कामाख्या अंबुबाची उत्सव :योनी तंत्र मंत्र साधना पूजा मानणारे जगातील एकमेवाद्वितीय पर्व।

कामाख्या अंबुबाची उत्सव :योनी तंत्र मंत्र साधना पूजा मानणारे जगातील एकमेवाद्वितीय पर्व।
:"शिवंजय":डॉ संजय होनकळसे.©

कृपया गरजेनुसार परत परत व परत परत वाचा

ॐ भू : भुवा : स्‍व :
:ॐ कामाक्ष्‍यै चामुण्‍डायै विद्महे ।
भगवत्‍यै धीमही तन्‍नो गौरी प्रचोदयात ।।

अध्यात्म शास्त्र हि भारताची जगाला देन आहे.आपलं अध्यात्मशास्त्र हे सर्व समावेशक आहे.त्याच्या अनेकानेक शाखा उपशाखा आहेत.त्यातीलच एक गुढविज्ञान होय. गूढ विज्ञान हे गुह्य आहे रहस्यमयी आहे,गुह्य ज्ञान आहे. काही राहस्यांची उकल कोड भाषेत केली गेलीय,तर काही अनुभूतीच्या अखत्यारीत आहेत तर काही अनाकलनीय आहेत,अगम्य,काही गुढं दृश्य आहेत तर काही अदृश्य जसे महाकाल मंदिरात एके दिवशी बरोबर 2:45 रात्री कुणीतरी अदृश्य रूपात आरती करताना कॅमेऱ्यात पकडले गेले.यालाच आपण चमत्कार म्हणतो.ते अनाकलनीय आहेत.तर्कातीत आहेत.भौक्तीक ज्ञानविज्ञाना पलीकडचे आहेत.जसे उज्जैनचे कालभैरव सुरापान करतात, मंगलगिरीचे नरसिंह भगवान गुळपाणी प्राशन करतात.आमच्या पुण्याचा भुलेश्वर महादेव पेढ्याचा प्रसाद ग्रहण करतो.पाली येथे माघ चथुर्तीस रात्री बल्लाळेश्वर प्रसाद ग्रहण करतात.मी स्वतः हा अनुभव सातत्याने 11 वर्षे घेतलाय.आमच्या आळंदीस वारीची पालखी उठताना माऊलींचा पक्का कळस झुलत डोलत राहतो .काही क्षण त्या वेळेस जगातील सारे sattelite inactive होतात.अशी अनेक स्थाने आहेत.तसेच केरळ येथे चेंगनूर देवी आहे ती दर महिन्यास रजस्वला होते. तेथे सारे पुजारी या स्त्रियाच आहेत.
असच एक गुढं स्थान आहे आसाम येथील कामाख्या मंदिर.काली व त्रिपुर भैरवी नंतर अत्यंत शक्तशाली शक्तिस्थल शक्तीपीठ.
कामाख्याये वरदे देवी नीलपवर्तवासिनी | 
त्व देवी जगत माता योनिमुद्रे नमोस्तुते ||”
"कामाख्ये काम संपने कामेश्वरी हरि प्रिये, | 
“कामना देहि में नित्य कामेश्वरी नमोस्तुते ||”

अशा या निलपर्वतांवर स्थित असलेल्या जगनमाता सतीच्या योनीमुद्रारूपी वरदायिनी कामाख्या देवीस नमन करूया जी कामाख्या कामेश्वरी असून हरीहरांस प्रिय अशी आहे,जी काम संपन्न करून कामना पूर्ण करणारी आहे.
या कामाख्या पिठात योनी पूजनास आत्यंतिक महत्व प्राप्त आहे.भारत जगातील एकमेव देश आहे जेथे परमेश्वराशी चरा चरात पाहिले व पुजले जाते.सती च्या शक्तीपीठांमुळे तर हे सिद्ध होते की येथे गुद द्वार (नेपाळ गुह्येश्वरी)स्तन(पावागड) ,डोळे(नयना).पृष्ठभाग(पूरुरहृतिका) इतकेंच काय पण योनी पूजनही  शक्तीस्वरूप भक्ती स्वरूप व दैवी मानले जाते हे साऱ्या अतार्किक पण बुद्धिमान बुद्धिवादी,विशेषतः मासिक पाळी पालन न मानणार्या व याला मानसिक पाळी समजणाऱ्या ,सनातन विचारांवर ताशेरे ओढणाऱ्या इतर धर्मीय इ मानsick लोकांनी लक्षांत घ्यावे. 
मी तर माझ्या विद्यार्थ्याना नेहमी सांगतो की :
        काही जण नास्तिक,अईश्वरवादी असतात।
           काही धर्म एकेश्वरवादि आहेत।।
          काही जण अनेकेश्वर वादि असतात।
  पण आपण चरा चर ईश्वर पूजनकारणारे आहोत।।
     :शिवंजय डॉ संजय होनकळसे

SOME SAY THERE IS NO GOD.
SOME SAY THERE IS ONLY ONE GOD.
SOME FEEL THERE ARE MANY GODS
BUT ACTUALLY THERE US ONLY GOD
Shivanjay dr sanjay honkalse।

परमेश्वर चराचरात आहे हे हिरण्यकश्यपुस मान्य नव्हते पण भक्त प्रल्हादाने खांबातून नरसिंह उत्पत्तीने या घटनेतून सिद्ध केले व हां अनुभव व अनुभूतिच आपल्यां या शक्ति पूजा साध्य करवतात. 
स्त्रीची योनि ही परमपूजनीयच आहे कारण ती जीवन स्त्रोता आहे, इथे तर जगत स्त्रोता महादेवी महामाया हिची योनि व त्यांचे पूजन होते. हे जगत जननी स्थान आहे.खरी जन्मभूमी आहे. जीवनाचा अर्थ ,मतितार्थच यात दडलेला आहे.एवढेंच काय पण जीवन उद्धाराच उद्धारक रहस्यही यातच आहे. हे कुणाला खरं नाही वाटणार,कदाचित पटणार ही नाही की योनि हे ब्रह्म स्थान आहेव स्त्रीच्या बाबतीत  हे कुंडलिंनि"स्वरूपा"चे प्रथम स्थान आहे.योनितच स्त्रीयांचे सुषुम्नाद्वार असते तसा उल्लेखच कामाख्या अष्टोत्तरशत नामतील 74 वे नाम करते :
              ॐ सुषुम्ना मध्यकायै नमः
म्हणजेच योनिमार्ग हा मोक्ष मार्ग आहे ,सिद्धत्व प्राप्तिचा मार्ग आहे आणि आता सुज्ञांच्या लक्षान्त येईल की यामुळे च कामाख्या येथे भाउक भाविक,भक्त साधक,मुमुक्षु ,संत, महंत ,योगी जोगी भोगी,तांत्रिक,मांत्रिक,यांत्रिक,शाक्त, गाणपत्य,वैष्णस्व,सौर,शैव, घोरी ,अघोरी,एवढंच नव्हे सिद्ध ,अवधूत यांचा ताता लागलेला असतो.कारण जर स्त्रीची योनिजर पूजनीय तर ही तर महामाया जगन नायिका ,चिदविलासिनी महाजगदम्बेची जगत जननीचे जननेंद्रीय महा मुद्रा ,जननेन्द्रिय योनिलिंग रूप स्थित आहे .पण हिचे मणिपुर ,अनाहत ,विशुद्धिव आज्ञां चक्रांवरहि प्रभाव आहे पहा 69 ते 74 पर्यन्त कामाख्या नाम

ॐ श्री मणिपूरसमासीनायै नमः ।
ॐ श्री अनाहताब्जवासिन्यै नमः । ७०
ॐ श्री विशुद्धिचक्रनिलयायै नमः ।
ॐ श्री आज्ञापद्मनिवासिन्यै नमः ।
ॐ श्री अष्टत्रिंशत्कलामूर्त्यै नमः ।
ॐ श्री सुषुम्नाद्वारमध्यकायै नमः ।

या महायोनित ,योनिमुद्रेत दश महाविद्यास्थित आहेत. 
योनिमुले वसेत गौरी योन्‍यान्‍चनगनंदिनी । 
काली तारा योनि चिन्‍हे कुंन्‍तले छिन्‍नमस्‍तका ।  बगलामुखी च मातंगी वसेत योनि स‍मीपत: । 
योनिगर्ते महालक्ष्‍मी : षोडशी भुवनेश्‍वरी ।  
योनी पुजनमात्रेण शक्तिपूजा भवेद ध्रुवम । 
पक्ष्‍यादी बलिजातीनां रुधिरेश्‍च प्रपूजयेत 
योनि योनि योनीति यो व्‍यक्ति जपकाले च साधक: 
:अर्थात योनि मुळात गौरी निवासते,योनि प्रदेशांत पार्वती वसते,योनि चक्रामध्ये काली व तारा,योनि कुण्डलान्त छिन्नमस्ता तर योनि जवळ बगलामुखी व मातंगी वास करतात,योनि गर्भात महालक्ष्मी, षोडशी व भुवनेश्वरी राहतात.
म्हणूनच योनि व योनीपीठ याची पूजा व अनुष्‍ठान  ही आद्यशक्‍तीचिच पूजा आहे व  सर्व वांछित फल व मुक्ति प्रदायिनी आहे .शंकर भगवान पार्वतीस म्हणतात की या योनिपुजाणामुळे शिवत्व प्राप्त होते मलाही म्हणजे शिवशंकरास योनि पूजनानेच शिवत्व प्राप्त झाले आहे. राधेच्या योनिची पूजा करूनच  हे पार्वती कृष्णाने कृष्णत्व प्राप्त केल आहे
हे पार्वती, रामानेदेखिल सितेच्या योनिची पूजन करूनच रावणाच्या वंश विच्छेद केला.
श्लोक:
तस्‍य पूजनमात्रेण शिवोहहं श्रृणु पार्वति ।  
राधायोनिं पूजयित्‍वा कृष्‍ण: कृष्‍णत्‍वभागत:।  
श्री रामो जानकीना: सीतायोनि प्रपूजक: । 
रावणं सकुलं हत्‍वा पुनरागत्‍व सुन्‍दरि ।  
अयोध्‍या नगरीं रम्‍यां वसतिं कृतवान स्‍वयंम् ।  
समुद्रस्‍य महाविष्‍णू बेलायां वटमुलत :|

आशा या योनि पूजनास कसलेही बंधन,मन्त्र तंत्र स्नान इ गरज  नाही हेही भगवान् सांगतात.
अशी ही कामाख्या माई  एकमेकाद्वितीय योनि पूजा जी सर्व जगतात एकमेकाद्वितीय असून  भारताची जगास आध्यात्मिक देन आहे.(आणि म्हणूनच विश्वभरातून अनेकानेक परदेशी साधक पण इथे येतात.)बाकि सर्व ठिकाणी योनि ही तुच्छ वा फ़क्त आनंद उपभोगाचे साधन:an instrument of pleasure च मानले जाते. प्लेझर होय ब्रह्मानंदाची झांकी आहे पै
पण फक्त pleasurach ही खरं तर मानsickता (मानवी सिकनेस) आहे ,नाही का?
हिच्या अस्तित्वाच ,जाणिवेचे, जाग्रति व शक्ति स्त्रोताच   आणखिन एक लक्षण म्हणजे वार्षिक अम्बुबाची पर्व जे आषाढात येते.
अंबुबाची पर्व 22 ला रात्री सुरु झाले देवीचे पट बंद झाले. २२ जून ते 26 जून पर्यंत हे पर्व या वर्षी आहे.जगातील सर्व तांत्रिक,मांत्रिक ,सिद्ध पुरुष ,साधक,भक्तगण,किन्नर
यांसाठी अंबुबाची पर्व हा एक अमृत कुंभ योग असतो.या काळात देवीची योनी मुद्रा रजस्वला होते.सत्ययुगात हे पर्व 16 वर्षांतून एकदा ,द्वापरात12 वर्षात एकदा,त्रेता युगात 7 वर्षात एकदा तर या युगात वर्षातून एकदा येते.

योनि मात्र शरीराय कुंजवासिनि कामदा।
रजोस्वला महातेजा कामाक्षी ध्येताम सदा।।

या तीन दिवस चार रात्री मंदिराच्या पटल आपोआप बंद होतात,देवीचे दर्शन स्पर्श निषेध असतो.हे आज तागायत सुरु आहे.पहा ! विशेषतः स्त्रियांनी हे लक्षात घ्यावे कि हे दिवस फक्त आरामाची असतात,स्त्री ही 12 महिने 24 तास विना casual leave राबत असते या दिवसांत तिला आरामाची गरज असते व ती शरीरात नको असलेले गर्भ धारणासाठी न वापरात आलेले waste product घाण,आग सोडत असते त्याचे परिणाम  वातावरणावर फार निगेटिव्ह असतात म्हणून स्पर्श वर्जित असतो.पण आज आपण विशेषतः स्त्रियाच यावर स्वतःची याबाबत नकारात्मक विटंबना करतात व करवतात.
आपण जसे मलमूत्र विसर्जन एकांतात करतो तासांक्सह हा एकांतवास आहे चार दिवसांचा .

आपण जसे मोबाइल वा संगणक याला क्लीन करतो कारण त्यात virus असतो व तो तसाच ठेवलातर ते खराब होते व नुकसान करते वा ते साधन हॅक होते व वाया जाते .तसच हे आहे.हे अत्यावश्यक सफाई अभियान असते हे लक्षांत घ्यावे.हा काही जण या बाबत घृणास्पद वर्तणूक करतात ते अयोग्य आहे .पण आपल्याला आश्चर्य वाटेल वा खोटे वाटेल पण नद्याही कर्क व सिंह संक्रातीस रजस्वला होतात असे निर्णयसिन्धु (कृष्णशास्त्री नवरे  रुपांतरीत मराठी यात110पान )सांगते.याचाही विचार भूगर्भशास्त्रज्ञ व जलतज्ज्ञ यांनी करावा.दुर्दैवाने या सर्व बाबींचा शास्त्रीय विचार न कारतांच याला "मासिक नव्हे मानसिक पाळी" असे संबोधणाऱ्या स्त्रियाच आहेत.खरंच स्त्रीच स्त्रीची दुश्मन असते हे खरे काय?खरंतर शिवता शिवत हा शास्त्रीय विषय सोडता योनी व अंबुपर्वाचा काळ हा साधने साठी व शक्ती पूजा या साठी अत्यंत उपयुक्त असतो .

.असो,हा एक वेगळा " नारी शास्त्रा"चा भाग आहे ,वेगळ्या लेखाचा विषय आहे ,मी काही यातला तज्ञ नाही   पण जे जे आपणासी ठावे ते ते सकलासी सांगावे या विचाराने एकदा या विषयावर 2014 साली एका विद्यार्थिनीच्या प्रश्नाखातर लिहल,FB वर पण टाकलं होते आता ते मिळत नाहीये )परमात्म्याने  परत विस्तारपूर्वक  लिहवून घ्यावा, याविचाराने विस्तारभय व विषयांतर टाळून इथेच हा विषय संपवून आपल्या अंबुपर्वाबद्द्ल पुढे जाऊ .
तर विषय रजस्वला असता कामाख्या पट आपोआप बंद होतात.
या काळात योनी पूजा हि अत्यंत सिद्ध होणारी असते.तर हे पौराणिक सत्य आहे की या अंबुबाची पर्वात आई भगवती हि रजस्वला होते  व तिची हि पाळी मानसिक नसतेव तिचे द्वार पटल  आपोआप बंद होतात.  तिचे दर्शन व स्पर्श वर्ज्य होतो.या वेळी गर्भगृहात स्थित असलेली योनी मुद्रा,योनी लिंगातुन तीन दिवस सतत जलप्रवाहाच्या जागी रक्त प्रवाहित होते आपसूकच .हा या कलिकाळा तील एक अद्भुत व विलक्षण साक्षात्कार आहे.
कामाख्या तंत्रानुसार महा कुंभमेळा इतकच महत्व आदिशक्ती कामाख्याच्या अंबुपर्व यांस आहे. येथे विविध अलौकिक शक्तींच प्रकटन येऊन सारा परिसर भारून गेलेला असतो.एरवी संध्याकाळी ६ वाजता मंदिर बंद होते व परिसरांत शुकशुकाट असतो पण या पर्वात रात्रं दिवस मंदिर व दर्शन बंद असूनही प्रचंड गर्दी असते कारण ही ऊर्जा.येथे आल्यावर हि भारलेली ऊर्जा सुज्ञास जाणव ल्या वाचून राहत नाहीव ज्यास जाणवत नाही तो अभागा असं म्हणता येणार नाही कारण तो येथे आला हेंच त्याच भाग्य,मी तर स्वप्नातही विचार नव्हता केला की मी येथे अशा पर्वात येऊ शकेल. पण जगननियंत्या जगतशक्ती ने मला सारे कुंभ मेळे ,अगदी शाही स्नानासह तेही दोनदोन वेळा,,गंगासागर मेळा दोनदा,पुष्कर मेळा ,नैमीशारण्य सोमवती आमावस्या मेळा 3 वेळा, पापनाशनं मेळा, मदुराई उत्सव,गुरुवायूर उत्सव, तुकाराम बीजोत्सव,नर्मदा जयंती उत्सव असे अनेक प्रचंड गर्दी व त्याहून प्रचंड ऊर्जेची शक्ति वा सिद्धस्थले करविली.अशा या अलौकिक शक्तीचंअर्जन पारंगत साधक पुरश्चरण ,अनुष्ठान ,जागरण करुन स्थिर करत असतात.
अशी मान्यता आहे की या तीन दिवसात ब्रह्मपुत्राच पाणी लालिमा पकडते ,मी काही ते स्वतः गर्दीमुळे जाऊन पाहू शकलो नाही पण येथील जागरण या वृत्तपत्रात तशी बातमी वाचली.
चवथ्या दिवशी सकाळी पट उघड़तात त्यावेळी दर्शनासाठी
दोन दिवस आधीच भाविक रात्रदिवस नम्बर लाऊन राहतात.देवीचे पट उघडल्यावर पूजा अर्चना होम,बलिदान केले जातात.
आम्ही येथे असतांना जवळ जवळ 12 रेडे व अनेक बकऱ्यांचे बळीची लाइन लागली होती,एरवी पण दुपारी 12 वाजे पर्यन्त  बळी दिले जातात. देवीस बळी देण्याची प्रथा पूर्वापर चालत आलिय. 
मला मानवी ,भूतदया ,नैतिक, वैचारिक पातळीवर बळी प्रथा(पशु वा नर बळी )मान्य नाही म्हणून मी कधीच याचा  विचार करण्याच्या भानगडीत पडलो नाही पण कामाख्यास असताना मला  काही जणां कडून करण्यात विचारणा आली की देवीस पशु बळी कसा मांन्य वा चालतो? म्हणून मग मला अल्पमतीस जे लक्षांत आले ते लिहितो.पण त्या आधी आणखिन एक मानवी ,व बौद्धिक पातळीवर विचार आला तो मांडतो की बळीला ऑब्जेक्शन घेणारे बहुतेक जण मांसाहारी पण असतात,आजकाल तर ब्राह्मण पण खातात(तरी बरे आहे सध्या वेजचा रिवर्स ट्रेण्ड जगभर सुरु झालाय पण आपण  चर्चिलच्या भाषेत 100 वर्षे जगाच्या मगे असतों ना!)आजकाल ब्राह्मणच  दुसऱ्या ब्राह्मणास म्हणतात की " खात नाहीस तर तू कसला ब्राह्मण"(अर्थात माझ्या जवळील  व माहितीतिल सात्विक ब्राह्मण ,यांची माफ़ी मागुन, यांना वगळता) यांना पशुंचे मांस मच्छी चालते त्यासाठी केलेली हत्या चालते पण गोंधळात वा देवीस दिलेल्या बळीस व त्याच्या मांस भक्षणास विरोध कां हे कळत नाही .(चौकशी करता कळले की येथे बळी दिलेले रेड्याचं मास हे ब्राह्मपुत्रेच्या पात्रात सोडतात व ते मांस त्या नदीतील जलचर  खातात.असाचं गैरसमज त्या महाकालच्या भस्मबाबत आहे.)
आपलं दुर्दैव हे आहे कि एकीकडे आपण बकरीचे हजारो लाखोंनी बळी दिले जातात, नुसत्या मुंबईतील रक्त धुण्यासाठी लाखो लिटर पाणी वाया जाते ,करोडेचे फटाके व रोषणाई नाताळ व ईद ला होते तिथे आपण काही बोलत नाही,त्यांच्या धर्म भावना दुखवायच्या नाही हि सेकुलर वृत्ती पण मिशनरीज ,व इस्लामिक  पद्धशिरपणे अगदी मीडिया विकून व स्वतःचा मीडिया तयार करून आपली विरुद्ध बातम्या पसरवतात आपण दुजोरा देतो.यालाच मराठीत स्यूडो सेक्यूल्यारिजम {इंग्रजीत दाम्भिक धर्मनिरपेक्षता}म्हणतात.(उदा इथे एकाने ज्याच्यावर मिशनरी  प्रभावाखालील हिंदूंच म्हणतोय,मेडियामार्फत,कि आसामला बुक्स books ची गरज आहे लाल पाणी व लालमातीची नाही व पावसाळ्यात माती ओली होते म्हणून कामाख्या लाल पाणी स्रवते.आता योनिअंबु उत्सव व पुस्तकांचा काय संबंध व माती ते चारच दिवस कशी ओली व लाल होते इतर दिवशी का नाही ,पण हे ऐकून आपण दुजोरा देतो)तर आपणच आपल्या धर्म व प्रथे विरुद्ध गरळ ओकतो ,म्हणून आपण हि परंपरा आहे सनातन प्रथा आहे आपले श्रद्धा अधिष्ठान आहे म्हणून निदान शांत राहावे ऐसे मला मनः पूर्वक वाटते व तैसे मी आपणास विनंन्ति करतो.
असो ,आता तर्कशास्त्रीय विवेचन करू व मला खात्री आहे आपले साधक व सुज्ञ वाचक नारायणांच्या पचनी पडेल.
काही बाबी या मानवी विचारां पलीकडे असतात, मानवी तर्का पलीकडे असतात,त्या गुढ़ असतात वा बुद्धिगम्य नसतात.
बाली प्रथा हि जगबगर आहे कारण बळी हां एक जीवनचक्राचा व सृष्टिचक्राचा नियम आहे व आपण यांस अपवाद नाही.म्हणजेंच आपणही या ना त्या प्रकार बळी देत असतो व बळीचे बकरे होत असतो.पहा आपण दिव्यानी दिवा पेटवतो तसेच जीवावर जीव जगतो, चालतो.देवीस दिलेला बळी त्या  स्थानाची ऊर्जा ,शक्ती स्पंदनं वाढवतो.हजारो लाखों संत साधू,महंत,योगी, भाविक भक्त येथे येऊन ऊर्जा संपादन करतात.हे आपल्यास नको आहे का?
तसेंच लहान माशास मोठा मासा गिळतो व जीवन जगतो म्हणजेच छोट्याच्या जीव बळी वर मोठा मासा जगतो ,मगर त्या माशास खाते.तर जीवावर जीव जगतो.हा बळीच आहे. आपण आपले कामाचे तास बळी देतो व जगण्यासाठी पैसे कमावतो.आपण दाणे खातो व पोट भरतो .दाण्याचा ,वनस्पती धान्य हे पण जीवच,बळी
देतो.आपण नारळ फोडतो तोही बळीच. तर हे सृष्टीचक्र आहे ,जीवचक्र आहे.ज्याची जशी वृत्ती ,प्रवृत्ती तशी त्याच्या बळीची पद्धत .आपण सात्विक प्रवृत्तीचे म्हणून आपणास हि तामसिक प्रवृत्ती नको वाटते एवढेंच.करणारे तर नरबळी पण देतात. 
थोडक्यात नारळ फोडून वा लिंबू देवास वाहूनही,(साऊथ इंडियन देवास लिंबाची माळ वाहतात,इथे कामाख्यास कबुतर वाहतात, व बकरी ,रेड्याचं बळी देतात,) ऊर्जा , स्पंदनं निर्माण होतात.थोडक्यात जशी ज्याची वृत्ती तशी त्याची प्रवृत्ती हेंचं जीवन आहे.भाव तोचि देव ,आपण नारळ ,केळी वाहतो कारण आपण सात्विक भाव पोसतो.
थोडक्यात बळी हा त्याग आहे ,(Sacrifice),त्याग हेंच जीवन आहे.
मी पामररतर देवीस साधा नारळ काय फुल पण वाहू  (बळी देऊ )शकलो नाही .फक्त हि लेखन सेवा तुमच्या मार्फत तीच्या चरणी वाहतो.
असो तर अशा या जननी जन्मभूमीत जेथे जनन इंद्रिय आहे तेही महामाया भगवती हिचे  चरणी मला या पर्वाचा लाभ मिळाला व या भन्नाट लिखाणातून करण्याची भगवतीची सेवा करण्याची सेवा साधक वाचक नारायणा पर्यंत पोहचवण्याचे बुद्धी व सामर्थ्य जीने दिले तिच्या चरणी हे सेवा,   श्री मनोहार निकम, श्री नाथ बाबा व श्रीमाती मालन देशमाने ज्यांच्यामुळे,ज्यांच्या बरोबर व ज्यांना घेऊन येथे येऊ शकलो त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून ,वाहतो व अल्प विराम घेतो.
महामाया आदिशक्ती परमेश्वरी चरणार विंदार्पर्ण मस्तु , उदोयोस्तु,उदयोस्तु,उदयोस्तु।।
शिवंजय डॉ संजय होनकळसे।©
drsanjayhonkalse@gmail.com
drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com

https://m.facebook.com/groups/1981579705403075?view=permalink&id=2236744109886632
〰️〰️🌼〰️〰️🌼〰️〰️🌼〰️〰️🌼〰️〰️🌼〰️

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया