कामाख्या भाग 2
कामाख्या भाग 2©
2 :(भाग एक Ref http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2013/07/drsanjayhonkalsegmailcom.html)
©
कामाख्या: भारताच्या ईशान्यद्वार मानल्या गेलेल्या प्रदेशातील दोन तट/सीमा रक्षकांपैकी एक शक्तीस्थळ. काली, त्रिपुरसुंदरी व कामाख्या हि तीन शक्तीशाली महामाया महादेवी होत.त्यापैकी त्रिपुरा व कामाख्या या ईशान्य भारताच्या प्रवेश द्वारी आहेत.
कामाख्या मंदिर दिसपूर या आसामच्या राजधानी पासून गुवाहाटीकडून ८ किलोमीटर दूर कामाख्या यांचं नावाच्या गावी आहे.कामाख्या स्टेशनपासून १० किलोमीटर दूर नीलाचल पव॑त आहे त्यावर मंदिर स्थित आहे.हे मंदिर शिवपत्नी देवी सतीच मंदिर आहे याचं महत्तांत्रिक महत्व आहे.प्राचीनकाळापासून,अगदी सत्य युगांपासून,हे कामाख्यातीर्थ तंत्र विविध कारणां साठी प्रसिद्ध आहे व हाचं या लेखाचा व मुख्यत्वे पुढील लेखाचा विषय आहे.
कामाख्याये वरदे देवी नीलपवर्तवासिनी |
त्वं देवी जगत माता योनिमुद्रे नमोस्तुते ||
कामाख्यास या आधी तीन वेळा दर्शन लाभ मिळाला. 2012 साली अगदी धावती घाईत भेंट झाली.(Ref http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2013/07/drsanjayhonkalsegmailcom.html)
नंतर एप्रिल मध्ये 2018 ला दोन वेळा 3 दिवस व दोन दिवस राहिलो अगदी मनःपूर्वक.असं म्हणतात की कामाख्या आईसाहेब परत बोवून घेतात अश्या या कामाख्याईचा वार्षिक उत्सव अंबुबाची उत्सवाला येण्याची इच्छा केली ,कठीण होते पण आईसाहेबांनी अगदी बोलावून घेण्याची कृपा केली हे केवढे या कुचकाम्याचे भाग्य.हे आमचे मित्र श्री मनोहर निकम व गुरुभाई नाथबाबा यांच्यामुळे फल रूप झाले .निकम सर वाडीला आमच्या यज्ञास आले व त्यांनी विचारले कामाख्यास येता का? खरे तर यांचं वेळी मला वार्षिक भागवत साप्ताहासाठी आमचे गुणी व सुप्रसिद्ध मित्रद्वय ऍक्युपंक्चर स्पेशालिस्ट डॉ श्री अवधूत शेट्ये व डॉ नंदकुमार नाखरे जाणे नक्की झाले होते पण नंदकुमार तेथेंच होते त्यांची परवानगी घेतली ,खरे तर त्यांनी मोठ्या मनाने ती दिली व आज मी येथे आहे .
55 तास प्रवास करून येथे 24 जूनला पोहोचलो. स्टेशनपासूनच गर्दीची चाहूल लागली पण सुरुवातीस चांगल नियमन आहे वाटले पण बाहेर आल्यावर गर्दी हाता बाहेर होती मंदिरासाठी बसेस उभ्या होत्या पण हलत नव्हत्या . थोडी वाट बघून आम्ही 11 नंबरची गाडी सुरु केली. रात्री 12:30 ला मंदिरात चालत पोहोचलो तर राहण्याची व्यवस्था हाती तो निकूल याने हात वर केले ,सारे नेट वर्क जाम झालेले ,मुश्किलीने निकम व येथील पंडित भुदेव यांना संपर्क करून एक रूम मिळाली व 3 वाजता नाथ बाबा पोहचले मग झोपलो.
कामाख्या म्हणजे भक्ती,श्रद्धा व योनी तंत्र ,सावर विद्या याचा जिवंत व ज्वलंत संगम.
घमंडी राक्षसराज नरकासुर यांच्या वधासंबंधी कामाख्या देवी ची एक आख्यायिका आहे .हा नरकासुर कामाख्या माईवर फिदा झाला होता.तिला त्याने त्याच्याशी विवाहासाठी हट्ट केला.माईने त्याला होकार देताना अट घातली कि जर त्याने एका रात्रीत चारी बाजूला जर सोपं पथ व एक निवारा गृह बांधले तर ती त्याच्याशी लग्न करेल.पण तसे नाही करता आले तर मात्र त्याचा मृत्यू नक्की होईल.नरकासुर याने गर्वाने भारित रस्ता तयार केला व विश्राम धाम बांधण्यास लागला.पण
महामाया कामाख्यामाईने एका मायावी कोंबड्याचं रूप घेऊन रात्रीच उगवतीची बांग दिली.नरकासुराच्या हे लक्षांत आल्यावर त्याने रागाने मारण्यासाठी त्या कुक्कुटाचा पाठलाग केलाव ब्रह्मपुत्रेच्या पलीकडील किनाऱ्यापर्यंत जाऊन त्याचा वध केला ती जागा आजहि `कुक्टाचकि' म्हणून प्रसिद्ध आहे. तो पर्यंत पहाट झाली होती व आई भागवतीच्या मायेमुळे विष्णूभगवंतांनी नरकअसुराचा वध केला व दिवाळीची निंव ठेवली.भगवती की माया से भगवान विष्णु ने नरकासुर असुर का वध कर दिया। यानंतर नरकासुर पुत्र भगदत्त हा कामरूपचा राजा झाला,व त्यानंतर भगदत्त चा वंश लुप्त झाला व कामरूप या राज्याचे छोटे छोटे तुकडे होऊन सामंत राजे इथंचे शासक झाले .
यानंतर नरकासुर यांच्या पाप कृत्यां मुळे व काही मुनींच्या शापामुळे माई कामाख्या अप्रगट झाली व कामदेवामुळे त्यावेळचे प्रतिष्ठित व प्रतिस्थापित कामाख्या मंदिर ध्वन्सप्राय झाले.
या कामदेवानेच येथील शैलदीप (ज्याला मध्यांचाल म्हणून पण ओळखले जाते),जे तंत्र साधनेचे सर्वोच्य सिध्दपीठ आहे,नावाच्या टापूवर समाधिस्त शंकरास आपल्या मदन बाणाने घायाळ केले होते. पण नंतर समधीतून जागृत झाल्यावर शिवशंकराने कामदेवास भस्म रुप केले मग भगवती कामाख्या देवीच्या योनीमुद्रेच्या अर्चनेमुळेच कामदेव यांस जीवनदान मिळाले म्हणून मग आपण कामदेव याचा मदन बाण आपण अदृश्य समजतो.म्हणून या सर्व भागास "कामरूप"म्हणून ओळखले जाते.व ज्या टापू वर महादेव समाधिस्त होते तो टापू भस्मानचाल म्हणून ही ओळखला जाऊ लागला .हा येथे गुवाहतीस ब्रह्मपुत्रेच्या मध्यावर आहे व कामख्या पीठापेक्षाही पुरातन आहे व त्यास आज उमानन्द टापू म्हणूनही ओळखले जाते व तो आज जगातील सर्वात छोटा मानवी वस्ती असंलेला टापू आहे त्याविषयी हि लिखाण केले आहे.(Ref http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2018/04/httpsm.html)या उमानंदचत टापू दर्शना नंतरच कामाख्या दर्शन सफल होतेहे लक्षांत घेणे महत्वाचे.
असं हे कामाख्या तिर्थ सर्वोच्य कौमारी तीर्थ आहे व त्या दृष्टीने कन्या पूजनासाठी पण महत्वाचे मानले जाते. येथे तंत्र मंत्र ,सावरतंत्र साधना अघोरी साधना ,भक्ती, श्रद्धा यांचं प्रसिद्ध केन्द्र आहे.
येथील अंबु बाची पर्व या सर्व दृष्टीने अत्यंतिक महत्वाचे आहे त्या अंबु बाची उत्सवासाठी मला देवीने येथे पाचारण करवले. देवी येथे एकदा आल्यास परत बोलावते याची प्रचीती मला आली हेही नसे थोडके. या अंबुबाची उत्सवाची महत्व ,व महत्ता ,महानता, त्याचा आपल्या जीवनातील विशेषता स्त्री जीवनातील महत्व समज, गैर समज यावर नेहमी सारखेच मनोभावें विचार मानण्याचा प्रयत्न करूया .मी काही यातील तज्ञ नाही पण पटले तर आईची कृपा प्रेरणा व चूक असेल तर ती सर्वस्वी माझी असेल या विचाराने या भागाला पूर्णविराम व लिखाणास अल्पविराम देतो।
ओम् नमो भगवती कामाख्या योनीमुद्राये नमः
इदं न मम।
शिवंजय डॉ संजय होनकळसे।©
drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot .com
Comments
Post a Comment