भारतीय वयो व्यवस्था विचार

भारतीय वयो व्यवस्था विचार: शिवंजय डॉ संजय©
(आमचे मित्र मेंजर सुशांत यांच्या आजीस सहस्तरदर्शन सोहळ्या निमित्त समर्पित।)

रविवार तारीख 22 एप्रिल 2017  आंम्ही 9 साधक आसाम ,अरुणाचल यात्रेत होतो। आमचे कामाख्या व ब्रह्मकुंड अर्थात परशुराम कुंड येथे अक्षय त्रितीयेचे दिवशी पवित्र स्नान संपन्न करून  माजुली या जगातील सर्वात मोठ्या रिव्हर  आयलंडवर सनातन वैष्णव संस्कृतीने नटलेलं व परिपूर्ण अशा बेटांवर भारतीय सांस्कृतिच वारसा लाभलेले आयुष्य अनुभवत होतो.
15 व्या शतकात संत शंकरदेव या  वैष्णवाने वसवले हे बेट आजही सनातन भारतीय संस्कृतीची वसा व वारसा यांचं  गौरव स्थान आहे.
भारतीय संस्कृती किती परिपूर्ण व संपन्न आहे या विचारात मग्न असतानाच मी आमचे विद्यार्थी मित्र मेजर सुशांत व त्यांच्या परिवाराचे या यात्रेतिल सहकार्याबद्दल आभार मानणारा मेसेज पाठवला त्या  संदर्भात मला एक मेसेज आला की मेजर सुशांत यांच्या आजी म्हणजे त्यांच्या आई रोहिणी गोखले यांच्या आईनी 22 तारखेलाच वयाची 80 वर्षे पूर्ण केली. 
या मेसजवर उपजतच मी उत्तर पाठवले अरे वा म्हणजे त्यांनी आयुष्यात 1000 म्हणजे सहस्त्र पौर्णिमा दर्शन अनुभवले कि।

मानवी जीवनात अनेक पाडाव येतात जे अगदी जन्मापासूनसुरु होतात ते मृत्यूपर्यंत पर्यंत असतात.आयुष्य जर आनंदाने युक्त असेल तर फार छोटं वाटते,वाटतं जीवन वाटचाल किती किती छोटीशी आहे तेंच जर दुःखांने भरलेले आयुष्य लाम्ब लचक भयानक वाटते.छोटें असो वा मोठं आयुष्याचा प्रत्येक पाडाव पार करूनच जीवन जगावे लागते.

भारतीय जिवनशास्त्र  हे अध्यात्म व धर्मशास्त्राशी निगडित आहे. जगांत इतर कुठल्याही धर्मात एवढा परिपूर्ण ,तर्कशुद्ध शास्त्रोक्त विचार दिसत नाही.आणि गम्मत पहा हे सारे विचार हजारो वर्षांपूर्वी ,म्हणजे इतर सारे देश व धर्म त्यांच्या त्यांच्या बाल्यावस्थेत पण नव्हते तेंव्हापासून प्रचलित आहेत म्हणून आपली परंपरा आहे ,संस्कृती आहे .

या सर्वामुळे जीवनाचं महत्व  वाढलं आहे  आयुष्य हा त्यामुळे आपल्याकडे एक सोहळाच आहे . जन्म व मृत्यू यांचं सुतक व शौच हे पण शास्त्रीयच .

शौनक व भट्ट भास्कर या मुनी द्वयांनी जीवनाच्या या पडावांवर विपुल लेखन केलं आहे.

आपल्या आयुष्यात आपण वाढ दिवस साजरे करतो ते आरतीने ओवाळून प्रकाश पसरवुन,मेण बत्त्या विझवून नव्हे.
दुर्दैवाने आपला संस्कृती परिपूर्ण व शास्त्रोक्त असूनही आजचा कॉन्व्हेंटच्या शिक्षणामुळे पाश्चात्यांधानुकरणाने(blinded westernization)अंधांग्लेला गुंगरलेला नवं मानवं या विचारांपासून व परंपरेपासून दुरावला गेला आहे. यांत भारतीय राजकारणी नेहरु-गांधी व इतिहासकार यांचा फार मोठा पध्दतशिरआखलेला डांव होता हे आता स्पष्ट होऊ लागले आहे व त्याचे वाईट व घातक परिणाम समोर दिसत असूनही आपल्याला जाग येत नाहीये यासारखे दुर्दैव नाही.

तर दुसरीकडे सारे जग आपल्या या संस्कृततीचा व परंपरांचा अभ्यास करत आहे व त्यांच्या जिवनशैलीचा भाग बनवत आहेत,जसं अमेरिकन व्हाईट हाऊस व व्हर्जिनियाच्या असेम्बली मधील रुद्रस्तवन  वा चक्षुसोपनिषदाचे तमसो  मा ...  असो व लंडनमधील शाळांतील प्रार्थना असो व दुबईच्या मशिदीतील रामधून असो व जपान सरकारद्वारे आयोजित सहस्त्रचंडी याग असो.
असो आपण सहस्त्र चंद्र  निमित्ताने सुचलेल्या भारतीय व्ययोवस्था बद्दल  विचार करत होतो.

सर्वसाधारण कलियुगामध्ये मनुष्याची जीवनमर्यादा सरासरी शंभर वर्षे मानली आहे.

भागवत ग्रंथामध्ये द्वादशस्कंधा मध्ये असे वर्णन आहे की  कलियुगाच्या चतुर्थ चरणामध्ये मनुष्याची वयोमर्यादा वीस ते पंचवीस वर्षे असेल. (सध्या प्रथम चरण चालू आहे.)

प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात बाल्य, तारुण्य, वार्धक्य अशा तीन अवस्था येतात.

1)जन्म झाल्यापासून पंचवीस वर्षे पूर्ण होईपर्यंत बाल्य अवस्था.
2)पंचवीस ते पन्नास वर्षे पूर्ण होईपर्यंत तारुण्य अवस्था.
3)पन्नास वर्षापासून पुढे वार्धक्य अवस्था मानली आहे.
आपल्या आयुष्यातील पन्नास वर्षे पूर्ण झाल्या नंतर प्रत्येक पाच वर्षाने एक-एक शांत करायला सांगितली आहे. त्या शांती कशासाठी सांगितल्या आहेत ? शांती केल्यानंतर होणारे फायदे कोणते ? 
तिसर्‍या अवस्थेमध्ये म्हणजेच वार्धक्य अवस्थेमध्ये मनुष्याच्या शरीराच्या ठिकाणी अनेक प्रकारचे आजार, आघात, कमी दिसणे, कमी ऎकू येणे अशा अनेक  प्रकारच्या  व्याधी जवळ येतात.

पन्नास वर्षे पूर्ण झाली की     *“वैष्णवी शांत”* व पंचावन्न वय झाले की  *“वारूणी”* शांत करतात. पन्नास वर्षे पूर्ण होईपर्यंत आपल्याला काम करायला काही त्रास होत नाही परंतु हळू-हळू वय जेसे वढत जाते तसे आपल्याला जाणवू लागते की आता आपल्याला काम करण्यासाठी आणखी कोणाची तरी  गरज आहे. एकट्याने काम करणे अशक्य आहे.

या शरीराला वेदांमध्ये रथ अशी उपमा दिली आहे. म्हणजे साठ वर्षे पूर्ण झाल्यावर खूप ठिकाणी  साठी शांत केली जाते.

त्या साठी शांतीचे नाव *“उग्ररथ”* शांत असे आहे. 

प्रत्येक पाच वर्षा नंतर वेगळी शांत सांगितली आहे . तसेच आपल्या शरीररूपी रथाचेही नाव बदलले जाते.

पासष्टी शांत तिचे नाव  *“मृत्युंजय-महारथी”*  शांत .

सत्तरीशांतीला  *“भीमरथ शांत”*,

पंचात्तरी शांत ज्याला आपण पंचाहत्तरी म्हणतो त्या शांतीचे नाव  *“ऎंद्री शांत”* 

तसेच ऎंशी वर्षे झाल्यावर। *“सहस्रचंद्रदर्शन शांत”*  करतात.दर वर्षी एकूण 12 पौर्णिमा येतात तर 080 व्या वयात व्यक्तीने एकूण सहस्त्र चंद्र दर्शन पाहिले अनुभवले असे समजून त्याच्या या वयांत सहस्त्र चं द्र दर्शन सोहळा व सहस्त्र दर्शन शांती करतात.

तसे पंचाऎंशी वय झाले की  *“रौद्री शांत”* 

नव्वद वय पूर्ण  झाल्यावर “सौरीशांत”.

या प्रमाणे पंच्यांण्णव वर्षाला “त्र्यंबक महारथी” शांत .

वयाची शंभर वर्षे पूर्ण  झाल्यावरती जी शांत करतात त्याला   *“महामृत्युंजय”*  शताब्दी  शांत असे म्हणतात. 
बाकी काही नाहीतरी षष्ठ्याब्दी व सहस्त्र दर्शन सोहळा तरी साजरा करावा. b
जीवन कृतार्थ झाल्याचा तो सोहळा असतो
प्राचीन भारताच्या ऋषींनी सर्व बाबीबीचा खास व शास्त्रोक्त विचार करूनच सारं लिखाण केले आहे ,ऋषी हे सायंटिस्टच आहेत  ऋषी चा अर्थ सत्य शोधक seeker of the Truth असा होतो हे मी नेहमीच सांगत आलोय. म्हणून ते सारे व्यवहारीकच आहे,व जीवन दिशा मार्गदर्शकच आहेत परंत आजच्या जगांत त्यांची व्यावहारीकता सोडून त्याला अंध विश्वास समजून स्वीकारल व दुर्लक्षिले जाते .
आजच्या पिढीला योग्य विचारांची दिशा मिळावी म्हणून हा लेखन प्रपंच कारण आजची पिढी हि चौकस आहे व तिला योग्य मार्गदर्शन करणारेच नाहित म्हणून म्यां पामराचा हि चिमणीची झेप।
©शिवंजय डॉ संजय
कृपया  shivanjaydrsanjay.blogspot.com    आपल्या कमैंट्स नोंदवाव्यात

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया