अमंगल ,अनारोग्य ,संकट नाशिनी,दोष परिहरी धुमावती देवी:
अमंगल ,अनारोग्य ,संकट नाशिनी,दोष परिहरी धुमावती देवी: 30 तारखे स धुमावती जयंती आहे त्या निमित्त "शिवंजय":संजय होनकळसे© shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।। भारतीय अध्यात्म हे किती सार्वत्रिक ,व सारसार व सर्वव्यापी आहे हे आपल्या संस्कृती ,सण परंपरा पूजा यावरून नीट विचार केला तर लक्षांत येते.नीट विचार केलातर अशासाठी म्हणतोय की आजच्या specializationच्या जगात आपण संकुची त ,डोळ्यावर झापडं लावून,विचार करतो. झापडं,blinkers,हि घोड्यास आवश्यक आहेत कारण त्याला आपल्या स्वारास सरळ न्यायचे असते,त्याने झापडं काढली तर तो उधळू शकतो.माणसाला चौफेर प्रगती करायची तर नुसती specialization ची झापडं लावून उपयोग नाही .नाहीतर वांदे होतात.आणि नेमके आज हेंच सर्वत्र दिसते भासते.फक्त उदाहरण ,विषयांतर वाटेल पण तसे नाही(पुढे कळेल), लगेच लक्षांत येईल म्हणून राजकारणाचे सांगतो ,आमचे एक चांगले साधक मित्र राष्ट्रवादीचे एवढे कायल आहेत की मोदी व त्यांच्या कामगीरी बद्दल थोडे लिहले तरी ते पर्सनल घेतात इतके की ते मोदींवर अत्यंत हीन दर्जाचे मत मांडतात वा र...