दुर्मिळ ,दुर्लभ पुण्यप्रद वारुणी योग :
🕉अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।
दुर्मिळ ,दुर्लभ पुण्यप्रद वारुणी योग :
$@π√∆¥ #.©
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3302434229772231&id=100000170606055
वारुणेन समायुक्ता मधौ कृष्णा त्रयोदशी ।।
गंगायां यदि लभ्येत सूर्यग्रहशतैः समा ।। ४०-२०,नारदपुराण ।।
वरुण योग ,ज्यास वारुणी योगही संबोधतात हा फाल्गुन महिन्यात (उत्तरेत चैत्र कृष्ण पक्षात )येणारा दुर्लभ व पुण्यप्रद त्याच प्रमाणे सिद्धीकारक योग येतो.
हा योग दुर्लभ आहे कारण हा नेहमी येत नाही,पुण्यप्रद आहे कारण पुण्यसंचय,मोक्ष कारक असा आहे,याच बरोबर सिद्धीकारक आहे कारण या योगात,जो दुर्लभ व अल्प काळच असतो,सुरु केलेले कुठचेही काम सिद्धीस जाते नव्हे भरभराटीस जाते.
असा हा योग यावर्षी 22 मार्च ला येतोय ,21 मार्च रात्री 7:40 ला सुरु होऊन 22 ला सकाळी 10 :27वाजे पर्यंत आहे 22 ला उगवतीस असल्याने 22 ला धरतात.22 ला फाल्गुन त्रयोदशी असून ,शिवरात्र आहे व वरुण नक्षत्र -शत तारका नक्षत्र आहे,व साध्य योग आहे.
शनिवारी रात्री महा वारूणी तर रविवारी सकाळी 10 :27 वारूणी योग आहे.
या योगात गंगा स्नान ,पंचक्रोशी काशी वारूणी यात्रा,दान व उपवास केल्याने करोडो सूर्य ग्रहणाचे एवढे पुण्य प्राप्त होते.
चैत्रासिते वारुणऋक्षयुक्ता त्रयोदशी सूर्यसुतस्य वारे।
योगे शुभे सा महती महत्या गंगाजलेर्कग्रहकोटितुल्या।।
(त्रिस्थलीसेतु)
चैत्रे मासि सिताष्टम्यां शनौ शतभिषा यदि । गंगाया यदि लभ्येत सूर्यग्रहशतैः समा ।
सेयं महावारुणीति ख्याता कृष्णत्रयोदशी । अस्यां स्नानं च दानं च श्राद्धं वाक्षयमुच्यते ।।
भविष्य पुराण .
या योग्य स्नान दान व श्राद्ध करावे
या योगात स्नान अत्यंत महत्वाचे आहे ते गंगेत ,प्रयाग काशी येथे जास्त लाभ प्रद आहे.इतर विकल्प असले तरी काशी स्नानच श्रेष्ठ .पहा आपल्याला टोमॅटो आम्लेट करायचे तर चांगले टोमॅटो घ्यावे कारण टोमॅटो आम्लेट मध्ये टोमॅटो हा घटक महत्वाचा आहे तो चांगल्याच प्रतीचा हवा ,पण दुसऱ्या कुठल्या भाजीत चवीसाठी टमोटो टाकायचा तर मग साधा चालेल,तसेंच योगाचा पूर्ण फायदा घ्यायचा तर गंगास्नान व काशीच महत्वाची,म्हणून काशीस स्नान महत्वाचे अन्यथा गोदावरी, नर्मदेतपण चालते कि इतकेच काय घरी स्नानही चालेल.पण गंगा स्नान महत्वाचे.
तर गंगा स्नान करून दान करणे हेही जास्त उपयुक्त ,योग्य स्थळी योग्य दान होईल .
तिसरं पूजा करावी तीही शिवाची स्नान करून शिवालयात लिंग पूजा ,अभिषेक व नारळ पाणी ,बिल्व व दोन केळी वाहावी,जमल्यास यद्न्य याग करावा.हे अत्यंत पुण्यकारक व मोक्षदायी असते .
तसेच या योगात कुठचेही कार्य सुरू केल्यास ते फळते व फुलते व उन्नत होते.
विद्यारंभ सुरु केल्यास विद्या लाभ व परीक्षेत घवघवीत यश प्राप्त होते,training सुरु करावे.
घर बांधण्यास सुरु करावे ,विवाहाची बोलणी करावीत ,विवाह होत नसल्यास अडचणी येत असल्यास वा दुरावा असेल तऱ या पर्वात स्नान,दान व शिव पूजा करावी.
मंत्र सिद्ध करण्यासही हा योग चांगला या योगात तो त्वरित शुद्ध होतो अट इतकीच स्नान करून शिव पूजन करावे व कार्य सुरू करावे.प्रॉपर्टी घेण्यास हा योग चांगला, मूलपुरुष व कुलपुरुष उपासना सुरु करावी.कुलपुरुष मंत्र व पितृ मंत्र म्हणावा वा श्राद्ध करावे पितरांना मुक्ती व आपणास त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
काशीस जर गेले असाल तर काशी वारुणी पंचक्रोशी यात्रा करणे आणखीन शुभप्रद . तर असा हा वरुण योग वा वारुणी योगाचा पूर्ण फायदा भाविक ,भावुक व साधकांनी घ्यावा .
मी खरंतर मार्च मध्ये परदेशी,पूर्व आशियात जाणार होतो पण corona मूळे मला ते होल्डवर ठेवावे लागले ,वाईट वाटले.पण जगले ते योग्यच झाले ,त्यामुळे हा पर्वयोग लाभ व्हावा हीच सद्गुरुइच्छा.मी काशीस जाणार यावेळेस .गेली दोन वर्षे मला सतत काशी योग लाभतोय .यावर्षी माघी कुंभ निमत्ते प्रयाग व काशी येथे साधना करण्यास मिळाली व आता हे पर्व.
खरतर 22 ला रविवार आहे ,20 रात्री (महानगरी)वा 21 का पहाटे (LTT वरून गाडी आहे)निघून 22 ला स्नान करून परतीचा प्रवास करून चाकरमानी,नोकर दारही हे पर्व साध्य व सिद्ध करू शकतात ,फक्त इच्छा बळकट हवी.GOD HELP THOSE WHO HELP THEMSELVES
चैत्रे मासि सिताष्टम्यां शनौ शतभिषा यदि । गंगाया यदि लभ्येत सूर्यग्रहशतैः समा ।।
देवीभागवत पुराण :
"वारुणं कालिकाख्यञ्च शाम्बं नन्दिकृतं शुभम्।
सौरं पाराशरप्रोक्तमादित्यं चातिविस्तरम्॥"
#त्रिस्थलीसेतु
चैत्रासिते वारुणऋक्षयुक्ता त्रयोदशी सूर्यसुतस्य वारे।
योगे शुभे सा महती महत्या गंगाजलेर्कग्रहकोटितुल्या।।
तर आधिकस्य अधिकं फलं या विचाराने प्रत्येकाने जमेल तेवढे नक्की करावे.
$@π√∆¥ #©
Comments
Post a Comment