नवीक्षितिज:नवा ध्यास:नव्या वाटा,नव्या भारतासाठी


नवीक्षितिज:नवा ध्यास:नव्या वाटा,नव्या भारतासाठी
$@π√∆¥ #.
" मी आयुष्यात कधीही राजकारणात रस घेतला नाही,आजही नाही.मला आठवते की MAला मुंबई युनिव्हर्सिटीत पाहिला येऊन गोल्डमेडल मिळाल्यावर पोदार कॉलेजचे प्राचार्य PJ जोशीनी अनेक प्रश्न विचारले, कोणकोणत्या अर्थव्यवस्था जगात आहेत? आपल्यास कोणती अर्थव्यवस्था योग्य आहे?यावर माझं उत्तर होते" सर्व व्यवस्था गुण दोष युक्त आहेत,आपण सर्व व्यवस्थांचे दोष टाळून जगास दिलेली मिश्र अर्थव्यवस्था आणूनही काही झाले नाही म्हणून राजकीय विल असेल तर कुठचीही व्यवस्था चांगली कारण प्रत्येक व्यवस्थेचे यशस्वी व सुंदर उदा आहेत"
‌हे माझं राजकीय विषयातील नैराशेच मत, शतक उलटले तरी, बदलवणारे काही झाले नाही.काहींनी आशा उजाळवल्या पण शेवटी सारे मातीचे माधव च वा तेल लावलेले पहिल वानचं.
मी PJ ना माझी उत्तर देत असताना त्याच्या  काही वर्षे आधी माझ्या पेक्षा काही वर्षे मोठा असलेला एक तरुण अध्यात्म दृष्ट्या प्रेरित होऊन विवेकनंदांच्या चरित्रपटाने भारावून हिमालयात संन्यास घ्यायच्या हेतूने  भटकत होता.पण अध्यात्मानेच त्याला कलाटणी दिली व समाजराज कारणाकडे वळतं केले व भारताच्या वाटचालीना योग्य व छान छेद देणारा पंतप्रधान दिला.२०१४ ला मोदी आल्यानंतर हा निराशेचा स्वर हलका होऊ लागला.कारण पहिल्यांदाच हळू हळू मला राजकारणात समाजकारण करणारे राजकीय विल,इच्छा शक्ती दिसली
हे मी माझ्या मोदींचे प्रसिद्धी पराङ्मुख अध्यात्मिक गुरु या लेखात लिहलय.
(http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2020/06/blog-post.html)
हे शिक्षण क्षेत्रास हि लागू पडते कारण आपण अनेकवार शिक्षण क्षेत्रात बदल घडवले त्यांचे पोलिसी वा तात्त्विक बैठक चांगली असूनही हे बदल वायफळ व वाया गेले आहेत व पिढीचे नुकसान झाले आहे, मग ते अचानक 5 वितL इंग्रजी आणणे व मग काढून घेणे असो वा डिग्रीची परिक्षा व  अभ्यास विभागणी दोन ,inter नंतर,दोन वर्षात केली गेली ( आम्ही या विभागणीचे पहिली batch आहोत) व 10 + 2+ 3 असो वा फौंडेशन कोर्से असो .मला आठवते FC introduced करण्यामागे  विचार तत्व छान होते पण त्याचा राबता  अत्यंत टुकार ठरला.
आता परत नवी शिक्षण पद्धतीची घोषणा जुलै 2020 ला झालीय त्यातही अनेक चांगले बदल उदघृत आहेत ,जसे arts सायन्स ,कॉमर्स विभागणी मोडीत काढली जाते आहे .पुढील पिढी हि BA ,B.COM नसतील ते SPECIALIST GRADUATE असतील जसे Eco ,Physics ,Chemistry,history literature   graduate असतील एवढेच नाहीतर संगीत ,sports ,Art ( कलाArts नाही Art) graduate असू धकतील कारण पहिल्या तीन  वर्षात (ज्याला आज आपण पूर्व kG वगैरे म्हणतो त्यावेळीच पाल्याचा कल ओळखण्यासाठी व्यवस्था आहे व 5 वि पासुन नित्य विषय व्यतिरिक्त  इतर विषय ancilliary activities चे विषयही असतील जसे गाणं ,अभिनय ,पैंटिंग, sports अशा कला  निवडता येतील .
आज फक्त  शिक्षण धोरण जाहीर झालय 2022 पर्यन्त नियोजन (planning, व programme) तयार होईल .
एकंदरीत शिक्षण हे stereotyped होऊ न देता विविध पैलू व व्यक्तिमत्व विकास व Vocational शिक्षण (व्यवसाय शिक्षण )पद्धतीवर भर आहे .
पण परत याचे operation ,राबता चांगला व्हावयास हवा नाहितर परत जुन्या वळणावर
गाडी स्थिर(?) व्हायची .सुदैवाने एक मोठा फरक आज आहे तो म्हणजे राजकीय इच्छाशक्ती, जिचा अभाव होता, ती आज आहे . व सुदैवाने कित्येक फिल्ड्स वर शुद्धीकरण प्रक्रिया हि सुरु आहे जस चित्रपट क्षेत्र .
म्हणून हा लिखाण  प्रपंच.  
उद्याच्या दृष्टीने नवीन शिक्षण संस्था ज्या स्पेसिफिक aitivity ओरिएंटेड असतील अशा निर्माण झाल्या पाहिजेत.
म्हणजे मला आठवते महर्षी महेश योगीयांनी ट्रान्सनडेंटल मेडिटेशनची रेगुलर युनिव्हर्सि टी सुरु केली गेल्या 70च्या दशकांत अमेरिके त जिथे T M (Transcendental Medit ation) केंद्रित शिक्षण सेवा सुरू केली.याचे अमेरिके सारख्या देशात,जिथे लोक लहान मोठेशिक्षक विद्यार्थीनोकरदार व उद्योजक सारेच विकेण्ड मजेची स्वैराचाराची वाट पाहत असतात, विलक्षण व अकल्पनिय results  मिळाले .विद्यार्थी सिगरेट ,दारू पब अशा सवयींविहित जगायला लागले, चांगले व्यक्तिमत्व असलेले नागरिक  झाले. या यशामुळे 80 च्या दशकांत अशी युनिव्हर्सिटी भारतात सुरु करण्याचे विफल प्रयत्न झाले  कारण आपले नेहरूवियन अँटी हिंदू धोरण.
पण आज  परिस्थिती बदल्लीय एक तर सकारात्मक शासन व राजकीय इच्छाशक्ती उदयान्वित  होत आहे .त्यात नवं शिक्षण धोरणाबरोबर  आता गेल्या महिन्यातच टेम्पल बिल पास झालंय ज्या मुळे आता मंदिराच्या पैशाचा विनियोग मंदिरच करू शकतील.आता पर्यंत मंदिराचा पैसा मदरसा व हज साठी जात होता तो बंद होईल व मंदिर समित्या नवीन  शैक्षणिक धोरणांतर्गत स्वतःच्या वेदपाठशाला ,गोशाळा वेदिक शिक्षण संस्था सुरु करू शकतील .यावर आजच नवीन विचार रुजू होतोय ,कि शासनाने  मदरसा च्या शिक्षणासाठी शासकीय निधी न देण्याचा विचार होतोय .आसाम  govt  ने याबाबत पाऊल उचललं आहे व हिमाचल प्रदेश च्या शिक्षण मंत्र्यांनी ,सुरेंद्र सिह ,पण हा निधी बंद करावा असे उवाच केले आहे.
एकंदरीत परिस्थितीत फरक ,चांगला फरक पडत आहे.
उद्यासाठी संस्कृती केंद्रित ,वेदिक धर्म ,संस्कार केंद्रित ,खेळ ,मैदानी व इंडोर वैकल्पिक चिकित्सा(Alternative Medicine),विविध खेळ केन्द्रीत   शिक्षण संस्था सुरु व्हावयास हव्यात .
या विषयी मी सतत बोलत असतो .सुदैवाने माझे एक माझ्या पहिल्या batch चा विद्यार्थी याने उचलून धरलीय.त्याच नाव अनिर्बन रॉय व तो CA असून वकिली करतो ,भोपाळच्या UNION  CARBIDE ची CASE तो लढतोय .COLLEGE पासून अत्यंत ऍक्टिव्ह असा तो होता व आपल्या व्यक्तींमत्वांच सर्व क्रेडित तो  कॉलेज लला देतो .
त्याने विचार केलाय कि TENIS अकादमी सुरु करायचीय कारण भारत फक्त योग्य शिक्षण व ट्रेनिंग व्यवस्थे अभावी  चांगले टेनिस पटू निर्माण करू शकत नाही.टेनिस मध्ये हारणारा  खेळाडूही  प्रचंड पैसा कमावतो म्हणून अशी संस्था आपल्या कडे होणे आवश्यक आहे . त्यालाही मी नवीन शिक्षण धोरणानुसार  टेनिस केंद्रित अकादमी काढ म्हणून सांगितले आहे ज्यात टेनिस CURRICULLAM ठेवायचं व अनुषंगाने इतर विषय जसे LANGUAGES , GYMNASTICS ,ND RELATED विषय  ठेवायचे .त्याला सूचना एकदम पसंत पडलीय .जागाही शोधतोय तो आता .पण मला वाटते अशाच प्रकारे इतर  व्यवसायात्मक  activities जसे वेद शाळा ,गोपालन ,कुक्कुट पालन ,ऑरगॅनिक फार्मिंग वैकल्पिक चिकित्सा इत्या अनेक व्यवसात्मक शिक्षण संस्था सुरु व्हाव्यात
.नवीन धोरण आज embryonic stage मध्ये आहे .असे हे विचार  प्रसूत व प्रसिद्ध होणे व ते सरकार पर्यंत पोहचणे ,पोहोचवणे अत्यावश्यक आहे .या दृष्टीने सकारात्मक विचार  आजच्या नवं पिढीने करणे व आपले advisable विचार आजच्या अनुभवी पिढीने करणे महत्वाचे आहे उद्याच्या शक्तिमान भारत निर्मितीसाठी कारण भारतात साधन सामग्री ,स्किल ,टॅलेंट याची कमी नाही ,कमी आज ती right mobilization व Channelization ची व राजकीय इच्छाशक्तीची.
$@π√π¥ #©
shivanjaydrsanjayhonkalse.tripod. com

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|