अज्ञात चेहरे ।महान मोहरे।। पुष्प पहिले :खंडाळ्याच्या घाटातून रेल्वे बांधण्याच्या घाट घालताना होण्या-या घोळाचा घाट सुकर करणाऱ्या नवनाथ सिद्धाचा आश्रम व गुफा :खंडाळा:
🕉अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम।।
अज्ञात चेहरे ,महान मोहरे।
पुष्प पहिले :
खंडाळ्याच्या घाटातून रेल्वे बांधण्याच्या घाट घालताना होण्या-या घोळाचा घाट सुकर करणाऱ्या नवनाथ सिद्धाचा आश्रम व गुफा :खंडाळा:
भाग 1
$@π√∆¥ #♂πk@£$€©
(🕉 अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
अज्ञात चेहरे ।
महान मोहरे।।
पुष्प पहिले :
खंडाळ्याच्या घाटातून रेल्वे बांधण्याच्या घाट घालताना होण्या-या घोळाचा घाट सुकर करणाऱ्या नवनाथ सिद्धाचा आश्रम व गुफा :खंडाळा:
भारताच्या सर्वांगीण सामाजिक ,आर्थिक प्रगतीत व अध्यात्म जगांत कित्येक मान्यवर व सुप्रसिद्ध महात्मे व महान व्यक्तींचं महत्व पूर्ण यौगदान आहे. पण या परिचित व प्रसिद्ध विभूतीं व्यतिरिक्त कित्येक प्रसिद्धी पराङ्मुखं विभूती आहेत, होत्या व आपल्या आसपास असतात.त्यांचं योगदान,अनेकांना घडवण्यात केलेली धडपड आम्हास व पुढी पिढीस कळली तर ते त्यांच्यासाठी स्फूर्ती व प्रेरणादायी आदर्श ठरतील , भरकटलेल्या व त्या मार्गावर व कुंपणावर असलेल्या अनेकांना आशा पल्लवित करणारे ठरेल .मी स्वतः त्याच प्रतिकात्मक जिवंत उदाहरण आहे.वडीलधाऱ्यांच्या छत्राविना कुप्रसिद्ध दलदलीत वाढ झाल्याने एक न्यूनगंड युवावस्थेतच निर्माण झाला जो आजही आहे ,भिडस्त पणाच्या रुपात ,पण आयुष्यात वळण देणारे आई, शिक्षक ,मित्र अगदी विद्यार्थी मित्र व सद्गुरू कृपा यामुळे मी घडत गेलो. व जे काही माझ्यात चांगले आहे ते त्यामुळेच. जीवनातील या बिनचेहऱ्याच्या, अज्ञात ( प्रसिद्धी लोलुप नसल्या मुळे अज्ञात )व्यक्तिमत्वावर ,जे कित्येकांच्या आयुष्यात महत्वाचे, मोलाचे मोहरे ठरले अशा व्यक्तिमत्वावर लिहावे असे
गेली अनेक वर्षे वाटत होते .बाबाजींवरील पुस्तक हे त्या पोटीच लिहलं गेले कदाचीत, कारण तो पर्यंत त्यांच्यावर भावुक सामान्यजन,साधकां साठी लिखाण नव्हतं.माझं हे पुस्तक जगातील कुठल्याही भाषे त्यांचं चरित्रात्मक असे पहिले पुस्तक , कदाचित ,ठरेल,कारण त्या नंतर त्यांच्यावर बरेच लिखाण निर्माण झाले , Awareness आला या awareness च्या सुरवातीस मी खारीचा वाटा उचलू शकलो हे बाबाजींची कृपा.त्या नंतर Management by Spiritual Quotient ,व मग सिद्ध आणि सिद्धाश्रम लिहून घेतले गेले.
त्यामुळे आता सुरु करतोय अशा अज्ञात चेहऱ्या च्या मोलाचा भूमीकेवर
अज्ञात चेहरे।
महान मोहरे।।
यातील पाहिले पुष्प , वाचक व साधक नारायणास समर्पित करीत आहे ,शतकातील गुम्नाम अज्ञात नाथ योगी गंभीरनाथ यावर ज्यांची 103 वी पुण्यतिथी 21 मार्च का आहे.
अनेक व्यक्ती ,शिक्षक यावर लिहायचे आहे सद्गुरू कृपे होईल तसे वाचक साधक भाविकांपर्यंत ते पोहचावे हि सद्गुरू चरणी प्रार्थनेच्छा
इदं न मम।)
मुंबई पुणे प्रवासात गाडी नेहमी खंडाळ्यास मधेच उभी राहते अगदी दोन तीनच मिनिटं हे मी अगदी लहान पणापासून बघत आलोय.कित्येकांनी हा अनुभव घेतला असेलच.त्याची वेगवेगळी कारणे ऐकिवात आलीत.कुणी म्हणतात बोगदा सुरु होऊन गाडी वर चढते म्हणून ती विश्रांती घेते ,पण मग दोन्ही वेळा,उतारतानाहि ,कशी थांबते.
कुणी सांगते इंजिन चेक करण्यासाठी थांबते,तर ते काम लोणावळा ,व कर्जत येथे होऊ शकते .
मग मोठा झालो तसे लक्षांत आले कि कुणी सिद्ध येथे वस्तीस होते म्हणून त्यांना वंदना म्हणून हे केले जाते .इथेच एका टेकडीवर जीचा माथा एका सिद्धासारखा दिसतो तिथे गगन गिरी व त्यापूर्वी कुणी सिद्धाने तपस केलेय.(तिथे मी आमचे मित्र संजय चव्हाण व उरणच्या इतर मित्रांबरोबर खोपोलिमार्गे गेलोय.)त्या मुळे तिथे गाड्या थांबतात असे ऐकले.पण ते सिद्ध कोण हे कळायला मला 2020, मार्च उजाडाव्यास लागले .
या ठिकाणी गाड्या उभ्या राहण्याचे प्रमुख कारण असेकी जेंव्हा रेल्वे ठाण्याहून पुढे पुण्यापर्यंत वाढवणे सुरु झाले तेंव्हा खंडा ळ्याहून,डोंगर माथ्यावरून-कडे कपारीतून मार्ग ,योग्य मार्ग कसा काढायचा हा यक्ष प्रश्न उभा राहिला.त्यावेळील अत्यंत घनदाट जंगल व सह्याद्रीच्या कठीण कडे कपारीतून मार्ग काढणे दुरापास्त व दुर्लभ होते.
ब्रिटिश तंत्रज्ञान व इंजिनीरिंग थिटे पडले. काम सोडून द्यावे किंवा काय इतकी परिस्थिती आली.
तेंव्हा येथे म्हणजे आज बोगदा 15 ,16 आहे तेथे असलेल्या गुफेतील एका सिद्ध योग्यांनी योग्य व सुकर मार्ग दाखवला व कार्य सहज व सुलभ केले.त्या योग्यास अभिवादन करण्यासाठी तेंव्हा पासून येथे गाड्या दोन मिनिटं थांबून आदरांजली वाहतात .
हे सिद्ध योगी म्हणजे बाबा सिद्ध गंभीरनाथ जी होय.गेल्या शातकातील अत्यंत प्रभाव शाली,प्रबळ व्यक्तिमत्व होते.नाथ परंपरेतील गेल्या आठ शतकातील त्यांच्याइतके प्रभाव शाली सिध्द व्यक्तिमत्व दुसरे झाले नाही. अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे स्थान उच्च आहे.
जिथे गाड्या थांबतात तिथे त्यांची गुफा आहे ,बोगद्याच्या वर थोडा चढ आहे तिथे एकात एक दोन गुफा आहेत.बोपनाथ येथील कनिफनाथ गुफेसारखाच झोपून सरपटत जाऊन आत जावे लागते.आत गोरख नाथांची मूर्ती आहे .निरव व शांत वातावरण आहे.प्रफुल्लित करणारा गारवा आहे.अध्यात्मिक ऊर्जा आहे.जवळील गावातच पंचायत दर्जा असलेला त्यांचा मठ आहे.सध्या त्यामठाचे अधिपती भगवती नाथ आहेत,जे अत्यंत प्रेमळ व बोलके व लघवी आहेत.गेली चार वर्षे हे तिथे सेवा साधना करतात,जवळ जवळ 150 ऐकर च्या वर जागा आहे.या मठात नेहमी येणारे साधक व भक्त आहेत.आमचे स्नेही श्री विश्वास पुण तांबेकर हे 1986 पासून श्रद्धेने येताहेत.त्याना समृद्ध अनुभव आहेत इथले. त्यांच्या बरोबर आमचे महाविद्यालयीन स्नेही dr नंदकुमार नाखरे,श्री संजय केळकर हि येत असतात.
तर अशा याठिकाणी 19व्या शतकांती सिद्ध योगी गंभीरनाथ यांचे पावन वास्तव्य होते हे महाराष्ट्राचे व भारतीय रेल्वेचे भाग्यच अथवा रेल्वेचा इतिहास व मार्ग क्रमण वेगळे असते.
.....................भाग2............
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3344502718898715&id=100000170606055
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
Comments
Post a Comment