पितृशास्त्र :श्राद्ध योग्य तिथ्या


पितृशास्त्र :श्राद्धउत्सवास योग्य तिथ्या :
शिवंजय डॉ संजय होनकळसे.

मी माझ्या विद्यारथ्यांना नेहमी सांगतो की आपण हि म्हातारे  होणार आहोत म्हणून वरिष्ठांची  काळजी घ्या व कुबचा जेसने गळा कापू नका हे पितृ दोषास कारण होत.
पेरिलेची उगवते  या न्यायाने आपण पितृदोष व पितृ शाप याचे बळी होत असतो.
घरातील वडील व्यक्ती हयात असताना त्यांचे हाल करणे,त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्याच राहत्या घरातून हाकलून देवून त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणे हि पुढील मोठ्या संकटाना आणि पितृदोषांस पोषक अशीच कारणे आहेत. हे सर्व करताना एकदिवस आपल्यालाही वृद्धावस्था येणार आहे हे मात्र विसरू नये. मुले लगेच अनुकरण करतात. आपण जे आपल्या आईवडिलांसोबत केले तेच आपलीही मुले आपल्यासोबत करणार नाही कश्यावरून. म्हणूनच आईवडिलांची सेवा करून ,तसेच त्यांच्या पश्च्यात त्यांचे योग्य ते क्रियाविधि करून त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावे आणि आपल्या मुलांसमोर चांगला आदर्श घालून द्यावा. अश्याने आपलेही प्रारब्ध चांगले होते.
माणूस विचित्र प्राणी आहे आजकाल संस्कार करावयाच्या वयात लहान मुलांचे अधिकाधिक लाड करतो वत्यांना नाजूक ,disimmune बनवतो व ज्या आईवडील्यानी आपकी काळजी घेतली  हागण मुतण काढलं त्यांच्या वर त्यांच्या म्हातारपणी रुबाब दाखवतो व दोष देतो व हे आपण त्यांची काळजी घेणे म्हणतो.
आपले आईवडील किंवा इतर मोठी माणसे ज्यांनी आपल्याला घडवले, ज्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, ज्यांच्या प्रेमाच्या छायेत आपण वाढलो ते आपल्याला शाप देणार नाहीत
म्हणतात ना कुपुत्रो जायेत क्वचिदपी कुमाता न भवती  .पण आपल्या म्हातार्या आईवडिलांचे म्हातारपणी अवधनाने का होईना हाल केले ,त्यांच्या औषधपाण्याकडे न पाहता त्यांना मृत्युसम पिडा दिल्या किंवा वडिलोपार्जित संपत्तीत खोटेपणा केला, आपल्या भावंडांचा वाटा छलकपट करून दिला नाही, वडिलोपार्जित इस्टेट बळकावली , खोट्या सह्या करून लुबाडली,आपल्या नावावर केली ,किंवा आईवडील  असतानाही त्यांच्याशी गोड बोलून इतर भावंडाना धूर्तपणाने कळू न देता आपल्याच नावावर करायला भाग पाडले , आपल्या आईवडिलांनी त्यांच्या मृत्यपत्रात लिहिलेल्या त्यांच्या इच्छांचे पालन न करणे ,अश्या गोष्टीनी आपल्या हातून पातक घडते .
या वाबी पितृ दोषास जारून ठरतात

तसेच कुणाचा जेसने गळा कापू नये.
आपल्या प्रेमीजन ,मित्र मैत्रीण, वा भावंडांचा , कुटुंबियांचा आपण केसाने गळा कापला,त्यांना वडिलोपार्जित इस्टेटीपासून वंचित ठेवले तर मात्र त्यांचे शिव्याशाप, पितृदोष लागतो आणि तो फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या मुलांना आणि पुढील पिढ्यांनाहि लागतो. संपत्तीचा वाटा समोरून देवू केला असताना मोठ्या मनाने जर तो आपल्या नातेवाईकांनी नाकारला तर शाप कधीही लागणार नाही .जीवंतपणी भावंडांचे शाप मृत्युसम पीडा देतात . व्यवसायात कश्यातही प्रगती होत नाही . आईवडिलांच्या संपत्तीवर मुलांचा समान हक्क आहे आणि ज्याचा त्याला तो देणे हेच सर्वार्थाने होतावह आहे.संपत्ती हवी असेल तर ती कष्टाने कमवावी तीच लाभेल अन्यथा नाही .  घरात आईवडिलांचे जेवणाचे ताटसुद्धा वेगळे ठेवले जाते .ऐकून सुद्धा कसेतरी होते. पण आईवडिलांची संपत्ती मात्र हवी .आपल्या म्हातार्या सासूबद्दल दुनियाभर निंदा करायची पण तिने दिलेली चांदी सोन्याच्या वस्तू दागिने ते मात्र हवेत . इतका स्वाभिमान असेल तर ते तरी कश्याला घ्यायचे. म्हणूनच मग अश्या व्यक्ती गेल्यावर त्यांचे आशीर्वाद फळतील कि शाप ? ह्याचे उत्तर आपणच देवू शकतो. आईवडिलांचे करताना सुद्धा तोंडातून "ब्र " सुद्धा काढू नये.
घरात सतत कलह, संपत्ती असूनही त्याचा उपभोग घेता न येणे , रात्रीची शांत झोप नसणे, घरात आर्थिक स्थिरता नसणे ,घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यास मोडणे ,संसारसुख नसणे , नोकरी धंद्यावर गदा येणे ,आयुष्य एकंदरीतच अस्थिर असणे, व्यवसायात स्थिरता न येणे ,घरात एक प्रकारचे सतत दडपण जाणवणे, अनाठायी पैसा खर्च होणे, व्यसनाधीनता होणे ,संतती सौख्य नसणे किंवा संतती झाली तरी तिच्यापासून सुख नसणे , घरातील सासूसासरे दीर जाऊ आणि इतर लोकांची निंदा नालस्ती ह्या प्रकारामुळे  संकटाना आयुष्यभर सामोरे जायला लागते. हि सर्व पितृदोषाची कारणे आहेत . म्हणूनच कुणाचे चांगले करता आले नाही तर कमीतकमी वाईट तरी करू नये. कष्टाने आपली संपत्ती जमवावी तीच आपल्याला आनंद आणि रात्रीची शांत झोप देयील. साधना ,उपासना करावी त्याने मन शांत होते आणि दुसर्याच्या संपत्तीवर डोळा ठेवण्यासारखे विचारही मनास शिवत नाहीत.
ववरील काही न जाही दोष आपण प्रत्येक जण अनुभवतो व असे कां होते व कसे भले करावे गे कळत नाही  ,कारण आपकी पितर संतुष्ट नसतात म्हणून त्यांच्यासाठी पित्रोत्सवात आपण त्यांचे पूजन अर्चन ,तर्पण श्राद्ध करणे आवश्यक असते  व ते त्यांक्सच्या मृत्यू तिथीस  भाद्रपद कृ प्रतिपदा ते आमावस्या या पुत्रीसत्वात कराव

सर्वात उच्चतम श्राद्ध श्राद्धपक्षांच्या तारखांवर होते.ज्या दिवशी आपल्या पूर्वजांनी जग सोडले आहे वा दिवंगत झालेत
त्याच तारखेला असलेल्या तिथीस  श्राद्धपक्षात  केलेले श्राद्ध  सर्वोत्तम आहे,
श्राद्ध पक्ष भाद्रपद गणपती विसर्जनानंतर  पौर्णिमा संपताना सुरु होतो.
ज्यांच्या मृत्यूची तारीख आठवली जात नाही त्यांच्यासाठी अमावस्या तिथ योग्य मानली जाते. बाकीची कुठलीही तिथी असेल तर  श्राद्धपक्ष श्राद्धात त्याच तारखेला केले पाहिजे.

अमावस्या/ पौर्णिमाशीच्या दिवशी श्राद्ध करणार्‍या व्यक्तीमध्ये बुद्धिमत्ता, पुष्टीकरण, स्मरणशक्ती, आकलन शक्ती, मुलगा-नातू आणि महानता प्राप्त होईल. तो  श्राद्ध उत्सवाची पूर्ण फळे भोगतो.

★ त्याचप्रमाणे प्रतिपदा  तिथीस केलेले श्राद्ध संपत्ती धन प्रद आहे आणि या तिथीस श्राद्ध केले तर संपत्ती बरकत देते व नष्ट होत नाही.
। जो द्वितीया श्राद्ध  उपासना करतो तो राजसुख मिळते.

★ तृतीया उत्तम अर्था प्राप्ती इच्छेला सार्थ करते. ही तृतीया श्राद्ध शत्रूंचा नाश करणारा व पापाचा नाश करणार आहे.

जो व्यक्ती चतुर्थीला श्राद्ध करतो तो शत्रूंभेद  पाहतो, म्हणजेच त्याला शत्रूंच्या सर्व दुष्कर्मांची जाणीव होते.

पंचमी  श्राद्ध उत्तम लक्ष्मी दायक असते

जो व्यक्ती षष्ठी तिथीवर श्राद्धकम करतो त्या देवमाणूस गणला जातो  पूज्य होतो.

जो सप्तमी श्राद्ध करतो त्याला महान यज्ञांचे गुण प्राप्त होते आणि गणांचे स्वामी होतो.

अष्टमीवर श्राद्ध केल्याने पूर्ण समृद्ध होतो.

नवमी तिथीवरील श्राद्ध  करण्यास संपन्न आणि मन मोहिनी अशी स्त्री /पत्नी मिळते.

दशमीला श्राद्ध करणारा माणूस ब्रह्मत्व  व लक्ष्मी प्राप्त करतो.

एकादशीचे श्राद्ध हे सर्वश्रेष्ठ  आहे. हे करणाऱ्यास सर्व वेदांचे ज्ञान प्राप्त होते. त्याची सर्व पापी कर्मे नष्ट होतात आणि त्याला सतत आशीर्वाद मिळतो.

द्वादशी तिथीचे श्राद्ध  करण्याने राष्ट्र कल्याण आणि मुबलक अन्न पुरवण्यासाठी करते.

त्रयोदशीचे श्राद्धसंतती , बुद्धिमत्ता, धारणा शक्ती स्वातंत्र्य, चांगली पुष्टी, दीर्घायुष्य आणि संपन्नता आणते.
चतुर्दशीची श्राद्ध अपघाताने मृत झालेल्यांसाठी केल जाते आणि ज्यांना शस्त्राने मारले जाते त्यांच्यासाठी चतुर्दशीही करावी.
अमावस्येचे श्रद्धा अशा सर्व लोकांसाठी आहे .ज्यांना विचित्र म्हणून जन्म झाला आहे, म्हणजेच तीन मुली नंतर मुलगा किंवा तीन मुलानंतर मुलगी. या दिवशी जुळे जन्मलेल्यांसाठीही श्राद्ध करावे.व वर सांगितल्या प्रमाणे ज्यांची तिथी माहित नाही त्यांच्या साठी वा स र्वांसाठी  करतात  हिला सर्व पित्री आमावस्या म्हणतात

==> कृष्णा पक्षाच्या नवमी तिथीवर अ विधवा महिलांचे साध्व किंवा श्राद्ध अश्विन (गुजरात-महाराष्ट्रानुसार भद्रपत) वर केले जाते.

==> मुलांचे श्राद्ध कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला केले जाते.

==> एखाद्या अपघातात किंवा युद्धात मरण पावलेल्यांची श्रद्धा कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीवर केली जाते.

जे या प्रकारे श्राद्धदि कर्म करतात त्यांना सर्व इच्छा प्राप्त होतात आणि  अनंतकाळ स्वर्गसुख सेवन करतात. मघा नक्षत्र ही वडिलांची अभीष्ट उद्दीष्ट सिद्धीदायक आहे. म्हणून, नक्षत्राच्या दिवशी केलेल्या श्रद्धाला अक्षय असे म्हणतात. पितृग्न नेहमीच त्याला अधिक पसंत करतात.

जे लोक अष्टकांमध्ये पूर्वज इत्यादींची पूजा करीत नाहीत, जे या प्रसंगी श्राद्ध दान करतात ते देवतांच्या जवळ जातात, म्हणजेच स्वर्ग, आणि ज्यांना नाही, ते तिर्यक (पक्षी इत्यादी)अधम जन्मा वर जातात.

श्राद्धकर्म रात्री करणे निषिद्ध आहे.
$@π√∆¥ #.©
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|