मोठी दिवाळी :देव दिवाळी:दिव्यांची दिवाळी :कार्तिक पौर्णिमा


मोठी दिवाळी :देव दिवाळी:दिव्यांची दिवाळी :कार्तिक पौर्णिमा
:$@π√∆¥ #
"कार्तिक पौर्णिमा"
शिवंजय डॉ संजय होनकळसे©
https://goo.gl/images/kfkuz7

देव दिवाळी कार्तिक मासच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा पौर्णिमा तिथी रविवारी, 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार असून सोमवार 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत असणार आहे.ययोगायोग म्हणजे उद्या पूर्ण दिवस रोहिणी नक्षत्र आहे .व पुण्यातील काही जण बाबाजींचा जन्मोचा प्रेमोत्सव साजरा करतात व उद्या याच तिथीस 30 नोव आहे व  पौर्णिमा व रोहिणी नक्षत्र पण आहे.
(सोमवारी बाबाजींचा तिथीने 1818 वा वाढदिवस व देव दिवाळी)

सनातन शास्त्रात पौर्णिमा व आमावस्या यांना आत्यंतिक महत्व प्राप्त आहे ।आमावास्येचा  चंद्र जो मनाचा कारक आहे त्याची युती आत्म्याशी म्हणजे सूर्याशी होते। मन व आत्म्याचे मिलन होते म्हणून दक्षिणेस आमवास्या आत्यंतिक पवित्र मानली जाते.
तसेंच पौर्णिमेस चंद्र मनसो जायेत,व आत्मकाराक सूर्य यांची प्रतियुती होते तीही सर्व हिंदू पवित्र मानतात.प्रत्येक पौर्णिमा जसे चैत्र पौर्णिमा,हनुमान जयंती, वैशाख -बुद्धपौर्णिमा,जेष्ठ वट सावित्री,आषाढ गुरु पौर्णिमा, श्रावण राखी -नारळी पौर्णिमा.मग कोजागिरी व कार्तिक पौर्णिमा ।
कार्तिक पौर्णिमा हि धार्मिक दृष्ट्या महात्वाचीच पण हिच आध्यात्मिक महत्वही अधिक आहे .
अश्विन कृ एकादशी ते कार्तिक द्वितीया पर्यंत आपण दिवाळी साजरी करतो .या दिवाळी स छोटी दिवाळी म्हणतात ,हि मानवी दिवाळी आहे व फार आनंदमयी ,उज्जयी , सर्व भारत भर दिव्यांची दिवाळी म्हणून साजरी होते व आज सर्व जगभर प्रसिद्ध आहे. या नंतर येणाऱ्या पौर्णिमेस देव दिवाळी
भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिना महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक महिन्यात प्रामुख्याने लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णू यांचे पूजन केले जाते. अशी अख्यायिका आहे की, कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला सगळे देव दिवाळी साजरी करतात आणि याच दिवशी देवांनी काशीत प्रवेश केला होता.

धार्मिक ग्रंथानुसार देव दिवाळीचा सण दिवाळीच्या पंधरा दिवसानंतर साजरा करतात. हा कार्तिक पौर्णिमेचा सण आहे. हा सण वाराणसीत धडक्याने साजरा केला जातो. जगातील सर्वात जुने शहर काशीची ही संस्कृती आणि परंपरा आहे. हा सण काशीच्या ऐतिहासिक गंगेच्या घाटांवर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतात. काशीमध्ये दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्याचसोबत देव दिवाळीच्या दिवशी दिपदान करणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. या दिवसाचं विशेष महत्त्व पुराणांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. असं मानलं जातं की, या दिवशी सगळे देव पृथ्वीवर येऊन दिवाळी साजरी करतात.

पुराणांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, या दिवशी काशीमध्ये सर्व देव एकत्र पृथ्वीवर अवतरले होते. त्यांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली होती. यामागे एक कारण होतं, ते म्हणजे, असं सांगण्यात येतं की, देवांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाला कंटाळून या राक्षसाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी भगवान शंकराकडे प्रार्थना केली होती. त्यानंतर भगवान शंकराने त्या राक्षसाचा वध केला होता. ज्यामुळे देव अत्यंत प्रसन्न झाले होते. सर्व देव भगवान शंकराची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशीमध्ये पोहोचले. त्यांनी काशीमध्ये सर्वत्र दीप प्रज्वलन केलं. आजही ही परंपरा कायम आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आजही येथे दिवे लावून देव दिवाळी साजरी क रतात


मातीचे दिवे दान करण्याला या दिवशी विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी दिवे दान केल्यानं भगवान विष्णु प्रसन्न होतात, असं मानलं जातं. तसेच जीवनात सुख आणि समृद्धि येते. या दिवशी मंदिर, पिंपळाचं झाड, तलावाच्या ठिकाणी दीपदान केलं जातं. परंतु, मंदिरात दीपदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं
या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केला म्हणून त्रिपुर वाती तेववतात ,प्रभू कृपे अनेकवार लक्ष त्रिपुर वाती दिपपूजन सेवा या संजय  होनकळसे नावाच्या देंहाद्वारे करवून घेतली गेलीय तेही काशीविश्वनाथ चरणी.शीख धर्मीयात पण या दिवसास महत्व आहे .गुरु नानाकांचा जन्म हि यांचं दिवशी झालाय.
हा दिवस आणखी  एका  कारणासाठी तसेंच यांचं दिवशी पण रोहिणी नक्षत्रात इ स 203 ला महावतार बाबाजींचा जन्म परंगपेटाई येथे झाला .बाबाजी हे तत्वच आहे त्याअर्थी ते अजन्माच आहेत.पण त्यांच्या 1863 पासून प्रचलित  असलेल्या रूपाचा ,पांघरुणाचा ,शरीराचा जन्म हा  6 नोव्हेंबर,रविवार कार्तिक पौर्णिमा या दिवशी झाला।बाबाजी हे सर्व धर्म समन्वयाच काम करतात. त्यासाठी ते भाव भक्ती व क्रिया योगाच साधन वापरतात ।सध्या त्यांचा क्रिया योगा पेक्षा भक्ती योगावर जास्त भर देतात कारण क्रिया योग हा एकतर सर्वांना साध्यच होईल असे नाही व त्यात अनेक उपविभाग, communities व cult निर्माण झालेत व एक cult दुसऱ्याच नावही काढू देत नाहीत.मी एका क्रिया योगाच्या ग्रुपवर,जो योग  बाबाजींनी जगतांस दिला हे सारे मान्य करत असताना, बाबाजींचा जन्माची पोस्ट टाकली तर त्यांना भरपूर राग येतो पण तेथेच त्यांना योग शिकवणारा याचा उदोउदो चालतो जसे काही तेंच क्रिया योगचे प्रणेते आहेत.
दुसरे असे की गल्लोगल्ली क्रिया योगाचा मंडी बाजार मांडला जातोय.(read महावतार बाबाजी: डॉ संजय होनकळसे ,गुरुतत्व प्रकाशन कोल्हापूर ,contact:उदय गांधी +919324359110,चंद्रशेखर+918169191241)असो बाबाजी हे वयातील, जन्मातीत, इच्छातीत,मरणातीत मृत्युंजय आहेत व कार्तिकेयाचे शिष्य आहेत .कार्तिकेय हे यौवनाचे चिरंजीवतेचे दैवत,देव सेनापती.भगवान शिव व महाभगवती पार्वती यांचे पुत्र. गणेशाचे बंधू.कार्तिकस्वामीं चे दक्षिणेतील नाव मुरूगन स्वामी,शरवण,मौन धारण करून अतर्क्य कामे करणे हा त्यांचा पिंड आहे. त्रिपुरी पौर्णिमा अर्थात कार्तिक पौर्णिमा,कार्तिकात कृत्तीका नक्षत्रावर कार्तिक स्वामींचा जन्म झाला.महाराष्ट्रात त्यांना कार्तिकस्वामी,सहा तोंडे असल्याने षन्मुखानंद व कर्नाटकात षडानन म्हणून ओळखले जाते.स्वामींच्या उजव्या हातात वरद्करम्,कमळ,घंटा, माळा,दंड,आयुध व धनुष्य आहे म्हणून त्यांना दंडायुधपाणीही म्हणतात.कार्तिक स्वामी जन्मत:च अतिहुशार अति चिकित्सक होते .एकदा त्यांनी ब्रह्मदेवास 🕉चा अर्थ विचारला असता ब्रह्मदेवाने त्यांना १२ हजार श्लोकांत अर्थ सांगितला . त्यावेळी कार्तिकस्वामींनी तात्काळ ब्रह्मदेवाला ज्ञान कमी आहे,असे सांगत शिवालय गाठले . तेथे कार्तिक स्वामींनी शिवाला १२ कोटी श्लोकात 🕉चा अर्थ ऐकविला.त्र्यंबकेश्वरी तीर्थराज कुशावर्तावर दोन ठिकाणी कार्तिकस्वामी मंदिर आहे.नाशिक - त्र्यंबक रोडवर अंजनेरी येथे कार्तिक स्वामींचे प्राचीन दगडी मंदिर आहे.पुण्यास पर्वतीस कार्तिक स्वामीचे बंधू गजाननाचे गणपतीचे मंदिर बाजूला आहे.दोघांचे
मातापिता शिवपार्वती त्र्यंबकेश्वरी  वसलेले आहे मोराचे पीस, सोन्या चा तुकडा,मंगळाचा खडा असे कमंडलूतून बघितल्यास दारिद्र्य नष्ट होते , अशी भाविकांची भावना आहे.
संपूर्ण भारतामध्ये स्वामींची दुर्मिळ मंदीरे असून कर्नाटकात सांडूर व महाराष्ट्रात पुणे येथे पर्वती , नाशिक ,कोल्हापूर , संगमेश्वर,तुरभवचिपळूण येथे मंदिरे आहेत.स्त्रीयांनी कार्तिकेयांचे दर्शन घेऊ नये,असे कोणतेही शास्त्र सांगत नाही.परंतु महाराष्ट्रात प्रथा आहे की कार्तिकेयाच दर्शन घेत नाहीत कारण त्या संबंधी एक कथाधार आहे.
कार्तिकेयाच लग्नसंबंधी विचार चालू असता त्याने पार्वतीस विचारले की पत्नी कशी असते .पार्वती म्हणळू कि माझ्यासारखी हे ऐकून त्याला राग आला व तो म्हणाला बायको आई सारखी असेल तर मला लग्न नाही करायचे व स्त्रियांना दर्शन नाही द्यायचे.असे असले तरी कार्तिकेयाची दोन लग्ने झालीत. कार्तिकस्वामींचे लग्न झालेले असून त्यांना दोन पत्नी आहेत.एकीचे नाव वल्ली तर दुसरीचे नाव देवयानी आहे.वल्ली हि त्याची प्रेयसी व तिच्याशी त्याच्या प्रेमलीला दक्षिण श्रीलंका येथील कातीर ग्राम येथे राधा कृष्ण सारख्या रंगवून सांगितल्या जातात.या कातीर/ कटीरग्रामस भेट देण्याचे भाग्यहीया संजय होनकळसे रूपी देहास लाभले ।येथेच बाबाजींचे उच्च शिक्षण झाले.येथे कार्तिकेयाची सुवर्ण यंत्र रूपात पूजा होते.
दक्षिणेतील स्त्रीया कार्तिक दर्शन प्रेमाने घेतात.दक्षिणभारत हि कार्तिकेयाची कर्म भूमी येथेच त्याने तारकासुराचा वध केला.दाक्षिणात्य संस्कृतचा तो प्रणेता ,त्याबे अगस्त्य ऋषींच्या माध्यमातून दाक्षिणात्य संस्कृती व तामिळ भाषा रचली व समृद्ध केली म्हणून दक्षिणेत त्याला कृष्णासारखा मान आहे प्रेमाने त्याला मुरुगा व मुरुगन म्हणतात.
जसे आपल्याकडे अष्टविनायक आहेत तशी षणमुगनची सहा स्थान प्रचलित आहे व त्यांचे दर्शन हे अत्यंत भाग्यशाली मानले जाते.बाबाजी कृपे त्यांच्या या सहाही इष्टस्थानांची दर्शन संजय होनकळसे नावाच्या या देहास  सहा वेळा प्रत्येकी दर्शन सेवा लाभ मिळाला व परत डिसें 2018 ला जात आहे.
कार्तिक स्वामींची महाराष्ट्रात मोठी पूजा केली जाते कारण महादेवाने त्र्यंबकेश्वरी गोदावरी नदीच्या किनारी त्यांना ' शूळशक्ती ' प्रदान केली होती. या शक्तीमध्ये पंचमहाभूतांना नष्ट करण्याची ताकद आहे . त्यांच्य हातात जे पिंपळपानासारखे दिसते तिच ही शूळशक्ती होय . कार्तिके यांना बारा हात असून ही मूळ स्वरूपातील मूर्ती केवळ दक्षिणेतच पहायला मिळते .
हि स्थाने अशी आहेत
१)पळणी , दिंडीगुल: रवाणपद्यम
2)पाळमुदीर शौळे :मदुराई शाकदम्
3)तिरूपुरम् कुंद्रम : 3)सौरम् ,मदुराई
4)तिरुट्टंनी : शैवम् 
5)तिरूचेंदूर : वैष्णवम्
6)स्वामीमलाय कुंभकोनं
हि सारी स्थाने पवित्र व शक्तिशाली आहेत

कार्तिक स्वामींचे वाहन मयूर ( मोर ) आहे.मयूर हा पक्षी वेदस्वरूप मानण्यात येतो .
वेदी एवं मयुर इस्यात प्रणव शणमुघ इस्तदा
याचाच अर्थ ब्रह्मविद्या , शक्ती , मुक्ती , वत्तजनान , स्मिधा हे ॐ कार स्वरूप मयूराचे वर्णन आहे . स्कंद दर्शनात तर मयूर मुक्ती देणारा म्हणून सर्वश्रुत आहे.
..कार्तिकेय दर्शनाचे वेळी त्यांना *दंड, पाण्याने भरलेला कमंडलु, २७ रुद्राक्षांची माळ, कमळाचे फुल (किंवा कोणतीही पांढरी फुले) आणि दर्भ अर्पण करण्याची प्रथा आहे. अनेक भक्त प्रतिकात्मक पातळीवर सोने (सुवर्ण-Gold) देखील अर्पण करतात ( हे प्रतिकात्मक अर्पण असल्याने ते किमान १०० मिलीग्रॅम असले तरी चालते).* "प्रज्ञाविवर्धन स्तोत्रा"चे पाठ केल्यास अधिक उत्तम. विशेषत: विद्यार्थीदशेतील मंडळींनी दर्शन घ्यावे.©
'शिवंजय ':डॉ संजय होनकळसे
drsanjayhonkalse@gmail.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
Here's the link to the file:

https://s.docworkspace.com/d/ADilTRLjtKkeoJLM26SdFA

Shared from WPS Office:
https://activity.wps.com/wpsoffice2020?utm_source=wa

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|