बाबाजी व महाराष्ट्र
ओम अगस्तै नमः । कृनवंतो विश्वम आर्यम्।
महावतार बाबाजी विश्वात्मक गुरु:
महावतार बाबाजी हे विश्वात्मक गुरु आहेत. कारण त्यांचा जन्मच मुळी विश्वाच्या कल्याणासाठी व उद्धारासाठी व समन्वयासाठी झाला आहे .जसं वशिष्ठ व वाल्मिकींनी राम व कृष्ण घडवले तसेच सिद्ध अगस्त्य व भोगनाथ यांनी महावतार बाबाजी यांना घडवले . गुरू हे परीस समान मानले जातात कारण परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते तसेच योग्य गुरूच्या स्पर्शाने सत् शिष्य घडतात. तरीपण गुरुहा परीसा पेक्षा श्रेष्ठ आहे कारण परिस फक्त लोखंडाचे सुवर्ण करतो पण सद्गुरु हा आपल्या शिक्षणातून परिसर घडवतो म्हणजेच सद्गुरु हा असा परीस आहे की तो फक्त लोखंडाचे सोने करत नाही फक्त तर लोखंडातून परिसच बनवतो .
महावतार बाबाजी हे तर विश्वात्मक सद्गुरु आहेत कारण त्यांच कार्य कारण ध्येय हे विश्व कल्याण आहे.
विश्वनाथ जगन्नाथाने सृष्टी निर्मितीतनंतर सृष्टी चक्र चालवण्यासाठी सिद्धांची योजना केली व त्या प्रत अगस्त्य ,वशिष्ष्ठ,सप्तर्षी इत्यादी सिद्धांची योजना केली (Ref :सिद्ध एवं सिद्धाश्रम :'शिवंजय'डॉक संजय होनकळसे) व सृष्टीकार्य विभागणी केली .बाबाजी हे त्या पैकी एक सर्वश्रेष्ठ जग प्रसिद्ध सिद्ध आहेत.
ज्यांनी तुकाराम आदी शंकराचार्य साईबाबा, येशू ख्रिस्त श्यामाचरण लहरी महाशय युक्तेश्वर गिरी परमहंस योगानंद रमय्या नीलकांत न एवढेच नव्हे तर डॉक्टर राम भोसले सारखे परिससम शिष्य तयार केले ज्यांनी गुरु-शिष्य परंपरा व अध्यात्म यांची पताका विश्वभर फडकावली.बाबाजी हे व्यतीत ,इच्छातीत मृत्युंजय आहेत.
आधुनिक जगतात त्यांचं प्राकट्य 1862 साली उत्तराखंड येथील राणी खेत जवळील द्वारहाट येथे झाले ते कशी येथील संत लाहिरी महाशय द्वारे झाले .बाबाजीना त्यांना क्रिया दीक्षा देऊन सर्वांसाठी हि राजगुह्य राजयोगी परम पवित्र विद्या प्रसूत केली.
लाहिरी महाशयानी हि विद्या अनेकांना शिकवली त्यात सर्व धर्मीय लोक असत .एवढेच नाही तर लाहीरीजीं मुळे भारतात हि योग परंपरा पुनरुज्जीवित होऊन ती पुन:स्थापित झाली.या बरोबरच क्रिया योग्य परमपरा सुरु झाली ती जग भर प्रसिद्ध झाली .हि परंपरा दोन मार्गानी बहरली.एक लाहीरीजींच्या वंशातूनच हि परंपरा,Lineage सुरु झाली व ती आजही कार्यरत आहे.लाहीरीजींच्या पुत्र श्री तीनकौडी महाशय व मग नातू श्री सत्य चरण लाहिरी यांनी ही प्रथा व परं परा पुढे सुरु ठेवली आता त्यांचे पणतु हि परंपरा अबाधित ठेवून आहेत व खापर पणतू उज्वलजी हि आता यात सहभागी होतायत. पणतु हे पॅरिसला राहतात व सर्व जगभर ते दीक्षा देत असतात वय वर्ष 80 असूनही. बाल्कन,युरोप,पूर्व युरोप,आफ्रिका,इटलीइथे त्यांचे अनेक शिष्य आहेत.तर मुद्दा असा की महावतार बाबाजी,त्यांची परंपरा हि लाहिरी महाशय पासून पुनरुज्जीवित होऊन सर्वत्र जगभर प्रसिद्ध झाली ती एका बाजूने त्यांच्या घरातूनच जे आपण वर सांगीतले व दुसर्याबाजूने हि प्रसिद्धी गुरु शिष्य परंपरेने ही सर्वत्र दूर प्रचरित झाली ती लाहीरींचे शिष्य यूक्तेश्वरगिरी व परमहंस योगानंद यांच्या द्वारे .योगानंद यांनी तर बाबाजींच्या विदेशी भक्तांचा व क्रिया योगाची पताका सर्वदूर फडकवत ठेवली.कारण ते 1920 साली आंतरराष्ट्रीय सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेत गेले,तेथे त्यांनी महावतार बाबाजी व क्रिया योगाचा प्रसार केला.क्रिया दीक्षा समारंभ सुरु केले.सेल्फ रीअलायझेशन प्रतिष्ठान (Self Realization Foundation)ची तेथे शाखा सुरु केली .आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचं जग प्रसिद्ध पुस्तक योगिकथामृत :Autobiography Of a Yogi हे कॅलिफोर्निया,अमेरिका येथुनच प्रसिद्ध केले .
या पुस्तक मुळे बाबाजी व क्रिया योग परंपरा सर्वत्र मुख्यतः अमेरिकेतूनच प्रसारित व प्रसिद्ध पावली.अनेक पाश्चात्य बाबाजींच्या दर्शन शोधार्थ भारतात येऊ लागले ,सनातन धर्म पताका सर्वत्र पोहोचली.
एवढे होऊनही बाबाजींबद्दलची जाणीव जागृती व प्रचार हा सर्वत्र जगभर व भारतात उत्तरेसच जास्त झाला .1951 नंतर श्री S AA रामय्या व श्री निलकांतन यांच्या माध्यमातून तो दक्षिणेस ,तामिळनाडू व कर्नाटक येथेही सुरु झाला 70 च्या दशकांत लाहीरीजीना दर्शन व दीक्षा देणाऱ्या बाबाजींचीजन्म स्थलीही शोधून काढण्यात यश मिळालं व तेथे ,T N च्या परांगेपट्टइ येथे त्यावेळचे union हेल्थ मिनिस्टर डॉ श्री करणसिंग यांच्या मदतीने त्यांचे जन्ममंदिरही स्थापन झाले .
बाबाजी व महाराष्ट्र:
तरीपण महाराष्ट्र बाबाजींचे अस्तित्व-जाणिवेपासून वंचितच राहिला.म्हणजे महाराष्ट्र त्यांच्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होता असे नाही.काही तुरळक,ठराविक अध्यात्म साधक यांना त्यांच्या अस्तित्वाची, असण्याची जाणीव होती,नक्कीच होती,पण आज जी स्थिती आहे ती नव्हती.खरेतर बाबाजींच्या सर्वाधिक सहवास लाभलेली, जगभर प्रसिद्धी पावलेली,भारताचा गौरव जगभर वाढवणारी व्यक्ती महाराष्ट्रात स्वातं त्र्या आधीपासून ते 2005 पर्यन्त होती, तरीसुद्धा बाबाजींच्या व्हावा तेवढा प्रचार प्रसार जेवढा व ज्या वेगे इतरत्र झाला तेवढा निदान 20 व्या शतकाच्या शेवटच्या दशक पर्यंत तरी झाला नव्हता. पण अखेर या व्यक्तीमुळेच बाबाजींच्या भक्तीची परंपरा महाराष्ट्रात सुरु झाली.आणि हि व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातील वादळी ,विस्मयी मोहमयी व्यक्तिमत्व-आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व भारताचे नाव जगभर करणारे डॉ राम भोसले होत.
बाबाजी परंपरा व त्याची लाट महाराष्ट्रात सार्वजनिक स्तरावर रुजू करण्याचे श्रेय हे निर्विवादपणे जागतिक कीर्तीचे स्पर्शद्न्य
डॉ राम भोसले यांच्याकडे जाते.
श्री भोसलेंचा आयुष्यवृत्तांत आत्यंतिक विस्मयकारक व रोमांचक व मानवी मनाला थक्क करणारा आहे.
राम भोसले यांच पितृछत्र लहानपणीच
हरपले,त्यामूळे त्यांच्या नातेवाईकानी त्यां ना वाढविण्याची जबाबदारी घेतली परंतु काही घरगुती त्रासाला कंटाळून ते घरातून पळाले व मुंबईला आले.व जेज़े. हॉस्पिटल मध्ये त्यांनी wardboy म्हणून नोकरी पत्करली.तेथे operation theater मध्ये, सर्जनचे हाताखाली operation टेबल तयार करण्याचे काम करता करता operation चे तंत्र शिकले.
स्वातंत्र्य पूर्व काळात सर्व डॉक्टर ब्रिटीश असत,एकदा ख्रिसमसला सर्व डॉक्टर रजेवर गेले असता एक emergency Case Admit झाल्यावर त्यांच्या ऑपरेशनची गरज होती,पेशंटचे नातेवाईक गयावया करू लागल्यामुळे राम भोसलेंनी स्वत: (ward boy ला तसा शैक्षणिक व कायदेशीर अधिकार नसतानाही) ऑपरेशन केले व ते यशस्वी झाले सर्जनसह सर्वजण सुट्टी नंतर कामावर रुजू झले. त्यांना हे कळल्यावर ते अत्यंत आश्चर्य चकित झाले व त्यांनी राम भोसलें चे कौतुक केले.परंतु अधिकार नसताना नियमभंग केल्याबद्दल त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.
यानंतर अत्यंत काबाडकष्ट करून ते ऑस्ट्रियाला मसाज शिकण्यासाठी गेले, पण तेथेही शैक्षणिक पात्रता नसल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला,पण तिथे त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट झाली.त्यांनी शिफारस केल्याने राम भोसले यांना स्पेशल केस म्हणून प्रवेश दिला गेला,परंतु शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अथवा पदवी दिली नाही. तेथून इंग्लंड ला जावून त्यांनी जागतिक किर्तीच्या मसाजीस्ट कडे शिक्षण घेतले व शिक्षकांच्या प्रेमास पात्र ठरले . यानंतर ते मुंबईस परत आले.
मुबईत त्यांनी मसाज practiceसुरु केली, महात्मा गांधी, पं नेहरू,स्टालिन , यशवंतराव चव्हाण , राधाकृष्णन , गोपीकृष्ण इ. अनेक जागतिक दर्जाचे नेते, अभिनेते,उद्योजक यांचे केवळ मसाजच्या माध्यमातून व्याधिनिवारण करीत असत, याशिवाय त्या काळातील उस्तादां कडून तबला, पखवाज व शास्त्रीय संगीत शिकून, यातही त्यांनी प्राविण्य मिळवले होते , यामुळे त्यांना कीर्ती व श्रीमंती मिळविली. मोठ्या माणसात प्रसिद्धी मिळविली
क्रांतिकारक श्री राम भोसले- क्रांतिकारकांच्या भूमिगत चळवळीत ही ते सहभागी होते, १९ ४ २ ते १ ९ ४ ६ च्या काळात सातारच्या एका मुसलमान पोलिस अधिकार्याने एका स्वातंत्र्य चळवळीतील स्त्री क्रांतीकारीकेची विटंबना करून ठार केले, त्याचा बदला घेण्याची जबाबदारी राम भोसले यांच्यावर सोपवण्यात आली.
यावेळी सदर मुसलमान अधिका-यास मारण्याची तारीख व वेळ आधीच जाहीर करून, त्यानुसार त्या अधिका-याच्या भोवती पोलिसांचा जागता पहारा असूनही,राम भोसल्यांनी, त्या अधिक-यास, ठरलेल्या तारखेस व वेळेस (सायंकाळी ५ वाजता ) उभा चिरून ठार केला. यानंतर ब्रिटिशांनी राम भोसलेना दिसतील तिथे गोळी घालून, ठार करण्याचा हुकुम दिला, यानंतर लपत छपत ते हिमालयात आले. (कारण तोच भाग ब्रिटीशांच्या पोहचण्याच्या पलीकडे होता)
येथे हिमालयात त्यांना एक तरुण भेटला, त्याने त्यांना काय पाहिजे ? हवे ते देतो ." असे म्हणाला, हे ऐकून "मला पंचपक्वान्ने व मुंबईत अमुक ठिकाणी मिळणारे पदार्थ पाहिजेत .असे वैतागून राम भोसले म्हणाले . त्या क्षणी त्यांना ते पदार्थ मिळाले,तो तरुण म्हणजे "बाबाजीच" होते.
राम भोसलेंनी हिमालयातील बहुतेक काळ बाबाजीबरोबर घालविला यांच्या एवढा बाबाजींचा सहवास क्वचितच कोणाला मिळाला असेल (राम भोसले काही काळ दारूचे व्यसनी,मासाहारी व देवपूजा ई न मानणारे होते.तसेच त्याने क्रीयायोगाला आयुष्य वाहिलेले नव्हते.तरीही त्यांना बाबाजींचा सहवास व आशीर्वाद लाभला )
बाबाजी स्वत: उडत येत, जात व राम भोसलेही हवेतून उडत नेत असत हिमालयातील वास्तव्यात त्यांना बाबाजी गुरुपौर्णिमा उत्सवाला घेवून गेले.तेथे त्यांना दत्तात्रेय, गोरक्षनाथ व इतर नवनाथ सर्व देवता, संत महात्म्ये व सिद्ध्पुरुशांचे दर्शन झाले, या सर्व देवदेवता उडत येत होत्या. विशेष म्हणजे येणारे प्रत्येक संत वा देवता कोण आहे,यांची राम भोसलेना आपो आप कल्पना येत होती त्यांनी तो सर्व गुरुपौर्णिमेचा उत्सव हिमालयात पहिल. असे ते स्वत: सांगत.(मी म्हणजे "शिवंजय"संजय होनकळसे स्वत: त्यांना डिसेंबर,२००३- २००५ ला भेटलो असता,त्यांनी ते खरे आहे असे सांगितले .
बाबाजीनी त्यांना इतरही अनेक गोष्टी सांगितल्या. बाबाजींच्या सहवास त्यांना पाच, सहा वर्षे लाभला
यानंतर भारतास स्वातंत्र्य मिळाल्याचे समजताच ते हिमालयातून परत आले, स्वातंत्र्यामुळे त्यांच्यावरील सर्व आरोप परत घेतले गेले. त्यांनी परत प्रॅक्टिस सुरु केली , यानंतरही बाबाजी त्यांच्या संपर्कात होते.
मेहता कुटुंबातील मुलाचा अपमृत्य टाळण्यासाठी बाबाजींनी हिमालयात मृत्युजय यज्ञ केला व त्याचा अपमृत्यू टाळला (या मेहता कुटुंबातील पुढील पिढीतील जय मेहता यांच्याशी प्रसिद्ध अभिनेत्री , भारत सुंदरी जुही चावला यांनी विवाह केला व यांच्या मलबार येथील बंगल्यातच राम भोसले शेवटपर्यंत राहत होते
शेवटपर्यंत ते बाबाजींच्या सहवासात होते, रात्री २ ते ४ च्या दरम्यान मुंबईतील मलबारहिल येथील बंगल्यात त्याना बाबाजी भेटायला येत असत.हे त्यांनी मला त्यांना भेटलो तेंव्हा सांगितले . तेव्हाही त्यांनी मला प्रेमाने मसाज दिला, ९ जानेवारी 2005 ची माझी यांची भेंट शेवटची ठरली. यानंतर म्हणजे महिन्या नंतर 23 फेब्रुवारीस त्यांचे निर्वाण झाले.
राम भोसले यांचे जीवन अत्यंत नाट्यपूर्ण आहे. त्यांच्या विषयाच्या अनेक घटना विषय विस्तार व विषयांतराच्या भीतीपोटी टाळल्या आहेत .
त्यांचा जीवन वृत्तांत प्रसिद्ध होईपर्यंत म्हणजे या शकाच्या सुरुवाती पर्यंत बाबाजींचे व क्रिया परंपरा याचे ज्ञान व भान काही ठराविक उच्च साधकांपूरतच मर्यादित होते .पण "Class"साधकांनंतर Mass स्तरावर पोहोचले ते या शतकाच्या सुरुवाती नन्तर .त्यांचे जीवनीवरील " दिव्यस्पर्शी : (धनंजय देशपांडे); प्रकाशक : प्रसाद प्रकाशन (पुणे)
व सिद्धहस्त : (दिलीप चावरे); प्रकाशक : रोहिणी अविनाश सुभेदार ( मुंबई)
हि मराठी चरित्रग्रन्थ व Healing Hands हे इंग्रजीतील पुस्तक प्रकाशित झाल्यावर.
बाबाजींवर सविस्तर लिखाण:
डॉ राम भोसलेंच्या चरित्र ग्रंथांमुळे बाबाजी व क्रिया परंपरा याबद्दल जाणीव जागृती तर झाली ,पण अजूनही बाबाजींबद्दल सविस्तर व समग्र माहिती पाडून अजूनही समस्त व सर्वत्र विखुरलेला साधक समाज अजूनहीअनभिज्ञच होता .योगी कथामृत मुले जरी बाबाजी सर्व जगास ज्ञात झाले तरी योगी कथामृत मध्ये बाबाजीं वर महत्वाचे असले तरी तुरळक वृत्तांतच आहे .इन मिन दोन प्रकरणे बाबाजींवर आहेत व अस्प्ल्या नायकाचा ऐतिहासिक वृत्तांत थोडाच माहित असल्याची खंत हि परामहंसानी योगानंद यांनी या पुस्तकातच व्यक्त केली आहे.कथामृत व्यतिरिक्त अनेक महत्वाची माहिती असलेले ग्रंथही उपलब्ध होते ,पण बाबाजींबद्दलची विस्तृत माहिती एकत्रित ,संकलित रुपात कुठेच नव्हती .मराठीतही काही पुस्तके उपलब्ध होती पण ती बहुधा वैयक्तिक अनुभव व वा साधक साधना अनुभवरूपातच होती .हि बाबाजींच्या चरित्रात्मक वृत्तांताची गरज भागली ती 2009 साली प्रसिद्ध झालेल्या "महावतार बाबाजी" या गुरुतत्व प्रकाशन च्या ,'शिवंजय': डॉ संजय होनकळसे लिखित बाबाजींवरील चरित्रात्मक पुस्तकामुळे.कारण या पुस्तकांत बाबाजींच्या जन्म इतिहास पासून ते अगदी या शतकातील त्यांच्या अस्तित्व कार्याबद्दल सुलभ, सलग व सटीक वृत्तांत दिला आहे. असे पुस्तक जे बाबाजींवर विस्तृत व सुयोग्य माहिती देणारे दुसरे पुस्तक अजून कुठल्याही भाषेत आलेले नाही अशी प्रांजळ माहिती कै गुरुनाथ मुंगळे महाराज ,कोल्हापूर यांनी दिली .सद्गुरू गुरुनाथ मुंगळे हे स्वतः उच्च कोटीचे दत्त उपासक व बाबाजींचे साधक होते व त्यांनी अनेकांना बाबाजींच्या उपासनेस उद्युक्त केले .
याच बरोबर पुण्यातील नांदेड सिटी व राजगुरू नगर ,पुणे येथे स्थापित बाबाजींच्या मठाधिपती "श्री गुरुश्री "यांनीही मांडले आहे .श्री गुरुश्री हे जेष्ठ दत्त गुरु स्वरूप स्वामी समर्थ यांचे कृपापत्र आहेत .या पुस्तकाची नोंद आदी शंकराचार्य यांच्यावरील आदी शंकराचार्य समग्र ज्ञान कलश या डॉ दिलीप मेघश्याम साठे यांनी संकलित केलेल्या कोश रुपी ग्रंथात घेली गेलीय (पृष्ठ क्र 237 )व या पुस्तकास Ref ग्रंथाचा दर्जा मिळाला आहे .(https://m.facebook.com/story.php?story_fbid=3773261132689536&id=100000170606055)
कुठल्याही marketing व पब्लिसिटी विना हे पुस्तक हजारो साधकांनी उचलून धरले .याच्या 5000च्या आसपास प्रति त्यांच्यापर्यंत पोहोचल्या याच्या आता हिंदी व इंग्रजी भाषेतही प्रकाशन झाले आहे .
राम भोसले यांच्या चरित्र ग्रंथांमुळे बाबाजी च्या बद्दल जाणीव निर्माण झाली व बाबाजींवरील 'शिवंजय' डॉ संजय होनकळसे यांच्या चरित्र ग्रंथामुळे बाबाजींचे एक लाटच निर्माण झाली ,त्यांच्या कार्याची माहिती ,प्रसार व प्रचार सुरु झाला .
मुख्य म्हणजे भक्तीचा ,साधनेचा व क्रिया योग परंपरेचा झेंडा रोपण पक्क झाले.आज महाराष्ट्रभर बाबाजींचे मठस्थापित होऊन ,भक्ती व अनुभूती चा आनन्द समस्त महाराष्ट्र लुटत आहे .या मुळे एक अत्यंत महत्व पूर्ण काळजी आपण सर्वांनी संयुक्त जाणिवेने घेतली पाहिजे ती ही जाणीव जागृती विशुद्ध रुपात जपली गेली पाहिजे ,कारण हा मध आहे ,तो ढोंगी प्रसार प्रचाराच्या मुंग्यापासून सुरक्षित ठेवला गेला पाहिजे.साधक जागृत राहिला तर आपल्या स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी खोटे पणा करणारे आपसूकच गप्प होतील.
जय गुरु!
"शिवंजय":डॉ.संजय होनकळसे©
shivanjaydrsanjayhonkalse.tripod. com
shivanhaydrsanjayhonkalse.blogspot.com
संदर्भसंपादन करा
.1 दिव्यस्पर्शी : (धनंजय देशपांडे); प्रकाशक : प्रसाद प्रकाशन (पुणे)
.2 सिद्धहस्त : (दिलीप चावरे); प्रकाशक : रोहिणी अविनाश सुभेदार ( मुंबई)
.3 Dr Aanand Kambly, Pune - Personal Disciple of Dr Ram Bhosle, www.samvahan.in / www.anandacentre.org
4http://www.samvahan.com/founder-frameset.htm Michael Trembath
5 Healing Hands
6 महावतार बाबाजी :dr संजय होनकळसे
मराठीत गुरुतत्व प्रकाशन ,कोल्हापूर
7 महावतार बाबाजी :हिंदीमे
8 Mahavtaar Babaji :English Dr Sanjay Hobkalse
9 सिद्ध एवं सिद्धाश्रम :dr sanjay honkalse
10शंकराचार्य समग्र ज्ञान कलश डॉ दिलीप मेघश्याम साठे
Sir तुमचे सिध्द एवं सिद्धाश्रम हे पुस्तक कुठे मिळेल, म्हणजे प्रकाशनाचे नाव वगैरे सांगितले तर मी तिथून मागवेन आणि Sir देवात्मा हिमालयाच्या कुशीत हे पुस्तक पण प्रकाशित झाले आहे का?? तर ही पुस्तकं कुठं मिळेल ते जरा सांगा म्हणजे मला पण ती वाचता येईल. 🙏
ReplyDelete