भाग २मोदीजींचे प्रसिद्धीपराङ्मुखआध्यत्मिक गुरु.
छोटी मूर्ती, मोठी कीर्ती,महान विभूती
पुष्प 4 :भाग २
मोदीजींचे प्रसिद्धीपराङ्मुख
आध्यत्मिक गुरु.
"शिवंजय":डॉ संजय होनकळसे
drsanjayhonkalse@gmail.com
नरेंद्रने साधारण दोन तीन वर्ष हिमालयातच वास्तव्य केले,मुख्यत्वे गरुडचट्टी व नंतर बद्रीनाथ वगैरे .
त्यांच्या मनाने विरक्तीचे वेध घ्यायला सुरुवा त केली ज्यामुळे त्यांनी संन्यास घ्यायचा विचार पक्का केला.विचार पक्का आहे असे पाहून ते पोहोचले ते थेट कोलकत्ता येथे विवेकानंदांच्या गुरूंच्या मठात बेलूरला.ते तेथे राहिले.आत्मस्थानंद हे,1941 पासून त्यांच्या वयाच्या 22व्या वर्षांपासून तेथे होते, मठाधिपती होते.नरेंद्रनं त्यांच्या सान्निध्यात काही काळ घालवून त्यांना संन्यासदीक्षा द्यायची विनंती केली.पण....... आत्मस्थानंदस्वामींनी यापासून परावृत्त केले व सांगितले की नरेंद्रचा जन्म हा समाजहिता साठी झालाय व त्यांनी देशसेवेच व्रत घ्यावं. या अर्थी आत्मस्थानंद हेही त्यांचे गुरु होत, जसे दत्तात्रेयांनी अनेक गुरु केले तसे.तेंव्हा पासून ते 2017पर्यंत आत्मस्थानानंद यांच्या निर्वाणापर्यंत मोदीजी त्यांच्या संपर्कात होते.
खरेतरआत्मस्थानांद यांच्या नकारानेही नरेंद्र परावृत्त झाले नाही त्यांनी राजकोट गाठले व तेथेही प्रयत्न केला रामकृष्ण मठात जाऊन संन्यास घ्यायचा,पण तोही विफल झाला.
दैवाचे लिखित वेगळे असंते हेंच खरे.
मग मोदी RSS मध्ये सक्रिय झाले,वाजपेयीं यांच्या हाताखाली शिकले पण रामनीती सोडून कृष्णनीती चा वापर करून गुजरात चे मुख्यमंत्री पद भूषवले .त्या दरम्यान त्यांना काही अडचणी आल्या तेंव्हा साधारण 18 ,19 वर्षांपूर्वी ते ऋषिकेश स्थित स्वामी दयानंद गिरीजी यांच्या संपर्कात आले व त्यांचंही मार्गदर्शन मोदींना लाभत गेले ते सप्टे 2017 पर्यंत त्यांच्या निर्वाणा पर्यंत .
आणि दुहेरी सुख संयोग पहा ,स्वामी दयानंद गिरीजी यांचाही माझ्या अध्यात्मिक गतीविधींवर तेवढाच प्रभाव आहे ,किंबहुना अभिरामदासजीं संपर्काच्या 11वर्षे आधी . स्वामी दयानंदजी यांचे दिस सत्संग प्रवचन सोहळा वाशीस होता तेंव्हा त्यांनी वाशी येथे गीता व वेद पाठ शिक्षण वर्ग सुरु केले होते तेंव्हा त्यांच्या शिष्यास,श्री उदय आचार्ययजी जे वर्ग चालवणार होते, राहण्यासाठी जागा उपलब्ध मी करून दिली होती.उदयजी त्यावेळी माझे घरी येत जात व माझ्या मातोश्रीशी ( त्या वेळी 66)त्यांचे चांगले सूत जमले होते .त्यांच्या मुले ऋषिकेश आश्रमात गेली 28ते 30 वर्षे जाणे होते तेतगे अभिषेक सेवा सुरू आहे .
दयानंदस्वामी हे चिन्मयानंद स्वामींचे गुरुबंधू ,तपोवन स्वामींचे शिष्य . त्यांच्यासारखी सहज ,गोड ,वाणी व संबोधन शैली मी तरी कुठेही पाहिली नाही.त्यांचं विश्लेषण फारच सुंदर,गोड, समर्पक व मनात खोल रुतणारे असे.अध्यात्माचा खरा अर्थ ,मार्ग व अंतिम ध्येय मला त्यांच्या मुळेच समजले व त्याचा पुरेपूर वापर मी माझ्या महाविद्यलायतील विद्यार्थी व्यक्तींमत्व विकास,यात्रा व्यवस्था,अध्यात्मान्कविकास, माझा व विद्यार्थ्यांचाही,या साठी पुरेपूर झाला ,एवढा की त्या सर्व अनुभवांवर आधारित मी Management By Spiritual Quotient : Power of Faith जे माझ्या विद्यार्थ्यांनी मला 1997 ते 2000 या दरम्यानच्या यात्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नां वर आधारित आहे व अमेरिकेत प्रसिद्ध झालेय(https://www.amazo n.com/Management-Spiritual-Quotient-Power-Faith/dp/1448970148)
स्वामींचे आश्रम ऋषिकेश ,कोईम्बतुर व Pensylvenia येथे आहेत त्यांनी अयाचित वृत्तीने हे सारे केले .वेदांत,गीता व उपनिषद यावर त्यांची चांगली पकड व शिकवण्याची हातोटी होती. त्यांचे ऋण नफिटणारे असेच आहे.त्यांनी अनेक उपक्रम राबवले,कित्येक शाळा चालवल्या,AIM (All India Move ment) for Sewa हि चळवळ राबवली. अनेकांचा आयुष्यात अध्यमिक उन्नतीचे मा र्ग खुले केले व अनेक साधू व विद्यार्थी यांची परंपराच व त्याचा वारसा ते मागे सोडून गेलेत.मोदीजी त्यांच्या सतत संपर्कात असत.पंत प्रधान झाल्यावरही त्यांची चर्चा होत असे.
पंतप्रधान झाल्यावर उडुपीच्या पेजावरमठ अधिपती विश्वेस तीर्थ स्वामी,हे उमाभारतींचे गुरु(1995 ला उमभारती दीक्षित झाल्या) मोदींच्या संपर्कात आले.मोदीजी 2014 ला शपथ ग्रहणानंतर त्यांना भेटले होते व स्वामी जी 2019च्या शपथविधिस हजर होते.मोदी जीने त्यांच्याबरोबर गुरुपीर्णिमा उत्सवपण साजरा केला होता.2019 च्या डिसेंबरच्या शेवटच्या रविवारी आजारपणाने त्यांनी देह सोडला.
तर अशारीतीने आत्मस्थानंदस्वामी,विश्वेस तीर्थ,दयानंदगिरीजी,महाराज अभिरामदास जी हे त्यांचे अध्यात्मिक मार्गदर्शक होत. तसे काही जण तोतयां स्वामींनी पण आपण त्यांचे गुरु असल्याचे हक्क सांगितले व काही(पुलकितस्वामी,साहिबाबाद दिल्ली) गजाआड झाले .
पण मायाकुंड येथील श्री रामानंद संत सेवा आश्रमातील महंत स्वामी अभिरामदास महाराज हे नरेंद्र मोदींचे कौटुंबिक गुरु होत . नरेंद्र मोदी विद्यार्थी जीवनात घरी न सांगता बद्री केदारला त्यांना भेटायला गेले होते .ते गुरुंच्या गरुडचट्टी हनुमान गुहा आश्रमात बरेच दिवस राहिले आणि केवळ गुरुची भेट झाल्यानंतर ते पुढील यात्रेस गेले. नरेंद्र मोदीं ची आई हिराबा मोदी देखील तिच्या गुरू बद्दल मोठी श्रद्धा बाळगतात. त्यांच्या उपासनागृहात व सभेत आई हिराबाने गुरु अभिराम दास महाराजांचा फोटो मागे ठेवला आहे.
निवडणुकीआधी नरेंद्र मोदी यांचे छोटे भाऊ पंकज मोदी स्वत: येथे आले होते आणि त्यांच्या मार्गदर्शकाशी अभिरामदासजींशी एकांतात दीर्घ चर्चा केली. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपाच्या मोठ्या विजयाबद्दल त्यांचे गुरु स्वामी अभिराम दास महाराज म्हणाले की "नरेंद्र यांचा विजय म्हणजे संन्यास आणि तपश्चर्ये यांचा विजय आहे. खरं तर, तो एक माणूस आहे जो पूर्णपणे निष्ठावान आहे." त्यांनी स्वत: मध्ये अटल जी आत्मसात केले आणि देशासाठी स्वत: ला झोकून दिले. आपल्या शिष्याच्या यशाबद्दल गुरु अभिराम दास म्हणाले की, "नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताचा स्वाभिमान जगाला समजेल अशी मला आशा आहे. भ्रष्टाचारापासून देशाला स्वातंत्र्य मिळेल. गोहत्या खून आणि इतर बेपर्वा कृत्यांना आळा बसेल. नरेंद्र मोदींच्या आगमनाने उत्तराखंडचा विकासही होईल."
मोदींनी उत्तराखंड येथे रेल्वेची निव हि ठेवलीय व काम जोरात सुरु आहे व केदार पर्यंत राष्ट्रीय महा मार्ग हि सुरु करण्याची योजना राब वली जात आहे, ज्यामुळे अगदी केदारनाथ धाम पर्यंत मोटाररस्ता होईल .
2019च्या निवडणुणुकीवेळी काशीत मतदान होते तेंव्हा हि मोदी केदारनाथ जवळील रुद्र गुहेत रात्रभर ध्यानस्थ होते .
अशा रीतीने आपल्या गुरूंचे बोल व विश्वास सार्थ ठरवून सत्यातउतरवणाऱ्या निस्पृह,निस्वार्थी,देशार्थी,Non corrupt सच्चा हिंदू पंत प्रधान सेवक भारतास अनेक शताब्द- युगाब्द नंतर लाभला आहे. त्यांना व त्यांच्या निष्ठेला व त्यांना अत्यंत हीन भले बुरे ,नव्हे नको ते बोलणारे व शिव्या घालुन आपल्या हीन दर्जाचं प्रदर्शन करणाऱ्या पिद्दुंना ( गुलाम) पुरून उरणाऱ्या कर्तृत्वास कोटी नमन व त्यांच्या मातागुरुस व गुरुंस कोटी साष्टांग दंडवत!
"शिवंजय ":डॉ संजय होनकळसे©
। शिवार्पणम।।
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2020/06/blog-post_22.html
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3613303822018602&id=100000170606055
Comments
Post a Comment