अनुभवली. मग काय त्या श्रीमती सुलभा देशपांडे आमच्या प्रत्येक सहलीच्या अतूट भागच झाल्या कीवत्यांच्या मीस्टरांच्या पण समजण्या पालिजडे गेले इतके कि ते स्वतःही एका retreat साठी ऋषीकेशला 10 दिवस आमच्यात राहिले.असो अनुभव ,अनुभूती आपल्या पाल्याचा माणूस म्हणून झालेल्या व्यक्तिमत्व विकासांती हळू हळू इतर सर्व पालकांना आमची भट्टी स्वीकारावी लागली नव्हे तेही आम्हाला जॉईन करू लागले. असे कळत नकळत 200 ते 250 जण म्या पामरार्फत गंगा चरणी आणवले गेले.
गंगेने त्यांनाही आपलेसे केले भाग्यशाली केले .आज ते सर्वही सुजाण,सुस्थित आहेत पण हेबीB घडवल्या गेल्याचे दिवस त्यांची आमरण पाठ सोडणार नाही हे अबाधित सत्य आहे.आजही ते एकत्र आहेत त्यांचे संसार,बायका व मुले एकत्र जाणीवपूर्वक भेंटतात.असा प्रवास गंगा माउलीने न चुकता ,सातत्याने एकही सिझन वाया न घालवता आज 26 वर्ष करवून घेत आहे . खरं तर कधी वर्षांतून दोन चारदा याना त्या ,शिबीरं ,कुंभ मेळे (प्रयाग हरीद्वारचे) 19९६ ,९७,२०००, इत्यादी सलग सारे कुंभ स्नान तेही शाही स्नान वाजत गाजत शाही मिरवूणूकित आजोळच्या लाडांत करवून घेतले आहे. व आता 2019 च्या प्रयाग स्नानाचे पण वेध लावलेत गंगाईने.
हे सर्व आज अधिक मासांत अगदी गंगा दशहरा उत्सवाचा भागीदार बनवून तेही पूर्ण 11 दिवस पुण्यस्नानाचा अनुभव देत अगदी दशहारा सोहळ्यात चुनरी उत्सवाचा भागीदार करवून गंगाईने आपलं माउली पण सिद्ध सार्थक केलेय,एवढेंच नव्हे तर त्या माउलीने मला गंगा दशहऱ्यास राफ्टींगच्या माध्यमातून अगदी पाळण्यात बाळकासारखे 18 कि मी खेळवत आणलंय . राफ्टींगचा अनुभवही गेली 16 वर्ष सातत्याने दिलाय हे हि नसे थोडके म्हणून कि काय मलाहि माउलीपण कधी दिले हे कळलं पण नाही।
म्हणून तर
मानो तो गंगा माँ है ना मानो तो बहता पानी।
पाणी म्हणून पण गंगा अमृतच आहे ,दिव्य आहे.हा श्रद्धेचा भाग आहे ,अनुभवाचा प्रांत आहे.
म्हणूनच कृष्णसखा गीतेत म्हणतो "it लभते ज्ञानं"
ज्या एका वाक्यावर मजकडून Management by Spiritual Quotient : The power of FAITH हे पुस्तक लिहवून घेतले ते कृष्णगंगेनेच .( आठवा मागचा लेख "श्रोतसामस्मि गंगा" नद्यां मध्ये मी गंगा आहे इति श्री कृष्ण भगवत गीता) .
श्रद्धा ज्ञान देते ,ज्ञानअनुभव व अनुभूती देते
म्हणून गंगा हि माउली अध्यात्म गंगा आहे हे वादातीत,व ऋषिकेश माझं आजोळ आहे. असा मी कु पूत्र पण गंगा हि नेहमीच सु माता आहे माउली होऊन 'माउली'पण बहाल करणारी दिव्यांगना एकमेव अद्वितीय स्वर्गारोहिणी गंगा.
हे पटवून देणारा स्वामी विवेका नंदांचा एक किस्सा सुयोग्य व चपलखं तो सांगून लेखणीस पुन्हा अल्प विराम देतो.
एकदा विवेकानंदांना एका विदेशी पर्यंटकाने विचारले की भारता तील सर्वात पवित्र नदी कोणती?
क्षणाचाही उसंत न घेता स्वामीजी म्हणाले " अर्थांत यामुनाजी"
त्यावर पर्यटक आश्चर्य चकित होऊन म्हणाला "स्वामीजी कदाचित आपण चुकताहात गंगा हि सर्वात पवित्र नाही का?"
स्वामीजी म्हणाले बरोबर गंगा इतकी पवित्र कुणी नाही पण आपण नद्यां बद्दल विचारले म्हणून यमुना कारण गंगा हि तर अमृतांनंदमई माई आहे माय माउली आहे.
शिवंजय डॉ संजय
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
drsanjayhonkalse.tripid.com
Fotos
गंगा। दशहारा चुनरी उत्सव
राफ्टिंग गंगा झुला झुलन।।
गँगा
।
Comments
Post a Comment