मोदीजींचे प्रसिद्धी पराङ्मुखआध्यत्मिक गुरु.

आर्यम्।
छोटी मूर्ती, मोठी कीर्ती,महान विभूती
पुष्प 4 :भाग १
मोदीजींचे प्रसिद्धी पराङ्मुख
आध्यत्मिक गुरु.
"शिवंजय":डॉ संजय होनकळसे
drsanjayhonkalse@gmail.com
मी आयुष्यात कधीही राजकारणात रस घेत ला नाही,आजही नाही.मला आठवते की MAला मुंबई युनिव्हर्सिटीत पाहिला येऊन गोल्डमेडल मिळाल्यावर पोदारकॉलेजचे प्राचार्य PJ जोशीनी अनेक प्रश्न विचारले, कोणकोणत्या अर्थव्यवस्था जगात आहेत? आपल्यास कोणती अर्थव्यवस्था योग्य आहे?यावर माझं उत्तर होते"सर्व व्यवस्था गुण दोष युक्त आहेत,आपण सर्व व्यवस्थांचे दोष टाळून जगास दिलेली मिश्र व्यवस्था आणूनही काही झाले नाही म्हणून राजकीय विल असेल तर कुठचीही व्यवस्था चांगली कारण प्रत्येक व्यवस्थेचे यशस्वी व सुंदर उदा आहेत"
हे माझं राजकीय विष्यातील नैराशेच मत, शतक उलटले तरी,बदलवणारे काही झाले नाही. काहींनी आशा उजाळल्या पण शेवटी सारे मातीचे माधवच वा तेल लावलेले पहिलवानचं.
मी PJ ना माझी उत्तर देत असताना त्याच्या  काही वर्षे आधी माझ्या पेक्षा काही वर्षे मोठा असलेला एक तरुण अध्यात्म दृष्ट्या प्रेरित होऊन विवेकनंदांच्या चरित्रपटाने भारावून हिमालयात संन्यास घ्यायच्या हेतूने  भटकत होता.पण अध्यात्मानेच त्याला कला टणी दिली व समाजराजकारणाकडे वळतं केले व भारताच्या वाटचालीना योग्य व छान छेद देणारा पंतप्रधान दिला.२०१४ ला मोदी आल्यानंतर हा निराशेचा स्वर हलका होऊ लागला.कारण पहिल्यांदाच हळू हळू मला राजकारणात समाजकारण करणारे राजकीय विल,इच्छा शक्ती दिसली. वक्तृत्वशैली( usaत Communication व Manaagement skillचा पाठ्यक्रमामुळे सुधारलेले इंग्रजी,)त्यांचं कुंभ मेळ्यात मी हिंदू आहे व म्हणून मी हे करणारच म्हणत कुंभस्नान करणं, केदारनाथ ,काशी उज्जैन येथे दर्शन सेवा,जनसामान्यात केलेली राज कीय जागृती(अन्यथा गांधी नेहरूंच्या मूर्ख स्वार्थापोटीकेलेल्या किमया,घोळ घोटाळे या बद्दल बोलणे म्हणजे गुन्हा असायचा,आजहि  काही 'पिद्दु बळीसम्राटां ना तो वाटतो:अर्णव गोस्वामी,पालघर प्रकरणे,काही धडाडीचे निर्णय,डिफेन्स व भारताची जगभर वाढती imaage व फक्त भारताचा विचार या गोष्टी अवनतपणे त्यांचा अभ्यास करण्याकडे मन वळवू लागल्या.काहीतरी दैवी शक्तीच पाठब ळ असल्याशिवाय एक माणूस हि किमया भारताततरी होऊ शकत नाही हे पटून मोदीं ची आध्यात्म प्रवासातून मला उमजणारी उभरणारि,उभारणारी प्रतिमा उकलत गेली .
गरीब घरात जन्मूनही आईकडून अध्यात्माचे बाळकडू मिळालेले(आजही त्यांच्या अध्या त्मिक गुरूंचा फोटो त्यांच्या मातोश्री हिराबां च्या रूम मध्ये  किचन मध्ये आहे.
नरेंद्रला लाहनपणूच देशभक्ती व अध्यात्म  यांनी पछाडले होते मिलिटरी यूनिफार्म मध्ये फोटो काढणे,1965 च्या यूद्धात सैंनिकांची सेवा करणे हे सुरु होतेव पण या नरेंद्रवर व नरेंद्र विवेकानंद यांचा प्रभाव वरचढ ठरल्या ने ऐन विशितच त्यांनी घर सोडले ते थेट हिमालयातील आपल्या कौटुंबिक गुरूंच्या कडे पोहोचले ते थेट केदारनाथला व तेही दोन वर्षे राहून मग पुढे संन्यास घ्यायचे मन व मत पक्के केले .
हे त्यांचे गुरु म्हणजे श्री संप्रदाई श्री रामानंद संत सेवाश्रमचे संचालक श्री अभिरामदास जी.संयोग पहा अभिरामदासजी यांच सत्संग सहवास सातत्य 1997 पासून मलाही लाभ ले एवढेच नाही तर त्यांचा माझ्या अध्यात्मि क वाटचालींवर विशेष प्रभाव आहे.त्यांच्या सुयोग्य मार्ग दर्शनाचाही मी धनी आहे.मला त्यांचा प्रथम सत्संग लाभ माझ्या केदारनाथ चे प्रथम दर्शन फेरीतच झाला,मे31,1997 ला.
मे 1997च्या शेवटच्या आठवड्यात साधार ण 30 ,31 मे ला माझी केदारनाथ दर्शनाची नांदी झाली,सेवा दर्शन आजता गायत भोले बाबा करवून घेतायत.या यात्रेतच मी केदार नाथ येथील 3.5 की मी आधी गरुडचट्टीस गेलो (आता 2013 च्या त्रासदी नंतर हा मार्ग बंद झालाय व गरुड चट्टी isolate झालीय, आता रास्ता बांधणी सुरु आहे)
येथे संत रामानंद सेवाश्रम आहे व प्रचंड मोठी नैसर्गिक गुफा आहे :हनुमान गुफा.हि गुफा शोधून त्या परीसरात अत्यंत मेहनतीने  संत श्री रामानंद (त्यागी ) यांनी श्री संत रामानंद सेवाश्रम बांधला साधारण 70च्या दशकात व ते तिथे मे ते ऑक्ट दरम्यान गेली अनेक वर्षे साधना करीत,कित्येकदा केदार नाथ धाम बंद झाल्यावर हि तेथे साधना तप करीत.जे कार्य व शीतकालीन साधना श्री पुजारिजिनी 1974 ते 2012 केली ती यक्ष आदेशानुसार केली हे आपण पूजारीजींच्या दोन लेखांत पाहिले.(Ref: https://m.fa cebook.com/story.php story_fbid =3517427451606240&id=100000170606055
---------------------- -  -----//----------
https://m.facebook.com/groups/164388476958833?view=permal ink&id=3136694216394896)

तर या पाहिल्यावहिल्या केदारयात्रेतच दर्शन झाल्यावर मी  22 शिलेदारासह गरुड चट्टीस गेलो,अभिरामदासजी भेटले.उंच,लालबुंद, तेजस्वी रूप,गोल चेहरा,हसत मुख असे ते दिसले,नंतर ते स्वभावतःच व तपस साधना मुळे तसे आहेत  हे लक्षांत यायला वेळ नाही लागला.त्यांनीआम्हाला बोध केला,उपदेश केला अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.मला स्पष्ट आठवते त्या वेळी,त्यांच्या मुखातून,जणू आज्ञाच,मी सात कैंलास व अष्टनारायण या बद्दल माहिती ऐकली.ते फक्त माझ्याकडे पाहुन बोलत होते.त्याच वेळी मला सात कैलास करण्याची इच्छा झाली.सात वर्षे अभ्यास करून मग मी एक एक कैलास करीत गेलो,कारण त्या बद्द्ल कुठेही माहिती उपलब्ध नव्हती मी अगदी त्या त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली तरी मला लोक मुर्खात काढत,काहीतरीच विचारतोय म्हणून.मला सातवर्षां नंतर,तयारी करून,कैलास करणे  जमले * 11 वर्षांनी मानसारोवर केले.ते इतरत्र योग्य ठिकाणी लिहितच आहे.
असो मग केदारच्या प्रत्येक फेरीत गरुडचट्टी येथ,तिथे न जमल्यास ऋशिकेशला त्यांच्या आश्रमात त्यांचं सत्संग,दर्शन सेवा घ्यायची जणू सवयच लागली,गरुडचट्टी पुजारींशीप ण जवळीक होत गेली,त्याचाबद्दलच्या लेखा त लिहले प्रमाणे.
बडेमहाराज अभिरामदासजी हे 'श्री' संप्रदा याशी संबंधित आहेत.हा संप्रदाय स्वामी रामाननंद यांनी सातशे वर्षापूर्वी  स्थापित केला.स्वामी रामानंद हे रामनुजाचार्य यांचे   संप्रदायातील एक अनुयायी होते.विशिष्ट अद्वैत सिद्धांत मानणारे होते.विशिष्ट अद्वैत सिद्धांतानुसार जीव हा परमेश्वराचाच अंश आहे व तो परमेश्वरातच विलीन होणार असे मानतो.हा सिद्धांत 10व्या शतकांत तामिळ नाडू इथे जन्मलेल्या श्री रामनुजाचार्य यांनी मांडला आहे.त्यांची प्रमुखगादी तामिळनाडू त नांगनेरि,जे एक अष्टनारायण स्थान,आहे. श्रीकृपे महत् प्रयासाने हे स्थान मी शोधले व आता 6,7 वेळा दर्शनसेवा केलीय.रामानुजी हे लक्ष्मीनारायण पूजक असतात पण त्यातू न त्याचा एक नवीन पोटविभाग  साधारण 13 व्या शतकांत रामानुज संप्रदायातील एक अनुयायी श्रीरामानंदजी जे,रामावतारीच होते असे मानले जाते,यांनी स्थापिला तो "श्री" संप्रदाय या संप्रदायातील संत हे फक्त बैरागी असतात.व वैरागी च गादीवर बसतात.
(रामानुजीं मध्ये गृहस्थ पण संत असतात व गादीवर बसू शकतात)हे "श्री" संप्रदाई यांचे लक्ष्मी नारायण ऐवजी सीताराम हे दैवत असून त्यांचीच भक्ती करतात.या संप्रदायात रामसीता हनुमान यांचे मंदिर व पूजन करता त व राम मंत्र जपतात .
असो अभिरामदासजी हे या श्री संप्रदायाशी, रामानंदसंप्रदयाशी संबंधित आहेत.हे अत्यंत उच्चकोटींचे ज्ञानी आहेत,वाणी रसाळ,मधुर भाषी व सदाहसमुख असे आहेत.यांचा मुख्यआश्रम हा नर्मदा किनारी राजपिपला येथे आहे.तसेंच ऋषिकेश मायकुण्ड येथेही गंगाकिनारी सुंदर अस आहे.तसेच कन्या कुमारी येथेही आहे.
नरेंद्रमोदी हे तरुण वयातच संन्यस्त वृत्तीने आपले कौटुंबिक गुरु श्री अभिरामदासजी यांच्याकडे केदारनाथ गरुडचट्टी येथे पोहोच ले,एकटेच.स्वानुभूतिच्या शोधात व संन्यास आश्रम स्वीकारण्यास
आणि हा त्यांच्या जीवनाचा turning पॉईंट ठरला जीवन व वाटचाल  बदलवून टाकणारा
म्हणतात ना दैव जाणिले कुणी?
कसे ते पाहुयात पुढे

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|