अधिक मास :अधिकस्य अधिकम फलम.:© डॉक्टर संजय होनकळसे "शिवंजय" drsanjayhonkalse@gmail .com भारत हा कदाचित जगाच्या पाठीवरील एकमेव देश आहे की जेथे सभ्यता,जीवन ,संस्कृती, आरोग्य ,आयुष्यमान ,हवामान, सण,व्रत वैकल्य, अन्न, आहारशास्त्र अगदी साज श्रुगार-वेषंभूषा व अध्यात्म शास्त्र सुद्धा इ अनेकानेक गोष्टींची शास्त्रीय बैठकीवर आधारीत उत्कृष्ट सांगड घातलेली आहे. पण हे सर्व बाजूला पडून या गोष्टी परंपरा म्हणून जोपासल्या जाऊ लागल्या आहेत.अगदी छोट्या गोष्टी जस नाक कान टोचणे ,गंध लावणे इ बाबींमागे शास्त्रीय आधार आहे .फरक इतकाच की आधार- ज्ञान बाजूला होऊन या रीती रिवाज परंपरा म्हणून पुढे आल्या व पाश्चात्य करणाच्या( Impact of Westernization) प्रक्रियेमुळे त्यांना अंध श्रद्धा नावाच्या पोतडीत घातले जाऊ लागले.तरीही आजही आपण शास्त्राप्रमाणे अस अस करणे आवश्यक आहे किंवा शास्त्र असें सांगते अस म्हणून कित्येक परंपरा पाळतो.खरतर अज्ञानामुळे श्रद्धा बळकट न होता कमजोर झाल्या . युवकांमध्ये अत्यंत प्रचलित असलेले एक पाश्चात्य लेखक पॉल ब्रनटन( Paul Bruntan उर्फ P B )ज्या...