भाग 2 गंभीरनाथ🕉अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम।।अज्ञात चेहरे ,महान मोहरे।पुष्प पहिले खंडाळ्याच्या घाटातून रेल्वे बांधण्याच्या घाट घालताना होण्या-या घोळाचा घाट सुकर करणाऱ्या नवनाथ सिद्धाचा आश्रम व गुफा :खंडाळा
भाग 2 सिद्ध योगी गंभीरनाथ
🕉अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम।।
अज्ञात चेहरे ,महान मोहरे।पुष्प पहिले
खंडाळ्याच्या घाटातून रेल्वे बांधण्याच्या घाट घालताना होण्या-या घोळाचा घाट सुकर करणाऱ्या नवनाथ सिद्धाचा आश्रम व गुफा :खंडाळा:
भाग 2
योगी गंभीरनाथांचा जन्मेतिहास ज्ञात नाही, पण त्यांचा जन्म काश्मीर येथील धनी कुटुं बात झाला होता.ते सत्शील,शांत,आध्यात्मि क कल असलेले असेच होते.युवावस्थेतच त्यांना वैराग्य लाभले होते.त्यामुळे ते गोरख पूर येथे गेले व योगी गोपालनाथ यांची दीक्षा प्राप्त केली.त्यांनी तिन्ही योग,हठ,लय,राज योग पद्धतीमध्ये सिद्धी प्राप्त केली.
योगिराज बाबा गम्भीरनाथ,हे सिद्ध पुरुष, योग मानव और समाधि योगसिद्ध महात्मा होते.त्यांचा प्रभाव असाधारण आहे.त्यांनी नाथ सम्प्रदाय योग सिद्धांतास पुनर्जीवन दिले.कारण त्यावेळी पीठात अनेक समस्या होत्या इतक्या कि त्याच्या अस्तित्वावरच सावट आले होते.यांच्या कारकीर्दीत गोरख पूर पिठास नव जीवन प्राप्त झाले,ज्या वेळी गोरखपूर पिठास उतरती कळा लागली होती त्यावेळेस यांनीच पिठाचा पुनरुद्धार व पुन:निर्माण करून पिठास सन्माननीय स्थान प्राप्त करवून दिले.बाबा गंभीरनाथ यांच्या आध्यात्मिक प्रभावामुळे गोरखनाथ मंदिरास नवजीवन मिळाले.त्यावेळी त्यांनी पीठाच्या धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृति परंपरा याचे संरक्षण व त्या बरोबरच संवर्द्धनपण केले.
नाथयोग परंपरेत गेले सात-आठशें वर्षात त्यांच्या सारखा योगी हिमालय ते कन्याकुमा री पर्यंत विसव्व्या शतकांत झाला नाही. एवढ्या सिद्ध योग्याच दर्शन दुर्लभ असतं. त्यांच्यामुळे मानवता योग-शक्ति ने संपन्न झाली.विसव्व्या शतकांत त्यांनी गुरु गोरखनाथयांची योग साधना पद्धतिच प्रतिनिधित्व करत योग व ज्ञान का समन्वय साध्य केला.या काळातील ते योग रहसयाचे सर्वमान्य मर्मज्ञ, मायाबंधन मुक्त सिद्ध पुरुष होते.त्यांनी महर्षि पतंजलि व गुरु गोरक्षनाथ योग परंपरा यामध्ये समन्वय स्थापित केला. त्यांनी गुरु गोरखनाथ योग परंपरा माध्यमातू न शिव-शक्तिच्या एकात्मकता-कुंडलिनी जागरण साक्षात्कार केला. ते शांति व गंभीरतेचे उज्वलतम रूप होते.अनेक मोठे संतों महात्मांनी त्यांच्या चरणी श्रद्धा समर्पित कर आत्ममोक्ष साधन प्राप्त केलंय. गोरखनाथ मंदिरास त्यांच्या आध्यात्मिक प्रभाव मुळे नवजीवन मिळालं.मंदिरातील एक छोट्याश्या खोलीत राहणाऱ्या या अल्पभाषी सिद्ध योग संताचा प्रभाव दूर दूर पसरला होता.
त्या नंतर दिग्विजय नाथ जे त्यांचे शिष्य होते त्यांनी गोरखपूर पीठ सांभाळले.गंभीरनाथ हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री,गोरखपूरपिठाधिश आदित्य योगी यांचे आजोबा गुरु कारण ते दिग्विजय नाथ यांचे शिष्य आहेत. गंभीरनाथजी हे स्वामी प्रणवानंद,ज्यांनी 'भारत सेवा संघ'स्थापन केला,यांचे गुरु व प्रेरणास्रोत
याष्य या महान संत योग्याने 21 मार्च 1917 फाल्गुन कृ त्रयोदशीस नाथसमाधी घेतली.गंमत म्हणजे तो दिवस वारुणी योग पर्व असा होता.संध्याकाळी चार नंतर हा योग व साध्य योग होता.
2016- 17 स त्यांची शताब्द पुण्यस्थिती धडाक्यात साजरी केली गेली.त्यावेळी भारतीय डाक विभागाने त्यांच्या स्मृति प्रीत्यर्थ डाक तिकीट काढले.इतर अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले.
हिंदूस्तान अकॅडेमीक्स या संस्थेमार्फत नाथ परंपरा व संप्रदायाच्या संशोधन व अभ्यासा साठी विभाग स्थापन केला गेलाय.उत्तर प्रदेशातील सहाव्वीच्या वर्गास गंभीरनाथ हा धडा शिकवला जातो.
ब्रह्मालीन महंत दिग्विजय नाथ त्यांना आपला परम गुरु मानत असत.ते नेहमी म्हणत कि गोरखमठ व मंदिरसेवेत ते जर काही करु शकले ते सर्व परमगुरूच्या कृपेच द्योतक आहे, माझ्या सर्व कर्मशक्ति व विचारशक्क्तींच मूळ हे माझे परम गुरु आहेत ज्यामुळे मठ व मंदिर यांची प्रगती झाली.माझ्या जीवनातील कित्येक मोठं मोठी संकटं त्यांच्या कृपेने दूर झाली.
अश्या या सिध्दयोग्याच्या उर्जास्थानी जाण्याचं भाग्य मला लाभले हि सद्गुरू कृपा.संयोगवश येत्या 21 मार्चला त्यांची 103वी पुण्यतिथीही शनी प्रदोष मिश्रित त्रयोदशीस वारुणी योगातच येतेय .ब्रह्मलीन योगी गंभीरनाथ चरणी कोटी कोटी प्रणाम!
shivanjaydrsanjayhonkalse.blog spot.com ©
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3344944262187894&id=100000170606055
Comments
Post a Comment