कृष्णसखा उद्धव


From my book "सिद्ध आणि सिद्धाश्रम "chapter 15

महाभारतकालीन महायोगी श्रीकृष्ण सखा उद्धवजी.

{भगवंतांनी उद्धवास आज्ञा केली व निर्देश दिला की “उद्धवा मी निजधामास जात आहे,पण मी पुन्हा निर्देश देई पर्यन्त तुला माझ्या ज्ञानाचे व सनातन धर्म रक्षणासाठी तपस करावयाचे आहे व त्यासाठी तू बद्रीकाश्रमांत जा व तेथील एका विशिष्ट गुफेत धुनी पेटवून रहा.तेथे तुला हाताशीच कंदमूळ व गंगाजल  उपलब्ध राहील.”अशा रीतीने स्थूल जगांत उद्धव यांना स्थूल देहात ठेवून सूक्ष्म ज्ञानाचे रक्षण करण्याची विलक्षण व्यवस्था व विलक्षण व्यवहार कौशल्य व व्यवहार आदर्शाचे उत्तम व विलक्षण उदाहरण जगांत कुठेही शोधून सापडणार नाही.
आजही उद्धव बद्रिकाश्रमात ध्यानस्थ बसले आहेत भगवान श्री कृष्णाच्या पुढील आदेशाची वाट पाहत. }

श्रीकृष्णभगवान यांचे तत्वचिंतक परममित्र मित्र उद्धवजी हे जरी लौकिकार्थाने सिद्ध म्हणता येणार नाहीत तरी पण आपण येथे त्यांचा विचार करणार आहोत कारण त्यांचे कार्य हे एक सिद्ध पुरुषाला साजेसे आहे.उद्धवजी हे नारद,सनका दीक (ब्रह्मदेवपुत्र) यांसारखे दिव्य लोकातील नाहीत वा सप्तचिरंजीवां प्रमाणे  चिरंजीव ही नाहीत.ते देहसिद्ध नसून महाभारत कालीन प्राप्त झालेल्या स्थूल देहातच आजहि वास्तव्य करून आहेत.आज पांच हजारहून अधिक त्यांचं वय आहे.ते केदारखंडात,बद्रीनाथ जवळील पांडुकेसर या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार सनातन धर्माच्या रक्षणासाठी तपस करीत आहेत व त्यांचे दर्शन स्थळ/आश्रम अव्यक्त,अप्रगट आहे तसेंच इतर सिद्धां प्रमाणे त्यांचे दर्शन सहज तर नाहीच नाही हे अस्मादिकाच्या लक्षांत हिमगिरि पदभ्रमणाच्या पहिल्या प्रयत्नातच 1997 साली आले होते.जर अगस्त्य हे “नित्यसिद्ध” आहेत तर उदधव  “कृपासिद्ध” सिद्ध आहेत. 
त्यांचं अस्तित्व व त्याचा पुरावा म्हणजे भागवतातील कृष्ण आदेशाची पुष्टीच आहे.श्रीमद भागवतातील अकराव्या स्कंधात याचा स्पष्ट उल्लेख आहे.ज्यावेळेला यादवांच्यात यादवी माजली व कृष्णभगवंताची निजधामास जाण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी निघण्याची सर्व तयारी सारवासारव सुरू केली,आपल्या नंतर सर्व व्यवस्था लावायला सुरुवात केली.त्यावेळी यांनी त्यांचे तत्वचिंतक मित्र उद्धव (कृष्ण भगवंताचे तीन जवळचे मित्र होते,सुदमा गुरुकुलातील मित्र,अर्जुन योद्धा मित्र व उद्धव तत्वचिंतक मित्र )यांना पाचारण केले.मग त्यांना उपदेश केला जो “उद्धव गीता” वा “हंस गीता” म्हणून ओळखला जातो.(याच उदधवजींना कृष्ण भगवंतांनी गोपिका,ज्या कृष्णाच्या विरहात दु:खी होत्या त्यांच सांत्वन करण्या साठी मथुरेला पाठवले होते.[उद्धवा शांतवन करजा ही कविता आपल्या पैकी कित्येकांना शाळेत असल्याची आठवत असेल.]ते उद्धव संदेश म्हणून प्रसिद्ध आहे.)

उद्धव-गीता भागवताच्या अकराव्या स्कंधातील, सहाव्व्या प्रकरणातील चाळीसाव्या ऋचेपासुन सुरू होऊन 29 प्रकरणा नंतर संपते.यात एकूण 1000 श्लोक आहेत.उद्धव गीता हा कृष्णाचा शेवटचा उपदेश असून तो ज्या साधकांनी भगवत गीतेचा नीट स्वाध्याय केला आहे त्यांच्यासाठी आहे असं म्हंटलं जातं.कारण या उपदेशांनंतर कृष्ण भगवंत निजधामास जाण्यासाठि प्रभास पाटण येथे गेले व देहोत्सर्ग केला.(पहा द्वारका धीश श्रीकृष्णाचे अंत स्थान सोमनाथ :डॉक्टर संजय होनकळसे :सामना 21 /2/1999)आत्मा,मन,व माया इ.उपदेश करून झाल्यावर भगवंतांनी उद्धवास आज्ञा केली व निर्देश दिला की “उद्धवा मी निजधामास जात आहे,पण मी पुन्हा निर्देश देई पर्यन्त तुला माझ्या ज्ञानाचे व सनातन धर्म रक्षणासाठी तपस करावयाचे आहे,त्या साठी तू बद्रीकाश्रमांत जा व तेथील एका विशिष्ट गुफेत धुनी पेटवून रहा.तेथे तुला हाताशीच कंदमूळ व गंगाजल  उपलब्ध राहील.”अशा रीतीने स्थूल जगांत उद्धव यांना स्थूल देहात ठेवून सूक्ष्म ज्ञानाचे रक्षण करण्याची विलक्षण व्यवस्था व विलक्षण व्यवहार कौशल्य व व्यवहार आदर्शाचे उत्तम व विलक्षण उदाहरण जगांत कुठेही शोधून सापडणार नाही.आज पांच हजारहून अधिक वर्षांचा काळ मागे लोटला आहे.तपोबल व कृष्णकृपा यामुळे सशरीर व अस्तित्व आजही शाबूत ठेवून उद्धव बद्रीकाश्रमी आजही तप करीत बसले आहेत.त्यांच्यासाठी अंग रक्षक म्हणून दोन व्याघ्र नियोजले होते ते आजही तेथे उद्धवांच्या रक्षणाचे कार्य करीत आहेत.कुणी चुकून जर त्या गूहे पाशी आले तर वाघांच्या भीतीने ते तेथून पळून जातील म्हणून तशी व्यवस्था करवली आहे.त्या व्याघ्रांचीच काय ती तेवढी साथ सोबत उद्धवांना आहे.त्यांच्या व्यतिरिक्त फक्त नारद मुनि व सनाकादीकच त्यांची भेंट घेतात. केवढं महान,धाडसांच व उदात्त लोक कल्याणांच काम उद्धव करीत आहेत,तेही आपल्यासाठी मानवासाठी,सनातन धर्माच्या रक्षणासाठी ते आज एकटे तप करीत बसले आहेत.विचार करण्यासारखी बाब आहे. आपण तर कांही काळ जरी एकटे राहिलो,तेंहि गावांत वा शहरातील घरांत जिथे सर्व सोयी सुविधा आहेत तरी घाबरतो,एकटेपण आपल्याला खावयास उठते,याउलट उद्धवजी एकटेच,एका निर्जन स्थळी, तेंहि पांच हजार वर्षांपेक्षा जास्त काळ,माणसं  विरहित जागी,तप करीत बसले आहेत,आणि तेंहि सनातन धर्म,आपल्या रक्षणा साठी त्यांनी आपल आयूष्य वेचले आहे.आपल्याला साठी नंतर जीव व शरीर जडत्वामुळे नकोसा वाटतात. केंवढा मोठा त्याग आहे हा.अशा उद्धवजींना कोटी कोटी प्रणाम करणे आपले परम कर्तव्य आहे.आजच्या सुपरमॅन,बॅटमन,यांच्या रंजकतेत रमणार्‍या,व महा भारत,धर्म देव धर्म यांची खिल्ली उडवणार्‍या तरुण पिढीला हे कल्पनातीत सत्य  कळणे व समजावणे आत्यंतिक महत्वाचे आहे व ते आपले विशेष कर्तव्य आहे.
  उद्धवजींकडे आणखी एक भूमिका,कर्तव्य आहे व तेही ते इमाने  इतबारे पार पाडत आहेत.असं मानलं जाते की बद्रिकेदार यांची सेवा सहा महीने मानवाकडे व शितकालीन सहा महीने देवांकडे असते.शित कालीन सहा महिन्यांची केदारनाथ सेवा नारद महर्षिण कडे आहे.केदार नाथ येथील गरुड चट्टी येथे अखंड काल 24 वर्षे एक पुजारी राहत होते.प्रस्तुत लेखकांचे व त्यांचे चांगले जिव्हाळ्याचे संबंध होते.ते सहसा जास्त वैयक्तिक अनुभव सांगत नसत पण आम्ही नेहमीचे असल्याने नंतर ते मनमोकळे पणे आपले अनुभव सांगू लागले होते.त्यांनी माला व माझे मित्र प्रोफेसर सचिन यांना संगितले होते की शितकाली त्यांना कित्येक वेळा बंद असलेल्या केदारधाम मंदिरात पुजा संवाद ऐकू येत असत.यांचं प्रमाणे बद्रीधामची पुजा शीतकलात सहा माही उद्ध्वजींकडे असते व ते ती सेवा इमाने इतबारे पाड पाडत असतात.म्हणजे आज हजारों वर्षे ते बद्रि नाथची पुजावर्षातून सहा महीने  करत आहेत.अशा या महायोगी उद्धव यांचे आपल्या सुदैवाने आजच्या काळातील एक छायाचित्रही उपलब्ध आहे,आपणा पैकी काहीजणांनी ते कदाचित इतस्तत: पाहिल्याची शक्यता पण आहे पण ते उद्धजी आहेत हे क्वचितच थोड्यांना माहीत आहे.या लिखाणात ते येथे देण्यात येत आहे.मुंबईतील घाटकोपर येथे राहणार्‍या नाना महाराज तराणेकर यांचे एक भक्त यांच्या कॅमेर्‍यात दैवी  कृपेने हे छायाचित्र आले.त्तेथून ते इंदौर व मग अकोल्यातील नाना महाराजांचे भक्त पांडुरंग आबाराव देशपांडे, यांच्याकडे पोहचले.अकोला  येथील ख्यातनाम तबला वादक श्री अमित शर्मा यांचे जवळही हे छायाचित्र असून त्यांनी ते मोठे करून शेगावच्या गजानन महाराज संस्थानास भेंट दिलेले आहे.श्री गजानन महाराज यांच्या समाधी मंदिरातील परिसरांत असलेल्या धुणीच्या दारावर ते छायाचित्र आजही लावले आहे.
गेल्याशतकाच्या अंतिम दशकांत या छायाचित्राच्या प्रती सर्वत्र पोहचात होत्या व फोटो संबंधात अनेक ग्रेपवाईन/ वदंता प्रचलित होत्या.योग्य माहिती सर्व साधारण पणे उपलब्ध नसल्याने हे होत होते.काही जणांच्या मते हे चित्र एका सुप्रसिद्ध कृष्ण संप्रदाया कडून अॅनिमेशन पद्धतीने छापले गेले होते.एका माहितीनुसार हे संगणकीय कौशल्य वापरुन तयार केलेले आहे. अवघड पीर श्री दादा महाराज बापट यांच्या ऑफिस मध्ये हि हे चित्र आहे .त्यांच्या मते ते डॉ रामनाथ अघोरी यांचे आहे. व ते आता समधूस्ट आहेत भारताच्या नेपाळ सीमेलगत कोठेतरी.आणखीन डिटेल्स विचारता मी तुला ते नंतर सांगेन असे त्यांनी सांगितले. इंदूर येथील एका आश्रमात तेथील प्रसिद्ध बाबा यांच्या आश्रमात तर त्या बाबाजींचे विविव्हढं फोटो आहेत त्यातील एका फोटोंत तर यांचं फोटोवर त्यांचता चेहरा लाऊन तो फोटो  ठेवला आहे.असो तर या फोटोबद्दल मत मतांतरे आहेत.
              

                   (श्री उद्धवजी फोटो)

  पण प्रस्तुत लेखकाने संशोधनाअंती जी माहिती मिळवली  ती  अशी आहे की हैदराबाद येथील दोन फोटोग्राफर मित्र1982 साली हिमालयात फिरत असता त्यांच्या कडून हे फोटो काढले गेले आहेत.ते फोटो काढत फिरत असता त्यांना एक वाघ दिसला त्यांचा फोटो काढण्यासाठी ते दोघेही त्या वाघाच्या मागे गेले असता वाघ गुहेत शिरला व त्या गुहेत शिरलेल्या वाघाचा फोटो काढण्यासाठी त्यांनी कॅमेरा ऑन केला तर त्याच्या फ्लॅशमध्ये त्यांना उद्धवजी दिसले त्यांचे ते रूप बघून एक तर तिथेच बेशुद्ध पडला तर दुसर्‍याने खटाखट सारे 36 फोटो(त्यावेळी 1982च्या आसपास 36 फोटोंचा रोल असे)काढले व तोही बेशुद्ध पडला. नंतर दोघेही पायथ्याशी बेशुद्ध अवस्थेत सापडले.फोटो डेवलप केल्यावर हा फोटो,त्यातल्या त्यात चांगला व योग्य,मिळाला.नंतर तो कोणाचा फोटो आहे हे कळोस्तर वर सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या कहाण्या तयार झाल्या होत्या. पण तो मग नाना महाराज यांच्या सेवक भक्तांकडून नाना महाराजांकडे गेल्यावर त्यांनी सांगितले की ते उद्धव आहेत ज्यांची व नानांची भेंट 1920 साली,नाना हिमालयात बद्रिकेदार मार्गे गंगोत्रीकडे जात असताना वाट चुकलेल्या अवस्थेत,झाली होती.याचा उल्लेख महाराजांच्या “ श्री मार्तंड महिमा “ नावाच्या ओवीबद्ध चरित्राच्या संपूर्ण आठव्या अध्यायात केला आहे.इंदौर येथील प्रा.विनोद पागे यांनी महाराजांच्या समोर बसून त्यांच्या मुखाने सारे तपशील ऐकू न लिहून,परत महाराजांना दाखवून लिहिले आहे.चरित्रात जरी उद्धव्जींचा उल्लेख नसला तरी महाराजांनी आपल्या अंतरंग,अगदी जवळच्या शिष्यांना त्यांना बद्रि नाथ येथे भेटलेले महायोगी कृष्णसखा होते असे संगत असल्याचा स्पष्ट उल्लेख नाना महाराज विशेषांक “पिसारा” या फेब्रुवारी 1982 च्या अंकातील पण नंबर 38 वर स्पष्ट पणे केलेला आहे.
उद्धव व नाना यांच्या भेटीच्या वृत्तांताआधी नाना महाराजां विषयी थोडे लिहिणे  आवश्यक,मुख्यत्वे करून नवीनपिढी व जे नानामहाराजां बद्दल जाणुन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी आहे.
नानामहाराज यांचे संपूर्ण नाव मार्तंड शंकर तराणेकर हे असून ते वासुदेवांनन्द सरस्वती टेंबेस्वामी माणगाव(कुडाळ-सावंतवाडी)यांचे अनुग्रहीत होते.त्यांचा जन्म तराणे नावाच्या इंदूर जवळच्या गावी 1886 साली झाला.गेल्या शतकांतील सर्व संतांमध्ये त्यांचे नाव भक्तिभावाने व आदराने घेतले जाते.माझ्या भाग्याने मला त्यांची भेंटदर्शन घेण्याचे पुण्य,अध्यात्मातल काहीही कळत नसतांना,महाविद्या लय कालीन दिवसांत आमचे मित्र श्री दिलीप गडकरी यांच्या मुळे लाभले.त्या काळी नाना मुम्बई दादर येथील “सुरेश” या धुरू वाडीतील बिल्डिंग मध्ये येत असत तेंव्हा हा योग लाभला होता.अष्टौप्रहर प्रसन्नता त्यांच्या कडे होती.मधुर-मृदुल उक्ती व कृती,परमानंदी मुद्रा,अथांग शांती,ऋजुता,अनाग्रह,विनय,प्रीती इ सर्व गुणांनी युक्त अशी त्यांची मूर्ति होती.
महाराष्ट्रीय संतपरंपरेत नाना महाराज हे संत एकनाथांचा पुनर्जन्म होता असे मानले जातं.एकनाथ यांनी,अत्यंत कष्टाने,भागवताच मराठीत भाषांतर केले होते. त्यामूळे त्यांना उद्धवजी श्रीकृष्ण आदेशानुसार बद्रिकाश्रमांत ध्यानस्थ बसलेत  हे अवगत होते.त्यांचं दर्शन घेण्याच्या उद्देशाने एकनाथ सातशे वर्षांपूर्वी बद्रीका श्रमांत वणवण भटकले.पण दुर्दैवाने त्यांच्या उद्धव भेटीचा योग नव्हता.त्यांना आपली इच्छा मागे ठेवूनच अवतार कार्य आवरते घ्यावे लागले होते.ती अपुरी इच्छा नानामहाराज म्हणून पूर्ण होण्याचा योग मात्र होता.पूर्वजन्मीची इच्छाबाकी असल्याने नानांना सच्चिदानंद  दर्शनाची अतीव व्याकूळता होती.त्यामुळे ऐन जवानीतच वयाच्या 23/24 व्व्या वर्षीच ते हिमालयात बद्रीनाथ दर्शनास गेले होते.आजच्या सारखी दळणवळण साधने तेंव्हा नव्हती(बद्रीनाथचा रस्ता 1962 साली सुरू झाला हे लक्षांत घेता प्रवास अत्यंत कठीण होता हे सुज्ञाच्या लक्षात येईलच.)ऋषिकेशहूनच चालत जावे लागे.कडेकपारीतून,पाय वाट काढत ते बद्रि नाथ येथे पोहचले,नंतर बर्फाच्छादित पायवाटेने बद्रिनाथहून गंगोत्रीच्या दुर्गम दुस्तर,कडेकपारीच्या मार्गाला लागले असताना ते वाट चुकले.त्यात तहानेने घसा व्याकुळ झालेला दिवस मावळतीला लागलेला,प्रचंड थंडीने शरीर थंड,अन घसा पाण्यासाठी व्याकुळ अशा अवस्थेत अचानक त्यांना एक गुहा थोड्याश्याच अंतरा वर दिसली,त्या गुहेतून लख्ख प्रकाश बाहेर पडत होता.बुडत्याला,काडीचा आधार या न्यायाने त्यांना दिलासा मिळाला.अडखळत धडपडत ते गुहेच्या दारी पोहचले तर दाराशी रक्षकासारखे दोन मोठे वाघ त्यांना दिसले,साक्षात मृत्यूच जणू समोर उभा ठाकलेला पाहून परत एखाद्याच्या आशा पूर्णपणे विलोपल्या असत्या पण दत्तभक्ताला कुठली भीती?तेवढ्यांत आतून वाघांना  त्यांना आंत येऊ देण्याची आज्ञा झाली.वाघ खरोखरंच पाळलेल्या प्राण्याप्रमाणे रास्ता मोकळा करून बाजूला झाले.पुढचा विचार करे पर्यन्त आतून दिव्य धीरोदात्त आवाज संस्कृत भाषेतून आला.नानांना आंत बोलवण्यात आला होते.नाना आंत शिरले.आंत शिरल्यावर वाघांसामवेत  सिद्धासनात बसलेले दिव्य,भव्य व अत्यंत विलक्षण योगी दिसले. ते मार्तंड-महिमातील आठव्या अध्यायात त्यांचे जे वर्णन आहे ते येथील फोटोशी तंतोतंत जुळलेले दिसते.त्यांना पिंगटशिर असा जटाभार होता.भुवया वाढलेल्या होत्या.छातीच्या खालपर्यंत दाढी व केंस व ते पायांशी लोळत होते.कॉलरबोन स्पष्ट दिसत होते.सिद्धासनात बसल्यावर बरगड्या दिसतात त्या त्यांच्या दिसत होत्या.त्या योग्याने गंगाजल प्यावयास दिले व त्यांना सांगितले की ते महाभारत कुरुक्षेत्रातील योद्धा आहेत,युद्ध झाल्यावर निजधामास गमन करण्यापूरवी श्री कृष्ण भगवंतांनी एक मंत्र देवून या एकांत गुफेंत मला तपस करण्यास बसवले आहे.या दिव्य मंत्राने मी कृतार्थ झालो आहे.तेंव्हापसून मी येथेच त्यांनी दिलेली कार्य करीत आहे,त्यांचा पुढील निर्देश येई पर्यन्त मला हेंच करण्याची आज्ञा आहे.
उद्धवजींनी नानांना रात्रभर तेथेच मुक्काम करावयास सांगितले.उद्धवज्जींनी आपल्या जवळील कंद काढला,धुंनितुंन शिजवून तो एका पानावर घोळून टाकला तेंव्हा त्यातून सुंदर,रवेदार,दानेदार कळ्या पडल्या.नाना या भ्रमांत राहिले की त्यातील अर्धा वाटा तरी त्यांना मिळेल कारण त्यांना प्रचंड भूक लागली होती. पण त्यांच्या नशिबी त्यातला एकच घास होता.उद्धवजी म्हणाले की बाळ तुला एकाच घांस पुरेसा आहे.तुला तो खालल्यावर आठ दिवस भूक लागणार नाही.
खरोखरच नानांना आठ दिवस नंतर भूक लागली नाही.यामुळे सुज्ञजनांच्या  हे लक्षांत येईल की खरोखर आपल्या कडे आशा जडी बुटी आहेत की जाणे महिनोंमहीने भूक लागत नाही. आणि आपण खरोखर इतके आणा खातो त्याची शरीराला तेवढी गरज नसते . तसेच हिमालयात अशा अनेक जडीबुट्टी आहेत त्याने अगदी माणूस उघडा राहिला तरी थंडीही वाजत नाही. 
नंतर  नाना महाराजांच्या विनंतीला मान देऊन उदधवांनी अस्खलित, ओजस्वी व ओघवत्या  संस्कृत भाषेत उपनिषद याचे स्वरूप समजावून सांगितले उप निषदांचा आशय स्पष्ट करणारे प्रवचन दिले. व सत-चित-आनंद याचे स्वरूप समजावून सांगितले.दैवी,धीर,गंभीर वाग गंगा ओसंडून वाहत होती व त्यांचं आकंठ प्राहण करणारे फक्त नानाच.  
मग उदधवांनी नानांना आशीर्वाद दिला व सांगितले की त्त्यांचे भविष्य उज्वल  आहे. तुझी व माझी भेंट ही घडवून आणली गेली आहे.
सकाळच्या पहिल्या प्रहरी नानांना उदधवांनी आपल्या पायाशी डोळे मिटून बसावयास सांगितले आणि क्षणातच त्यांना गंगोत्रीस पोहोचवले.
अशी ही एखाद्या मानवाची उद्धवांशी झालेली एकमेव अलौकिक भेट. नानांची एकमेकाद्वीतीय पात्रता दर्शवते. व भागवतांत जे लिहले आहे याची सत्यता सिद्ध करते.
नाना त्यावेळी तरुण होते जेमतेम 23/24 वर्षांचे.उद्धवान्ंनि सांगितल्या प्रमाणे त्यंचे भाग्य व भविष्य हे उज्वल झाले हा इतिहास आहे.
नाना उदधवांना 1920 साली भेंटले गेले तर उपलब्ध छायाचित्र हे शतकाच्या अंतार्धांत घेतले गेले आहे.
म्हणजे आजही उद्धव बद्रिकाश्रमात ध्यानस्थ बसले आहेत भगवान श्री कृष्णाच्या पुढील आदेशाची वाट पाहत . 

================================

Comments

  1. फारच उत्कंठावर्धक कथन आहे.
    फोटो मात्र दिसत नाहीय.
    कृपया पहावयास मिळेल का 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|