मायोंग:मैनावतीची नगरी ,माया नगरी
मयोंग : आसाम अरुणाचल डायरी।
मायोंग:मैनावतीची नगरी ,माया नगरी.
:शिवंजय डॉ.संजय
भारत हा एक धार्मिक,आध्यात्मिक पार्श्वभूमि व
इतिहास असलेला देश आहे. मंडुकोपनिषदच्या प्रथम अध्यायाच्या प्रथम ऋचेतच म्हंटले आहे की भौतिक विज्ञान व जगापालिकड़े पण जग आहे व त्याच्या अभ्यासास परा विज्ञान व दैवी ज्ञान म्हणतात.त्यांच्याच एक भाग गुढ विज्ञान ,काळी जादूचं विज्ञान ,ज्याला माया शास्त्र असे पण संबोधता येईल.
असे हे मायाशास्त्र व त्याचा वावर वापर जगभर सर्वत्र चालतो. त्यांची एक वेगळीच दुनिया असते. दक्षिण अमेरिका, पेरू,अर्जेंटीना,ब्राज़ील, यूरोप ,अफ्रीका, चीन, इ देशांत है प्रकार आहे ज्याला ब्लैक मैजिक म्हणतात. पण भारत याची राजधानी आहे ,येथे त्याचा शास्त्रोक्त अभ्यास झालाय. यांची वसति चवथ्या मितीत आहे जयास माया लोक व माया नगरी म्हंटले जातेजस सिद्धलोक हे सिद्धांच तसांचं हा मायालोक .
भारतात ही विद्या उत्तरेस प्रसिद्ध आहे. उज्जैन,बनारस, बंगाल मध्ये ही केंद्रे आहेत.पण आसाम गोहाटी जवळ या माया नगरिंची राजधानी आहे जे आज मायांग म्हणून आजही प्रचलित आहे.
आसाम येथील गोहाटी जवळ 40 की मि दूर मईरोंग जिल्ह्यात ब्रह्मपुत्रेच्या किना-यावर मायांग पसरले आहे.
मायांग हे नाव संस्कृत व दिमासा या असमिज- मणिपुरी भाषेतून आले आहे.माया + आंग अर्थात मायेचे स्थान ,वा माँ म्हणजे शक्ति व् यांग म्हणजे नगरी = माया नगरी. म्हणून हे महामाया त्रिपुर भैरविचे स्थान.आणखीण एका विचारानुसार हे मणिपुरी वंशाच्या मैराओंग या जमातिच वसति स्थान म्हणून मोइरोंग हे विभाग व मायांग हे ठिकान झाले.
मयांगचे अनेक ऐतिहासिक दखल आहेत व् ही मायानगरी पुराण काळापासून ,महाभारत काळा पासून प्रसिद्ध आहे.घटोचकच है कचरी राजघरण्याचा घटोचकच इथलाच ,याने आपल्या मायावी शक्तिसह महाभारताच्या युद्धात भाग घेतला होता.
हिडिम्बा,जी भिमाची बायको होती तीच राज्य मायांगच.
घटकांत सिह देव हे हिडिंबा राजघराण्यातील आजचे राजे आज येथे आहेत.
आँखिन एक उल्लेख या बाबत प्रचलित आहे व् तो म्हणजे नवनाथ कालीन माया नगरी पण हिंच. नवनाथ भक्तिसारानुसार येथे मायावती मैनावतीचे राज्य आहे. मैनावतीच्या मोहपाशांत गुरु मच्छिन्द्रनाथ अडकले होते. अनेक वर्ष ते मैनावतीच्या राज्यांत तिच्या मोहजालांत अड़कले होते. व् मग त्यांचे शिष्य गुरु गोरखनाथ ढोलकिवल्याचं रूप घेऊन इथे आले व् त्यांनी " जाग मच्छिन्द्र ,गोरख आया"अर्शी प्रसिद्ध हाळी देऊन त्यांना जागें केले व् स्त्री राज्यतून मुक्त केले.
आजही येथे स्त्री राज्य आहे असेे मानले जाते. आजही या जागे बाबत अनेकानेक कथा प्रसिद्ध आहेत. आजही ऐसे सांगतात की येथून माणसे हवेत गायब होतात ,व् वा पशुंमध्ये रूपांतरित होतात.आजही कित्येक जण ,साधू,नागा ,तांत्रिक ,मांत्रिक येथे आश्रयास जातात. कित्येक परदेशी साधक,अभ्यासक येथे तंत्र विद्या शिकण्यास येथे येतात .
अशा या माया नगरी बाबत अनेक कथा श्रुती रूपात प्रसीद्ध आहेत व मान्यता पावलेल्या आहेत.
आम्हाला येथे जाण्याचा योग आला तो या आसाम,परशुराम कुंड वारीत तोही अचानक भेंट झालेल्या माझ्या वाचक मित्रामुळे.माझे "महावतार बाबाजी" हे पुस्तक वाचून प्रभावीत झालेले ,मुंबईतच स्थाईक असलेले ,सुजाण वाचक मनोहर निकम यांची संयोगवश कामाख्यास भेट झाली. ते मला भेंटण्याचे सारे प्रयत्न गेले नऊ वर्ष करत होते अगदी ते आमचे प्रकाशक मित्र पंडित श्री सुहास जोशी यांनाही माझ्यासाठी भेंटले पण आमचा भेंटीचा योग्य इतक्या वर्षांनी तो पण आसम मध्ये आला.त्यांच्या मुळे व त्यांच्या सहकारी नाखवा यांच्याबरोबर आम्ही 12 जण मायांग ला निघालो . भीती होती ,उत्सुकता होती पण सारे एकत्र होतो. आजही येथे चमत्कृतीपूर्ण घटना घडतात.आजही स्त्री राज्यातून मोहमयी मायावती येतात व आवडली एखादी व्यक्ती तर त्याला घेऊन जातात. आजही असा समज आहे की एखादा माणूस लाल वस्त्रांत गेल्यास व तेथील प्रथम हाथीशीला दर्शन घेतले व मग एका गुफेंत स्वयंभू गणेशाचे दर्शन घेतले .हा गणपती नेहमी थोडा थोडा वाढतो.या भागांत गणेश व शक्ती पूजा होते हे गाणपत्य व शाक्त आहेत. येथे काही तांत्रिक व मांत्रिक भेंटले एक रमण बाबा म्हणून महात्मा भेंटले.टिळक हजारीका व लक्ष्मी राम नाथ हे तिथले प्रसिद्ध तांत्रिक आहेत.सारे वातावरण गूढ व रहस्यमयच होते। येथे एक म्युझियम पण आहे त्यांत वसिष्ठ नाडी व तांत्रिक व मंत्रशास्त्राच्या पटट्या आहेत. आयुर्वेद व पुरातन पुस्तके आहेत. एकंदरीत धुंदमय वातावरणात प्रवास झाला .
आजमितीस मायांग हे टुरिस्ट आकर्षण आहे ,वन्यजीवन ,पक्षी, सांस्कृतिक केंद्र ,व रिव्हर टुरिझम म्हणून प्रचलित आहे. तर अशा या महामाया त्रिपुरभैरवी च्या मोहमयी महा माया नगरीच्या महाजालातून आम्ही सुखरूप परतलो.
शिवंजय संजय
drsanjayhonkalse.blogspot.com.
drsanjayhonkalse.tripod.com
Asam ,24 April 2018

Comments
Post a Comment