पितृशास्त्र भाग 14,15 16 : पिंड पूर्वजांना कसे पोहचते?
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2326540180694979&id=100000170606055
पितृशास्त्र भाग 14:
पिंड पूर्वजांना कसे पोहचते?
शिवंजय डॉ संजय होनकळसे©
पिशाचा गुह्यका: सिद्धा: कूष्माण्
आपल्या आतापर्यंतच्या आलेखावरून हे स्पष्ट होते की पितृउत्सव हा आपल्या कडे सर्वात मोठा उत्सव आहे .
हा उत्सव 15 दिवस कमीतकमी वा16 दिवस चालतो .इतर सारे उत्सव या पेक्षा कमी दिवसांचे असतात. जसे नवरात्र व दशहरा 10 दिन.गणपती 11 दिवस ,दिवाळी 5 दिवस ,वा सहा ,षड रात्र सहा दिवस, होली व रक्षा बंधन गोकुळ अष्टमी 2 दिवस इत्यादीड कुंभ मेळा हा जर उत्सव धरला तर तो मात्र 2 ते 3 महिने चालतो .
पित्रोत्सव हा सर्व भारतभर पाळला जातो जसा गणेश उत्सव महाराष्ट्रात , पोंगल दक्षिणेत, दुर्गा पूजा बंगाल ,गरबा गुजरात असं यांचं क्षेत्र मर्यादित नाही ते भारतभर आहे.
हा आपले पूर्वज ज्यांच्या वंशात आपण जन्मलो ,जयचे जिनस्,कुल व गोत्र परंपरा आपण धारण करतो त्यांच्या बद्दल कृतज्ञता दर्शवण्याचा उत्सव आहे.
हा उत्सव वेग वेगळ्या नावाने व पद्धतीनं जग भर मनवतातात.
उदाहरणार्थ आमचे सुहृद शेखर सोहोनी जे सिंगा पुरला वारंवार जातात ते माझया इतर देशां तील याउत्सवांच्या लेखास पहा पितृशास्त्र भाग 5.:shivanjay dr sanjayhonkalse. blogspot.com वा https://m.facebook.com/story.php?story_fbid=2319052071443790&id=100000170606055 उद्देशून लिहतात"खूप छान आणि खरी माहिती।
मी सिंगापूरमध्ये पण हे बघतो। तेथे व्यक्ती ज्या दिवशी जाते त्यादिवशी प्रत्येक वर्षी स्मरण करतात।
जवळ जवळ प्रत्येक सोसायटी च्या कोपऱ्यात एक मोठा ड्रम ठेवलेला असतो आणि तेथे छापील चित्र ,डौलर, मोटारी केक असे कागद त्या व्यक्तीचे स्मरण करून जाळतात करण त्याला त्या वस्तू स्वर्गात मिळतील आणि तो खुश राहील म्हणून.
हिंदू धर्म बद्दल टिका करणाऱ्यांची हल्ली फार फॅशन आली आहे"
खरतर आपल्याकडे हा उत्सव फार शास्त्रोक्त व योग्य पद्धतीने साजरा होतो.अगदी पितरलोक ,पिशाच लोक ,व त्यांचा अस्ट्रोलाजीकल विचार करून याचे दिवस ठरले आहेत
दशक्रिया व श्राद्ध तर्पण करताना पिंड दान करतात अशी आपली प्रथा आहे .
ते पिंड कावळ्याने स्पर्शल्यासच पितर तृप्त झाले असे मानले जाते,यालाच आपण काकस्पर्श असे म्हणतो .
कावळा शिवणे व कावळाच का इतर पशु का नाही?
पितृपंधरवड्यात कावळा शिवण्याची आपण वाट का पहातो?
माणसाच्या १० वा १३ व पितृपंधरवड्यात कावळेच का यावे लागतात?
गाईला मागुन नमस्कार का करतात?
वा गंगा व यमुनेच्या व नदितीरीच श्राध्द का करतात.का करावे?
असे अनेक प्रश्न बुद्धिवादी बुद्धिमान प्राण्यास पडणे साहजिकच आहे.पण बुद्धी prograamed व direct नीट केली की यांची उत्तरे मिळतात फक्त काविळीची नजर न लावता बुद्धीला श्रद्धेची झालर लावणे हे आत्यंतिक महत्वाचे .मी माझ्या व्यवस्थापनशास्त्र ,वाहतूक व्यवस्थापन व अर्थशास्त्रातील अनेक theories समजून सांगताना मी हे मावर्जून माझ्या पाल्यांना समजावून सांगतो.
अध्यात्म शास्त्रांत तर हे आणखीन व आणखीन जास्त अत्यावश्यक व महत्वाचे असते कारण हे तर्कां पलिकडचे ( पण अतार्किक वा अगम्य rather बुद्धिगम्य नसते तर बुद्धीस तर्क व श्रद्धा यांचे रोपण करून व्यवसाईका बुद्धीने सहजसाध्यच नव्हे तर सहज सिद्ध होऊ शकते.
असो आपल्याकडे ते शास्त्रोक्त (श्रुती स्मृती युक्त वेदोक्त) कथा रूप प्रश्नउत्तर वा गुरुशिष्य सवांद रूपात (पुराणोक्त) वा परंपरा युक्त असते,।
थोडक्यात अनेक मार्गे ,जस ज्याचा पिंड तसे वा जसे ज्याला समजेल तसे सांगून ठेवले आहे ,प्रॉब्लेम आपण त्याकडे चुकूनही पाहायला तयार नसतो हा आहे .पण एखाद्याने तर्काने सांगितले मग ते चुकीचे का असेना आपण स्वीकारतो व याला खरेतर आंधळे पणा न म्हणता ,बुद्धी वाद म्हणत वाद घालत बसतो .याचाच पुरेपूर फायदा इतरधर्मीय घेतात .तेंच जे आपल्या लाडक्या चाच्या बापूंनि,पूर्वनेत्यांनी स्वार्थपायी ,निधर्मवाद नावाच्या शोभिवंत भूलपाडणाऱ्या नावाखाली हेंच केले व आपल्यास आपल्या परंपरा ,श्रद्धा ,एवढेच काय राज्यव्यवस्था यापासून कोसो कोसो कोसो ,व्यवस्थित व्युव्ह रचून ,दूर ठेवले.असे केले हे कळायला फार उशीर लागतोय.
असो ,याबाबत प्रथम पुराणोक्त कथेचा उल्लेख करूया............................
To continue पितृशास्त्र भाग 14 .....
इदं न मम्।
शिवार्पणम्।
'शिवंजय': डॉ संजय होनकळसे©
drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
पितृशास्त्र भाग 14
दशरथ महाराजांचे निधन झाले तेव्हां राम, सिता, लक्ष्मण वनवासंत होते.त्यामुळे रामाला आपल्या वडीलाचे कोणतेच कार्य करावयास मिळाले नाही.रावणवध करुन राम राज्यवर बसला तरी सुध्दा रामाने वडीलांचे श्राद्ध केले नव्हते.
एकदा राम व सिता जंगलांतुन जात असताना एका तळ्यामधे आकाशातुन फार मोठी वस्तु त्या तळ्यात पडते. राम जवळजाउन बघतो तर तो स्वर्गातुन पडलेला य़क्ष असतो.तो रामाला सांगतोकी दशरथ महाराजांना मुक्ती मिळालेली नाही कारण त्याचे क्रियाकर्म व्यवस्थीत झालेले नाही.
रामघरी येतो व वडीलाचे श्राध्द घालावयाचे आहे त्याची तयारी करणाची आज्ञा देतो. ही गोष्ट जेव्हां राजपुरोहीताच्या कानावर जाते तेव्हां ते पुरोहीत सांगतात की स्वकमाईच्या पैशाने क्रियाकर्म केले तरच महाराजांना मुक्ती मिळेेल.राम व सिता महाराजंचे क्रियाकर्म करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी येतात.सकाळी राम सितेला जमुना किनारी बसवुन गावांत काही मिळते का बघण्यास जातो. दुपारची बाराची वेळ होते तरी राम परत येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसतात.मघ्यान्ह टळायला लागते या चिंतेत, सिता व ब्राम्हण बसलेले असतात त्याच वेळेला नदीतुन दशरथ महारांजांचे दोन्ही हाताची ओजंळ बाहेर येते आपला शिधा घेण्यासाठी.
सिता म्हणते मजजवळ देण्याारखे काहीही नाही. महाराज तिला सांगतात तु ज्याठिकाणी बसली आहेस तेथील वाळु माझ्या हातावर दिली तरी चालेल सिता त्याप्रमाणे करते व तातकाळ हात अदृष होतात.त्याच वेळेस राम तिथे येतो व सितेला म्हणतो तु हे काय केलेस, माझ्या वडीलाच्या हातावर वाळु ठेवलीस ती म्हणते असे करण्यास महाराजांनीच सागीतले. ह्याला हा झाडावरचा कावळा, ही गोमाता साक्ष आहे, हे भिक्षुक साक्षआहेत.यमुना माता साक्ष आहे. राम प्रथम कावळ्याला विचारतो हे खरे आहे का ?
कावळा भगवान रामा पुढे काहीही न बोलता गुपचुप बसतो. भिक्षुक,गोमाता,यमुना नदीसुध्दा शांत बसते.सर्व काही यांच्चा समोर झालेले असताना सुध्दा रामाच्या भिती पोटी गुपचुप बसतात.सिता संतापते व म्हणते सत्य माहीत असुन सांगायला तुम्ही कचरतात,मला खोटी पाडतात, मी तुम्हा सर्वाना शाप देते.कावळ्या तु बाहेरुन तसा आतुन सुध्दा काळा आहेस आज पासुन लोक तुला अवलक्षणी समजतील तुझे दर्शन अपशकुन समजतील.
गोमाते तु एवढी पवित्र तु पण तशीच,तुला शाप देते तुझ्या पवित्र तोडांने घाण खाशील तुला लोक अपवित्र समजतील.
भिक्षुक तु ब्राम्हण असुन सुध्दा असा वागला तु आयुष्य भर भिकारी रहाशील. जमुने माते तुझ्या उदरातुन माझ्या ससुरांचे हात आले होते तरी तु गप्प बसली मी तुला शाप देते डाव्या बाजु पर्यंत व उजव्या बाजु पर्यत माझी नजर पोचेल तीतपर्यत तुझे पात्र कोरडे पडेल.
एवढे सर्व होइ पर्यंत राम शांत बसलेला असतो. सितेने संतापुन एवढे जळजळीत शाप दिल्याचे पाहुन रामाला वाटते सितेचे म्हणने खरे आहे.मग तो कावळा,गाय,भिक्षुक व नदी ला विचारतात तुम्ही सर्वजण असे का वागलात.चौघे म्हणतात भगवंता तुमच्या समोर आम्ही काय बोलणार म्हणुन आम्ही गप्प बसलो.राम म्हणतो केवळ माझ्यामुळे तुम्हाला शाप मिळाले आहेत ते मी सितेला परत घेण्याची विनंती करतो पण सिता शाप परत घेण्यास साफ नकार देते.शेवटी राम म्हणतो यावर उशाप दे.
सिता कावळ्याला म्हणते जरी लोक तुला अवलक्षणी समजत असतील तुझे दर्शन अपशकुन समजतील मी तुला उशाप देते तरी सुध्दा लोक १० ,१३ व व वर्ष श्राध्दाला पितृपंधरवड्यात पितरांच्या नावानी नेवेद्याचे ताट ठेवतील तुुला आग्रहाचे आमंत्रण देतील,या दिवशी तु जेवल्या शिवाय ते जेवणार नाहीत म्हणुन आपण १० ,१३, वर्ष श्राध्दाला व पितृपंधरवड्यात कावळा शिवण्याची वाट पहातो.
सिता गाइला म्हणते जरी तु तोडांनी घाण खाशील मी तुला उशाप देतेकी तरी सुध्दा लोक तुझी पुजा करतील पण पाठी मागुन. म्हणुन गाइची पुजा किंवा नमस्कार पाठी मागुन करतो.
सिता भिक्षुकाला म्हणते तु आयुष्य भर भिकरी रहाशील पण मी तुला उशाप देते ज्या वेळेस तुजकडे घरांत लग्न वगैरे कार्य निघले त्या वेळेस तुला धर्मकार्याचे काम मिळेल व तुझ्या घरांतले कार्य पुर्ण होइल.
सिता यमुनेला म्हणते उजव्या व डव्या बाजु पर्यंत माझी नजर पोचते तितपर्यंत तुझे पात्र कोरड्च राहील पण मी तुला उशाप देते की जी लोक तुझ्या तटावर य़ेउन क्रिया कर्म करतील त्यांना परत क्रिया कर्म करण्याची गरज भासणार नाही.आज आपण पहातो की यमुना नदीचे पात्र मध्य भागी कोरडे आहे.
हाइ कथा जर आपण गयेस श्राद्धकर्म करण्यास गेलो तर आवर्जून सांगीतली जाते. मी गुरुकृपे दोनदा, एकदा मातोश्रीना घेऊन व एकदा सर्व विद्यार्थी मित्रांना घेऊन, गया श्राद्ध करवून घेतलंय जमल्यास गयाश्राद्ध महत्वावर पण लिहिण्याची इच्छा आहे.पाहूया!
पण सध्या कावळा पुराण पूर्ण करूयात........
To be cintinued ....
भाग 15
इदं न मम्।
शिवार्पणाम्।
शिवंजय डॉ sanjay होन कळसे
drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
Xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxcxxxxxxxxxxxxxx
पितृशास्त्र भाग 15
शिवंजय डॉ संजय होनकळसे
हे झाले कावळा,गाय व पिंडाचे पौराणिक पौराणिक महत्व,ज्यामुळे देशाची परंपरा व संस्कृती नियमित होत असते व जगांतील सर्व देश व तेथील लोक ती पाळतात ब्रिटन ,रोम इ याना तास पारंपरिक इतिहास आहे व त्यांना त्याचा अभिमान असतो ब्रिटनच्या पर्यटन व्यवस्थेच तर तसं ब्रीद वाक्यच आहे.अमेरिकेस तेवढा मोठा व महान इतिहास नाही म्हणून त्यांनी त्या आता तयार केल्यात जसे थँक्स गीविंग, martyer day ,इत्यादी.आपल्याकडे याला विशेष व प्राचीन इतिहास आहे म्हणून ते आऊट डेटेड नाही होत कारण त्या मागे शाश्वत मूल्य आहेत.आपक्त परंपरा व पद्धती मागे शास्त्रीय भौगोलिक ,climatalogical इ विचार पण असतो.
कावळ्याच्या ,पिंडांचा व पितरांचा शास्त्रीय संबंध पाहूया
पिंडदान आणि कावळा :
प्रत्येक प्राणी हा ईश्वर प्रेरित गुणांचा खजिना घेऊन विहारतो विचरतो.काही प्राणी पक्षी ह्याना नैसर्गिक वरदान असते .
उदा.
1)गाढव:
गाढवाला विषबाधा समजते.तो विषारी पाणी कधीच पित नाही.म्हणूनच पूर्वी लढाईवर गाढवे घेऊन जात त्यांना पाणी देत नसत सैन्याचा तळ पडल्या नंतर त्या पाण्यावर गाढवे सोडत जर गाढव पाणीं प्याला तरच सैन्य पाणी पीत होते.
2)कासव:
एकाग्रता वा concentration हि कारावास देन आहे. फक्त दृष्टीने पिल्लाचे पोषण करते .भगवंताचे तगाई अशीच एकाग्रता असावी याची आठवण व द्योतक म्हणूब ते आपल्या मंदिरांमध्ये असते.
3)कुत्रा:
त्याच प्रमाणे कुत्रा भविष्य जाणतो काही वाईट घडणार असेल तर ती केविलवाणी किंचाळतात .किल्लरी भूकम्पाच्या आधी ही प्रचिती आली होती .
4) गिधाड
याची दृष्टी अत्यंत तीक्ष्ण असते प्राणी मेला की क्षणात दूरदूर अंतरावरून गिधाडांच्या थवे तेथे येतात कशा मुळे होते हे. यामुळेच पारसी धर्मांत शव गिधाडांस अर्पण करतात.
5)मांजर
हा प्राणी अंधारात चांगले पाहू शकतो.
6)वटवाघूळ
दिवसा दिसत नाही पण रात्री पाहू शकते.
७)हत्ती
शार्प मेमरी बहाल आहे
८) कोळ्यास धुर्तता व लँडग्यास लबा डी
7)आता कावळ्या संदर्भात
माणूस मरतो म्हणजे त्यातील कुठला तरी घटक बाहेर पडतो कुणी त्याला आत्मा , कुणी जीव , कुणी प्राण , कुणी चेतना असे म्हणतो बाहेर काही तरी पडते आणि ते अगोचर म्हणजे न दिसणारे असते .हिंदू धर्मानुसार बाहेर पडणार जीवात्मा असतो तो कुणाला दिसत नाही .परंतु पिंडदाना पर्यंत तो तेथे घुटमळत असतो .त्याला सर्व दिसते पण त्याला कोणी पाहू शकत नाही ज्या प्रमाणे गाढव , कुत्रा, मांजर, गिधाड, वटवाघूळ किंवा कासव ह्यांना विशिष्ट शक्ति असते तशीच एक शक्ती कावळ्याच्या ठिकाणी असते त्याला तो आत्मा दिसतो. ज्यावेळी कावळा पिंडाला शिवायला जातो त्यावेळी तो आत्मा जर अतृप्त असेल तर आत्मा कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाही. पण त्याचा कुठे जीव अडकला असेल आणि त्याचा उघड किंवा मनात संकल्प केला व त्याची इच्छा पूर्ण करू असा शब्द दिला तर आत्मा त्याला पिंड स्पर्श करू देतो .आणि तृप्त असेल तर पटकन कावळा शिवतो अशी मान्यता आहे .ह्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न हे बरोबर की चूक हेही सांगू शकत नाही पण ही प्रथा अनादी काळा पासून चालत आली आहे .रामायणात तसेच महाभारत ह्याचा उल्लेख आढळतो. महाभारत युद्धा नंतर धर्मराज पिंड दान करतो त्यावेळी कृष्ण त्याला अजून एक पिंडदान कर्णाच्या नावाने कर म्हणून सांगतो त्याचा सपूर्ण विधी गरुड पुराणात आला आहे .एवढी प्राचीन परंपरा आहे म्हणजे त्यात काही तरी तथ्य असावे असे मला ,'शिवंजय'डॉ संजय होन कळसे,वाटते आपले मत भिन्न असू शकते .
काही लोकांनी जिवंत माणसाच्या नावाने पिंडदान केले तर तेथे कावळा शिवला असे दाखवून हा विधी खोटा आहे असे भासवले मला तरी त्यात विशेष काहीच वाटले नाही.जो माणूस जिवंत आहे त्याचा आत्मा तेथे असण्याचा प्रश्नच नाही कावळ्याला अडवायला आत्मा नसतो त्यामुळे तो शिवतोच. आणि जिवंत माणसाचे पण केले जाते हे विशेष कित्येकांना माहीत नसते .कित्येक जण एकटे असतात ,वा संन्यास घेताना स्वतःचे श्रद्ध करवून घेतात.मी शिवंजय संजय,स्वतः काही जीवंत व आपल्या पासू न दूर गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध माझ्या विद्यार्थ्यांसमवेत घालतो.
सर्वच धर्मात अश्या प्रकारचे विधी असतात त्यावेळी आपण गप्प बसतो .पण हिंदू धर्मातील ह्या विधी कडे अंधश्रद्धा म्हणून पाहिले जाते.
असो कावळ्याच्या या विशेष गुणांस काम दृष्टी म्हणतात हे आपण ऐकून असतोंच.
असो अनुमान ,अनुभव ,व अनुभूती यांत फरक असतो असे मी नेहमी सांगतो . पितृ शास्त्र व पर्यायाने अध्यात्म शास्त्र हा अनुमानाचा प्रांत नक्कीच नाही एवढेंच म्हणेन।
इदं न मम्।
शिवार्पणम्।
शिवंजय डॉ संजय होनकळसे
drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
Comments
Post a Comment