अधिक मास :अधिकस्य अधिकम फलम.:
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3876051299077185&id =100000170606055
अधिक मास :अधिकस्य अधिकम फलम.:©
डॉक्टर संजय होनकळसे "शिवंजय"
drsanjayhonkalse@gmail .com
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3876051299077185&id=100000170606055
160 वर्षांनी येत आहे दुर्मिळ*""अधिक मास *:$@π√∆¥ #.
या वर्षी अश्विन मास अधिक मास म्हणून येत आहे 18 सप्टे पासून हा दुर्मिळ योग्य आहे कळतं हे वर्ष लीप इयर हि आहे .लीप इयर व अश्विन अधिक मास हा संयोग 160 वर्षांनी येत आहे .या मस्त केलेली साधना ,पूजन ,जप 100 पट फळते.
१६० वर्षांनी आला दुर्मिळ संयोग
एक माळ जप केल्याने शंभर पट फलप्राप्ती
*"दोन अश्विन मास असलेला दुर्मिळ अधिक मास योग"*
१६० वर्षानी लीप ईयर आणि अश्विन अधिक मास एकाच वर्षात
१८६०मध्ये असा अधिक मास आला होता त्यानंतर असा सुयोग आता आलेला आहे
*"
अधिक मास :अधिकस्य अधिकम फलम.:©
डॉक्टर संजय होनकळसे "शिवंजय"
drsanjayhonkalse@gmail .com
भारत हा कदाचित जगाच्या पाठीवरील एकमेव देश आहे की जेथे सभ्यता,जीवन ,संस्कृती, आरोग्य ,आयुष्यमान ,हवामान, सण,व्रत वैकल्य, अन्न, आहारशास्त्र अगदी साज श्रुगार-वेषंभूषा व अध्यात्म शास्त्र सुद्धा इ अनेकानेक गोष्टींची शास्त्रीय बैठकीवर आधारीत उत्कृष्ट सांगड घातलेली आहे. पण हे सर्व बाजूला पडून या गोष्टी परंपरा म्हणून जोपासल्या जाऊ लागल्या आहेत.अगदी छोट्या गोष्टी जस नाक कान टोचणे ,गंध लावणे इ बाबींमागे शास्त्रीय आधार आहे .फरक इतकाच की आधार- ज्ञान बाजूला होऊन या रीती रिवाज परंपरा म्हणून पुढे आल्या व पाश्चात्य करणाच्या( Impact of Westernization) प्रक्रियेमुळे त्यांना अंध श्रद्धा नावाच्या पोतडीत घातले जाऊ लागले.तरीही आजही आपण शास्त्राप्रमाणे अस अस करणे आवश्यक आहे किंवा शास्त्र असें सांगते अस म्हणून कित्येक परंपरा पाळतो.खरतर अज्ञानामुळे श्रद्धा बळकट न होता कमजोर झाल्या . युवकांमध्ये अत्यंत प्रचलित असलेले एक पाश्चात्य लेखक पॉल ब्रनटन( Paul Bruntan उर्फ P B )ज्यांनी भारतीय माणूस, परंपरा इ.चा भारतात येऊन अभ्यास केला व भारतावर अनेक पुस्तके लिहिली ते त्यांच्या एका पुस्तकात "भारताच्या आध्यात्मिक रहस्याच्या शोधात"(Search of the secret India या पुस्तकाचा अनुवाद) म्हणतात की ज्या ज्या गोष्टी भारतात अंधश्रद्धा म्हणून गणल्या जातात त्या त्या गोष्टींमागे शास्त्र आहे फरक एवढाच आहे की कालपरत्वे त्याच्या मागील शास्त्र मागे पडले आहे.आपण फक्त त्या विद्या /बाबी ह्य ठराविक लोकांचीचं मक्तेदारी म्हणून ,आपलं तो प्रांत नाहीं म्हणून, झिडकारतो अथवा दुर्लक्ष करतो.आपल्याकडे हा वसा वारसा आहे हे आपले सुदैव पण त्याचवेळी हे आपले दुर्दैव पण आहे कारण एवढा मोठा वसा असूनही आपण ते मन:पूर्वक स्वीकारत नाहीं.इतरेजन ,परदेशीयांना याच मोल जास्त. खरंच पिकते तिथे विकत नाहीं .
आता हेच पहाना आपले दिनमान ,दिनचर्या ,अथवा कालगणना ही चंद्राच्या गती व भ्रमणावर आधारीत आहे तर पाश्चात्यांची कालगणना ही सौर भ्रमणावर आधारीत आहे .वर वर सूर्य भ्रमाणावरील कालगणना सहज व सोपी नक्कीच आहे .पण ग्रह नक्षत्रांचा भूतल व प्राणीमात्रावरील परिणामांचा विचार करतं सौर भ्रमणापेक्षा चंद्र भ्रमण जास्त महत्वाचे होय. कारण सर्व सूर्यमालेत (हर्शल व नेपच्यून वगळता).चंद्र सर्वात गतिमान व जलद ग्रह व सर्वात मंद शनी.सुर्य एका राशीत साधारण महिनाभर असतो तर चंद्र सव्वा दोन ते अडीच दिवस त्यात तो मनाचा कारक ह.म्हणजेच मानवी वर्तणूक ,भावना चंचलत्व इ.चा विचार केल्यास चंद्राला प्राथमिकता देणे महत्वाच व जास्त शास्त्रीय .नेमका तोच विचार आपल्या पूर्वजांनी ,ऋषीमुनींनी केलेला आहे काहीही प्रयोशाळा,साधन सामग्री नसताना किती सूक्ष्म विचार तोही फक्त ध्यान धारणा ,साधनेच्या बळावर केला गेलेला आहे.
याच काल गणणे नुसार इंग्लिश सौर वर्ष हे निखळ ३६५ दिवसांचे असतें तर चंद्र भ्रमणानुसार चांद्रवर्ष हे ३५५ दिवसांचे असतें .चाद्रवर्ष व सौर वर्ष यात मग दर वर्षी दहा दिवसांची फारकत होते ती भरून कशी काढायची ? ते भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी तीस दिवसांचा एक महिना जास्त म्हणजे तीन वर्षांनी त्या चंद्र वर्षात तेरा महिन्याचं वर्ष येते त्या तेराव्व्या महिन्यास अधिक मास म्हंटले जाऊ लागले.सर्व सामन्यपणे दर तीन वर्षांनी अधिक मास येतोचैत्र पासून फाल्गुन पर्यंत १२ महिन्यात ३५५ दिवस येतात.इंग्रजी किंवा कॅलेंडर प्रमाणे सौर वर्षाचे ३६५ दिवस येतात..काटेकोर पणे दर तेहतीस महिन्यांनी अधिक मास येतो.सूर्य प्रत्येक महिन्यात एक या प्रमाणे १२ महिन्यात १२ राशी फिरत असतो.सूर्य ज्या दिवशी रास बदलतो त्यास संक्रांत म्हणतात. सूर्य संक्रांत त्या त्या राशीच्या नावाने ओळखली जाते उदाहरणार्थ सूर्य कर्क राशीत जातो त्यास कर्क संक्रांत म्हणतात तर १४ जानेवारीस मकर राशीत जाण्याऱ्या सूर्य संक्रांतीस मकर संक्रांत म्हणतात.अशा मेष राशी पासून मीन राशी पर्यंत १२ संक्रांत येतात. सूर्य राश्यान्ताराचे दिवस हे ठराविकच असतात पण यात बदल होत होत ३३महिन्यांनी असा महिना येतो की ज्यात संक्रांत नसते.अलीकडच्या महिन्यात अमावास्येला संक्रांत असतें व पुढील महिन्यात प्रतिपदेला संक्रांत असतें ,समजा भाद्रपद महिन्यात अधिक मास येत असेल तर.श्रावणातील संक्रांत अमावास्येच्या दरम्यान येईल सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल व पुढी महिन्यात प्रतिपदेला सूर्य कन्या राशीत पोरावेष्ट होईल. या दरम्यानच्या अमावस्या व पुढील अमावस्या पर्यंतचा महिना अधिक मास गणला जातो अश्या रितीने इंग्रजी महिन्यात काही फरक न पडता एक अधिक मास चंद्र वर्षांत दर तीन वर्षांनी. येत असतो थोडक्यात अधिक मास बिन संक्रांतीचा मास असतो. तो तेरावा महिना असतो. अधिक महिन्याला पुढील महिन्याचे नव देतात म्हणजे भाद्रपद अधिक मास असेल तर श्रावण महिन्यानंतर अधिक भाद्रपद महिना येतो.
अधिक महिन्यात संक्रांत येत नसल्या मुळे सूर्य चंद्र यांच्या गती मध्ये फरक पडतो व त्यामुळे वातावरणातपण फरकआपल्या शरीरावर पण प्रभाव पडतो .याचा आपल्यावर योग्य व इष्ट परिणाम व्हावा म्हणून काही व्रते व नियम पाळावेत अशी व्यवस्था आपल्या पूर्वजांनी केली आहे.
यामुळे मानवास सुख,शांती समाधान, प्रसन्नता मिळून इच्छित मनोरथ प्राप्ती होते. हा अधिक महिना मोठया पर्वाप्रमाणे असतो .त्या महिन्यात धार्मिक कृत्ये करतात.धर्म यात्रा ,तीर्थ यात्रा ,तीर्थस्नान ,करावे, या पर्वात दान धर्म करण्याने हजारो पटीने पुण्यसंचय होतो.रोज गोग्रास द्यावा , हरिविजय हा ग्रंथ वाचावा, रोज तेलाचा अथवा तुपाचा दिवा देवघरात तेवत ठेवावा ,दीप पूजन अत्यंत महत्वाचे.वेदशास्त्र व पुराणयामंध्ये सांगितलेले सर्व सर्व फळ दीप पूजनाने मिळते. गाय श्राद्ध,व वेद्पाठ्नाचे पुण्य दिप्दान्नामुळे milte.मिठाचे खाण्यातील प्रमाण कमी करावे नक्त भोजन म्हणजे दिवसा न जेवता एकभुक्त राहून,फक्त रात्री जेवावे .उपवास ,पूजन ,अर्चन ,तीर्थ यात्रा ,तीर्थ स्नान,दान धर्म ,जप.ताप वागारेनी धर्माचरण होऊन पुण्य लाभ होतो,जीवनाचे सार्थक होते.जीवन शांत,सुखमय,संमृद्ध होते .साधारण पणे पुण्यसंचय समाप्त झाल्यावर पुनर्जन्म होतो पण या अधिक मासातील पुण्यसंचय हा अव्यय, अक्षय असा असतो.म्हणजे हे पुण्य व पुण्यसंचय जन्म मृत्युच्या परे असतें.या संचयाने शाश्वत सद्गती लाभते.
या महिन्यालासुरुवातीला नावं रूप अस काही नव्हत. याला मलमास म्हणुन ओळखले जांत होते परंतु गोलोक वासी गाय श्राद्ध श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने याला पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्यावेळी पांडव काम्यक वनात वनवास भोगत होते क्लेश त्रास याने त्रस्त होते त्यावेळी गतवैभव ,कीर्ती ,मान, धन पुन: प्राप्त व्हावे म्हणून कृष्णाने त्यांना पुरुषोत्तम व्रत आचरणात आणावयास लावले.
याच वेळी कृष्णाने द्रोपादिची पूर्व जन्म कहाणी चे स्मरण तिला करून दिले. द्रोपदीने पूर्वजन्मात या व्रताचा उद्धटपणे पांच वेळा अपमान केला म्हणून तिला महाभारतकाळी पांच पतींची पत्नी होण्याचा शाप दुर्वासऋषींनी दिला .पूर्व जन्मात ती मेधावती नावाची ,मातृपितृसुखाला वंचित अशी सुंदर ,मुलगी होती ती परम शिव भक्त होती. तिने शिवावतार दुर्वासांची अपर सेवा केली त्यावेळी प्रसन्न होऊन त्यांनी तिला पुरुषोत्तम मास व्रत आचरणास आन म्हणून उपदेश केला तो तिने उद्धत पणे ,हसत झिडकारला असें तेणे पांच वेळा या व्रताचार्नास नकार दिला त्यावर दुर्वास क्रोधी झाले व याचा घोर परिणाम भोगशील असा शाप दिला.पुढे उग्र तपोबलाने शिव्भाग्वान तिला प्रसन्न झाले त्यावेळी तिने मला बलशाली,शूर,वीर नामी ,देखणा व सद धर्मी पती मिळावा असा वर मागितला .असें पांच गुण एकच पुरुषात असणे काठीन्म्हणून एकेक गुणयुक्त असें पांच रात्न्मानी पती तुला मिळतील असा वर दिला पण असें झाल्यास माझे जनी हसे होईल असें तिने शिवशंकर यांना सांगितले व अन्य वर द्यावा अशी विनंती केली.पण दुर्वासांनी ज्यावेळी तुला उपदेश केला त्यावेळी पाचवेळा तू हसून त्यास नकार दिलास त्याचेच फळ परिणाम म्हणून तुला पांच पटीन बरोबरच संसार करावा लागेल व तेंव्हा तू हे पुरुषोत्तम व्रत आचार करशील व सुखी होशिलो. व हे व्रत मनोभावे केल्या मुळे त्यांना पूर्व वैभव व राज्य प्राप्त झाले.
अधिक मासातील ज्या दोन एकादशी येतात त्यापण अत्यंत शुभ मानल्या जातात .त्यांना पद्मिनी व परम एकादशी असें म्हणतात ज्यांना पूर्ण अधिक मास पाळता येत नसेल त्यांनी निदान या दोन दिवशी तरी व्रताचरण अवश्यमेव करावे
अधिक मासा चा खास मंत्र""*.
*"ओम नमो भगवते वासुदेवाय नमः"*
*हा मंत्र देईल अक्षय पुण्य फळ.*
अधिक मासाचे अधिष्ठाता श्री भगवान विष्णू आहेत. त्यामुळे पूर्ण अधिक मास श्रीविष्णू देवतेचा मंत्रजप केल्यामुळे विशेष लाभ होतो.
असे मानले जाते की जो कोणी भक्त म्हणजेच साधक श्री विष्णू मंत्राचा जप करतो त्या भक्ताला म्हणजेच साधकाला *श्री भगवान विष्णु स्वतःहून आशीर्वाद देतात, त्यांच्या पापांचे शमन करतात, आणि विशेष महत्त्व म्हणजे त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करतात*.
अशी मान्यता आहे की अधिक मासामध्ये श्री भगवान विष्णूच्या मंत्र जपा चे फळ १०० पटीने मिळते.
म्हणून ज्या भक्ताला
*ओम नमो भगवते वासुदेवाय नमः*
ह्या जपाची रोज एक माळ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केव्हा पण करण्याची इच्छा असेल त्या भक्तांनी ह्या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
स्वतःही ह्या संधीचा लाभ घ्यावा व इतरांना पण सांगावे. स्वतः करून इतरांना जो कोणी करायला सांगेल त्यांना श्री विष्णू भगवंता कडून अगणित फलप्राप्ती होईल.
या मासात 11 फुलवतीची मंजुळ ज्योत श्रीकृष्णापुढे लावावी
थोडक्यात या महिन्यात सर्व कर्म कृष्णार्पण भावनेने करावे व अधिकस्य अधिकम फलं असे पदरी पडून घ्यावे हेच योग्य ठरेल. ©
dr.sanjay honkalse.
Comments
Post a Comment