भाग2 सूक्ष्म देहविज्ञानची अनुभूती: काशीतील अति प्राचीन

सूक्ष्म देहविज्ञानची अनुभूती: काशीतील अति प्राचीन आदी भैरवी शितला गुफा:

काशी येथील अतिप्राचीन गुफा जेथे बाबाजी ,त्यांची  मृत्युंजय बहिण नागलक्ष्मी व शामाचरण यांची भेट झाली.©:
भाग 2: बाबाजी ,महाशय ,नागलक्ष्मी भेंट।
$@π√∆¥ #♀πk@£$€
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com

देवीचे विग्रहाच्या खाली आणखिं एक गुफा दिसली. चौकशी करता कळले की तिथे प्रवेश वर्ज्य आहे व गुफेचे व्यवस्थापक महंत पंडित शिवप्रसाद तिथे रोज  सकाळी 4 वाजता येऊन साधना करतात.माझी साधना करुन झाल्यावरच माझ्या मनांत विचार आला  की:
या प्राचीन गुफेत आदी मायेने अनेकांना दर्शन ,मार्ग दर्शन व साक्षात्कार करवला. तैलंग स्वामी ,टिना स्वामी याना येथेच साक्षात्कार व दर्शन झाले.लाहिरी महाशय व तैलंग स्वामी यांची मैत्री होती,तैलंगस्वामी खरेतर 300च्या वर वयाचे व लाहीरी जी 60चे पण त्यांचा एक मेकांवर लोभ व बंधूभाव होता.
1870 व /वा 1880 च्या दशकांत लाहीरीजी,राम गोपाळ,ज्यांनी निद्रेवर जय मिळवला होता,sleepless saint म्हणून प्रसिद्ध होते, यांची ऐतिहासिक भेट बाबा जी व त्यांची मृत्युंजय बहीण  नागलक्ष्मी अम्मा यांनी या शिलेतच दर्शन दिल्याचा उल्लेख 'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी ' मध्ये आहे. चला जागवूया व जगूया तो प्रसंग ,ते क्षण:
"रामगोपाल हे कधीही न झोपणारे  साधू होते.यांना एकदा लाहिरी महाशयांनी दशाश्वमेध घाटावर मध्यरात्री पाठवले.तेथे गेल्यावर ते बसलेल्या ठिकाणची एक शिळा आपोआप वर होत गेली व त्या खाली असलेल्या भुयारातून एक चिरतरुण व लावण्यवती स्त्री अधांतरी  हवेतून वर येऊ लागली,त्या स्त्रीस एक तेजोवलंय होते. त्या महावतार बाबाजींचे भगिनी होत्या,त्याच वेळी गंगाईच्या प्रवाहातून प्रकाश मय (Divine Light)रूपांतून लाहिरी महाशय प्रकट झाले व आकाश मार्गाने महावतार बाबाजी आले.यांचं वेळी लाहीरीजी अमरत्व व मृत्युं जय या विषयावर आश्रमात भाष्य करीत होते"
(Ref :"महावतार बाबाजी" शिवंजय:डॉ संजय होनकळसे,गुरुतत्व प्रकाशन ,प्रकरण 14 ,पान 79).
हा  एक सूक्ष्म देह विज्ञानाचा जीता जागता नमुनाच होय.
हि एक ऐतिहासिक भेंट आहे कारण या भेटीतच बाबाजींनी आपला देह कार्यभाग संपवण्याचा विषय  काढला होता ,पण माता नागलक्ष्मी यांनी त्यांना परावृत्त केले व सांगितले की त्यांचं कार्य जन संपर्क व विविध धर्माचे ध्रुवीकरण करणे (Unification of World Religion) हेआहे व ते होई पर्यंत तुम्हाला देह त्याग  करता येणार नाही. बाबाजी यास सहमत झाले व त्यांनी तसे वचन आप्त भगिनी माता नागलक्ष्मी यांना दिले ते येथेच.त्यामुळेच बाबाजी आजही कार्यरत आहेत व अध्यात्मात जन संपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक दैवी विभूती व सिद्ध याना त्यांचे कार्यभाग व जबाबदारी दिली गेलीय त्यासाठीच ते कार्यरत असतात.(डिटेल्स पहा:सिद्ध आणि सिद्धाश्रम:शिवंजय डॉ संजय होनकळसे).
हि घटना 1870 व 80 च्या आसपास ची म्हणजे त्या वेळी हि गुफा गुप्त स्वरूपांत होती. एका मोठ्या शिळे खाली ती होती .माता नागलक्ष्मी त्या शिळे खालून, शिळा वर उचलली जाऊन वर येत्या झाल्या.म्हणजेच शिळा घळी स्वरूपात होती. पण मी साधना करताना विचार आला की ही सद्य गुफा तर घळ रूपांत नाही. आतून फरशी काम केले गेले य व ते फार तर 50 ते 60 वर्ष जुने असावे.
हा विचार करत मी उठत असंताना या घळी खाली ती आणखिं एक  तळ गुफा दिसली .विचारणा केल्यावर तीथे सर्वाना प्रवेश नाही प्रवेश निषिद्ध आहे.तेथे तेथील व्यवस्थापक महंत पंडित शिवप्रसाद रोज पहाटे 4 ते 7 पर्यंत साधना करतात असे कळले.मग काय त्यांना भेटण्याचा प्रयत्न म्हणून चौकशी केली व नंतर  पुढील इतिहास समजला .ते आता आपण पाहू.
To be continued.......
shivanjaydrsanjayhonkalse. blogspot.com
$@π√∆¥ # ©

सूक्ष्म देहविज्ञानची अनुभूती: अति  आदी भैरवी शितला गुफा:काशी येथील अतिप्राचीन गुफा जेथे बाबाजी ,त्यांची  मृत्युंजय बहिण नागलक्ष्मी व शामाचरण यांची भेट झाली.©:
भाग 3 :महंत शिवोप्रसाद व  व गुफेचे आधुनिकीकरण

Comments

  1. As a vineyard owner, I require tractors that are both compact and effective in tight spaces. The john deere 3020 has piqued my interest because of its impressive fuel efficiency. However, I'm also looking at the john deere 4040 for its robust engine performance. The kubota b2601 stands out for its agility, while the john deere 2210 appears to be ideal for the upkeep of a smaller vineyard. At this point, I'm curious if the john deere 430 would be a more worthwhile investment for long-term usage. Which option do you recommend?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|