पावित्र्याचा महामेरू:पतितपावनी गंगा।

पावित्र्याचा महामेरू:पतितपावनी गंगा।

:शिवंजय डॉ संजय।©

(कै. गुर्लिंग ज्योति देशमाने,कै.जयंत हसोळकर,कै.  श्रीमती  सुमति  होनकळसे यांच्या स्मृतिस सविनय सादर समर्पित)

        श्रोतसामस्मि जान्हवी ,

सर्व तीर्थांमध्ये मी गंगा आहे असे प्रत्यक्ष भगवान कृष्ण गीतेच्या 10   व्व्या अध्यायात म्हणतात.अशा पुरुषोत्तमरूपी गंगादर्शन व स्नानाचे महात्म्य तर नक्कीच पण पुरुषोत्तम अधिक मासात अधिकस्य फलं देणारे असे आहे.मनांत नसताना हे भाग्य मला लाभले. हे आज आता अधिक मासाच्या पहिल्या दिवशीच गंगा दर्शन झाले व आज दुसऱ्या दिवशी मी चक्क हरकी पौडीवर,जिथे भगवंताचे पृथ्वीवर पहिल पाऊल पडले,तेथे स्नान करत होतो हे चार दिवस आधी माझ्या विचार-इच्छे पलीकडे होते हे खरं वाटणारं नाही.हरीद्वार:हरिकडे जाण्या साठी हरिहरमय होण्यासाठी अस लेलं प्रवेशद्वार.अशा या हर कि पौडी मध्ये स्नान करण्याचे स्वप्न भाऊक भाविक बाळगून अस तात.
हरिद्वारला अधिक मास निमित्ते गंगा स्नानास आलो आहे.
येथे घाटावर म्हणजे हर कि पौडी वर स्नान करता कर ता निरीक्षणा ने लक्षांत येते कि कित्येकजण पाण्यात उतरतांना घाबरतात पाणी फारच थंड वाटते पण एक दा पाण्यात शिरल्यावर बाहेर पडवत नाही हा माझा अनेकांच्या बाबत आलेला अनुभव आहे. स्नान करताना भाविकांच्या मनातले भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात.कित्येकांच्या चेहऱ्यावर कृतकृत्यतेचे भाव तर काही जण घळा घळा रडतांना दिसतात. माझ्या सुहृदांचं पण तेंच होते.मी इथे येतानाही दोघं तिघांनी आमचं केंव्हा स्नान होईल,केंव्हा आम्हास बोलावणं येईल?आमच्यासाठी गंगाजल आणा इ उद्गार व इच्छा व्यक्त केल्या गेल्या.कारण  गंगा हि पाप मोचनी आहे.दहा प्रकारचे शारीरिक पापं गंगा स्नानाने लोप पावतात हा इतिहास व कित्येकांचा अनुभवआहे. चोरी,हिंसा,परस्त्रीगमन,मानसिक पाप,परसंपत्तीची हाव,वाईट विचार,दुराग्रह,वाणीचे पाप,कठोर  व असत्य भाषण,चहाडी,बाष्कळ बडबड अशी दहा काया वाचा मने केलेली पापं गंगास्नानाने नाहीशी होतात म्हणून गंगेला दशहारा पण म्हणतात व दशहरा उत्सव जेष्ठ शु प्रथमा ते दशमी साजरा करतात.
म्हणजे पापं करायची व गंगा स्नानाने ती धुवत बसायची असं नव्हे.जर गरज,नाविलाज,वा धर्म म्हणून वा अजाणता अशी पाप कर्मे केली गेल्यास ती विमोचन गंगा करते जसे धर्म युद्धात द्रोणाचार्य व भीष्म मारले गेले व रावण वधा मुळे गुरुहत्या व ब्रह्महत्या दोष लागल्याने त्याचे विमोचन गंगा व ज्योतिर्लिंगाद्वारे केले गेले आहे.नाहीतर कृष्णाने नाहीका 16000 गोपी फिरवल्या मग आम्ही काय पापकेले असे म्हणणारे अनेक 'गोपीचंद 'असतात.अर्थात जर पश्चातापयुक्त असुर देखील शरण गेल्यास गंगाई त्याचा उद्धार करते .म्हणूतर child like faith ने मी गंगेच्या कवेत नेहमी शिरतो .कारण आदी शंकर म्हणतात तसे
" कुपुत्रो जायेत क्वचीदपी कुमाता न भवती।"
गंगा फक्त पापनाशकच नाहीतर भोग व मोक्ष यांचे साधन पण आहे.भोग म्हणजे भौक्तिक उन्नतीचे साधन व यातून सुटकेच साधन पण गंगा आहे.

असो अशा या परम पवित्र गंगा साधन साध्य करण्याचं माध्यम मला सद्गुरुकृपेने बनवलं गेले हे या पार्श्वभूमी वर लक्षांत आलं.कारण मला पामराला करूणाकराच्या कृपेने अनेकवेळा गंगेच्या अनेक पात्रांमध्ये स्नान कर ण्याच्या कृपा वर्षावात चिंब होण्याच भाग्य लाभले. जेवढ्या सहजपणे हे लीहितो आहे तेवढ़या सहज हे झाले नाही हेही तितकेंच खरेअनेक त्रास,भोग,यातना, संघर्ष,सेवा,ई तुन शरणागत होउन जावे लागले.
मला अजूनही स्पष्ट आठवते माझी पहिलीवहिली गंगाभेंट.
मी व माझे काही महाविद्यालयीन सहकारी दिल्लीस विद्यार्थी प्रतिनिधींच्या  परिषदेसाठी  दिल्ली विश्वविद्यालयात चार दिवस राहिलो होतो ती माझी वायच्या विशीतील पाहिली दिल्ली वारी.दिल्लीस जाऊन कुतूब मिनार पाहणे हे स्वप्नातीत भाव सत्यात उतरले होते.तेंव्हा वाटले पण नव्हते की माझ्या पुढे होणाऱ्या बहुतेक सर्व यात्रांचे दिल्ली हे केंद्र होईल ते.या पहिल्या दौऱ्या दरम्यान मग आम्ही आग्रा, हरिद्वार, हृषीकेश,मसुरी अशी पहिलटकरां सारखीचं गावठी सहल केली.गावठी अशा साठी कि काही माहिती नाही दिशाभान नाही आणि चला मुरारी सफर करने अशी अवस्था.आम्ही जानेवरी महिन्याच्या भर थंडीत दिल्ली हून हरिद्वार मसुरी व हृषीकेश भटकंती व तेथून बसने आग्र्यास गेलो व पुन्हा वर दिल्लीस जाऊन मग खाली मुंबईस आलो म्हणजे आग्रा दिल्ली व परत दिल्ली via आग्रा मुंबईस द्राविडी प्राणायाम करीत आलो.असो ती माझी पाहिली गंगा वारी .
मग नंतर लेक्चरर झाल्यावर 1987स महाविद्यालयात मी व माझे सहकारी प्रोफ आर. पी. दलालमिळून शैक्षणिक सहल विभाग सुरु केला तेंव्हा मथुरा,आग्रा, फतेहपूर,हरिद्वार,ऋषी केश,नैनिताल अशी सहल केली. तेंव्हा हरकी पौडीत स्नान केले धमाल केली होती.
त्यानंतर 1992 ला गंगोत्री गौमुख करण्याचा योग आला त्या निमित्ताने हरिद्वार व ऋषीकेश येथे स्नान केले पण ज्या दिवशी आम्ही ऋषीकेशला राहिलो त्या रात्री म्हणजे मी चुकत नसेन तर 19 ऑक्ट 1992 च्या रात्री मोठा भूकंप झाला तो ऋषीकेश येथेही आम्हाला जाणवला होता.उत्तर काशी येथे भरपूर हानी झाली होती.त्यामुळे गंगोत्री,गोमुख न करता आम्ही बद्रीनाथला जाऊन आलो.
यानंतर मात्र माझे गंगा स्नान आज तागायत कधीही चुकवले गेले नाही मी सतत न चुकवता दरवर्षी किमान एकदा तरी,कधी कधी दोनदा वा तीनदा केदार बद्रीनाथ दर्शनास बोलवला गेलोय.केदार बद्री मार्गावर नेहमीच जाता येता हरिद्वार,हृषीकेश,ब्यासी,देवप्रयाग रुद्रप्रयाग,कर्णप्रयाग इत्यादी पंचप्रयाग व प्रयाग राज येथेही स्नान तर्पण केले आहे ,जाऊन येऊन धरले तरी 150 च्या पेक्षा जास्त वेळा गंगा स्नानाचा भाग्य या कुचकाम्याला लाभलं आहे.एवढेच नव्हे तर गौमुख व् त्याही वर वसलेले तपोवन ते गंगासागर पर्यंत सारे प्रमुख तीर्थ स्नान करवले गेले.नक्कीच माझे,काशीचे शर्मा यांनी सांगितल्या प्रमाणे ,गंगेशी पूर्व ऋणानुबंध असावेत.हे ऋण फेडण्यासाठी गंगा ते गंगा सागर ,गंगा उगम ते गंगा सागर मिलन येथ पर्यंतच्या कथाप्रवास वर्णन लिहावं असं 1997 पासून वाटतंय सद्गुरुकृपे व गंगाशीर्वादे हे काम मला लेखणी बनवून आपण सर्व सुज्ञ वाचक साधकांपर्यंत पोहचावे हिंच त्यांच्या चरणी प्रार्थना.
आई म्हणूनच दर वेळी गंगेच्या कवेत तासनतांस विहार केलाय व अनेकांकडून करवून घेतला गेलाय एवढी करुणामई आहे पतित पावनी  गंगा.
अशा या कृपामयी गंगेस,जी भावानुसार  भुक्ती व मुक्ती च फळ देते ,कोटी कोटी नमनकरून लेखनास अल्पविराम देतो.

          नमामी गंगे तव पाद पंकजं।
          सुरार्सुरैर्वंदीत नित्य मुक्तम।।
         भुक्तीं च मुक्तीं च ददासी नित्यम।
         भावानु सारेण सदा नराणाम।।
शिवंजय डॉ संजय©
कृपया आपले अमूल्य मत नोंदवून प्रोत्साहित करा pl encourage by posting your valuable comments nd suggestions on
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com.
drsanjayhonkalse.tripod.com

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया