संतांची निरामय भूमी बेळगाव :
संतांची निरामय भूमी बेळगाव :
शिवंजय डॉ संजय ©
तुझ्या लीलेने तरुवरती फुलते फुल।
तुझ्या कृपेने घरी दारी खेळती मूलं।।
तुझी दृष्टी म्हणुनि रोज पेटती चूल।
क्षमा करावी गुरु होता हातून भूल।।
खरंच त्यांच्या कृपेनेच सारे चाललेय हेंच खरें.पण मायेने बुद्धीवर साठवलेल्या मळभामुळे बुद्धी अहं निर्माण करते व बुद्धि वादी मानव "मी कर्ता" याभ्रमात विहार करतो.आधुनिक मराठीत यालाच ' I' MANIA असे म्हणतात.
'माया आपल्यावर स्वार न होऊ देता जर मानव मायेवर स्वार झाला तर आणि तरच आपल्या हातून भूल झाली अशी क्षमा याचना गुरुकडे करु शकतो.
बघाना!नाहीतर बिकट परिस्थिती व illhealth असूनही महिनाभर North-Eastआसाम ,अरुणाचल अगदी चीन,ब्रह्मदेश बॉर्डरवरील परशुराम कुंड व मग केदारनाथ , गुप्तकाशी,हरिद्वार,ऋषिकेश करून 28 मे 2018स आल्यावर लगेचच दत्त यागाच्या तयारीस लागलो.
त्यानिमित्ताने कोल्हापुरास जाऊन आईसाहेबांना आव्हानाचे श्रीफळ ठेवले व बेळगावला आलो. बेळगाव अगदी लहानपणापासून परिचयाचे.मला तेथील विभागांची माहिती नाही पण हुबळी निवासी श्री सिद्धारुढ स्वामींची गुरूदीक्षे चा वारसा आम्हाला आमच्या पूज्य मातोश्रींकडून आल्याने अगदी 60 च्या दशकांत कलावती आईसाहेबांच्या दर्शनाचा लाभ अनेकदा मिळाला होता म्हणून दरवर्षीच्या हुबळी वारीत बेळगाव ला जाणे होत असे.त्यावेळी मुंबई पुणे ब्रॉडगेज मग पुणे मिरज न्यारो गेज ने येऊन मग मिरज बंगलोर रेल्वेने आम्ही द्राविडी प्रवास करीत असू.
त्यावेळचे बेळगाव शांत ,सुंदर हवेशीर होते,आजही आहे पण फरक जाणवतो,तांबडी,काळी माती आता खचितच दिसते त्यावर सिमेंटचं आवरण चढलंय.आता गर्दी ,गाड्या,उन , ट्राफिक यांची वर्दळ फार आहे.अर्थात तरीही बेळगाव छानच पण नव्याने येणाऱ्यास.तर कदाचित चार वर्षांनी आज मी बेळगावी येत होतो.
खरेतर मार्च महिन्यातच बेळगावला आमचे गुरुभाई नाथबाबा येण्यास सांगत होते. दत्तभक्त किरणस्वामी यांच्या मठाचा स्थापना सोहळा होता पण इच्छा असूनही तब्बेतीच्या कारणासाठी व एप्रिलच्या परशुरामकुंड तयारीसाठी नाथबाबांना नाराज केले.
पण योग फळायचाच होता तोही आमच्या नाथ बाबा ,विष्णू गिरी,सोहोनी व पोतदार, pk आळशी या सावंगाड्यांसह इ बरोबरच.
आम्ही सात साधक कोल्हापूरहून गाडी करून दुपारी 12 वाजता बेळगावच्या श्री काणे महाराजां च्या मठात पोहीचलो.12 :३० झाल्यानंतरही मठातील विद्याताईंनी सुंदर खिचडी आमटी व भाजी बनवून उदर यज्ञाच्या आहुतीची व्यवस्था केली.
श्री श्रीपाद काणे माऊलींचा जन्म पौष वद्य पंचमी 23 जानेवारी 1895 ला हेरे गावी झाला.बालपणीच गोंदवलेकर महाराजांचा दर्शनाचा लाभ मिळाला,मोठया भावाच्या अपमृत्यूमुळे अंगावर सारी जबाबदारी आल्याने शिक्षणात अडचणी आल्या. सर्वे ऑफिस मध्ये सेवा कार्य केले.तसेंच डेअरी ऑफिस मध्ये त्यांनी काम केले .
दामोदर पंत कुरोलीकर महाराजांनी त्यांना दिक्षा दिली.सज्जनगडावर त्यांना श्रीधर स्वामींची भेंट घडली.प पु योगानंदकडून त्यांना पिंडी ते ब्रह्मानंदी साक्षात्कार झाला.केंड गावचे नारायण महाराज यांचीही कृपा त्यांना लाभली.
३१ ऑक्टोबर 1977 ला त्यांनी निर्वाण समाधी घेतली.
त्यांचे घर आता मठांत रुपांतरीत केले गेलय, ट्रस्ट च्या माध्यमातून नियमितसेवा सुरु आहेत.त्यांच्या या मठांतच आम्ही मुक्कामास राहिलो.
संध्याकाळी मग आम्ही श्री किरण स्वामींनी तीन वर्षे सतत अभ्यास व ध्यास घेऊन ,आराखडा बनवून स्थापन केलेल्या सुंदर अशा दत्त मंदिरांत गेलो.यांच मंदिराच्या उदघाटन सोहळ्यास मला यावयाचे होते, मार्च महिन्यात.पण आता आल्यामुळे बरेंच झाले. किरणस्वामींशी मनमोकळ्या गप्पा गुजगोष्टी करता आल्या.
किरण स्वामी हे दत्त भक्त त्यांचे पूर्वज आजी आजोबा हे स्वामी समर्थांचे कृपांकीत ,समर्थांच्या पादुका व मणी त्यांच्या कडे आहेत.
किरण स्वामींना लहानपणा पासूनच दत्तभक्तीची ओढ आहे ,त्यांना दत्त प्रभूंचे दृष्टांत होतात. त्यांना त्यादृष्टीने मंदिर बांधावे हे मनी आले व त्यांनी अत्यंत मेहनतीने व अभ्यासपूर्वक सातत्य ठेवून स्वकष्टाने अयाचित वृत्तीने सुंदर शास्त्रोक्त असे दत्त मंदिर बांधले आहे. त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणाहून सामग्री जमा करून स्वतः लक्ष ठेवून तयारी परिपूर्ण केली. बांधकामात कुठेही लोखंड वापरले नाही ,पिलर नाहीत.अष्टदिशाच्या स्वामींचे प्रतिनिधित्व म्हणून अष्टकोनी मंदिर बांधले.
.त्यांचं हे मंदिर म्हणजे वास्तू चे व मंदिर शास्त्राचे सुंदर आधुनिक उदाहरण आहे. आपल्याकडे टेम्पलसायन्स =मंदीर शास्त्रा धारीतच मंदिरे ,मुख्यत्वे करून सर्व पुरातन मंदिरे जसे केदारनाथ, रामेश्वर,तिरुअनंत पुरम अशा सारखी शक्तीस्थाने हि पुर्णतः मंदीर शास्त्राच्या आधारे बांधली गेलीयेत.अगदी विहीर ,स्वयंपाक गृह, गर्भगृह , सारेच वास्तूचा परिणाम देणारे आहे. आमचे पुण्याच्या फरगुसनचे देगलूरकर साहेब यांचा याबाबत गाढ अभ्यास आहे व त्यांचे ज्ञान व कार्य सर्वश्रुत व जग प्रसिद्ध आहे. अशांचं एका तामिळ विद्वानांचे सहाय्य किरणस्वामींनी घेतलंय.
एकंदरीत मंदिरशास्त्रानुसार पूर्णतः 18 महिन्यांचे गर्भ संस्कार करून बांधले आहे.आधुनिक काळांतील काही उत्कृष्ट मंदिरात,जसे पुण्यातील सहसत्रबुद्धेचं मंदिर ,शेगावच्या गजानन महाराजांचे मंदिर,गणले जाईल असेंच हे भेंट देण्याजोगे व जागेचा पूर्ण व चांगला उपयोग करून,अष्टदिशा,नवग्रह,देव सेनापती कार्तिकेय,इ.
कुठंही रेती वापरली नाहीये.रांगोळी व सिमेंट वापरलय.
बेळगाव ला नेहमीच कलावती आई साहेबांच्या हरी मंदिरात दर्शनासाठीच आलोय.आईसाहेब या सिद्धारुढ स्वामीमहाराज यांच्या शिष्या.60 च्या दशकांत अनेकवार त्यांच्या दर्शन सेवेचा लाभ झालाय.त्यांचा जीवन वृत्तांत अत्यंत विलक्षणअसाच आहे. अत्यंत विपरीत आयुष्य त्यांचं पण सतत अध्यात्म विकासाचा ध्यास,अत्यंत उच्च्कोटीची भक्ती साधना त्यांची.
त्यांनी महाराजांचे कीर्ती आणखी न उच्च स्तरावर नेली. मी माझ्या व्यवस्थापनाच्या व व्यक्तिमत्व विकासाच्या वर्गात नेहमी चांगला शिष्य कसा असावा याची चर्चासत्र ठेवीत असे. तेंव्हा नेहमी म्हणत असे की खरा शिष्य तो जो आपल्या गुरूंच नाव किर्तीमान करतो,जस विवेकानंद.विवेकानंद खरतर जास्त प्रसिद्ध पावले होते ठरवलं असतं तर तेआपल्याच नावाने सारे कार्य व संस्था स्थापन करु शकले असते पण त्यांनी आपल्या गुरूंच्या नावे रामकृष्ण मिशन सुरु केले व गुरूंच्या नावे जगभर झेंडा रोवला ,आपल्या गुरुची नाव व कीर्ती उजागर केली. अगदी तसंच कलावती आईसाहेब यांनी आपल्या गुरूंची किर्तीरोशन केली. त्यांनी रामकृष्ण मिशन सारखी सर्वत्र हरी मंदिर या नावाने केंद्र स्थस्पित केली.सर्व अध्यात्मिक व उपासना चांगल्या प्रकारे व्यवस्थापित (organised) केल्या ,सर्वात उत्तम कार्य म्हणजे उपासनेला शिस्त लावली,बालसंस्कार केंद्रे स्थापन केली. बालोपासना सुरु केली.सर्वत्र हरी मंदिराची केंद्रे आज आहेत व ती 'अनगोळ'शी संलग्न आहेत .फारच उत्तम कार्य आहे . त्याच्या सेवक सेविका उत्तम संसार करतात फारच छान शरणागत भाव त्याचा असतो. माझी आई व बहिणी आज त्याच्याशी संलग्न आहेत.माझी आई तर सिध्दारूढ महाराजांच्या सेवेत तिच्या बालपण पासून होती ,महाराजांनी तिला त्यांच्या अंगा खांद्यावर खेळवली होती. माझ्या घरी कित्येक लोक तिला भेटावयास येत कारण 1980नंतर ती कदाचित एकटीच अशी होती जीने सिद्धारुढ स्वामींना प्रत्यक्ष पहिले आहे.मी तिला भेटायला येणारांचे भाव नेहमीचं टिपलेत. माझ्या आईमुळे लक्षांत आले की शरणागत भाव काय असतो ते.घरी आणलेली प्रत्येक वस्तू , आय,आवक आधी सिद्धारुढ माउलींच्या चरणी ठेवून मगच त्याचा विनियोग करायचा.जेवण्याआधी महाराजांना भरवून पाणी पाजून मग आपण जेवायचे.रात्री पांघरू न घालून त्यांना झोपवायचे. आपल्याला जे जे पाहिजे ते ते त्यांना सजीवरूप समजून अर्पण करायचे. समर्पण करायचे .याला समर्पण भक्ती म्हणतात ,यालाच मधुरा भक्ती म्हणतात. मधुरा भक्तीचे महाराष्ट्रातील उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिद्धारुढ भक्त व हरिमंदिर भक्त समुदाय.व हि भक्ती आई साहेबांनी घरोघरी व सर्वदूर परदेशातपण प्रचलित केली. अनगोळ ला मला मात्र कधी राहता आले नाही कारण मी त्यांच्या केंद्राशी कार्यबाहूल्यामुळे सातत्य ठेवू शकलो नाही.सातत्य व नियमितता हा गुण आईसाहेबां नी भिनवलाय.
मला मात्र हुबळीची पद्धत व सेवा आवडते "भाव तोचि देव"हा हिशेब.आजकाल भावात्मक भक्तीच महत्वाची असं महावतार बाबाजीपण सांगतात .मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव असे चालत नाही असं संत तुकडोजी म्हणतात.
आईची दर्शन सेवा भेंट घेऊन आम्ही बाळेकुंदरी मार्गे पंतांच दर्शन घेऊन ,नव बाग ला ब्रह्मानंद महाराजांच्या समाधी दर्शन घेऊन वाडीस पोहोचलो.
श्री दातात्रेयाच्या चरणी अधिक मासा निमित्त दत्त याग सेवा समर्पणा साठी.
Shivanjay dr sanjay honkalse ©
deshbhakt honkalse.tripod.com
shivanjay dr sanjay honkalse.blogspot.com
Comments
Post a Comment